वैज्ञानिकांची संपूर्ण माहिती Scientist Information In Marathi

Scientist Information In Marathi वैज्ञानिक विशिष्ट क्षेत्राचे ज्ञान घेऊन त्यामध्ये नवनवीन शोध लावण्याचे काम करतात.आजच्या लेखामध्ये आपण वैज्ञानिकांविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत ,तसेच आजच्या लेखामध्ये आपण भारत देशात जन्म घेतलेल्या १० वैज्ञानिकांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे वैज्ञानिकांविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Scientist Information In Marathi

वैज्ञानिकांची संपूर्ण माहिती Scientist Information In Marathi

वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्र                     एपीजे अब्दुल कलाम रॉकेट
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्रसत्येंद्रनाथ बोस क्वांटम मैकेनिक्स
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्र प्रफुल चंद्र रॉय रसायन शास्त्र
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्र मेघनाद साहा न्यूक्लियर फिजिक्स
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्र सलीम अली पक्षी विज्ञान
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्र होमी जहांगीर भाभा परमाणू
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्र जगदीश चन्द्र बोस प्लांट विज्ञान
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्र श्रीनिवास रामानुजन गणित
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्र सी वी रमन भौतिक विज्ञान
वैज्ञानिकाचे नाव – क्षेत्रप्रशांत चंद्र महालनोबिस सांख्यिकी

चला तर मग आपल्या देशातील अशाच काही थोर वैज्ञानिकांच्या जीवना विषयी आणि त्यांनी लावलेल्या संशोधना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

१) एपीजे अब्दुल कलाम APJ Abdul Kalam in Marathi

एपीजे अब्दुल कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोंबर १९३१ मध्ये तामिळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे झाला.त्यांचे खरे नाव ” अबूलपाकीर जैनुल्लाब्दिन अब्दुल कलाम ” असे होते. एपीजे अब्दुल कलाम हे लहानपापासूनच खूप हुशार होते ,तसेच ते देशातील एक थोर वैज्ञानिक होते.

एपीजे अब्दुल कलाम हे २००२ ते २००७ च्या दरम्यान भारत देशाचे राष्ट्रपती देखील होते. एपीजे अब्दुल कलाम यांनी डी.आर. डी.ओ मध्ये एयरोस्पेस इंजीनियर म्हणून आपल्या करियर ची सुरवात केली होती ,जिथे त्यांनी भारतीय सेनेसाठी हेलिकॉप्टर ची निर्मिती केली होती.

१९६९ मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांची निवड इस्रो मध्ये झाले.इथे त्यांनी देशासाठी रॉकेट बनवले . एपीजे अब्दुल कलाम यांच्या कामामुळे त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.२७ जुलै २०१५ मध्ये एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन झाले.

२) सत्येंदरनाथ बोस

सत्येंदरनाथ बोस हे देखील देशातील थोर वैज्ञानिक होते आणि त्यांचा जन्म पश्चिम बंगाल राज्यात १ जानेवारी १८९४ मध्ये झाला होता.अल्बर्ट आईन्स्टाईन आणि सत्येंदरनाथ बोस यांनी क्वांटम मैकेनिक्स क्षेत्रात एकत्र काम केले होते ,या कामामुळेच त्याकाळी सत्येंदरनाथ बोस यांना प्रसिध्दी मिळाली होती.सत्येंदरनाथ बोस भौतिक वैज्ञानिक तर होतेच ,यासोबत ते देशातील एक थोर गणितज्ञ देखील होते.

सत्येंदरनाथ बोस यांच्या कामासाठी त्यांना भारत सरकारकडून १९५४ मध्ये पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा  सन्मान करण्यात आला होता.रवींद्रनाथ टागोर यांचे एकमेव विज्ञान विषयी पुस्तक टागोर यांनी सत्येंदरनाथ बोस यांना समर्पित केले होते.४ फेब्रुवारी १९७४ मध्ये सत्येंदरनाथ बोस यांचे निधन झाले.

३) मेघनाद साहा

मेघनाद साहा हे भारतातील एक थोर वैज्ञानिक होते आणि त्यांचा जन्म ६ ऑक्टोंबर १८९३ मध्ये झाला.मेघनाद साहायांचा जन्म ढाका जवळील एका गावी झाला ,जे की आता बांगलादेश मध्ये स्थित आहे आणि भूतकाळात ते बंगाल चा एक भाग होते.मेघनाद साहा यांनी साहा आयनीकरन समीकरण चा शोध लावला.

त्यांनी सूर्याच्या किरणांच्या दबावाला आणि त्यांचे वजन मापायचे एक यंत्र देखील तयार केले होते.१९४३ मध्ये साहा इन्स्टिट्युट ऑफ न्यूक्लियर फिजिक्स चे नाव मेघनाद साहा यांच्या नावावर देण्यात आले होते.१६ फेब्रुवारी १९५६ मध्ये नवी दिल्लीमध्ये त्यांचे निधन झाले.

४) प्रफुल चंद्र रॉय

भारतामधे रसायन विज्ञान क्षेत्राचे जनक ” प्रफुल चंद्र रॉय” यांना मानले जाते.त्यांचा जन्म २ ऑगस्ट १८६१ साली झाले.देशाची पहिली औषध कंपनी “बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स” ही होती आणि या बंगाल केमिकल्स अँड फार्मास्युटिकल्स कंपनीचे संस्थापक ” प्रफुल चंद्र रॉय” हे होते.१६ जुन १९४४ मध्ये रसायन क्षेत्रात संशोधन करणारे थोर वैज्ञानिक पर्फुल चंद्र रॉय यांचे निधन झाले.

५) सलीम अली

सलीम अली यांचा जन्म १२ नोव्हेंबर १८९६ मधे महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथे झाला.त्यांना लोक बर्डमैन म्हणून हाक मारत.सलीम अली हे एक पक्षी वैज्ञानिक होते आणि ते देशातील पक्ष्यांचे सर्वेक्षण करणारे पहिले भारतीय वैज्ञानिक होते.भरतपूर पक्षी अभायारण्या ची स्थापना करण्यामध्ये सलीम अली यांचा मोलाचा वाटा होता.सलीम अली यांच्या कामासाठी भारत सरकारकडून त्यांना वर्ष १९५८ मध्ये पद्मभूषण आणि १९७६ मध्ये पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.२० जुन १९८७ मध्ये सलीम अली यांचे निधन झाले.

६) होमी जहांगीर भाभा

होमी जहांगीर भाभा यांचा जन्म ३० ऑक्टोंबर १९०९ मध्ये झाला.होमी जहांगीर भाभा यांना भारतीय परमाणू कार्यक्रमाचे जनक मानले जाते.आपल्या देशाचे त्याकाळचे पंतप्रधान असणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांना परमाणू कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी होमी जहांगीर भाभा यांनी सुचवले होते.२४ जानेवारी १९६६ मधे एका विमान अपघातात त्यांचे निधन झाले.

७) जगदीश चन्द्र बोस

भारतीय वैज्ञानिक जगदीश चन्द्र बोस यांचा जन्म ३० नोव्हेंबर १८५८ साली झाला.झाडांच्या विज्ञानामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे.त्यांनी झाडांची वृध्दी मोजण्याचे यंत्र बनवले होते.जगदीश चन्द्र बोस यांच्या प्रत्येक पेटंट ला त्यांना विरोधाचा सामना करावा लागला.जगदीश चन्द्र बोस यांच्या कामाचा सन्मान म्हणून चंद्रा वरती असणाऱ्या क्रेटर ला त्यांचे नाव देण्यात आले होते.२३ नोव्हेंबर १९३७ मध्ये त्यांचे निधन झाले.

८) श्रीनिवास रामानुजन

श्रीनिवास रामानुजन हे एक देशातील थोर गणितज्ञ होते आणि त्यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ मध्ये तामिळनाडू येथे झाला.श्रीनिवास रामानुजन यांनी आपल्या आयुष्यात गणित क्षेत्राशी संबंधित भरपूर सिद्धांत मांडले.श्रीनिवास रामानुजन हे कैंब्रिज च्या ट्रीनीजी कॉलेज मध्ये फेलो म्हणून निवड झालेले पाहिले भारतीय होते.२६ एप्रिल १९२० मध्ये त्यांचे निधन झाले.

९) सी वी रमन

सी वी रमन हे देशातील एक भौतिक वैज्ञानिक होते.त्यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८८८ मध्ये तामिळनाडू येथे झाला.त्यांनी शोध लावलेल्या प्रकाशाच्या प्रकिर्तनाला “रमण एफेक्ट” असे नाव देण्यात आले होते.सी वी रमन यांना १९३० मध्ये भौतिक क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळाला होता आणि ते भौतिक क्षेत्रात नोबेल पुरस्कार मिळणारे पाहिले भारतीय ,तसेच पाहिले आशियातील व्यक्ती होते.१९५४ मध्ये भारत सरकारकडून त्यांना भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.२१ नोव्हेंबर १९७० मध्ये त्यांचे निधन झाले.

१०) प्रशांत चंद्र महालनोबिस

प्रशांत चंद्र महालनोबिस हे एक थोर वैज्ञानिक होते आणि त्यांचा जन्म २९ जुन १८९३ मध्ये झाला.प्रशांत चंद्र महालनोबिस हे भारतीय संख्यिकी संस्थांचे संस्थापक होते.त्यांना भारतातील आधुनिक सांख्यिकी क्षेत्राचे जनक म्हणले जाते आणि त्यांचे निधन २८ जुन १९७२ मध्ये झाले.

FAQ

भारताचे आधुनिक सांख्यिकी क्षेत्राचे जनक कुणाला म्हणले जाते ?

भारताचे आधुनिक सांख्यिकी क्षेत्राचे जनक “प्रशांत चंद्र महालनोबिस” यांना म्हणले जाते.

रॉकेट मैन कोणाला म्हणले जाते ?

एपीजे अब्दुल कलाम यांच्या कामासाठी त्यांना रॉकेट मैन म्हणले जाते.

सत्येंदरनाथ बोस यांनी कोणत्या क्षेत्रात काम केले ?

सत्येंदरनाथ बोस यांनी अल्बर्ट  आइन्स्टाईन यांच्या सोबत क्वांटम मैकेनिक्स क्षेत्रात काम केले.

देशातील कोणत्या वैज्ञानिकाला बर्ड मैन म्हणले जाते ?

सलीम अली यांना बर्ड मैन म्हणले जाते.

देशामध्ये परमाणू क्षेत्राचे जनक कुणाला म्हणले जाते ?

देशामध्ये परमाणू क्षेत्राचे जनक होमी जहांगीर भाभा यांना म्हणले जाते.

चंद्रावर असणाऱ्या क्रेटर ला कोणत्या वैज्ञानिकाचे नाव देण्यात आले होते ?

जगदीश चन्द्र बोस यांच्या कामाचा सन्मान म्हणून चंद्रावर असणाऱ्या क्रेटर ला त्यांचे नाव देण्यात आले होते.

Leave a Comment