विराट कोहली यांची संपूर्ण माहिती Virat Kohli Information In Marathi

Virat Kohli Information In Marathi आपल्या भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट खेळाला आपल्या देशामध्ये एक धर्म मानले जाते ,आपल्या देशातील माणसे क्रिकेट आणि क्रिकेटपटूंसाठी वेडी असतात. आपला भारताचा क्रिकेट बोर्ड हा जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे.  

विराट कोहली यांची संपूर्ण माहिती Virat Kohli Information In Marathi

आपल्या भारत देशामध्ये खूप महान खेळाडू होऊन गेले. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका महान खेळाडू विषयी म्हणजे विराट कोहली यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे जागतिक क्रिकेटचा राजा मानलेल्या जाणाऱ्या विराट कोहली यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव विराट कोहली
आईचे नाव सरोज कोहली
वडिलांचे नाव प्रेम कोहली
पत्नीचे नाव अनुष्का शर्मा
मुलीचे नाव वामिका
भावाचे नाव – बहिणीचे नाव विकास कोहली भावना कोहली
जिंकलेले विश्र्वचषक २०११
पुरस्कारपद्मश्री

विराट कोहली ( Virat Kohli in Marathi )

काही दिवसांपूर्वीच क्रिकेट खेळ ऑलिम्पिक २०२८ च्या स्पर्धेमध्ये शामिल झाला ,क्रिकेट खेळ ऑलिम्पिक मध्ये शामिल होण्याचे सर्वात मोठे श्रेय विराट कोहली यांना दिले जाते ,कारण विराट कोहली हे जगप्रसिद्ध क्रिकेटपटू आहेत आणि इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया वरती सर्वात जास्त फॉलो करणाऱ्या रँक मध्ये विराट कोहली तिसऱ्या स्थानावर आहे. विराट कोहली हे  आशिया खंडातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात जास्त फॉलो केले जाणारे व्यक्ती आहेत.

विराट कोहली यांना लहानपणासूनच क्रिकेट खेळायची आवड होती ,त्यांची ही आवड त्यांच्या वडिलांनी लहानपणीच ओळखली होती आणि त्यांचे वडील त्यांना भेटवस्तू म्हणून क्रिकेटची बॅट आणत असत. विराट कोहली यांना क्रिकेट मध्ये आपले करियर करायचे होते ,त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांचा दाखला क्रिकेट अकॅडमी मध्ये केला.

विराट कोहली यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of Virat Kohli and his family in Marathi )

विराट कोहली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. विराट कोहली यांच्या वडिलांचे नाव ” प्रेम कोहली ” होते ,तर त्यांच्या आईचे नाव “सरोज कोहली” आहे. विराट कोहली यांचे  वडील वकिलीची नोकरी करत होते ,तर त्यांच्या आई गृहिणी होत्या. विराट कोहली यांना एक मोठा भाऊ आणि बहीण आहे .विराट कोहली यांच्या भावाचे नाव ” विकास कोहली ” असे आहे ,तर त्यांच्या बहिणीचे नाव ” भावना कोहली” हे आहे.

विराट कोहली यांचे प्राथमिक शिक्षण ( Primary Education of Virat Kohli in Marathi )

विराट कोहली यांचे प्राथमिक शिक्षण दिल्लीतील विशाल भरती पब्लिक येथे झाले. विराट कोहली यांनी लहानणापासूनच क्रिकेट ची आवडत होती ,त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना ८ वर्षाचे असताना क्रिकेट अकॅडमी मध्ये टाकले. विराट कोहली ज्या शाळेत शिकत होते ,त्या शाळेत खेळाला जास्त महत्व दिले जात नव्हते ,त्या शाळेचा जास्त फोकस हा अभ्यासावर होता.

या कारणामुळे विराट कोहली यांच्या वडिलांनी कोहली यांची शाळा बदलण्याचा निर्णय घेतला आणि ९ वित विराट कोहली यांचा दाखला त्यांनी कॉन्वेंट सीनीयर सेकेंडरी स्कूल येथे केला. पुढे जाऊन विराट कोहली यांनी आपले सगळे ध्यान क्रिकेट खेळण्यावरती लावले आणि त्यांनी १२ वी नंतर शाळा सोडली.

विराट कोहली यांचे क्रिकेट करियर ( Cricketing career of Virat Kohli in Marathi )

विराट कोहली यांनी २००२ मध्ये अंडर १५ खेळले होते. त्यानंतर २००४ मध्ये त्यांची निवड अंडर १७ मध्ये झाली. विराट कोहली यांचा खेळ दिवसेंदिवस चांगला होत होता. विराट कोहली यांची निवड २००८ मध्ये झालेल्या अंडर १९ विश्र्वचषक मध्ये झाली आणि या भारताच्या कप्तान पदाची जबाबदारी भारतीय क्रिकेट बोर्ड ने विराट कोहली यांच्यावर सोपवली.

विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली भारत ने २००८ मधील अंडर १९ विश्र्वचषक जिंकला. विराट कोहली यांच्या या फॉर्म मुळे वर्ष २०१० मध्ये वयाच्या २० व्या वर्षी त्यांची निवड भारतीय आंतरराष्ट्रीय संघात झाली. विराट कोहली यांचा पहिला एकदिवसीय सामना हा श्रीलंका संघा विरुद्ध होता. पुढे जाऊन २०११ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्र्वचषक मध्ये विराट कोहली यांची निवड झाली. या विश्वचषक मधील भारत आणि बांग्लादेश यांच्यामधे झालेल्या सामन्यात विराट कोहली यांनी आपले पहिले विश्र्वचषक मधील शतक लावले.

याच वर्षी २०११ मध्ये विराट कोहली यांची निवड भारताच्या टेस्ट संघात झाली. त्यावेळी भारतीय संघ टेस्ट मधे चांगला परफॉर्मन्स करत न्हवता,यातच महेंद्र सिंह धोनी यांनी टेस्ट क्रिकेटमधून निवृती घेतली. महेंद्र सिंग धोनी नंतर टेस्ट टीम च्या नेतृत्वाची जबाबदारी क्रिकेट बोर्ड ने विराट कोहली यांच्यावर सोपवली आणि तेव्हापासून भारतीय टेस्ट संघाचा खेळण्याचा अंदाजच बदलला. विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली भारत टेस्ट संघाने ५ वेळा टेस्ट मेस हा किताब जिंकला आहे.

२०१४ आणि २०१६ मध्ये झालेल्या t २० विश्वचषक मध्ये विराट कोहली यांनी सर्वात जास्त धावा बनवल्या होत्या. या दोन्ही विश्वचषक मध्ये विराट कोहली यांच्या परफॉर्मन्स मुळे त्यांना या दोन्ही विश्वचषक चा “man ऑफ द सिरीज ” चा पुरस्कार दिला होता. २०११ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी च्या अंतिम सामन्यामध्ये विराट कोहली यांनी खेळलेली पारी भारताला विश्र्वचषक जिंकण्यामध्ये महत्वाची पारी होती.

विराट कोहली यांचे आयपीएल करियर ( IPL career of Virat Kohli in Marathi )

विराट कोहली हे आयपीएल इतिहासातील सर्वात जास्त धावा करणारे खेळाडू आहेत. विराट कोहली यांना २००८ मध्ये झालेल्या ऑक्शन मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने २० लाख रुपये देऊन खरेदी केले होते. आयपीएल मधे विराट कोहली ह्यांनी सर्वात जास्त शतक मारली आहेत आणि आयपीएल च्या २०१६ पर्वामध्ये विराट कोहली यांनी ९७३ धावा केल्या आहेत. या ९७३ धावा एका खेळाडू कडून एका पर्वामध्ये केल्या जाणाऱ्या सर्वोत्तम धावा आहेत.

विराट कोहली हे सध्याचे महान खेळाडू आहेत.सध्या जगामध्ये खेळत असणाऱ्या खेळाडू मध्ये विराट कोहली यांच्या सर्वात जास्त धावा आहेत. विराट कोहली यांच्या नावावर ७८ शतक आहेत ,यातील ४८ शतके एकदिवसीय सामन्यात आली आहेत ,तर २९ शतके टेस्ट सामन्यात आली आहेत आणि १ शतक हे t २० क्रिकेट मध्ये आले आहे. विराट कोहली यांच्या नावावर खूप विक्रम आहेत. भारत सरकारकडून विराट कोहली यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता.

FAQ

विराट कोहली यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला ?

विराट कोहली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये दिल्ली येथे झाला.

विराट कोहली यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

विराट कोहली यांच्या वडिलांचे नाव ” प्रेम कोहली ” होते आणि ते दिल्लीतील एक वकील होते.

विराट कोहली यांच्या आईचे नाव काय आहे ?

विराट कोहली यांच्या आईचे नाव “सरोज कोहली ” आहे.

विराट कोहली यांच्या पत्नीचे नाव काय आहे ?

विराट कोहली यांच्या पत्नीचे नाव “अनुष्का शर्मा” आहे.

विराट कोहली यांनी कोणत्या वर्षी भारतीय आंतरराष्ट्रीय संघात प्रवेश केला ?

विराट कोहली यांनी २०१० मध्ये श्रीलंका विरुद्ध झालेल्या एकदिवसीय सामन्यामध्ये भारत संघामध्ये प्रवेश केला.

विराट कोहली यांनी कोणकोणते विश्र्वचषक जिंकले आहेत ?

विराट कोहली यांनी २०११ मध्ये झालेला एकदिवसीय विश्र्वचषक आणि २०१३ मध्ये इंग्लंड येथे झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

विराट कोहली यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

विराट कोहली यांचा भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

विराट कोहली यांचे वय किती आहे ?

विराट कोहली यांचा जन्म ५ नोव्हेंबर १९८८ मध्ये झाला होता. ते २०२३ मध्ये ३५ वर्षाचे होतील.

आतपर्यंत विराट कोहली यांनी किती शतके मारली आहेत ?

विराट कोहली यांनी आतापर्यंत ७८ शतके मारली आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण महान खेळाडू विराट कोहली यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment