वरंधा घाटची संपूर्ण माहिती Varandha Ghat Information In Marathi

Varandha Ghat Information In Marathi आपल्याला महाराष्ट्र राज्याला निसर्गाची देणगी भेटलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर निसर्गरम्य ठिकाणे आहेत.असेच ,आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये बरेच घाट आहेत ,जे की निसर्गरम्य ठिकाणी वसले आहेत .अशाच एका निसर्गरम्य ठिकाणी वसलेल्या घाटा बद्दल म्हणजे वरंधा घाटा बद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखातून “वरंधा घाटा” विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Varandha Ghat Information In Marathi

वरंधा घाटची संपूर्ण माहिती Varandha Ghat Information In Marathi

वरंधा घाट हा महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित असून तो कोकण आणि दख्खन पठाराला जोडण्याचे काम करतो.वरंधा घाट हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात आहे आणि बरीच पर्यटक लोक हा घाट बघण्यासाठी आवडीने येतात.आजच्या लेखामध्ये आपण वरंधा घाटा विषयी म्हणजे वरंधा घाटाचे भौगोलिक महत्व ,आणि वरंधा घाटाजवळ असणाऱ्या पर्यटन स्थळा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

वरंधा घाट / Varandha ghat in Marathi

वरंधा घाट हा समुद्र सपाटीपासून ८०० मिटर च्या उंचीवर आहे आणि हा वरंधा घाट महाराष्ट्र राज्यातील कोकण भागातील महाड भागाला आणि दख्खन पठाराला जोडण्याचे काम करतो. वरंधा घाट हे निसर्गरम्य ठिकाणी वसलेले असून वरंधा घाटाजवळ असणाऱ्या जंगलांमध्ये भरपूर विविध प्रकारची झाडे आढळतात.

वरंधा घाटा ची लांबी २३ किलोमिटर इतकी असून वरंधा घाटा जवळील डोंगरावरून भरपूर नद्या वाहतात.वरंधा घाट जितका निसर्गरम्य आहे , तितकाच तो हानिकारक देखील आहे.वरंधा घाटातून गाडी चालवणे खूप कठीण आहे ,त्यामुळे आपण ह्या घाटातून प्रवास करत असताना ,गाडी नेहमी हळू चालवली पाहिजे.

घाटाचे नाव –वरंधा घाट
जिल्हा –रायगड
समुद्र सपाटी पासून उंची –८०० मिटर
जवळ असणारी पर्यटन स्थळे –रायगड किल्ला ,तोरणा किल्ला ,ठोसेघर धबधबा,इत्यादी.

इतिहासामध्ये केला जाणारा वरंधा घाटाचा वापर / Uses of Varandha ghat in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात वरंधा घाटाचा वापर कोकण भागाला दख्खन पठाराला जोडण्यासाठी केला जात होता.मराठा साम्राज्याच्या काळात हा एक व्यापार मार्ग होता.ब्रिटिश काळात देखील ब्रिटिशांनी ह्या घाटातून मुंबई आणि पुण्याला जोडणारे रेल्वे मार्ग इथे बनवले आणि आता देखील हा वरंधा घाट कोकण विभागाला दख्खन पठाराशी जोडण्याचे काम करतो.

ठोसेघर धबधबा / Thkseghar Waterfall in Marathi

वरंधा घाट हा प्राकृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या मजबूत आहे आणि पर्यटकांना पाहण्यासाठी हा घाट एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे.या वरंधा घाटाच्या जवळ खूप धबधबे आहेत ,जे की पर्यटकांना आकर्षित करतात .वरंधा घाटाजवळ असणाऱ्या प्रमुख घबधब्या पैकी ठोसेघर चा धबधबा पर्यटकांसाठी प्रसिद्ध आहे आणि हा ठोसेघर धबधबा वरंधा घाटा पासून २० किलोमिटर इतक्या अंतरावर आहे.

वरंधा घाटाजवळील किल्ले / forts near Varandha ghat in Marathi

वरंधा घाटाजवळ भरपूर ऐतिहासिक किल्ले देखील आहेत ,ज्यात तोरणा किल्ला ,रायगड किल्ला , इत्यादी किल्ल्यांचा समावेश होतो.ज्या पर्यटकांना ऐतिहासिक किल्ले बघण्याची आवड आहे ,त्यांच्या साठी वरंधा घाट हा चांगला पर्याय आहे .

ज्या लोकांना वन्य जीव पाहायला आवडतात ,त्या लोकांसाठी देखील वरंधा घाट हा चांगला पर्याय आहे.वरंधा घाटाजवळ जंगल असल्यामुळे इथे भरपूर वन्य जीव आपल्याला पाहायला मिळतात ,ज्यामध्ये भारतीय अजगराचा समावेश आहे.वरंधा घाटाजवळ असणाऱ्या जंगलांमध्ये औषधी वनस्पती देखील आढळतात ,जे की आयुर्वेदिक औषधांसाठी फायद्याचे ठरतात.

वरंधा घाट महोत्सव / Festival of Varandha Ghat in Marathi

वरंधा घाटाजवळ तेथील स्थानिक लोक दरवर्षी महोत्सव आयोजित करतात ,ज्याला वरंधा घाट महोत्सव म्हणले जाते,ज्यात तेथील स्थानिक लोक सांस्कृतिक नृत्य करतात ,याचसोबत या महोत्सव वेळी तेथील स्थानिक लोक पारंपरिक जेवणाचे देखील नियोजन करतात.

वरंधा घाटाजवळ अभयारण्ये ,किल्ले ,धबधबे आहेत ,त्यामुळे तुम्हाला जर अभयारण्ये ,किल्ले किंवा धबधबे बघायला आवडत असतील ,तर वरंधा धबधबा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय आहे.इथे जाणारे पर्यटक वरंधा घाटाजवळ असणाऱ्या निसर्गाकडे आकर्षित होतात.तुम्ही जर ट्रेकर असाल तर तुम्ही वरंधा घाटाजवळ असणाऱ्या डोंगरामध्ये ट्रेकिंग करू शकता.

तुम्हाला जर धबधबा बघायला आवडत असेल तर तुम्ही वरंधा घाटाजवळ प्रसिद्ध असणारा ठोसेघर चा धबधबा पाहू शकता, जो की वरंधा घाटा पासून २० किलोमिटर इतक्या अंतरावर आहे.तुम्ही जर किल्ले प्रेमी असाल ,तुम्हाला जर एतिहासिक किल्ले बघायला आवडत असतील तर तुम्ही वरंधा घाटाजवळ स्थित असणारे एतिहासिक किल्ले जसे की ,रायगड किल्ला ,तोरणा किल्ला ,इत्यादी किल्ले बघू शकता.

पश्चिम घाट / Westerners Ghats

वरंधा घाट हा पश्चिम घाटाचा भाग आहे .पश्चिम घाट हे जगातले आठवे उष्ण ठिकाण आहे आणि याला वर्ल्ड हेरिटेज प्लेस चे नामांकन देखील मिळाले आहे.पश्चिम घाटाची निर्मिती १५० मिलियन वर्षापूर्वी गोंडवाना च्या टकरी मुळे झाली.पश्चिम घाट हे हिमालयापेक्षा खूप जुने आहेत.हिमालयाची निर्मिती ५० मिलियन वर्षा पूर्वी झाली आणि पश्चिम घाटाची निर्मिती १५० मिलियन वर्षा पूर्वी झाली.

वरंधा घाटाजवळ भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि भारतामध्ये सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या ठिकाणांपैकी हे एक ठिकाण आहे.वरंधा घाटाजवळ दरवर्षी सरासरी ३,५०० ते ४-५०० इतका मिमी पाऊस पडतो.त्यामुळे पावसाळ्यात हा वरंधा घाट प्रेक्षणीय आकर्षण बनतो.

वरंधा घाटाचा इतिहास / History of Varandha Ghat in Marathi

वरंधा घाटाजवळ अश्मयुगीन काळातील काही अवशेष सापडले आहेत ,जसे की अश्मयुगीन काळातील हत्यारे ,मातीच्या वस्तू ,इत्यादी आणि संशोधनावरून असे समजते की ,ह्या सापडलेल्या वस्तू साधारण १०,००० वर्ष इतक्या जुन्या असून त्या मानवनिर्मित आहेत.वरंधा घाटाजवळ भरपूर प्राचीन मंदिरे देखील आहेत.या वरंधा घाटाजवळ असणारी काही प्राचीन मंदिरे ६ व्या शतकात बांधलेली आहेत.

१३ व्या शतकामध्ये वरंधा घाट हा बहमनी सत्तेचा भाग होता. बहमनी सत्ता ही एक मुस्लिम राजवट सत्त्ता होती आणि या काळात बहमनी सत्ता या वरंधा घाटाचा वापर सुपारी आणि मसाले यांना कोकण विभापासून दख्खन विभागापर्यंत पोहोवण्यासाठी केला जात होता.

FAQ

वरंधा घाट हा घाट कोणत्या राज्यात स्थित आहे ?

वरंधा घाट हा भारत देशातील महाराष्ट्र राज्यामध्ये स्थित आहे.

वरंधा घाटाची उंची समुद्र सपाटी पासून किती आहे ?

वरंधा घाटाची उंची समुद्र सपाटी पासून ८०० मिटर इतकी उंच आहे.

वरंधा घाटाची निर्मिती कशी झाली ?

वरंधा घाट हा पश्चिम घाटातील एक घाट आहे आणि या पश्चिम घाटांची निर्मिती १५० मिलियन वर्षा पूर्वी गोंडवाना च्या टकरी मुळे झाली.

वरंधा घाट हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

वरंधा घाट हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात स्थित आहे.

वरंधा घाटाची लांबी किती आहे ?

वरंधा घाटाची लांबी २३ किलो मिटर इतकी आहे .

वरंधा घाटाजवळ पर्यटकांना पाहण्यासाठी कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत ?

जर तुम्हाला धबधबे बघायला आवडत असतील तर वरंधा घाटाजवळ तुम्ही ठोसेघर धबधबा बघू शकता ,जो की सातारा जवळ आहे.जर तुम्हाला ऐतहासिक किल्ले बघायला आवडत असतील तर ,तुम्ही वरंधा घाटाजवळ असणारे ऐतहासिक किल्ले जसे की ,रायगड किल्ला ,तोरणा किल्ला ,इत्यादी किल्ले तुम्ही बघू शकता.

वरंधा घाटाची निर्मिती किती वर्षा पूर्वी झाली ?

वरंधा घाटा हा पश्चिम घाटातील एक भाग असून ,पश्चिम घाटाची निर्मिती १५० मिलियन वर्षापूर्वी झाली.

आजच्या लेखामध्ये आपण पश्चिम घाटाचा भाग असणाऱ्या वरंधा घाटा विषयी संपूर्ण माहिती जसे की ,वरंधा घाटाची निर्मिती  ,वरंधा घाटा विषयी संपूर्ण माहिती ,वरंधा घाटाचा इतिहास ,इत्यादी विषयी संपूर्ण माहिती आपण पाहिली.

Leave a Comment