वाघ प्राण्यांची संपूर्ण माहिती Tiger Animals Information In Marathi

Tiger Animals Information In Marathi वाघ शब्द ऐकला तरी आपल्याला भीती वाटते ,आपण जर प्राणी संग्रहालयात वाघ पाहिला असेल ,तर त्याची चाल आणि डरकाळी बघून आपल्या अंगावर काटा नक्की आला असेल !

Tiger Animals Information In Marathi

वाघ प्राण्यांची संपूर्ण माहिती Tiger Animals Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण भारताचा राष्ट्रीय प्राणी असणाऱ्या वाघ प्राण्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे वाघा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

प्राण्याचे नाव वाघ
गण मांसाहारी
संघ कौरेडेटा
वर्ग स्तनधारी
कुळ फेलीडाय
वंश पँथेरा

वाघ (Tiger in Marathi)

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.भारत देशासोबत वाघ हा बांगलादेश ,दक्षिण कोरिया आणि मलेशिया या देशांचा देखील राष्ट्रीय प्राणी आहे.वाघ हा जंगलातील शक्तिशाली प्राण्यांपैकी एक शक्तिशाली प्राणी आहे.वाघ हा पिवळ्या रंगाचा असून ,त्याच्या शरीरावर काळे पट्टे असतात.

इतर प्राण्यांप्रमाणे वाघाला देखील चार पाय असतात.वाघ हा प्राणी जंगलातील इतर प्राण्यांना मारून आपला उर्द्रनिर्वाह करत असतो.वाघाचा धावण्याचा वेग जास्त असतो .तो ५० ते ६० किलोमिटर प्रती तासाने धावू शकतो.वाघ चपळ देखील असतात.

जंगली प्राण्यांची कमी होणारी संख्या (Decreasing numbers of wild animals in Marathi)

वाढत्या जंगलतोड आणि अधिक प्रमाणात प्राण्यांना मारल्यामुळे दिवसेंदिवस जंगली प्राण्यांची संख्या कमी कमी होत चालली आहे आणि या प्राण्यांच्या कमी होणाऱ्या संख्येमध्ये सर्वस्वी आपण मानव जबाबदार आहे.आपण आपल्या स्वार्थासाठी प्राण्यांची हत्या करतो.

प्राण्यांच्या या कमी होण्याच्या प्रमाणामध्ये वाघ प्राणी देखील आहे.वाघांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.माणसाने जर जंगलतोड आणि प्राण्यांना मारण्या चे प्रमाण कमी केले नाही तर भविष्यात आपल्या पुढच्या पिढीला जंगली प्राणी फक्त पुस्तकातच बघायला भेटतील.

आताच्या काळात आपल्याला वाघ बघायचा असेल तर तो आपल्याला जास्तकरून प्राणी संग्रहालयात दिसतो.जर वाघ जंगलात असेल आणि माणसाने त्याची विनाकारण छेड काढली ,तर तो आपल्यावर हल्ला देखील करू शकतो.पूर्वी आपल्या देशातील राजे महाराजे आवड म्हणून वाघांची शिकार करत होते.

वाघाची राहण्याची जागा (Living place of Tiger in Marathi)

जास्तकरून वाघ हे जंगलात राहतात , वाघांच्या प्रजाती जास्तकरून एकटे राहणे पसंद करतात.काही वाघ गुहेत देखील राहतात.त्यांना जेव्हा भूक लागते ,तेव्हा ते बाहेर शिकार करण्यासाठी येतात आणि भेटेल त्या जंगली प्राण्याची शिकार ते करतात.याचबरोबर वाघ हा प्राणी आपल्याला प्राणी संग्रहालयात देखील दिसतो.

प्राणी संग्रहालयात वाघाच्या भोजनाची सोय केलेली असते आणि पर्यटकांना वाघ बघण्यासाठी निश्चित रक्कम ठेवलेली असते.पर्यटक ती रक्कम बघून प्राणी संग्रहालयातील वाघ बघू शकतात.

वाघाच्या प्रजाती ( Species of Tigers in Marathi )

जगभरामध्ये वाघांच्या ७ ते आठ प्रजाती आढळतात.या ७ ते ८ प्रजाती मधील बाली वाघ आणि कैस्पियन वाघाच्या प्रजाती नष्ट होण्याच्या कगारिवर आहेत.

भारतामध्ये या ठिकाणी वाघ हा प्राणी आढळला जातो ( Tigers is found in this places in India in Marathi )

भारतामध्ये तसे तर सर्व ठिकाणी वाघ हा प्राणी आढळला जातो.यामध्ये पंजाब आणि राजस्थान राज्याच्या उत्तर दिशेला असलेल्या वाळवंटामध्ये वाघ आढळला जातो.तसेच हिमालय मधील खूप उंचीच्या ठिकाणी देखील वाघ हा प्राणी आढळला जातो.भारतामध्ये जास्त करून वाघ हा प्राणी ६०० ते ७०० मीटर ची उंची असणाऱ्या प्रदेशांमध्ये आढळला जातो.भारतातील बंगाल टायगर्स जगभरात प्रसिद्ध आहेत.

वाघाच्या शरीराचे वर्णन ( Description of Tigers Body in Marathi )

वाघ हे बघितल्यावरच ते किती तागदवर असतील ,याचा अंदाज आपण लावू शकतो.वाघाची उंची १ मीटर इतकी असते ,तर वाघाची लांबी ३ मिटर इतकी असते.साधारण नर वाघाचे वजन २५० किलो ग्रॅम इतके असते .नर वाघाच्या तुलनेत मादी वाघाचे वजन कमी असते.साधारण मादी वाघाचे वजन ५० किलो ग्रॅम इतके असते.आपण जर वाघ बघितला असेल तर ,वाघाची चाल आपल्याला मोहित करून सोडते तर, वाघाची डरकाळी आपल्या अंगावर रोमांच उभे करते.

वाघांचे प्रजनन ( Breeding of Tigers in Marathi )

मादी वाघ एका वेळी एक ते सहा छोट्या वाघांना जन्म देऊ शकते.नुकत्याच जन्मलेल्या या वाघाचे वजन साधारण २ किलो ग्रॅम इतके असते.सुरवातीला काही दिवस त्या छोट्या जन्मलेल्या वाघाचे डोळे मिटलेले असतात आणि जेव्हा ते छोटे जन्मलेले वाघ दोन पेक्षा जास्त वर्षाचे होतात ,तेव्हा ते आपले एकटे फिरायला लागतात.

जागतिक वाघ दिवस आणि तो साजरा करण्या मागचा उद्देश (International Tigers Day and motive of celebrating National Tigers Day in Marathi)

२०२० मध्ये रशिया देशात झालेल्या वाघ संवर्धन परिषदेत जागतिक वाघ दिवस साजरा करण्याची घोषणा करण्यात आली होती.जागतिक वाघ दिवस हा दरवर्षी २९ जुलै या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.या दिवशी जगभरात वाघा सबंधी कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

जागतिक वाघ दिवस साजरा करण्यामागे हाच उद्देश होता की ,”वाघांची संख्या वाढण्यासाठी प्रयत्न करणे आणि जेवढे वाघ जिवंत आहेत ,त्यांचे संवर्धन करणे “.२० व्या शतकाच्या सुरवातीला जगभरातील वाघांची संख्या १ लाख इतकी होती ,परंतु वर्तमानात तीच संख्या हजारांमध्ये आली आहे.वाघांच्या या कमी होण्याला कुठेतरी आळा बसावा यासाठी या “जागतिक वाघ दिवस ” दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

वाघा सबंधी असणाऱ्या १० रोचक गोष्टी(10 interesting facts about Tigers in Marathi)

१) वाघ एका तासामधे ६० किलो मिटर पर्यंत धावू शकतो.

२) वाघ हा प्राणी एकावेळी ३० किलो ग्रॅम इतके मांस खाऊ शकतो.

३) वाघ हा २० फूट लांब पर्यंत उडी मारू शकतो ,तसेच तो १२ फूट वर उडी मारू शकतो.

४) वाघाच्या मेंदूचे वजन ३०० ग्रॅम च्या आसपास असते.

५) जास्तकरून वाघ हे जंगलामध्ये आढळतात ,परंतु काही देशातील लोक वाघाला पाळतात.

६) वाघाचा आवाज तीन किलो मीटर लांब पर्यंत ऐकला जाऊ शकतो.

७) वाघाचे वरील दात ३० सेंटी मीटर इतके लांब असतात.

८) जन्मलेल्या वाघाला एका आठवड्यापर्यंत पाहता येत नाही.

९) वाघांची अंधारा मध्ये पाहण्याची क्षमता इतर प्राण्यांपेक्षा जास्त असते.

१०) जेवढे वाघ संपूर्ण जगात आढळतात ,त्यातील ७० % वाघ हे भारत देशात आढळतात.

FAQ

भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण आहे ?

वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे.

नर वाघ आणि मादी वाघ यांचे वजन किती असते ?

नर वाघाचे वजन साधारण २५० किलो ग्रॅम असते ,तर मादी वाघाचे वजन ५० किलो ग्रॅमच्या आसपास असते.

मादी वाघ एका वेळेला किती वाघांना जन्म देते ?

मादी वाघ एका वेळेला १ ते ६ वाघांना जन्म देऊ शकते.

जागतिक वाघ दिवस हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?

जागतिक वाघ दिवस हा जगभरामध्ये दरवर्षी २९ जुलै या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

जागतिक वाघ दिवस साजरा करण्या मागे काय उद्देश आहे ?

जागतिक वाघ दिवस हा दरवर्षी जगभरामध्ये २९ जुलै या दिवशी साजरा केला जातो.”वाघांची कमी होणारी संख्या रोखण्यासाठी आणि जे वाघ जिवंत आहेत ,त्या वाघांचे संवर्धन होण्यासाठी प्रयत्न करणे” हे जागतिक वाघ दिवस साजरा करण्यामागचे उदेश आहे.

वाघाचा वेग किती असतो ?

वाघ हे एका तासात ६० किलो मीटर इतके अंतर पार करू शकतात.

वाघाचा गण कोणता ?

वाघ प्राणी हा मांसाहारी प्राणी आहे.

वाघाचा संघ कोणता ?

वाघ हा ” कौरेडेटा” या संघाचा प्राणी आहे.

वाघाचे कुळ कोणते आहे ?

वाघाचे कुळ “फेलीडाय” हे आहे.

वाघ प्राणी हा कोणत्या वंशाचा प्राणी आहे ?

वाघ प्राणी हा “पँथेरा” वंशाचा प्राणी आहे.

आजच्या लेखामध्ये आपण भारताचा राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या वाघा विषयी संपूर्ण माहिती पाहिली.तुम्हाला आजच्या लेखातून वाघा विषयी माहिती समजली असेल.

Leave a Comment