सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती Sindhutai Sapkal Information In Marathi

Sindhutai Sapkal Information In Marathi आपल्या भारत देशामध्ये भरपूर थोर समाजसुधारक होऊन गेले ,त्या सर्व थोर समाजसुधारकांनी देशातील लोकांची सेवा केली. आजच्या लेखामध्ये आपण अशा एका थोर समाजसुधारका विषयी म्हणजे “सिंधुताई सपकाळ” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे सिंधुताई सपकाळ यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या कार्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Sindhutai Sapkal Information In Marathi

सिंधुताई सपकाळ यांची संपूर्ण माहिती Sindhutai Sapkal Information In Marathi

नाव सिंधुताई सपकाळ
जन्म १४ नोव्हेंबर १९४८
वडिलांचे नाव अभिमान साठे
पतीचे नाव श्रीहरी सपकाळ
मृत्यू ४ जानेवारी २०२२

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब  ( Birth of Sindhutai Sapkal and his family in Marathi )

थोर समाजसुधारक सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात एका गरीब कुटुंबात झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या वडिलांचे नाव “अभिमान साठे”असे होते.

लहानपणी सिंधुताई सपकाळ यांना हलाखीची परिस्थितीचा सामना करावा लागला ,त्यांना गरीब परिस्थितीमुळे नवे कपडे भेटत नसे ,त्या जुनी पुराणी कपडे घालत असत. घरच्या परिस्थितीमुळे सिंधुताई सपकाळ यांना कमी वयातच शाळा सोडावी लागली. सिंधुताई सपकाळ या फक्त चौथी पर्यंत शिकल्या. घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे सिंधुताई सपकाळ यांचे खूप कमी वयात लग्न झाले.

सिंधुताई सपकाळ यांचा जीवन संघर्ष (life struggles of Sindhutai Sapkal in Marathi )

सिंधुताई सपकाळ यांनी जीवनभर संघर्ष केला. कमी वयातच त्यांचा विवाह त्यांच्या वयापेक्षा १० वर्ष मोठ्या असलेल्या व्यक्तीशी झाला. त्यांच्या पतीचे नाव ” श्रीहरी सपकाळ” असे होते. सिंधुताई चे सासर जिथे होते ,तेथील मोठी जमीनदार लोक स्त्रियांवर अत्याचार करत आणि ते स्त्रियांचे शोषण करत. सिंधुताईंनी हा स्त्रियांवर होणारा अन्याय सहन न करायचे ठरवले आणि सिंधूताईंनी स्त्रियांवर शोषण आणि अत्याचार करणाऱ्या लोकांविरुद्ध आवाज उठवला.

जेव्हा सिंधुताई सपकाळ या गरोदर होते तेव्हा समाजातील काही माणसांनी सिंधूताईंवर आरोप लावला की ,” हे जे सिंधूताईंच्या पोटातील बाळ आहे ते दुसऱ्या कोणाचे तरी आहे .”  सिंधूताईंची बाजू खरी होती तरीही त्यांच्या पतीने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्या गरोदर असून देखील त्यांच्यावर मारहाण केली आणि त्यांच्या पतीने सिंधुताई यांना घराबाहेर काढले.

सिंधुताई यांच्या पोटामध्ये बाळ असल्यामुळे त्या कमजोर पडू लागल्या. अशा परिस्थितीत सिंधुताई सपकाळ आपल्या आईकडे माहेरी गेल्या. आईने देखील सिंधुताई यांना घरातून बाहेर काढले. त्यावेळी सिंधुताई यांना वाटले की ,” आपले या जगात कोणच नाही” .

अशा वेळी त्यांना खूप वेळा स्वतःचा जीव घेण्याचा विचार देखील त्यांच्या मनामध्ये आला ,परंतु आपल्या पोटातील बाळाकडे बघून त्यांनी तो विचार आपल्या मनातून हाकलून लावला. सिंधुताई सपकाळ यांना मुलगी झाली आणि त्यांच्या मुलीचा जन्म हा गोठ्यात झाला. सिंधुताई सपकाळ या आपला आणि आपल्या मुलीचा उदरनिर्वाह करण्यासाठी रेल्वे स्टेशन वरती  भिक मागत.

सिंधुताई यांनी केलेली समाजसेवा (Social works of Sindhutai Sapkal in Marathi)

काही काळानंतर सिंधुताई सपकाळ या आपल्या मुलीला घेऊन महाराष्ट्र राज्यातील चिखलदरा येथे आल्या. चिखलदरा येथे वाघ संरक्षण प्रकल्प होणार होता आणि त्यासाठी २४ आदिवासी गावातील लोकांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागणार होते.

सिंधुताईनी त्या २४ गावातील आदिवासांची पिडा समजली आणि त्यांनी त्यांच्यासाठी आवाज उठवायचा निर्णय घेतला .त्यांनी यासाठी प्रयत्न केले ,त्यांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांच्या प्रयत्नांना यश आले . सिंधुताईनी आपले पुढचे आयुष्य अशा गरीब आणि ज्यांना आईवडील नाहीत ,अशा लोकांची सेवा करण्यासाठी खर्च करायचे ठरवले.

सिंधुताई यांनी खूप गरीब आणि आदिवासी मुलींना दत्तक घेतले ,आणि त्यांनी त्या मुलींचे पालन पोषण करण्यासाठी दिवसरात्र कष्ट गेले. त्या सगळ्या मुली सिंधुताई सपकाळ यांना ” माय” म्हणून हाक मारत .तेव्हापासून सिंधुताई सपकाळ यांना ” अनाथांची माय” म्हणले जाते.

सिंधुताई यांनी केली आश्रमाची निर्मिती (Ashram established by Sindhutai Sapkal in Marathi )

काही वर्षांनंतर सिंधुताई सपकाळ यांनी आश्रमाची स्थापना केली .या आश्रमंच्या मदतीने सिंधुताई यांनी १२०० गरीब घरातील मुलींना दत्तक घेतले होते आणि त्या मुलींना चांगले शिक्षण देत होत्या. वर्तमानात याच सिंधुताईनी सांभाळ केलेल्या मुलींमधील काही मुली डॉक्टर आहेत ,तर काही मुली इंजिनियर आहेत. आज त्या मुलींपैकी सर्व मुली उच्च स्तरावर पोहोचल्या आहेत.या मुलींच्या यशामागचे बऱ्यापैकी श्रेय हे सिंधुताई सपकाळ यांना जाते.

सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या आयुष्यभर लोकांची सेवा केली. त्यांनी अनाथ मुलींना दत्तक घेतले आणि त्यांच्या जेवणाची आणि शिक्षणाची सोय त्यांनी केली. सिंधुताई यांनी विधवा महिलांना देखील आश्रय दिला. त्याकाळी सिंधुताई यांनी ६ आश्रमांची स्थापना केली होती. आश्रमात होणाऱ्या खर्चासाठी सिंधुताई यांनी कधीच कोणत्या श्रीमंत व्यक्तीला व राजकीय नेत्यांना मदत मागितली नाही.

सिंधुताई सपकाळ यांना मिळालेले पुरस्कार ( Awards received by Sindhutai Sapkal in Marathi )

सिंधुताई यांनी केलेल्या समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांना भरपूर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. सिंधुताई यांनी आपल्या जीवनभर महिलांच्या विकासासाठी प्रयत्न केले,त्यांच्या या कामासाठी त्यांना भारत सरकारकडून ८ मार्च २०१८ मधे महिला दीन दिवशी ” नारी शक्ती पुरस्कार” देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच भारत सरकारकडून सिंधुताई सपकाळ यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला होता. सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या कामासाठी ७५० हून अधिक पुरस्कार देण्यात आले आहेत.

सिंधुताई सपकाळ यांचे निधन (Death of Sindhutai Sapkal in Marathi )

सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या जीवनभर समाजाची सेवा केली. त्यांनी अनाथ मुलींना सहारा दिली ,त्या १२०० अनाथ मुलींच्या माय झाल्या. अशा या सिंधुताई सपकाळ यांचे निधन वयाच्या ७३ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने ४ जानेवारी २०२२ मध्ये पुणे येथे झाले.

FAQ

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म केव्हा झाला ?

सिंधुताई सपकाळ यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील वर्धा जिल्ह्यात झाला.

सिंधुताई सपकाळ यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

सिंधुताई सपकाळ यांच्या वडिलांचे नाव ” अभिमान साठे” असे होते.

सिंधुताई सपकाळ यांच्या पतीचे नाव काय होते ?

सिंधुताई सपकाळ यांच्या पतीचे नाव ” श्रीहरी सपकाळ” असे होते.

सिंधुताई सपकाळ यांनी कोणते कार्य केले ?

सिंधुताई सपकाळ यांनी आपल्या जीवनभर लोकांची सेवा केली. त्यांनी अनाथ मुलींना दत्तक घेतले आणि त्यांनी त्या अनाथ मुलींना चांगले शिक्षण दिले.सिंधुताई सपकाळ यांनी १२०० अनाथ मुलींना दत्तक घेतले होते.त्या मुली सिंधुताई यांना ” माय” या नावाने हाक मारत. वर्तमानात या दत्तक घेतलेल्या मुली चांगल्या स्तरावर आहेत.

सिंधुताई सपकाळ यांनी किती आश्रमांची स्थापना केली होती ?

सिंधुताई सपकाळ यांनी ६ आश्रमांची स्थापना केली होती.

सिंधुताई सपकाळ यांना त्यांच्या कार्यासाठी त्यांना कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

सिंधुताई सपकाळ यांच्या समाजसेवेच्या कामासाठी त्यांचा सन्मान ७५० हून अधिक पुरस्कार देऊन करण्यात आला आहे. भारत सरकारकडून सिंधुताई सपकाळ यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

सिंधुताई सपकाळ यांचे निधन केव्हा झाले ?

सिंधुताई सपकाळ यांनी आपले जीवन समाजसेवेसाठी खर्च केले. त्यांचे निधन ४ जानेवारी २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे वयाच्या ७३ व्या वर्षी झाले.

आजच्या लेखामधून आपण थोर समाजसुधारक सिंधुताई सपकाळ यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. आजच्या लेखामध्ये आपण अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनातील संघर्ष ,त्यांनी केलेली कार्ये ,त्यांच्या कामासाठी त्यांना मिळालेले पुरस्कार याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment