शेअर मार्केटची संपूर्ण माहिती Share Market Information In Marathi

Share Market Information In Marathi आपल्या देशातील काही लोक नोकरी करतात ,तर काही लोकांचा व्यवसाय आहे ; परंतु पैसे कमवणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या कमाईतील विशिष्ट रक्कम नक्की कुठल्या ना कुठल्या स्कीम मध्ये गुंतवत असते. तसे म्हणायला गेले तर ,गुंतवणूक करण्याचे भरपूर मार्ग आहेत ; जसे की सोन्यामध्ये गुंतवणूक करणे ,एफ डी मध्ये गुंतवणूक करणे आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे ,इत्यादी.

Share Market Information In Marathi

शेअर मार्केटची संपूर्ण माहिती Share Market Information In Marathi

सध्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आजच्या लेखामध्ये आपण शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे शेअर मार्केट विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव शेअर मार्केट
शेअर मार्केट संबंधातील भारतातील एक्सचेंज संस्था बॉम्बे स्टॉक एक्सचेंज नेशनल स्टॉक एक्सचेंज
गुंतवणूक करण्याचे मार्ग ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग ऑप्शन ट्रेडिंग लाँग टर्म ट्रेडिंग

शेअर मार्केट (Share market in Marathi)

शेअर मार्केट ला “स्टॉक मार्केट” देखील म्हणले जाते. शेअर मार्केट म्हणजे पैसे गुंतवण्याचे असे माध्यम,ज्यामध्ये आपण पैश्या द्वारे कोणत्याही कंपनीचे शेअर खरेदी करू शकतो किंवा विकू शकतो. उदाहरण घ्यायचे झाले तर ,समजा मला टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे आहेत तर ,जेवढी त्या टाटा मोटर्स च्या शेअर्स ची किंमत आहे ,तेव्हढी रक्कम गुंतवून मी टाटा मोटर्स चे मला हवे तेवढे शेअर्स खरेदी करू शकतो.

समजा एखादी कंपनी आहे आणि त्या कंपनीच्या एका शेअर ची किंमत १०० रुपये इतकी आहे आणि मी त्या कंपनीचे १०० रुपयाने १० शेअर्स खरेदी केले आणि भविष्यात मी शेअर्स घेतलेल्या कंपनीच्या एका शेअर ची किंमत २०० रुपये इतकी झाली, तर मला १००० रुपये चा फायदा होणार.

भारतामध्ये “बॉम्बे स्टॉक एक्सचेंज” आणि “नेशनल स्टॉक एक्सचेंज” ह्या दोन स्टॉक मार्केट संबंधितील एक्सचेंज संस्था आहेत. तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने कोणत्याही कंपनीचा शेअर खरेदी करू शकता किंवा खरेदी केलेला शेअर विकू शकता.

फक्त जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट कंपनीचा शेअर ऑनलाइन रित्या खरेदी करता ,तेव्हा तुम्हाला तो शेअर खरेदी करण्यासाठी किंवा विकण्यासाठी ब्रोकर ची मदत घ्यावी लागते आणि तुम्हाला झालेल्या फायद्यातून विशिष्ट रक्कम त्या ब्रोकरला द्यावी लागते.

शेअर मार्केट मधील गुंतवणूक ( Investment in Share market in Marathi)

१८ वर्षाच्या पुढील कोणीही शेअर मार्केट मध्ये  गुंतवणूक करू शकतो. आपल्याला शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता भासत नाही. फक्त शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी आपण शेअर मार्केट विषयीचे ज्ञान घेऊन त्यात गुंतवणूक केली पाहिजे.

सध्याच्या काळात शेअर मार्केट वरती भरपूर चित्रपट आणि वेब सिरीज निघाल्या आहेत. “शेअर मार्केट वरून लाखो रुपये कमवा, करोडो रुपये कमवा”  यांसारख्या थंबनेल चे भरपूर व्हिडिओज यू ट्यूब वरती उपलब्ध आहेत. परंतु आपण जर शेअर मार्केट क्षेत्रात नवीन असलो ,तर आपण पहिल्यांदा या क्षेत्राचे ज्ञान घेतले पाहिजे आणि आपल्याला जेव्हा आपल्या ज्ञानावर संपूर्ण विश्वास होईल ,तेव्हाच आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे चालू केले पाहिजे.

सुरवातीला आपण शेअर मार्केट मध्ये कमी रक्कमेची गुंतवणूक केली पाहिजे. कारण बऱ्यापैकी शेअर मार्केट मधील नवे गुंतवणूकदार सुरवातीलाच भरपूर पैश्याची गुंतवणूक करतात आणि त्यांच्या कमी अनुभवामुळे त्यांना हे गुंतवलेले पैसे गमवावे लागतात. त्यामुळे आपण शेअर मार्केट मधील गुंतवणूकीची सुरवात ही कमी रक्कमेपासूनच केली पाहिजे.

ट्रेडिंग खाते ( Trading account in Marathi)

वर्तमानात इंटरनेट वर भरपूर मोफत ट्रेडिंग खाते उघडणाऱ्या ॲप्स उपलब्ध आहेत. आपण त्यातल्या आपल्याला हव्या त्या कोणत्याही ट्रेडिंग ॲप वरती ट्रेडिंग खाते उघडू शकतो. ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी आपल्याला एक निवेदन फॉर्म भरावा लागतो. त्या निवेदन फॉर्म वरती विचारलेली माहिती आपण योग्यरीत्या भरायची असते ,तसेच काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याला त्या ट्रेडिंग ॲप वरती सबमिट करावे लागतात.

आपला हा ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी भरलेला निवेदन फॉर्म यशस्वी रित्या सबमिट झाल्यानंतर काही दिवसात आपले ट्रेडिंग खाते तयार होते आणि आपण ट्रेडिंग खात्या द्वारे शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणे चालू करू शकतो.

शेअर मार्केट मध्ये यश प्राप्त करण्यासाठी असणारे पुस्तकांचे महत्व ( Importance of book to achieve success in share market in Marathi)

आपण जर शेअर मार्केट क्षेत्रात नवीन असलो ,तर शेअर मार्केट शिकण्यासाठी आपण शेअर मार्केट संबंधी असणाऱ्या पुस्तकांची मदत घेऊ शकतो. बाजारामध्ये शेअर मार्केट शिकवणारी भरपूर पुस्तके उपलब्ध आहेत. त्यातील काही पुस्तके दिग्गज ट्रेडर यांच्याद्वारे लिहिली गेलेली आहेत. आपण शेअर मार्केट मधील ज्ञान ग्रहण करण्यासाठी अनुभवी लोकांचें शेअर मार्केट मधील अनुभव पाहिले पाहिजेत ,तसेच अनुभवी लोकांच्या बरोबरच आपण नवख्या ट्रेडर्स चे देखील अनुभव पाहिले पाहिजेत .

शेअर मार्केट मध्ये यश प्राप्त करण्यासाठी असणारे मित्राचे आणि चांगल्या शिक्षकाचे महत्व ( Importance of Friend and mentor  to achieve success in share market in Marathi)

आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण अशा मित्राची मदत घेतली पाहिजे किंवा त्याची संगत केली पाहिजे ,ज्याला शेअर मार्केट विषयीची संपूर्ण माहिती आहे किंवा जो शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करतो. आपला मित्र जर अगोदरच शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करत असेल तर , त्याच्या शेअर मार्केट मधील अनुभवाचा फायदा आपल्याला होईल आणि तो शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी कोणत्या चुका करायच्या नाहीत हे देखील आपल्याला सांगेल.

शेअर मार्केट क्षेत्रात आपल्याला जर प्रगती करायची असेल तर आपल्याला शेअर मार्केट विषयीचे ज्ञान घेण्यासाठी चांगल्या शिक्षकाची मदत घ्यावी लागेल. सध्या शेअर मार्केट संबंधी ज्ञान देणारे भरपूर लेक्चर्स आणि कोर्सेस मार्केट मध्ये उपलब्ध आहेत .

त्यातील बरेच कोर्स आणि लेक्चर्स शेअर मार्केट संबंधी चुकीची माहिती लोकांना सांगत आहेत ,त्यातील खूप कमी कोर्सेस आणि लेक्चर्स असे आहेत ,जे शेअर मार्केट संबंधी योग्य माहिती लोकांना सांगत आहेत. त्यामुळे शेअर मार्केट विषयीचे ज्ञान मिळवण्यासाठी आपण योग्य त्या शिक्षकाची पारख केली पाहिजे.

FAQ

शेअर मार्केट हे काय आहे ?

शेअर मार्केट हा गुंतवणूक करण्याचा एक पर्याय आहे आणि शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे.

स्टॉक मार्केट कशाला म्हणतात ?

शेअर मार्केटलाच “स्टॉक मार्केट” देखील म्हणले जाते.

शेअर मार्केट मध्ये खाते उघडण्यासाठी किती रुपये द्यावे लागतात ?

शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्यासाठी म्हणजे ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी काही ट्रेडिंग कंपनी फ्री मधे खाते उघडून देतात ,तर काही ट्रेडिंग कंपन्यांचे ट्रेडिंग खाते उघडण्यासाठी आपल्याला विशिष्ट रक्कम भरावी लागते.

शेअर मार्केट मध्ये आपण किती रुपये पासून गुंतवणूक चालू करू शकतो ?

शेअर मार्केट मध्ये आपण आपल्या इच्छेनुसार कितीही रुपये पासून गुंतवणूक करायला सुरवात करू शकतो.

भारतात शेअर मार्केट सबंधीतच्या एक्सचेंज संस्था किती आहेत आणि त्या एक्सचेंज संस्था कोणकोणत्या ?

भारतात शेअर मार्केट सबंधीतच्या एक्सचेंज संस्था दोन आहेत आणि त्या दोन एक्सचेंज संस्था “बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ” आणि ” नेशनल स्टॉक एक्सचेंज” ह्या आहेत.

भारतामध्ये शेअर मार्केट क्षेत्रातील बिग बुल कोणाला म्हणले जाते ?

भारतामध्ये शेअर मार्केट क्षेत्रातील बिग बुल “राकेश झुनझुनवाला” यांना म्हणले जाते.

सध्या शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्याचा ट्रेंड खूपच वाढला आहे ,याचसोबत इंटरनेट वर शेअर मार्केट क्षेत्राविषयी चुकीची माहिती पसरवणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. आजच्या लेखामध्ये आपण शेअर मार्केट विषयीची संपूर्ण माहिती पाहिली ,तसेच आपण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करण्या पूर्वी कोणत्या गोष्टींची दक्षता घेतली पाहिजे ,याविषयीची देखील माहिती आजच्या लेखामधून पहिली.

Leave a Comment