संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi

Sant Tukaram Maharaj Information In Marathi महाराष्ट्र राज्याला संतांची भूमी म्हणून ओळखतात.याच भूमीत संत ज्ञानदेव,संत मुक्ताबाई, संत एकनाथ,संत बहिणाबाई असे असेल संत होऊन गेले, यांतीलच एक महान संत म्हणजे श्री संत तुकाराम महाराज. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात संत महाराज होऊन गेले.

Sant Tukaram Maharaj Information In Marathi

संत तुकाराम महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Tukaram Maharaj Information In Marathi

आज जगाच्या काना-कोपऱ्यात प्रत्येकाला संत तुकाराम महाराज माहीत आहे.

मूळ नावतुकाराम बोल्होबा अंबिले (मोरे)
जन्म21 जानेवारी 1608 वार: सोमवार माघ शुद्ध पंचमी,शा.शके 1530 देहू, महाराष्ट्र
आईकनकाई बोल्होबा अंबिले
वडीलबोल्होबा अंबिले
भावंडसावजी,कान्होबा
पत्नीरखुमाबाई, जिजाबाई (आवली)
अपत्येमहादेव, विठोबा,नारायण, भागुबई
व्यवसायवाणी
कार्यसमाजसुधरक,विचारवंत,कवी, लोकशिक्षक
साहित्यरचनातुकारामांची गाथा (पाच हजारांवर अभंग)
भाषामराठी भाषा
संप्रदायवारकरी संप्रदाय
गुरूकेशव चैतन्य (बाबाजी चैतन्य)
शिष्यसंत निळोबा, संत बहिणाबाई, भगवानबाबा
निर्वाण19 मार्च 1650 (वय 42) फाल्गुन वद्य द्वितीया,शा.शके 1572 देहू, महाराष्ट्र

संत तुकराम महाराजांचे बालपण || Childhood information of sant tukaram in marathi :

महाराष्ट्र राज्याला लाभलेल्या अनेक थोर संतांपैकीं एक महान संत म्हणजेच संत तुकाराम महाराज.संत तुकाराम महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील देहू येथे 1608 मध्ये झाला. त्यांचे कुटुंब देहू गावचे सावकार असल्यामुळे सर्वांना ज्ञात होते,परिचयाचे होते.संत तुकारामांचे बालपण आई कनकाई आणि वडील बोल्होबा यांच्या देखरेखीखाली लाडात गेले.

संत तुकारामांचे आईवडील पांडुरंगाचे भक्त होते.त्यांच्या कुटुंबात विठ्ठलाची पूजा केली जात,किंबहुना म्हणूनच महाराजही विठ्ठ्लाच्या भक्तीकडे आकर्षित झाले असावे.महाराजांना दोन भावंडे होती ,त्यांचे नाव सावजी आणि कान्होबा.जेव्हा महाराज अवघे 18 वर्षांचे होते तेव्हा त्यांच्या आईवडिलांचा मृत्यू झाला आणि त्यांच्या डोक्यावरील आईवडिलांचे छत्र हरले.

संत तुकाराम महाराजांचे वैवाहिक जीवन || Marital life of sant tukaram maharaj:

संत तुकारामांना दोन बायका होत्या, रखुमाबाई आणि जिजाबाई म्हणजेच अवली. संत तुकारामांच्या वडिलांनी त्यांचे लग्न लोहगाव येथील रुक्मिणीशी लावून दिले.महाराजांच्या मामाचे गाव पण लोहगाव च होते.

संत तुकाराम आणि रखुमाबाई यांना एक मुलगा झाला.पुढे दम्याच्या आजारामुळे रखुमाबाई यांचे अकाली निधन झाले. महाराज आणि रखुमाबाई यांचा मुलगा पण नंतर अकाली मृत्यू पावला.महाराज यामुळे दुःखात बुडाले.

संत तुकारामांनी नंतर जिजाबाई नावाच्या मुलीशी दुसरा विवाह केला. जिजाबाई या पुणे जिल्ह्यातील खेड गावच्या आप्पाजी गुळवे यांच्या कन्या होत्या. जिजाबाईंना सर्वजण अवलाई म्हणून पण ओळखत.संत तुकाराम आणि जिजाबाई यांना चार मुले झाली. परंतु नंतर महाराज आपला वेळ पूजापाठ, कीर्तने करत घालवत. अभंग करण्यातही त्यांचा बराच वेळ जात.

असे म्हणले जाते की जिजाबाई या कठोर स्वभावाच्या होत, आणि त्यामुळे सतत विठोबाची भक्ती करणाऱ्या आपल्या नवऱ्याला त्या सतत टोमणे मारत.असेच एक दिवस जिजाबाईं च्या टोमन्यांना कंटाळून महाराज इंद्रायणी काठी गेले, मग ह्या प्रकाराला घाबरून जिजाबाईंनी त्यानंतर महाराजांना स्वतःच्या मनाप्रमाने वागू दिलं.

संत तुकाराम महाराजांचे सामाजिक कार्य || Social work of sant tukaram maharaj:

संत तुकारामांचा मूळ व्यवसाय सावकारी करणे होता.पण जेव्हा 1630 च्या सुमारास फार मोठा दुष्काळ पडला. खाण्यापिण्याचे हाल होऊ लागले, लोक देशोधडीला लागले. याच सुमारास महाराजांनी आपल्या आणि आपल्या भावामध्ये संपत्ती ची वाटणी केली.स्वतःच्या वाट्याला आलेली कर्जखते इंद्रायणी नदीत वाहून दिली आणि लोकांना कर्जमुक्त केले.

नंतरच्या काळात अभंग रचणे, कीर्तन करणे महाराजांनी सुरू केले.याचा जनसामान्यांनावर खूप मोठा प्रभाव झाला. लोकांना व्यावहारिक ज्ञान मिळू लागलं, एक प्रकारची लोकजागृती होऊ लागली.आपल्या अभंग, कीर्तनातून महाराजांनी लोकांना भक्तीचे रहस्य उलगडून सांगितले.

महाराजांचा बालपणीचा मित्र संताजी जगनाडे याच्याकडे महाराजांचे अभंग कागदावर उतरवण्याचे काम होते.संत तुकाराम केवळ शाब्दिक उपदेश देत नसत,याउलट स्वतःच्या कृतीतून उपदेश करत.

जे का रंजले गांजले | त्यांसी म्हणे जो आपुले |

तोचि साधू ओळखावा | देव तेथेचि जाणावा ||

या अभंगात संत तुकारामांनी म्हणले आहे, दारिद्र्यात खितपत पडलेल्या, दुःखाच्या खाईत असलेल्या लोकांची सेवा करण्यातच खरा परमार्थ आहे,तीच ईश्वरसेवा आहे.देव इतर कुठे नसून,त्यांच्याच ठिकाणी देव राहत असतो.यातून संत तुकारामांनी किती महान शिकवण दिली.

देहू गावातील मंबाजी नावाच्या एका बुवाने संत तुकारामांना खूप त्रास दिला.पण नंतर महाराजांचे अध्यात्मिक अधिकार बघून तो महाराजांचा शिष्य बनला.

असे म्हणले जाते शिवाजी महाराजांनी एकदा संत तुकारामांना मौल्यवान भेटवस्तू पाठवल्या,पण तुकारामांनी त्या सर्व भेटवस्तू एक संदेश लिहून अदबीने परत केल्या त्यात लीहले होते की, ” या सर्व भेटवस्तू माझ्यासाठी निर्थरक आहेत.माझ्यासाठी सोने आणि पृथ्वी यात काहीच फरक नाही.मी या सर्व निरुपयोगी वस्तू परत करतो.” हा संदेश वाचून शिवाजींचे मन तुकाराम महाराजांना भेटण्यासाठी व्याकूळ झाले आणि ते तात्काळ त्यांना भेटण्यासाठी निघून गेले.

 संत तुकाराम महाराजांचे अभंग आणि विचार: Abhanga and ideology of sant tukaram maharaj:

संत तुकारामांची गाथा म्हणजे जनसामान्यांची दुसरी गीताच आहे. गेल्या चारशे वर्षापासून महाराष्ट्राच्या पावन भूमीत या गाथेच्या स्वरूपाने ज्ञान प्रवाहित होत आहे. संत ज्ञानोबा आणि संत तुकोबा म्हणजे जणू काही महाराष्ट्राचे दोन विद्यापीठच. त्यांच्या साहित्यातून अध्यात्मिक ज्ञान जगाला मिळालं.

अभंग आणि ओवी म्हणलं की महाराष्ट्रातल्या तळागाळ्यातल्या जनमाणसानां पण माहीत आहे. तुकारामांच्या अभंगाची भाषा ही जनसामान्यांना समजण्यास अगदी साधी आणि सोपी आहे.संत तुकारामांनी अभंग,कीर्तन यांच्या माध्यमातून राष्ट्र धर्माची शिकवण दिली. बहुजन समाजाला जागृत केल.

संत तुकारामांनी देवभोळेपना,अंधश्रद्धा ,धर्मांतील चुकीच्या समजुती,प्रथा समाजापासून दूर सारण्याचा

प्रयत्न केला.महाराजांना बत्याच धर्मतांडकांचा विरोध पत्करावा लागला,पण त्यांनी माघार घेतली नाही.संत तुकोबांनी आपण जनजागृतीच कार्य चालूच ठेवलं, ते कुणासमोरच नमले नाही.

महाराजांच्या घराण्यात वारकरी संप्रदायाची प्रथा दिसते.संत तुकारामांच्या घराण्यात आठ पिढ्यांपासून सावकारी चालू होती.घरात नोकर चाकर होते, सगळीकडून फक्तं श्रीमंतीच झळकत होती. पण महाराज या सर्वांपासून नेहमी बाजूला राहिले. संसार होता पण तरीही त्यांनी सर्व जीवन पर्मार्थसाठी वाहिले.

संत तुकाराम महाराजांचे वैकुंठ गमन || Vaikunth gaman of sant tukaram maharaj:

संत तुकारामांनी स्वतःच्या संसारापेक्षा लोककल्याण करण्याला महत्त्व दिले. त्यासाठी त्यांनी विरक्ती पत्करली.पण ह्या सर्व कार्यात जिजाबाईंनी तुकोबाची मोलाची साथ दिली.त्यांच्या मदतीशिवाय हे सर्व सामाजिक कार्य करणं अवघड होत.

समाजासाठी आपल पूर्ण आयुष्य वाहून ,वयाच्या अवघ्या बेचाळीसाव्या वर्षी 19 मार्च 1650,फाल्गुन वद्य द्वितीया,शा.शके 1572 रोजी जगाला सोडून वैकुंठात निघून गेले.संत तुकाराम जेथून वैकुंठात गेले त्या जागी एक नांदूरकीचे झाड आहे.

ज्या दिवशी तुकाराम महाराज वैकुंठात गेले म्हणजेच होळीनंतरचा दुसरा दिवस जो दिवस आपण सध्या तुकाराम बीज म्हणून साजरा करतो.त्या दिवशी दुपारी 12:02 वाजता संत तुकाराम वैकुंठात गेले. असे म्हणले जाते तुकाराम बीजेच्या दिवशी दुपारी बरोबर 12:02 वाजता तिथे असलेले नांदुरकीचे झाड हलते. संत तुकारामांना “जगद्गुरु” म्हणून पण संबोधले जात.

FAQ

संत तुकारामांचे पूर्ण नाव काय आहे?

संत तुकारामांचे पूर्ण नाव तुकाराम बोल्होबा अंबीले (मोरे) होत.

संत तुकारामांच्या भावाचे नाव काय होते?

संत तुकारामांना दोन भावंडे होती,त्यांचे नाव सावजी आणि कान्होबा.

संत तुकारामांच्या गाथेत किती अभंग आहेत?

संत तुकारामांच्या गाथेत पाच हजारांवर अभंग आहेत

संत तुकारामांचे गुरू कोण होते?

संत तुकारामांचे गुरू केशव चैतन्य ऊर्फ बाबाजी चैतन्य होते.

संत तुकोबांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव काय होते?

संत तुकोबांच्या दुसऱ्या पत्नीचे नाव जिजाबाई होते, त्यांना अवलाई म्हणून पण ओळखले जात.

निष्कर्ष || Conclusion:

 संत तुकाराम हे त्या काळातील लोकसंत होते. त्यांनी अंधश्रद्धा दूर करून जनजागृती केली.त्यांची गाथा बुडालेली नसून आजही जनसामांन्याच्या मुखी असते.

ही संत तुकारामांची गाथा म्हणजे ज्ञानाचा स्त्रोत आहे आणि त्यातील अभंग मानवी जीवनाला नवी दिशा देणारे आहेत.असे म्हणता येईल की ,खऱ्या अर्थाने संत तुकारामांनी ज्ञानदेवांचे अर्धवट राहिलेले काम पूर्णत्वास नेले.

Leave a Comment