सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती Sindhudurg Fort Information In Marathi

Sindhudurg Fort Information In Marathi आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी भरपूर नवीन किल्ल्यांची बांधणी केली ,तसेच त्यांनी भरपूर जुन्या किल्ल्यांना नवे रूप दिले ,किल्ले बांधण्यामागे एक महत्वाचा उद्देश्य हा होता की ,ज्या भागामध्ये तो किल्ला आहे ,”त्या भागाची पाहणी किल्ल्यावरून होईल आणि त्या प्रदेश वरती होणारे परकीय सत्तांच्या आक्रमनापासून प्रदेशाचे रक्षण होईल”.

Sindhudurg Fort Information In Marathi

सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती Sindhudurg Fort Information In Marathi

महाराजांनी बांधलेले किल्ले आजही आपल्या महाराष्ट्रात आहेत आणि आजही ते किल्ले मावळ्यांनी केलेल्या पराक्रमाची गाथा सांगत अभिमानाने उभे आहेत.अशाच एक किल्ल्या बद्दल म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

सिंधू म्हणजे समुद्र आणि दुर्ग म्हणजे किल्ला ,समुद्रातील किल्ला म्हणून या किल्ल्याला “सिंधुदुर्ग” असे नाव देण्यात आले होते.वर्ष २०१० मध्ये महाराष्ट्र राज्याने ह्या किल्ल्याला “राष्ट्रीय सुरक्षित स्मारक” म्हणून घोषित केले होते.

किल्ल्याचे नाव –सिंधुदुर्ग
प्रकार –जलदुर्ग
जिल्हा –सिंधुदुर्ग ,महाराष्ट्र
स्थापना वर्ष –१६६४
जवळचा प्रदेश –मालवण ,सिंधुदुर्ग
डोंगर रांग –सिंधुदुर्ग
ठिकाण –सिंधुदुर्ग जिल्हा ,महाराष्ट्र
किल्ला चढणे –सोपे
किल्ल्याची सध्याची स्थिती –चांगली

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात असणारे किल्ल्यांचे महत्त्व / Importance of forts in chatrapati shivaji Maharaj’s era in Marathi

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांनी ३६२ च्या आसपास किल्ल्यांची निर्मिती केली होती .त्या काळात बऱ्यापैकी किल्ले हे जमिनीवर होते ,जे की जमिनी वरील आक्रमणापासून प्रदेशाचे रक्षण करत होते ,परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी समुद्री आक्रमणापासून प्रदेशाचे रक्षण करण्यासाठी समुद्री किल्ले बांधण्याचा निर्णय घेतला आणि यातच त्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती करायचे ठरवले .

समुद्रामध्ये असणाऱ्या किल्ल्यांपैकी एक किल्ला सिंधुदुर्ग किल्ला आहे.सिंधुदुर्ग किल्ल्याची ज्या चार कोळी लोकांनी योग्य जमीन ठरवली त्या चार कोळी लोकांना राज्यांकडून बक्षीस म्हणून गावे द्यायचे ठरवले.

सिंधुदुर्ग किल्ला / Sindhudurg fort in Marathi

सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी संपूर्ण भारतातील पर्यटक येत असतात.सिंधुदुर्ग किल्ल्या पर्यंत पोहचण्यासाठी बोट ची मदत घ्यावी लागते.सिंधुदुर्ग किल्ला हा अरबी समुद्रामध्ये स्थित आहे.सिंधुदुर्ग किल्ल्याचा मुख्य प्रवेश द्वार समुद्र किनाऱ्यावरून दिसत ही नाही ,बोटीतून सिंधुदुर्ग किल्ल्याकडे थोडे पुढे गेल्यानंतर सिंधुदुर्ग किल्ल्याचे मुख्य प्रवेश द्वार दिसते.

भारत देशातील महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग राज्यात सिंधुदुर्ग किल्ला आहे.हा किल्ला मुंबई च्या दक्षिणेला आहे.हा किल्ला ४८ एकर मध्ये पसरलेला असून या किल्ल्या वर असणाऱ्या तटबंदी ची लांबी साधारण ३ किलोमिटर एवढी आहे.

ह्या सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज यांनी वर्ष १६६४ मध्ये केली होती .सिंधुदुर्ग किल्ला हा ज्या जिल्ह्यात आहेत त्या जिल्ह्याला सिंधुदुर्ग किल्ल्यामुळे ” सिंधुदुर्ग ” असे नाव पडले होते.सिंधुदुर्ग किल्ला बांधून पूर्ण होण्यासाठी ३ वर्ष इतका वेळ लागला होता आणि हा सिंधुदुर्ग किल्ला ४८ एकर च्या एरिया मध्ये विस्तारला आहे.हा किल्ला मालवण च्या समुद्र किनाऱ्यापासून आत समुद्राच्या एका द्वीप वरती वसला आहे.

या किल्ल्यावर भरपूर गोड पाण्याची विहिरे आहेत ,ज्याला त्या काळात दूध विहीर ,साखर विहीर ,दही विहीर अशी नावे देण्यात आली होती.या किल्ल्यावर एक शिव मंदिर देखील आहे आणि या महादेवांच्या मंदिराची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुलाने म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांनी वर्ष १६९५ मध्ये केली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्या काळात सिंधुदुर्ग किल्ल्यावर ३० ते ४० शौचालयाची निर्मिती केली होती.

ह्या किल्ल्याच्या चारही बाजूला समुद्र आहे आणि समुद्राच्या भल्या मोठ्या लाटा पासून वाचण्यासाठी या किल्ल्याला मजबूत बनवण्यात आले होते आणि आजही इतक्या शतकानंतर देखील हा किल्ला मजबूत रित्या समुद्राच्या भल्या मोठ्या लाठा सहन करत अभिमानाने उभा आहे.ह्या किल्ल्याच्या भिंती १२ फूट च्या आसपास आहेत .

ह्या भिंती च्या आकारावरून तुम्ही हा अंदाज लावू शकता की ,हा किल्ला केवढा मोठा असेल त्याचा ! ह्या किल्ल्याची लांबी ३० फूट इतकी असून ,ह्या किल्ल्याची रुंदी १२ फूट इतकी आहे. सिंधुदुर्ग किल्ल्यावर एकूण २२ बुरुज आहेत.

ह्या किल्ल्याच्या मुख्य द्वाराला अशा रित्या बनवण्यात आले आहे की , “समुद्र किनाऱ्यापासून सिंधुदुर्ग किल्ल्याचे मुख्य प्रवेश द्वार दिसू नये” .सिंधुदुर्ग किल्ल्यावरून आसपास चा २५ किलोमिटर पर्यंतच प्रदेश दिसतो.सिंधुदुर्ग किल्ल्यावर आजही माणसे राहतात ,गडावर आजही बाजारपेठ भरते.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचे आणि पायाचे ठसे / original Hand and foot prints of Chatrapati Shivaji Maharaj at Sindhudurg fort in Marathi

सिंधुदुर्ग किल्ला हा हिरोजी इंदूलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बांधला होता.जेव्हा हा किल्ला बांधून पूर्ण झाला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी गड बांधण्याच्या मोबदल्यात काय हवे आहे ? असे हिरोजी इंदूलकर यांना सांगितले ,तर हिरोजी इंदुलकर यांनी उत्तर दिले आणि म्हणले मला काही नको आहे ,परंतु तुमच्या हाताचा आणि पायाचा ठसा द्या ,ज्याचे दर्शन लोक करतील आणि आजही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हाताचे आणि पायाचे ठसे आजही सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात हा किल्ला मराठा साम्राज्याचे सुरक्षा घर होते.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या द्वारे निर्माण केलेल्या हा किल्ला ऐतिहासिक दृष्ट्या आणि नैसर्गिक दृष्ट्या प्रबळ आहे.ह्या किल्ल्याच्या निर्मितीसाठी लागणारे साहित्य हे गुजरात राज्यातून आणण्यात आले होते.

तुम्ही जेव्हा सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट द्याल ,तेव्हा तुम्हाला सिंधुदुर्ग किल्ल्यावर भवानी मंदिर दिसेल.ह्या किल्ल्यावर पाण्याची विहीर आहे आणि या विहिरीतील पाणी वर्षात कधीही सुकत नाही.

सिंधुदुर्ग किल्ल्या जवळ असणाऱ्या वॉटर ॲक्टिविटिज / Water activites near Sindhudurg fort in Marathi

सिंधुदुर्ग किल्ला हा पर्यटकांसाठी सकाळी ९ पासून संध्याकाळी ६  पर्यंत खुल्ला असतो .तुम्ही ह्या वेळेत जाऊन हा किल्ला बघू शकता ,किल्ला बघण्यासाठी तुम्हाला बोट ची मदत घ्यावी लागते ,तुम्ही जर हा सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी सायंकाळचे गडवरती गेला तर तुम्हाला किल्ल्यावरून सुंदर असा मावळता सूर्य ही दिसू शकतो.

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या भोवती पर्यटकांसाठी विविध ॲक्टिविटीज देखील केल्या जातात.जर तुम्हाला स्कुबा डायविंग करायचे असेल तर तुम्ही सिंधुदुर्ग मध्ये जाऊन सिंधुदुर्ग जवळच्या समुद्रामध्ये स्कुबा डायव्हिंग करू शकता.याचसोबत तुम्ही , पैरा सेलिंग ,बनाना राईड ,इत्यादी यांसारख्या ॲक्टिविटीज देखील तुम्ही करू शकता.

FAQ

सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती कोणी केली ?

सिंधुदुर्ग किल्ल्याची निर्मिती महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली.

सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली आणि सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी किती वर्षाचा कालावधी लागला ?

सिंधुदुर्ग किल्ल्याची स्थापना १६६४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी केली आणि सिंधदुर्ग किल्ला बांधण्यासाठी ३ वर्षा पर्यंतचा कालावधी लागला.

सिंधुदुर्ग किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण जवळच्या अरबी समुद्रामध्ये स्थित आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्यावर किती बुरुजे आहेत ?

उत्तर – सिंधुदुर्ग किल्ल्यावर २२ बुरूजे आहेत.

सिंधुदुर्ग किल्ला हा किती एकर मध्ये विस्तारला आहे ?

सिंधुदुर्ग किल्ला हा ४८ एकर मध्ये वसला आहे.

सिंधुदुर्ग किल्ल्याचा प्रकार कोणता आहे ?

सिंधुदुर्ग हा जलदुर्ग प्रकारचा किल्ला आहे.

सिंधुदुर्ग किल्ला व्यतिरिक्त किल्ल्याच्या आसपास पर्यटकांसाठी कोणकोणती ठिकाणे आहेत ?

उत्तर – पर्यटक सिंधुदुर्ग किल्ला जवळ वॉटर ॲक्टिविटी करू शकतात ,तसेच सिंधुदुर्ग किल्ल्या जवळ विजय दुर्ग किल्ला आहे ,पर्यटक तो किल्ला देखील पाहू शकतात.

सिंधुदुर्ग किल्ला हा मुंबई शहरापासून किती किलो मीटर अंतरावर आहे ?

सिंधुदुर्ग किल्ला हा मुंबई च्या दक्षिणेला असून मुंबई पासून सिंधुदुर्ग किल्ल्या पर्यंतचे अंतर ४५० किलो मिटर च्या आसपास आहे.

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण च्या जवळ असणाऱ्या समुद्रामध्ये वसलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती पाहिली.

Leave a Comment