संत रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती Sant Ramdas Swami Information In Marathi

Sant Ramdas Swami Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू असणाऱ्या संत रामदास स्वामी यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे संत रामदास स्वामी यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Sant Ramdas Swami Information In Marathi

संत रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती Sant Ramdas Swami Information In Marathi

संत रामदास स्वामी यांचा परिचय ( Introduction of Saint Ramdas Swami in Marathi )

संत रामदास स्वामी यांना समर्थ रामदास असे देखील म्हणले जाते.संत रामदास स्वामी यांचे लहानपणीचे नाव “नारायण सूर्याजी ठोसर” असे होते.संत रामदास स्वामी हे संत ,कवी ,लेखक आणि अध्यात्मिक गुरू होते ,संत रामदास स्वामी यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू मानले जाते.संत रामदास स्वामी हे शेवटपर्यंत आपल्या सिद्धांतावर चालत राहिले.

नावसंत रामदास स्वामी
लहानपणीचे नाव नारायण सूर्याजी ठोसर
जन्म २४ मार्च १६०८
आईचे नाव रानुबाई ठोसर
वडिलांचे नाव सूर्याजी पंत
मृत्यू १३ जानेवारी १६८१

संत रामदास स्वामी हे लहानपनापासूनच धार्मिक होते आणि त्यांना असे वाटत होते की ,” आपण मनुष्य जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात अडकलो आहे.”असे म्हणतात की ,ते जेव्हा ११ वर्षाचे होते ,तेव्हा त्यांना श्रीराम यांचे दर्शन झाले होते ,आणि श्री राम यांनी संत रामदास स्वामी यांना कृष्णा नदीच्या किनारी नवीन संप्रदाय चालू करण्याची आज्ञा केली होती.

संत रामदास स्वामी यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब ( Birth of Sant Ramdas Swami and his family in Marathi )

संत रामदास स्वामी यांचा जन्म २४ मार्च १६०८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील जालना जिल्ह्यातील जांब नावाच्या छोट्या गावी झाला.संत रामदास स्वामी यांच्या वडिलांचे नाव “सूर्याजी पंत” होते तर ,त्यांच्या आईचे नाव रानुबाई ठोसर होते.संत रामदास स्वामी यांच्या मोठ्या भावाचे नाव “गंगाधर” असे होते.संत रामदास स्वामी यांचे वडील म्हणजे सूर्याजी पंत हे सूर्यदेवाचे मोठे भक्त होते.जेव्हा रामदास स्वामी हे सात वर्षाचे होते ,तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

संत रामदास स्वामी यांच्या लग्नाची अनोखी गोष्ट ( Intresting story of Sant Ramdas Swami marriage in Marathi )

एका कथेनुसर ,संत रामदास स्वामी यांचे लग्न ठरले होते आणि लग्नात असणाऱ्या भटजींनी जेव्हा शुभमंगल सावधान हे शब्द उच्चारले ,त्यावेळी संत रामदास स्वामी आपल्या स्वतःच्या लग्नातून पळून गेले.पुढे जाऊन संत रामदास स्वामी यांनी प्रभू श्री राम यांची भक्ती केली.

संत रामदास स्वामी यांची दिनचर्या ( Daily routine of Sant Ramdas Swami in Marathi )

संत रामदास स्वामी यांनी १६२१ ते  १६३३ च्या दरम्यान पूर्ण मन लावून प्रभू श्री राम यांची भक्ती केली.या काळात त्यांच्या दिवसाचा जास्त वेळ प्रभू श्री राम यांची भक्ती करण्यामध्ये जात होता.या काळात संत रामदास स्वामी पहाटे सूर्योदय व्हायच्या आधी उठत होते ,त्यानंतर ते सूर्य उगवल्यांनतर सूर्यदेवाची पूजा करत होते.

नंतर नदी किनारी जाऊन खोल पाण्यात प्रभू श्री राम यांचे नामस्मरण ते करत होते.नंतर अंघोळ झाल्यानंतर ते जंगलातील श्री राम यांच्या मंदिरात जाऊन तेथे पूजा करत.ते दुपारपर्यंत पूजा करत आणि संध्याकाळी ते लोकांना प्रभू श्री राम यांच्या संबंधी व्याख्यान देत.

संत रामदास स्वामी यांनी ही दिनचर्या न चुकता सलग १२ वर्षे पाळली.संत रामदास स्वामी यांच्या या सेवेला प्रभू श्री राम खुश झाले आणि त्यांनी संत रामदास स्वामी यांना दर्शन दिले आणि त्यांना कृष्णा नदी किनारी नवीन संप्रदाय चालू करण्याची आज्ञा केली.

संत रामदास स्वामी यांची अध्यात्मिक यात्रा(Spiritual Journey of Sant Ramdas Swami in Marathi)

रामदास स्वामी यांनी टाकली हे गाव सोडले आणि त्यांनी आपली अध्यात्मिक यात्रा चालू केली.संत रामदास स्वामी भारतातील उप महाद्विप येथे गेले आणि तेथे त्यांनी लोकांच्या सामाजिक जीवना विषयी अभ्यास केला.नैसर्गिक आपत्तीवरून होणारे लोकांचें नुकसान याचा त्यांनी नकारात्मक दृष्टिकोन पहिला.

त्याकाळी देशामध्ये बऱ्यापैकी सर्व ठिकाणी मुस्लिम राजवट होती ,मुस्लिम राजवट आपल्या जनतेवर करत असलेला अत्याचार संत रामदास स्वामी यांनी पाहिला.या काळात त्यांनी “अस्मानी सुलतानी” आणि “प्रचीकर्णीरूपन” ही दोन पुस्तके लिहिली.संत रामदास स्वामी यांची ही अध्यात्मिक यात्रा १२ वर्षाची होती.या यात्रेत संत रामदास स्वामी यांनी हिमालयाची देखील यात्रा केली.असे म्हणतात की ,या काळात संत रामदास स्वामी यांची भेट सिखांचे सहावे गुरू हरगोविंद यांच्याशी श्रीनगर येथे झाली.

संत रामदास स्वामी यांचे कार्य ( Work of Sant Ramdas Swami in Marathi )

अध्यात्मिक यात्रा झाल्यानंतर संत रामदास स्वामी हे महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे आले.नंतर त्यांनी मसूर येथे रामनवमी चे आयोजन केले.या रामनवमी कार्यक्रमाला हजारोंच्या संख्येमध्ये राम भक्त आले होते.असे म्हणतात की संत रामदास स्वामी यांना नदीमध्ये प्रभू श्री राम यांच्या मुर्त्या सापडल्या.

१६४४ मध्ये संत रामदास स्वामी यांनी चाफळ येथे येऊन आपल्या कार्याला सुरवात केली.येथे चाफळ येथे त्यांनी प्रभू श्री राम यांची मूर्ती स्थापन केली.या काळात ते गावातील तरुण मुलांना व्यायामाचे महत्व पटवून देत आणि त्याकाळी त्यांनी हनुमान मंदिरांची देखील निर्मिती केली.संत रामदास स्वामी यांनी जगाला ,कठीण परिस्थितीत हार न मानन्याचा सल्ला दिला.आपण कठीण परिस्थितीत हार न मानता संयम बाळगला पाहिजे ,असे त्यांचे मत होते.

छत्रपती शिवाजी महाराज आणि संत रामदास स्वामी यांची भेट ( Meeting of Sant Ramdas Swami and Chatrapati Shivaji Maharaj in Marathi )

छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.संत रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट १६४९ मध्ये चाफळ येथील शिंगणवाडी येथे झाली.ही एक एतहासिक भेट होती.

संत रामदास स्वामी यांचे निधन ( Death of Sant Ramdas Swami in Marathi )

संत रामदास स्वामी यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यभर प्रभू श्री राम यांची भक्ती केली.त्यांचे निधन १३ जानेवारी १६८१ मध्ये सातारा येथील सज्जनगडावर झाले.त्यांच्या निधनाच्या पाच दिवस आधीपासून त्यांनी अन्नाचा त्याग केला होता.त्यांच्या आयुष्यातील शेवटचे काही दिवसही ते प्रभू श्री राम यांची भक्ती करण्यामध्ये घालवत होते.

ते ” श्री राम, जय राम ,जय जय राम” या नामाचे जप करत होते.संत रामदास स्वामी यांच्या शेवटच्या काही दिवसात त्यांचे शिष्य उद्धव स्वामी आणि अक्का स्वामी हे त्यांच्या जवळ होते.संत रामदास स्वामी यांच्या निधनानंतर उद्धव स्वामी यांनी त्यांचे अंतिम संस्कार केले.

FAQ

रामदास स्वामी यांचा जन्म केव्हा झाला ?

रामदास स्वामी यांचा जन्म २४ मार्च १६०८ मध्ये झाला.

रामदास स्वामी यांचे खरे नाव काय होते ?

रामदास स्वामी यांचे खरे नाव “नारायण सूर्याजी ठोसर” असे होते.

रामदास स्वामी यांच्या आईचे नाव काय होते ?

संत रामदास स्वामी यांच्या आईचे नाव “रानुबाई ठोसर” असे होते.

संत रामदास स्वामी यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

संत रामदास स्वामी यांच्या वडिलांचे नाव ” सूर्याजी पंत ” असे होते.

संत रामदास स्वामी यांनी आपल्या जीवनभर कोणते कार्य केले ?

संत रामदास स्वामी यांनी आपल्या जीवनभर प्रभू श्री रामांची भक्ती केली.त्यांनी लोकांना अध्यात्मिक गोष्टींचे आणि व्यायामाचे महत्त्व पटवून देण्यासाठी जीवनभर प्रयत्न केले.

संत रामदास स्वामी यांचे निधन केव्हा झाले ?

संत रामदास स्वामी यांनी आपल्या शेवटच्या काही दिवसात देखील प्रभू श्री राम यांची भक्ती केली आणि त्यांनी १३ जानेवारी १६८१ मध्ये शेवटचा श्वास घेतला.

आजच्या लेखामधून आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू असणारे संत रामदास स्वामी यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment