विजयदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती Vijaydurg Fort Information In Marathi

Vijaydurg Fort Information In Marathi आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर किल्ले आहेत आणि त्या प्रत्येक किल्ल्यांचे विशेष महत्व आहे. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका समुद्रामध्ये स्थित असलेल्या किल्ल्या विषयी म्हणजे “विजयदुर्ग” किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे विजयदुर्ग किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Vijaydurg Fort Information In Marathi

विजयदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती Vijaydurg Fort Information In Marathi

किल्ल्याचे नाव विजयदुर्ग किल्ला
तालुका देवगड
जिल्हा सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र
उंची १०० फूट
चढाईची श्रेणी सोपी
प्रकार जलदुर्ग

विजयदुर्ग किल्ल्याची संरचना (Structure of Vijaydurg fort in Marathi)

विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील देवगड तालुक्यातील एक समुद्री किल्ला आहे. विजयदुर्ग किल्ला हा एतिहासिक समुद्री किल्ला आहे. या किल्ल्याच्या तीनही बाजूला समुद्राचे पाणी आहे.

हा किल्ला निसर्गरम्य ठिकाणी वसलेला असल्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी नेहमी पर्यटकांची गर्दी असते. विजयदुर्ग किल्ल्याला “जिब्राल्टर ऑफ द ईस्ट” ह्या नावाने देखील ओळखले जाते. विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळच एक दुसरा समुद्री किल्ला आहे आणि त्या किल्ल्याचे नाव “सिंधुदुर्ग” असे आहे.

विजयदुर्ग किल्ल्यावर असणाऱ्या भिंती ह्या 30 फूट उंच आणि १२ फूट लांब आहेत. विजयदुर्ग किल्ल्याची निर्मिती करताना गुजरात राज्यातून वाळू आणण्यात आली होती. तसेच ह्या किल्ल्याची निर्मिती करताना मोठ्या प्रमाणात दगडांचा वापर करण्यात आला होता ,त्यामुळे हा किल्ला आजही तितकाच मजबूत आहे ,जितका तो पूर्वी होता.

विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास (History of Vijaydurg fort in Marathi)

इतिहासकारांच्या मते विजयदुर्ग किल्ल्याची निर्मिती ही १२ व्या शतकात द्वितीय भोज यांच्या द्वारे करण्यात आली होती. सुरवातीला हा किल्ला साधारण ५ एकर क्षेत्रफळामध्ये विस्तारलेला होता. पुढे जाऊन विजापूर च्या आदिलशहाने या किल्ल्यावर आपला कब्जा मिळवला. आदिलशाहाच्या काळामध्ये या किल्ल्याचे नाव “गहरिया” असे होते.

आदिलशहाकडून १६५३ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि हा किल्ला मराठा साम्राज्यामध्ये सामील झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याचे नाव बदलून किल्ल्याचे नाव “विजयदुर्ग” असे केले. किल्ला जिंकल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्याची दुरुस्ती केली आणि त्यांच्या काळामध्ये हा किल्ला १७ एकर क्षेत्रफळामध्ये विस्तारला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा काळामध्ये हा किल्ला समुद्री आक्रमणापासून राज्याचे संरक्षण करत होता. मराठा साम्राज्यानंतर ब्रिटिशांनी १७५६ मध्ये हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला.

विजयदुर्ग किल्ल्याची आसपास असणारी पर्यटन स्थळे (Tourist places near Vijaydurg fort in Marathi)

विजयदुर्ग किल्ला हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आहे. सिंधुदुर्ग जिल्हा हा कोकणातील एक जिल्हा असल्यामुळे या ठिकाणी भरपूर पर्यटन स्थळे आहेत. विजयदुर्ग किल्ल्यापासून काही अंतरावरच सिंधुदुर्ग किल्ला आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याचे देखील एतहासिक महत्व असल्यामुळे ,तसेच सिंधुदुर्ग किल्ला हा निसर्गरम्य ठिकाणी वसला असल्यामुळे ,इथे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते. तुम्ही जर विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाण्याचा प्लॅन बनवत असाल ,तर तुम्ही विजयदुर्ग किल्ल्या सोबत सिंधुदुर्ग किल्ल्यासोबत सिंधुदुर्ग किल्ला देखील पाहू शकता.

तुम्हाला जर स्कुबा डायव्हिंग, पैरा सेलिंग करायचे असेल तर तुम्ही सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ जावून स्कुबा डायव्हिंग, पैरा सेलिंग आणि इतर वॉटर ॲक्टिविटीज करू शकता.

विजयदुर्ग किल्ल्या पासून काही अंतरावरच देवबाग चा बीच आहे. देवबाग च्या बीच वरून सायंकाळी सुर्यास्ताचा अप्रतिम नजरा दिसत असतो. त्यामुळे देवबाग चा बीच पाहायला जाणाऱ्यांची संख्या देखील जास्त असते.

देवबाग चा बीच हा विजयदुर्ग किल्ल्या पासून काही अंतरावरच असल्यामुळे तुम्ही विजयदुर्ग किल्ला पाहायला आल्यानंतर देवबाग चा बीच पाहण्यासाठी देखील जाऊ शकता. विजयदुर्ग किल्ल्या पासून काही अंतरावर देवगड चा समुद्री किल्ला आहे. तुम्ही हा किल्ला देखील पाहू शकता.

विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी असणारे उत्तम महिने (Best months to visit Vijaydurg fort in Marathi)

तसे तर वर्षातील कोणत्याही महिन्यात विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो ; परंतु विजयदुर्ग किल्ला हा समुद्रामध्ये वसला असल्यामुळे त्या ठिकाणी तापमान जास्त असते. उन्हाळ्यात तर ह्या किल्ल्याच्या आसपासचे तापमान हे खूपच जास्त असते ,त्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने हे हिवाळ्याचे मानले जातात.

आपण ऑक्टोंबर महिन्यापासून जानेवारी महिन्या पर्यंत केव्हाही हा किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकतो. हिवाळ्यात ह्या किल्ल्यावरून निसर्गाचा नजरा देखील अप्रतिम दिसतो ,त्यामुळे हिवाळ्यातील महिने हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम मानले जातात.

विजयदुर्ग किल्ला चालू आणि बंद होण्याची वेळ (opening and closing time for Vijaydurg fort in Marathi)

विजयदुर्ग किल्ला हा समुद्रात वसला असल्यामुळे हा किल्ला अंधार पडल्यानंतर पर्यटकांसाठी बंद केला जातो. विजयदुर्ग किल्ला हा आठवड्याचे सातही दिवस चालू असतो. हा किल्ला सकाळी १० वाजता पर्यटकांना पाहण्यासाठी चालू होतो आणि सायंकाळी ६:३० वाजेपर्यंत पर्यटकांना पाहण्यासाठी चालू असतो.

विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन (nearest Railway station from Vijaydurg fort in Marathi)

विजयदुर्ग किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे “सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन” आहे आणि हे सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन हे विजयदुर्ग किल्ल्या पासून काहीच अंतरावर आहे. देशाच्या काना कोपऱ्यातून रेल्वे “सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन” येथे येत असतात. तुम्ही देशाच्या कोणत्याही भागात राहत असाल तर, तुम्ही रेल्वे च्या मदतीने सिंधुदुर्ग “रेल्वे स्टेशन” येथे या आणि पुढे तुम्ही सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन पासून विजयदुर्ग किल्ल्यापर्यंत लोकल वाहनांच्या मदतीने जाऊ शकता.

विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळचे विमानतळ (Nearest airport from Vijaydurg fort in Marathi)

विजयदुर्ग किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे “डाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ” आहे आणि हे विमानतळ गोवा येथे स्थित आहे.

FAQ

विजयदुर्ग किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

विजयदुर्ग किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थित आहे.

विजयदुर्ग किल्ल्याचा तालुका कोणता आहे ?

विजयदुर्ग किल्ला हा देवगड तालुक्यात स्थित आहे.

विजयदुर्ग किल्ल्याची निर्मिती कोणी केली होती ?

विजयदुर्ग किल्ल्याची निर्मिती १२ व्या शतकामध्ये द्वितीय भोज यांच्या द्वारे करण्यात आली होती.

आदिलशहाच्या काळात विजयदुर्ग किल्ल्याचे नाव काय होते ?

आदिलशहाच्या काळात विजयदुर्ग किल्ल्याचे नाव “गहरिया” असे होते.

विजयदुर्ग किल्ल्याला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते ?

विजयदुर्ग किल्ल्याला दुसऱ्या “जिब्राल्टर ऑफ द ईस्ट” ह्या नावाने ओळखले जाते.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणत्या वर्षी विजयदुर्ग किल्ला जिंकला होता ?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आदिलशहाकडून १६५३ मद्ये विजयदुर्ग किल्ला जिंकला होता.

विजयदुर्ग किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे कोणकोणती आहेत ?

कोकणाला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभले आहे आणि विजयदुर्ग किल्ला हा कोकणात स्थित असल्यामुळे विजयदुर्ग किल्ल्याच्या आसपास भरपूर पर्यटन स्थळे आहेत. जसे की सिंधुदुर्ग किल्ला ,मालवण बीच ,देवबाग बीच ,देवगड किल्ला ,इत्यादी.

विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने कोणते मानले जातात ?

विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने हे ऑक्टोंबर ते जानेवारी पर्यंतचे मानले जातात.

विजयदुर्ग किल्ला चालू आणि बंद होण्याची वेळ काय आहे ?

विजयदुर्ग किल्ला हा पर्यटकांसाठी आठवड्याच्या सातही दिवस चालू असतो. हा किल्ला सकाळी १० वाजता चालू होतो आणि सायंकाळी ६:३० वाजता बंद केला जातो.

विजयदुर्ग किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे कोणते आहे ?

विजयदुर्ग किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे गोवा राज्यातील “डाबोलिम आंतरराष्ट्रीय विमानतळ” हे आहे.

विजयदुर्ग किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कोणते आहे ?

विजयदुर्ग किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे “सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशन” हे आहे.

आजच्या लेखामध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यामध्ये स्थित असलेल्या विजयदुर्ग किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण विजयदुर्ग किल्ल्यांची संरचना ,विजयदुर्ग किल्ल्याचा इतिहास ,विजयदुर्ग किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे,विजयदुर्ग किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने,विजयदुर्ग किल्ला चालू आणि बंद होण्याची वेळ ,विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन ,विजयदुर्ग किल्ल्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment