ताजमहलची संपूर्ण माहिती Taj Mahal Information In Marathi

Taj Mahal Information In Marathi ताजमहल हे जगाच्या सात आश्चर्यापैकी एक आश्चर्य आहे आणि हे आश्चर्य आपल्या भारतामध्ये आहे. ताजमहल ला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. दरवर्षी जगभरातून लाखो पर्यटक ताजमहल ला भेट देण्यासाठी येत असतात. आजच्या लेखामध्ये आपण ताजमहल विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे ताजमहल विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Taj Mahal Information In Marathi

ताजमहलची संपूर्ण माहिती Taj Mahal Information In Marathi

वास्तूचे नाव ताजमहल
जिल्हा आग्रा,उत्तर प्रदेश
निर्मितीचा कालावधी १६३२-१६५३
निर्मिती शहाजहान
जवळील पर्यटन स्थळे जामा मस्जिद ,रामबाग ,लाल किल्ला ,मेहताब बाग,फतेहपुर सिक्री,इत्यादी.

ताजमहल (Taj Mahal in Marathi)

ताजमहल हा भारताचा गौरव आहे. ताजमहल हे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा जिल्ह्यामध्ये स्थित आहे. आग्रा जिल्हा हा उत्तर प्रदेश राज्यातील तिसरा मोठा जिल्हा आहे. त्याकाळी मुघल आग्राचे सौंदर्य पाहून प्रभावित झाले होते. इतिहासकारांच्या मते आग्रा शहर हे इब्राहिम लोदी यांनी १५०४ मध्ये वसवले होते.

त्यांनी दिल्ली ला आपल्या साम्राज्याची राजधानी बनवण्या अगोदर ,आग्रा ला राजधानी बनवले होते. इथे आग्रा मध्ये पुढे “ताजमहल” बनवण्यात आले. असे म्हणतात की ,”आज आपण कितीही पैसे खर्च केले तर ,ताजमहल सारखी दुसरी इमारत बांधू नाही शकत”.

यमुना नदीच्या काठी स्थित असलेले संगमरवरी दगडापासून बनवण्यात आलेले भव्य दिव्य वस्तू म्हणजे ताजमहल. ताजमहल पाहण्यासाठी भारत देशासोबत इतर देशातील माणसे देखील येत असतात. ताजमहल ला भेट देणारी माणसे ताजमहल चे सौंदर्य पाहून आश्चर्यचकित तर होतातच ,यासोबत ते ताजमहल च्या सौंदर्याच्या प्रेमात देखील पडतात आणि ताजमहल पाहण्याचा अनुभव ते लवकर विसरत नाहीत.

ताजमहल ला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. मुमताज ही बादशाह शाहजहान ची दुसरी पत्नी होती. मुघल बादशाह शाहजहान ने आपल्या दुसऱ्या पत्नी मुमताज साठी ताजमहल ची निर्मिती केली होती. बादशाह शाहजहान चे आपल्या पत्नीवर खूप प्रेम होते आणि त्याने या प्रेमासाठी ताजमहल ची निर्मिती करण्याचे ठरवले होते.

ताजमहल चा इतिहास (History of Taj Mahal in Marathi)

आग्रा शहर हे दिल्ली पासून साधारण २०० किलो मिटर च्या अंतरावर आहे. ताजमहल ची निर्मिती करण्यासाठी बगदाद देशातून दगडावर कोरीव काम करणाऱ्या कारागिराला बोलवण्यात आले होते ,तसेच मध्य आशियातील बुखारा शहरातून संगमरवरी दगडावर फुलांच्या आकृती सारखे कोरीव काम करणाऱ्या कारागिराला बोलवण्यात आले होते. ताजमहल चा मिनारा बनवण्यासाठी समरकंद शहरातून कुशल कारागीराला बोलवण्यात आले होते.

ताजमहल बनवण्यापूर्वी जगभरातील विविध प्रांतातील ३६ कुशल कारागीरांना बोलवण्यात आले होते. ह्या ३६ कुशल कारागिरांच्या हाताखाली वीस हजार पेक्षा जास्त कारागीर ताजमहल बनवण्यासाठी मदत करणार होते.

ताजमहल बनवण्यासाठी सामग्री जसे की , संगमरवरी दगड हे राजस्थान मधून आणण्यात आले होते ,तसेच दुर्मिळ दगडांना जगातील विविध प्रांतातून आणण्यात आले होते.

ताजमहल ची निर्मिती करण्यास वर्ष १६३० पासून सुरवात करण्यात आली होती आणि ताजमहल बनून पूर्ण होण्यात तब्बल २२ वर्षाचा कालावधी लागला होता. ताजमहल बनवण्यासाठी २०,००० पेक्षा जास्त मजदुरांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती.

आपण अंदाज लावू शकतो की ,”ताजमहल २०,००० मजदुरांच्या मदतीने बनून पूर्ण होण्यासाठी २२ वर्षाचा कालावधी लागला असेल तर ,ताजमहल हे किती अप्रतिम वास्तुकला असेल ते !” ताजमहल ची उंची ६० फूट इतकी आहे आणि रुंदी ८० फूट इतकी आहे.

ताजमहल च्या आसपास असणारी पर्यटन स्थळे (tourist places near Taj Mahal in Marathi)

ताजमहल हे जगातील सात आश्चर्या पैकी एक आश्चर्य आहे. आपल्याला जर ताजमहल पाहायचा असेल तर, आपण ताजमहल पाहण्यासाठी पिकनिक चे नियोजन करू शकतो. चला तर आता आपण ताजमहल च्या आसपास असणाऱ्या काही पर्यटन स्थळांविषयी माहिती जाणून घेऊयात.

१) आग्रा किल्ला – आग्रा किल्ल्याला “लाल किल्ला” देखील म्हणले जाते. आग्र्याचा लाल किल्ला हा ताजमहल पासून काहीच अंतरावर स्थित आहे. लाल किल्ल्याची निर्मिती ही १५६५ मद्ये मुगल बादशाह अकबर द्वारे करण्यात आली होती. लाल किल्ला हा लाल दगडापासून बनवण्यात आला होता,म्हणून त्याला “लाल किल्ला” असे नाव पडले. लाल किल्ल्यावर जहांगीर महल देखील आहे ,ज्याला “शिष महल” देखील म्हणले जाते.

२) फतेहपुर सिक्री – मुघल बादशाह औरंगजेबाने गुजरात च्या विजयानंतर फतेहपुर सिक्री ला आपल्या प्रदेशाची राजधानी बनवले होते. हे फतेहपूर सिक्री हे आग्रा शहरापासून ३५ किलो मीटर च्या अंतरावर स्थित आहे. या फतेहपुर सिक्री शहरात आपल्याला मुघलांच्या काळातील वास्तुकला पाहायला मिळतील.

३) मेहताब बाग – आग्रा शहरापासून जवळच यमुना नदीच्या विरुद्ध दिशेला मेहताब बाग आहे. मेहताब बाग मध्ये विविध प्रजातीचे झाडे आपल्याला पाहायला मिळतील. तसेच इथे मेहताब बाग मद्ये विविध प्रजातीचे फुले देखील आपल्याला पाहायला मिळतील. मेहताब बाग वरून ताजमहल चा अप्रतिम नजारा आपल्याला दिसतो.

४) रामबाग – १५२८ मद्ये मुघल शासक बाबर याने रामबाग ची निर्मिती केली होती. रामबाग ही मुघल शासकांनी निर्मित केलेल्या सर्वात जुन्या बागे पैकी एक बाग आहे. रामबाग ही ताजमहल च्या उत्तर दिशेला दीड किलो मीटर अंतरावर स्थित आहे.

५) जामा मस्जिद – मुघल बादशहा जहांगीर च्या मुलीच्या आठवणीत १६४८ मध्ये जामा मस्जिद ची निर्मिती करण्यात आली होती.

ताजमहल पाहण्यासाठी उत्तम महिने (Best months to visit Taj Mahal in Marathi)

तसे तर आपण वर्षाच्या कोणत्याही महिन्यात ताजमहल पाहण्यासाठी जाऊ शकतो. ताजमहल चे सौंदर्य हे वर्षाच्या बाराही महिन्यात आपले मन मोहून टाकते ; परंतु काही लोकांच्या मते हिवाळ्यातील महिने ताजमहल पाहण्यासाठी उत्तम मानले जातात.

FAQ

ताजमहल ची निर्मिती कोणी केली होती ?

ताजमहल ची निर्मिती मुघल बादशहा शाहजहान द्वारे करण्यात आली होती.

ताजमहल ची निर्मिती करण्यासाठी किती मजदुरांचा वापर करण्यात आला होता ?

ताजमहल ची निर्मिती करण्यासाठी २०,००० हून अधिक मजदुरांचा वापर करण्यात आला होता.

ताजमहल संपूर्ण बनण्यासाठी किती वर्षांचा कालावधी लागला होता ?

ताजमहल संपूर्ण बनण्यासाठी २२ वर्षाचा कालावधी लागला होता.

शाहजहाने कोणाच्या आठवणीत ताजमहल ची निर्मिती केली होती ?

शाहजहाने आपल्या दुसऱ्या पत्नी मुमताज च्या आठवणीत ताजमहल ची निर्मिती केली होती.

ताजमहल ला कशाचे प्रतीक मानले जाते ?

ताजमहल ला प्रेमाचे प्रतीक मानले जाते. मुघल बादशहा शाहजहान याने आपल्या पत्नीच्या आठवणीमध्ये ताजमहल ची निर्मिती केली होती.

ताजमहल हे कोणत्या राज्यात स्थित आहे ?

ताजमहल हे उत्तर प्रदेश राज्यातील आग्रा जिल्ह्यात स्थित आहे.

ताजमहल चा उंची आणि रुंदी किती फूट आहे ?

ताजमहल ची उंची ६० फूट इतकी आहे तर रुंदी ८० फूट इतकी आहे.

ताजमहल च्या आसपास कोणती पर्यटन स्थळे आहेत ?

ताजमहल हे जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे आणि ताजमहल पाहण्यासाठी जगातील विविध भागातून पर्यटक इथे येत असतात. ताजमहल च्या आसपास “जामा मस्जिद ,रामबाग ,लाल किल्ला ,मेहताब बाग,फतेहपुर सिक्री,इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.

ताजमहल पाहण्यासाठी उत्तम महिने कोणते मानले जातात ?

आपण वर्षाच्या कोणत्याही महिन्यात ताजमहल पाहण्यासाठी जाऊ शकतो ; परंतु हिवाळ्यातील महिने ताजमहल पाहण्यासाठी उत्तम मानले जातात.

ताजमहल हे कोणत्या नदीच्या किनारी स्थित आहे ?

ताजमहल हे यमुना नदीच्या काठी स्थित आहे.

आजच्या लेखामध्ये आपण जगातील सात आश्चर्या पैकी एका आश्चर्या विषयी म्हणजे ताजमहल विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण ताजमहल विषयी माहिती ,ताजमहल चा इतिहास ,ताजमहल च्या आसपास असणारी पर्यटन स्थळे ,ताजमहल पाहण्यासाठी उत्तम महिने, ताजमहल विषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment