श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती Shree Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi

Shree Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक महान संतापैकी एक म्हणजेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज. संत ज्ञानेश्वर 13 व्या शतकातील एक महान, थोर संत होऊन गेले.

Shree Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची संपूर्ण माहिती Shree Sant Dnyaneshwar Maharaj Information In Marathi

महाराष्ट्राच्या संस्कृतीत वारकरी संप्रदायाला खूप महत्व आहे. संत ज्ञनेश्वरांनी जगाला ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ दिला , शाळेत दिवसाची सुरुवात ज्या पसायदानाने होते, ती पण ज्ञानेश्वरांचीचं देणगी आहे.

नावज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी  (माऊली)
जन्म22 ऑगस्ट 1275, वार गुरूवार. श्रावण कृ.अष्टमी, शा.शके 1197, आपेगाव, ता.पैठण , जि. छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र.
वडीलविठ्ठलपंत कुलकर्णी
आईरुक्मिणीबाई कुलकर्णी
उपास्यदैवतविठ्ठल
संप्रदायनाथ संप्रदाय, वारकरी, वैष्णव संप्रदाय
गुरूश्री संत निवृत्तिनाथ महाराज
शिष्यसाचिदानंद महाराज
भाषामराठी
कार्यसमाज उद्धार
सहित्यरचना ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका),  अमृतानुभव,  हरिपाठ,  अभंग
निर्वाण 2 डिसेंबर इ.स.1296  वार रविवार.  कार्तीक कृ. त्रयोदशी, शा.शके 1218.
समाधी मंदिरआळंदी, जि.पुणे.

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचे बालपण || Childhood information of sant dnyaneshwar maharaj :

तो दिवस होता,22 ऑगस्ट 1275 ज्या दिवशी रुक्मिणीबाईनी आपेगाव येथे संत ज्ञानेश्वरांना जन्म दिला. आपेगाव हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील एक गाव आहे. रुक्मिणीबाई आणि विठ्ठलपंत यांना निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान, मुक्ताबाई अशी एकुण चार अपत्ये होती. त्यात निवृत्ती हे थोरले होते आणि सोपान, मुक्ताबाई ही दोघे धाकटी भावंडे होती.

पूर्वी एकदा संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी संसाराचा त्याग केला होता आणि संन्यासधर्म स्वीकारला होता. पण त्यांच्या गुरूने सांगितले की विवाहित व्यक्ती संन्यास घेऊ शकत नाही. मग विठ्ठलराव परत आले होते.त्यानंतर घरी परत आल्यानंतर त्यांना चार अपत्ये झाली.

विठ्ठलपंत आणि त्यांच्या कुटुंबाने तीर्थयात्रा सुरू केली. मग ते पुणे जिल्ह्यातील आळंदी आले व तेथेच स्थायिक झाले. त्या काळातील लोकांना विवाहित व्यक्तीने संन्यासधर्म स्वीकारणे मान्य नव्हते.म्हणून लोकांनी विठ्ठलपंतांच्या पूर्ण कुटुंबाला वाळीत टाकले.

आळंदीच्या ब्राह्मणांनी ज्ञानेश्वर आणि त्याच्या भावंडांचे मुंज करण्याला नकार दिला. त्यावर उपाय काय असे विठ्ठलपंतांनी विचारल्यास त्या काळातील ब्राह्मणांनी त्यावर केवळ देहदंडाची शिक्षा आहे असे सांगितले. आपल्या काही त्रास होऊ नये, ते चांगल्या संस्करापासून

वंचित राहू नये ह्या उद्देशाने विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईनी आत्महत्या करून देहत्याग केला. पण आई वडिलांच्या मृत्यूनंतर संत ज्ञानेश्वर आणि त्यांच्या भावंडांना खूप त्रास सहन करावा लागला. अन्न, पाणी यासारख्या मुलभुत गोष्टी मिळवण्यासाठी त्या भावंडांना त्रास सहन करावा लागला. पुढे ती भावंडे पैठण येथे गेली, तिथे संत ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिध्द केली.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे जीवन || Information about life of sant dnyaneshwar in marathi :

संत ज्ञनेश्वरांचा जन्म अपेगावतील कुलकर्णी या देशस्थ ब्राह्मण कुटुंबात झाला.आई वडिलांच्या मृत्यूनंतर ज्ञानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना नाथ हिंदू परंपरेने स्वीकारले. पुढे हीच भावंडे महान ,थोर संत म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झाली.

संत ज्ञानेश्वर अवघे 21 वर्षांचे अल्पायुष जगले. या छोट्याशा कालावधीत रेड्याला वेद वदवणे, किंव्हा एका भिंतीला चालत करणे अशा अनेक दंतकथा आहेत. ज्ञानेश्वरांचा अजून एक चमत्कार म्हणजे त्यांचा शिष्य सच्चीदानंद यांच्या प्रेताचे पुनरुज्जीवन केले.संत ज्ञानेश्वर हे एक अध्यात्मिक गुरू होते, त्यांनी हे दाखवून दिले की अध्यात्मिक शक्तितून माणूस असाध्य , अविश्वसनीय कार्य पार पाडू शकतो.

आजच्या काळात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने शिक्षण संस्था, शाळा आणि आश्रम शाळा काढल्या आहेत,त्या संस्थानमधून दरवर्षी हजारांवर मुले शालेय शिक्षणाबरोबरच ,वारकरी संप्रदायाबद्दल पण शिकत आहे .महाराजांच्या जीवनावर प्रभात कंपनीने चित्रपट काढला आणि त्यातून ज्ञानेश्वरांचे कार्य जगभर पसरवले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे सामाजिक कार्य || Social work of sant dnyaneshwar maharaj information in marathi :

संत ज्ञानेश्वरांनी नेवासा येथे “भावार्थ दीपिका” हा ग्रंथ लिहला, हा ग्रंथ म्हणजेच गीतेचा साध्या ,सोप्या भाषेत केलेला अनुवाद आहे.भावार्थदीपिका म्हणजेच “ज्ञानेश्वरी” .खरे तर संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंदानी ती लिहली. संत ज्ञानेश्वर हे हिंदू धर्मातील सर्वात प्रसिद्ध संतांपैकी एक आहेत.वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी महाराजांनी “भावार्थदीपिका” हा ग्रंथ लिहला, जे एक जागतिक महान कार्यांपैकी एक महान कार्य आहे.

असे म्हणले जाते की कर्मयोग,ज्ञानयोग आणि भक्तीयोग ज्ञानेश्वरीत सांगितले गेले आहेत. ज्ञानेश्वरीत सुमारे 900 ओव्या आहेत.असे मानले जाते की ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इ. स. 1290 च्या सुमारास लिहला गेला.असे म्हणतात की ज्ञानेश्वरीत महाराजांनी मराठी भाषा आणि तिची महती सांगितली आहे.

संत ज्ञानेश्वरांनी सर्व-सामान्य लोकांच्या चांगल्या आरोग्यासाठी पसायदान ही प्रार्थना लीहली. पसायदान हे ज्ञानेश्वरीच्या शेवटी समाविष्ट आहे. भागवत हा धर्म सर्वांसाठी समान आहे आणि आपण सर्व एकाच देवाची मुले आहोत. वारकरी संप्रदायाचे पालन करून कोणतीही सर्व सामान्य व्यक्ती पण ईश्वरप्राप्ती करू शकतो, अशा साध्या -सोप्या भाषेत संत ज्ञानेश्वरांनी सर्व सामान्यांना भक्तीचा मार्ग दाखवला.

संत ज्ञानेश्वरांचा दुसरा ग्रंथ “अमृतानुभव” हा होय. असे म्हणले जाते की हा जीव-ब्रह्म ऐक्याचा ग्रंथ आहे. या ग्रंथात सुमारे 800 ओव्या आहेत. तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने हा  एक श्रेष्ठ ग्रंथ समजला जातो.

असे म्हणले जाते की चांगदेव हे एक महान योगी होऊन गेले, जे 1400 वर्ष जगले असे म्हणतात.पण त्यांचा अहंकार काही गेला नव्हता. त्यांचा अहंकार कमी करण्यासाठी संत ज्ञानेश्वरांनी त्यांना उपदेशपर एक 65 ओव्यांचे पत्र लिहले. हे पत्र म्हणजेच “चांगदेव पासष्टी”

हा ग्रंथ होय. या “चांगदेव पासष्टी” ग्रंथाद्वारे संत ज्ञानेश्वरांनी चांगदेव महाराजांना उपदेश देऊन त्यांचे गर्वहरण केले.

संत ज्ञानेश्वरांचा “हरिपाठ” हा एक 28 अभंगांचा नामपाठ आहे. ज्यात महाराजांनी हरिनामाचे महत्व सांगितले आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांची समाधी || Death of sant dnyaneshwar information in marathi :

 “अमृतानुभव” हा ग्रंथ लिहल्यावर संत ज्ञानेश्वरांनी तीर्थयात्रेला केली. तीर्थयात्रा झाल्यानंतर संत ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेण्याचा निर्णय घेतला.संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी, 2 डिसेंबर इ.स.1296 ,वार रविवार (कार्तीक कृ. त्रयोदशी, शा.शके 1218) रोजी समाधी घेतली.आळंदी येथे संत ज्ञानदेवांची समाधी आहे.

संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतरअवघ्या वर्षभरात निवृत्ती, सोपान व मुक्ताबाई या त्यांच्या भावंडांनी आपली जीवन यात्रा संपवली.आळंदीमध्ये इंद्रायणीच्या तीरावर संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो. यातील प्रत्येक दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे.

FAQ

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडीलांचे पूर्ण नाव काय होते?

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांचे पूर्ण नाव विठ्ठलपंत कुलकर्णी हे होते.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोणत्या साली लिहला आणि त्यात किती ओव्या होत्या?

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ इ.स. 1290 च्या सुमारास लिहला आणि त्यात 900 ओव्या होत्या.

संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर कोठे आहे?

संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधी मंदिर हे पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे आहे.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या भावंडांचे नाव सांगा?

संत ज्ञानेश्वर महाराजांना तीन भावंडे होती,त्यांची नावे

संत ज्ञानेश्वर महाराजांना तीन भावंडे होती,त्यांची नावे?

निवृत्ती, ज्ञानदेव,सोपान आहेत.

संत ज्ञानेश्वर महाराजांनी किती सहित्यारचना केल्या?

संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी म्हणजेच भावार्थदीपिका,अमृतानुभव,चांगदेव पासष्टी तसेच हरिपाठ आणि अभंग ह्या सहित्यरचनांची निर्मिती केली.

निष्कर्ष || Conclusion:

संत ज्ञानेश्वर महाराज हे एक ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक होते .संत ज्ञानेश्वर हे विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. संत ज्ञानदेवांना सर्वच भक्त प्रेमाने माऊली म्हणत आणि आजही म्हणतात. संत ज्ञानेश्वर हे तेराव्या शतकातील एक अद्वितीय संत होऊन गेले.संत ज्ञानेश्वरांनी लोकनिंदेला कधी महत्व दिले नाही, त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी अध्यात्मिक प्रगती केली, ते अध्यात्मिक ज्ञान जगापर्यंत पोहचवल.अशाप्रकारे आपल 21 वर्षांचं संपूर्ण आयुष्य पण त्यांनी सामाजिक कार्यासाठी व्यतीत केल.

Leave a Comment