सरोजिनी नायडू यांची संपूर्ण माहिती Sarojini Naidu Information In Marathi

Sarojini Naidu Information In Marathi भारत देशाच्या कोकिळा म्हणून संबोधल्या जाणाऱ्या सरोजिनी नायडू ह्या एक प्रसिद्ध कवयित्री होत्या.तसेच त्यांनी भारताच्या स्वांतंत्र लढ्यामध्ये सहभाग घेतला होता .सरोजिनी नायडू ह्या भारताच्या “राष्ट्रीय काँग्रेस ” पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या आणि त्या ह्या महिला अध्यक्ष पदा वरती १९२८ साला पर्यंत होत्या.याचसोबत सरोजिनी नायडू ह्या भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल देखील होत्या.आजच्या लेखामध्ये आपण सरोजिनी नायडू यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाला सुरवात करूयात.

Sarojini Naidu Information In Marathi

सरोजिनी नायडू यांची संपूर्ण माहिती Sarojini Naidu Information In Marathi

सरोजिनी नायडू यांचे सुरवातीची जीवन आणि त्यांचे कुटुंब / Sarojini Naidu’s early life and his family in Marathi

सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ मध्ये झाला.त्यांच्या वडिलांचे नाव “अघोरणाथ चटोपाध्याय” ,तर त्यांच्या आईचे नाव “वरदा सुंदरी” होते.सरोजिनी नायडू यांचे वडील “अघोरणाथ चटोपाध्याय” हे एक वैज्ञानिक होते आणि त्यांच्या आई ह्या एक कवयित्री होत्या.

सरोजिनी नायडू यांच्या आई वडिलांना आठ मुले – मुली होत्या ,त्या आठ मुली मुलांमध्ये सरोजिनी नायडू ह्या सर्वात थोरल्या होत्या.सरोजिनी नायडू ह्यांच्या एका भावाचे नाव “धिरेंद्र नाथ” होते आणि ते क्रांतिकारी होते ,तसेच सरोजिनी नायडू यांच्या दुसऱ्या एक भावाचे नाव “हरिंद्र नाव” होते आणि ते देखील एक कवी होते.

सरोजिनी नायडू यांचे शैक्षिणक जीवन / Educational Life of Sarojini Naidu in Marathi

सरोजिनी नायडू यांनी वयाच्या १२ वर्षी आपल्या मॅट्रिक पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.सरोजिनी नायडू यांच्या वडिलांना वाटत होते की ,आपल्या मुली ने पुढे जाऊन वैज्ञानिक बनावे ,परंतु सरोजिनी नायडू यांना मोठे होऊन चांगल्या कवयित्री बनायचे होते.सरोजिनी नायडू ह्यानी मद्रास प्रेसिडेन्सी हासिल केली होती.

सोळाव्या वर्षामध्ये सरोजिनी नायडू यांनी लंडन मध्ये जाऊन “किंग कॉलेज लंडन” आणि “गिरटन कॉलेज” मध्ये आपले एडमिशन घेतले.लंडन मधल्या या कॉलेज मध्ये सरोजिनी नायडू यांची भेट अर्थर सायमन आणि इंडमंड गोडसे या थोर लोकांशी झाली. अर्थर सायमन यांनी सरोजिनी नायडू यांना भारत देशाविषयी लिहण्याची सल्ला दिला ,तसेच इंडमंड गोडसे यांनी सरोजिनी नायडू यांना भारतातील पर्वत ,नदी यांच्या विषयी लिहिण्याचा सल्ला दिला.

सुरवातीपासूनच सरोजिनी नायडू यांना लिखाणाची आवड होती आणि त्यांनी ही लिखाणाची आवड त्यांनी शेवट पर्यंत सोडली नाही.सरोजिनी नायडू यांनी हिंदी भाषेतून खूप कविता लिहिल्या .१९०५ मध्ये त्यांनी त्यांची बुलबुले नावाची कविता प्रसिद्ध केली.सरोजिनी नायडू यांनी हिंदी भाषे सोबत इंगर्जी भाषेतून देखील खूप कविता केल्या आहेत.

सरोजिनी नायडू यांचे वैवाहिक जीवन / Married Life of Sarojini Naidu in Marathi

वयाच्या १५ व्या वर्षी सरोजिनी नायडू यांची भेट डॉक्टर गोविंद जलालू यांच्याशी झाली.गोविंद जलालू हे एक डॉक्टर होते आणि ते ब्राम्हण होते.वयाच्या १९ व्या वर्षी सरोजिनी नायडू यांनी डॉक्टर गोविंद जलालू यांच्याशी विवाह केला.

हा विवाह आंतरजातीय होता ,ज्याला त्या काळात मान्यता न्हवती ,परंतु या विवाहामध्ये सरोजिनी नायडू यांच्या वडिलांनी त्यांना मदत केली.पुढे जाऊन सरोजिनी नायडू यांना आणि डॉक्टर गोविंद जलालू यांना ४ अपत्ये झाली.

सरोजिनी नायडू यांचे राजकीय जीवन / Political Life of Sarojini Naidu in Marathi

१९०५ च्या बंगाल विभाजन वेळी सरोजिनी नायडू ह्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये शामिल झाल्या आणि याच बंगाल विभाजन वेळी सरोजिनी नायडू यांची भेट काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांशी झाली.पुढे जाऊन १९२५ मध्ये सरोजिनी नायडू यांची राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी निवड झाली.

सरोजिनी नायडू ह्या महिला सशक्तीकरण करण्यासाठी ओळखल्या जात होत्या.त्या देशातील खेडे पाड्यातील महीलांपासून ते मोठ्या शहरातील महिलांना सशक्त बनवण्यासाठी काम करत होत्या.सरोजिनी नायडू यांना गांधीजींच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एका आंदोलन दरम्यान जेल मध्ये देखील टाकण्यात आले होते .१९४२ मध्ये सरोजिनी नायडू यांनी २१ महिने जेल मध्ये काढले होते.सरोजिनी नायडू या महात्मा गांधी यांना लाडाने “मिकी माऊस” म्हणत असत.

पुढे भारत स्वतंत्र झाल्यानंतर सरोजिनी नायडू ह्या भारत देशातील राज्याच्या पहिल्या राज्यपाल झाल्या.सरोजिनी नायडू ह्या भारत देशातील उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल झाल्या आणि पुढे जाऊन त्या उत्तर प्रदेश राज्यात असणाऱ्या लखनौ शहरात राहू लागल्या.

गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या मिठाचा सत्याग्रह आंदोलनामध्ये सरोजिनी नायडू यांनी भाग घेतला होता.नंतर पुढे जाऊन जेव्हा गांधीजींना जेल झाले होते ,तेव्हा पक्षाला सांभाळण्याचे काम सरोजिनी नायडू यांनी केले होते.गांधीजींच्या नेतृत्वाखाली झालेल्या “भारत छोडो आंदोलनामध्ये ” सरोजिनी नायडू यांचा मोलाचा वाटा होता.

सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो महिला दिवस / National women’s day celebrated on Sarojini Naydu’s Birthday in Marathi

सरोजिनी नायडू यांच्या जन्म दिनी म्हणजे १३ फेब्रुवारी दिवशी “राष्ट्रीय महिला दिवस” देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.सरोजिनी नायडू यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात महिला सशक्तीकरनसाठी प्रयत्न केले.त्यांनी महिलांना अधिकार भेटावे म्हणून आयुष्यभर प्रयत्न केले.

१९१७ मध्ये सरोजिनी नायडू यांचा “महिला भारतीय संघ” स्थापन करण्यामध्ये मोलाचा वाटा होता.अशा या आयुष्यभर महिलांसाठी आणि महिलांच्या अधिकारासाठी लढणाऱ्या सरोजिनी नायडू यांचा जन्मदिन दर वर्षी “राष्ट्रीय महिला दिवस” म्हणून साजरा केला जातो.सरोजिनी नायडू यांना लाडाने “भारताच्या कोकिळा” असे देखील म्हणले जाते.

सरोजिनी नायडू यांचा मृत्यू / Death of Sarojini Naidu in Marathi

भारत स्वतंत्र झाल्यानंतर वर्ष १९४७ मध्ये सरोजिनी नायडू यांना उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल बनवले होते.2 मार्च 1949 मध्ये ऑफिस मध्ये काम करत असताना त्यांना अचानक हर्ट अटॅक आला आणि त्यांचे निधन झाले.सरोजिनी नायडू यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या अधिकारासाठी लढण्यामध्ये घालवले.

नाव –सरोजिनी चटोपाध्याय/नायडू
जन्म आणि जन्म स्थान –१३ फेब्रुवारी १८७९ आणि हैद्राबाद
मृत्यू –२ मार्च १९४९
आईचे नाव –वरदा सुंदरी
वडिलांचे नाव –अघोरणाथ चटोपाध्याय
पतीचे नाव –डॉक्टर गोविंद जलालू
मुले – मुली –
साहित्य –द गोल्डन थ्रेसोल्ड बोर्ड ऑफ टाईम ब्रोकन विंग
पुरस्कार –केसर ए हिंद
शिक्षण –मद्रास विश्व विद्यालय किंग कॉलेज लंडन गिरटन कॉलेज

FAQ

सरोजिनी नायडू यांचा जन्म कधी झाला ?

सरोजिनी नायडू यांचा जन्म १३ फेब्रुवारी १८७९ मध्ये झाला.

सरोजिनी नायडू यांचे टोपण नाव काय होते ?

सरोजिनी यांचे टोपण नाव “भारताची कोकिळा” असे होते आणि हे नाव सरोजिनी नायडू यांना महात्मा गांधी यांनी दिले होते.

सरोजिनी नायडू यांच्या पतीचे नाव काय होते ?

सरोजिनी नायडू यांच्या पतीचे नाव “डॉक्टर गोविंद जलालू” होते.

सरोजिनी नायडू यांना लाडाने कोकिळा का म्हणत असत ?

सरोजिनी नायडू यांना लिखाणाची आवड होती आणि महात्मा गांधी हे त्यांना लाडाने कोकिळा म्हणत.

सरोजिनी नायडू यांनी कोणकोणते साहित्य लिहिले ?

सरोजिनी नायडू यांना सुरवातीपासून लिखाणाची आवड होती.त्यांनी “द गोल्डन थ्रेसोल्ड बोर्ड ऑफ टाईम ब्रोकन विंग” आणि भरपूर साहित्य लिहिले.

सरोजिनी नायडू ह्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष होत्या ?

वर्ष १९२५ मध्ये सरोजिनी नायडू यांची भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदी निवड झाली होती.

सरोजिनी नायडू ह्या कोणत्या राज्याच्या राज्यपाल होत्या ?

सरोजिनी नायडू या उत्तर प्रदेश राज्याच्या राज्यपाल होत्या.

सरोजिनी नायडू यांच्या स्मरणात कोणता दिवस साजरा केला जातो ?

सरोजिनी नायडू यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांच्या अधिकारासाठी लढण्यामध्ये घालवले ,यामुळेच सरोजिनी नायडू यांच्या जन्मदिनी म्हणजे १३ फेब्रुवारी दिवशी “राष्ट्रीय महिला दिवस ” साजरा केला जातो.

सरोजिनी नायडू यांचा मृत्यू कधी झाला ?

सरोजिनी नायडू यांचा मृत्यू २ मार्च १९४९ मध्ये झाला.ऑफिस मध्ये काम करत असताना,अचानक त्यांना हार्ट अटॅक आला आणि यातच त्यांचे निधन झाले

आजच्या लेखामध्ये आपण कोकिळा नावाने प्रसिद्ध असणाऱ्या आणि “भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ” पक्षाच्या पहिल्या महिला अध्यक्ष असणाऱ्या सरोजिनी नायडू यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment