शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती Shivneri Fort Information In Marathi

Shivneri Fort Information In Marathi आपल्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली होती. त्याकाळी जुलमी राजवटीपासून आपल्या मराठी भूमीला मुक्त करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्या हाताने इतिहास लिहिला होता.

Shivneri Fort Information In Marathi

शिवनेरी किल्ल्याची संपूर्ण माहिती Shivneri Fort Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या किल्ल्यावर झाला ,त्या किल्ल्या विषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच आजच्या लेखामध्ये आपण शिवनेरी किल्ल्यावर झालेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ,शिवनेरी किल्ल्याची संरचना ,शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी असणारे उत्तम महिने ,शिवनेरी किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे ,शिवनेरी किल्ल्या विषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे छत्रपती शिवाजी महाराज यांची जन्मभूमी असणाऱ्या ” शिवनेरी ” किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव शिवनेरी किल्ला
जिल्हा पुणे
राज्य महाराष्ट्र
किल्ल्याचा प्रकार गिरिदुर्ग
उंची ३५०० फूट

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म (Birth of Chatrapati Shivaji Maharaj in Marathi)

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले हे विजापूर च्या आदिलशहा साठी काम करत होते. आदिलशहाने शहाजीराजांच्या वडिलांना म्हणजे मालोजीराजे भोसले यांना शिवनेरी किल्ला आणि पुणे भागातील काही प्रांत भेट म्हणून दिला होता.

शहाजीराजे भोसले ह्यांच्या पत्नी राजमाता जिजाबाई गरोदर असताना ,त्यांना शहाजीराजांनी शिवेनरी किल्ल्यावर पाठवले होते. इथेच शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० मध्ये झाला. १९ फेब्रुवारी १६३० मध्ये शिवनेरी किल्ल्यावर मराठी भूमीचा सूर्य जन्मला.

गरोदर असताना राजमाता जिजाबाई यांनी किल्ल्यावर असणाऱ्या ” शिवाई ” देवीला नवस केला होता की ,”माझ्या पोटी जर मुलगा जन्माला आला तर मी त्या मुलाचे नाव तुझ्या नावावर ठेवीन ” .देवीने राजमाता जिजाबाई यांची ईच्छा पूर्ण केली आणि राजमाता जिजाबाई यांच्या पोटी मुलानेच जन्म घेतला. नवस बोलल्या प्रमाणे राजमाता जिजाबाई यांनी आपल्या मुलाचे नाव “शिवाई देवीच्या ” नावावरून “शिवाजी” असे ठेवले.

शिवनेरी किल्ल्याची संरचना (Structure of Shivneri fort in Marathi)

शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ स्थित आहे. शिवनेरी किल्ल्याची संरचना त्रिकोणी आकाराची आहे आणि शिवनेरी किल्ल्याच्या चारही बाजूच्या भिंती या मातीच्या बनवलेल्या आहेत. शिवनेरी किल्ल्यावर एक तळे आहे आणि त्या तळ्याचे नाव ” बदामी तळे” असे आहे.

शिवनेरी किल्ल्यावर एक इमारत आहे , ह्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता. ज्या पाळण्यात छत्रपती शिवाजी महाराज लहान असताना खेळले होते ,तो पाळणा आजही या शिवनेरी किल्ल्यावर असणाऱ्या इमारतीवर आपल्याला पाहायला मिळतो.

शिवनेरी किल्ल्या विषयी असणाऱ्या काही रोचक गोष्टी ( Interesting facts about Shivneri fort in Marathi)

१) शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता.

२) शिवनेरी किल्ल्यावर एक प्रमुख दरवाजा आहे ,याव्यतिरिक्त किल्ल्याच्या चारही बाजूला चार वेगवेगळे दरवाजे आहेत.

३) शिवनेरी किल्ल्यावरील प्रमुख दरवाजा हा किल्ल्याच्या दक्षिण – पश्चिम दिशेला आहे.

४) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मा नंतरचे काही वर्ष ते आणि त्यांच्या आई राजमाता जिजाबाई या किल्ल्यावर राहत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाबाई लहानपणी महाभारत आणि रामायणाच्या गोष्टी सांगत.

५) शिवनेरी किल्ल्याच्या खाली मावळ्यांचा आणि महाराजांचा पराक्रम दर्शविणाऱ्या मुर्त्या आहेत.

६) शिवनेरी किल्ल्यापासून काही अंतरावर लेण्याद्री डोंगर आहे. अष्टविनायक गणपती पैकी एका गणपतीची मूर्ती ही या लेण्याद्री डोंगरावर आहे.

शिवनेरी किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे ( tourists places near Shivneri fort in Marathi)

शिवनेरी किल्ला हा पुणे जिल्ह्यात स्थित आहे आणि शिवनेरी किल्ल्याचे एतहासिक महत्व खूप आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म या किल्ल्यावर झाला असल्यामुळे महाराष्ट्र राज्यातील माणसे हा किल्ला बघायला येत असतात ,याचसोबत देशातील इतर राज्यातील लोक देखील आवर्जून शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी येत असतात.

शिवनेरी किल्ल्याच्या आसपास असणारी काही पर्यटन स्थळे खालीलप्रमाणे :

१) सिंहगड किल्ला – सिंहगड किल्ला हा शिवनेरी किल्ल्यापासून ४८ किमी च्या अंतरावर आहे. हा सिंहगड किल्ला देखील एक एतहासिक किल्ला आहे आणि या सिंहगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव ” कोंढाणा ” असे होते ,नंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाला प्रभावित होऊन कोंढाणा किल्ल्याचे नाव “सिंहगड ” करण्यात आले होते.

२) लेण्याद्री गिर्जात्मक गणपती – गिर्जात्मक लेण्याद्री गणपती हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे आणि लेण्याद्री डोंगर शिवनेरी किल्ल्यापासून खूप कमी अंतर्रावर स्थित आहे. या लेण्याद्री डोंगरावर प्राचीन काळातील लेणी आपल्याला पाहायला मिळतील.

३) जुन्नर गुहा – जुन्नर तालुक्यात तीनशे हून अधिक लेण्या आपल्याला पाहायला मिळतात ,ज्यामध्ये लेण्याद्री डोंगरावरील लेण्यांचा समावेश आहे. तसेच जुन्नर तालुक्यात प्राचीन काळातील गुहा देखील आपल्याला पाहायला मिळतील.

शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने (Best months to visit Shivneri fort in Marathi)

आपल्या भारत देशातील विविध राज्यातील लोक शिवभुमी असणाऱ्या शिवनेरी किल्ला पाहण्यासाठी वर्षभर येत असतात. शिवनेरी किल्ल्याला भेट आपण वर्षाच्या कोणत्याही महिन्यात देऊ शकतो ; परंतु हा किल्ला उंचीला खूप मोठा आहे ,त्यामुळे काही जीवित हानी होऊ नये म्हणून, पावसाळ्यात हा किल्ला पाहण्यासाठी जास्त कोणी येत नाहीत ,तसेच उन्हाळ्यात ऊन जास्त असल्यामुळे देखील उन्हाळ्यात हा किल्ला पाहण्यासाठी जास्त कोणी येत नाही.

हिवाळ्यातील महिने हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम मानले जातात. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी ला झाला होता ,त्यामुळे या किल्ल्यावर दरवर्षी १९ फेब्रुवारी ला शिवभक्तांची गर्दी असते आणि ह्या शिवनेरी किल्ल्यावर असणारा शिवजन्माचा कार्यक्रम अविस्मरणीय असतो. त्यामुळे दरवर्षी प्रचंड प्रमाणात लोक १९ फेब्रुवारी दिवशी हा किल्ला पाहण्यासाठी आवर्जून येत असतात.

शिवनेरी किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आणि जवळचे विमानतळ ( Nearest railway station and airport from Shivneri fort in Marathi)

शिवनेरी किल्ल्याच्या सर्वात जवळ असणारे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन हे पुणे येथे स्थित आहे. त्यामुळे तुम्ही जर देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहत असाल तर विमानाच्या किंवा रेल्वे च्या मदतीने तुम्ही पुणे येथे येऊ शकता आणि तुम्ही पुणे येथून रोड मार्गाने शिवनेरी किल्ल्याकडे जाऊ शकता.

FAQ

शिवनेरी किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

शिवनेरी किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात स्थित आहे.

शिवनेरी किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून किती फूट आहे ?

शिवनेरी किल्ल्याची उंची समुद्र सपाटी पासून ३५०० फूट इतकी आहे.

शिवनेरी किल्ल्याची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?

शिवनेरी किल्ल्याची स्थापना ११७० मध्ये करण्यात आली होती.

शिवनेरी किल्ल्याचा प्रकार कोणता आहे ?

शिवनेरी किल्ला हा ” गिरिदुर्ग” प्रकारातील किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव कोणत्या देवीच्या नावावरून ठेवण्यात आले होते ?

शिवनेरी किल्ल्यावर शिवाई देवीचे मंदिर आहे आणि शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव ” शिवाजी” असे ठेवण्यात आले होते.

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेल्या शिवनेरी किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.तसेच आजच्या लेखामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ,शिवनेरी किल्ल्याची संरचना ,शिवनेरी किल्ल्याला भेट देण्यासाठी असणारे उत्तम महिने ,शिवनेरी किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे ,शिवनेरी किल्ल्या विषयी विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment