संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Namdev Maharaj Information In Marathi

Sant Namdev Maharaj Information In Marathi महाराष्ट्राला थोर वारकरी संप्रदाय लाभलेला आहे. याच वारकरी संप्रदायातील एक संत, कवी म्हणजेच श्री संत नामदेव महाराज होय. संत नामदेव हे एक उत्तम कवी होते ,त्यांनी अनेक भाषांमधून काव्य देखील रचली आहेत. कीर्तनाच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार त्यांनी पंजाब या राज्यांपर्यंत पसरवला. अशा या महान संत, कवी तसेच कीर्तनकाराची माहिती आपण आजच्या लेखात बघणार आहोत.

Sant Namdev Maharaj Information In Marathi

संत नामदेव महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Namdev Maharaj Information In Marathi

महाराजांचे मूळ नावनामदेव दामा रेळेकर
जन्म26 ऑक्टोबर 1270
वडीलांचे नावदामा शेट्टी
आईचे नावगोणाई
गुरूविसोबा खेचर
संप्रदायनाथ संप्रदाय, वारकरी,वैष्णव संप्रदाय
भाषामराठी
व्यवसायशिंपी, समाजजागृती
शिष्यचोखामेळा
साहित्यरचनाशब्दकीर्तन, अभंगगाथा, अभंग ,भक्ति कविता
समाधी3 जुलै 1350
समाधिमंदिरपंढरपूर

संत नामदेव महाराजांचा जन्म आणि बालपण (Birth and childhood of sant Namdev maharaj)

संत नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात होऊन गेले. संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर इ.स.1270 रोजी कार्तिक शुद्ध एकादशीस, रोहिणी नक्षत्रास, रविवारी झाला. महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी या गावी संत नामदेव महाराजांचा जन्म झाला.

संत नामदेवांचे पूर्ण नाव नामदेव दामाशेट्टी रेळेकर असे होते. संत नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी तर आईचे नाव गोणाई असे होते. नामदेवांचे वडील दामाशेट्टी हे व्यवसायाने शिंपी होते. कपडे शिवणे हा त्यांचा व्यवसाय होता. संत नामदेवांचे संपूर्ण बालपण हे पंढरपूर या शहरात गेले. नामदेवांचे वडील विठ्ठल भक्त असल्यामुळे संत नामदेव महाराजांना लहानपणापासून विठ्ठलभक्तीची ओढ होती. संत नामदेव हे विठ्ठलाचे भक्त होते.

संत नामदेव महाराजांचा वैवाहिक जीवन (Marriage information of sant Namdev maharaj)

वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी संत नामदेवांचा विवाह गावातील सावकाराच्या मुलीशी झाला. संत नामदेव महाराजांच्या पत्नीचे नाव राजाई असे होते. संत नामदेव आणि राजाई यांना नारा, विठा, गोंदा, महादा असे चार पुत्र आणि लिंबाई नावाची एक मुलगी असे एकुण पाच अपत्ये झाली.

नामदेव महाराजांच्या कुटुंबात एकूण पंधरा माणसे होती. संत जनाबाई व संत चोखामेळा हे संत नामदेव महाराजांना गुरू मानत. संत नामदेवांची शिष्या असणाऱ्या संत जनाबाई या सुद्धा त्यांच्या परिवारातील एक सदस्य होय. संत नामदेव महाराजांच्या कुटुंबात एकूण 15 सदस्य होते आणि या संपूर्ण सदस्यांची जबाबदारी संत नामदेव महाराजांवर होती.

संत नामदेव महाराज यांचे सामाजिक कार्य (Social work of sant Namdev maharaj)

संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक संतकवी होते. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत सावता हे तिघ समकालीन संत होते. विसोबा खेचर हे नामदेवांचे गुरू होते. नामदेव महाराजांनी भारतभर भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला.संत  नामदेवांनी भारतातील पंजाब राज्यापर्यंत देखील हे भागवत धर्माचे कार्य पसरवले.

संत नामदेव महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून  समाजात जनजागृतीचे कार्य केले. अभंग कीर्तनाच्या माध्यमातून नामदेवांनी समाज प्रबोधन केले. संत नामदेवांनी कर्मकांड – पूजा, मंत्र-तंत्र, अशा अंधश्रद्धेतून लोकांना दूर राहण्याची शिकवण दिली. संत नामदेव महाराजांनी लोकांना जाग केले. समाजातील सामाजिक विषमता दूर केली, उच्चनिच भेदाभेद मोडले.

विठ्ठल एका मूर्तीतच नाही तर तो अवघ्या चराचरात  आहे हे ज्ञान संत नामदेवांना त्यांच्या गुरुंनी विसोबा यांनी दिलं. संत नामदेव महाराजांनी अनेक लोकांना भक्तिमार्गाला लावले. सर्वसामन्यांतच परमेश्वर हे नमदेवांनी लोकांना समजावून सांगितलं.

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीनंतर सुमारे 50 वर्षे नामदेव महाराजांनी आजीवन भागवतधर्माचा प्रचार  आणि प्रसार केला. संत नामदेवांनी महाराष्ट्रात भावनिक एकात्मता जपण्याचे अवघड कार्य केले. पंजाबमधील शीख बांधव महाराजांना “नामदेव बाबा” म्हणून ओळखतात,त्या लोकांना महाराज आपलेसे वाटतात, ते बांधव संत नामदेवांचे गुणगान करतात.

संत नामदेव महाराजांचे लेखन कार्य (Writing Work of sant Namdev maharaj)

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या कार्यकाळात संत नामदेव महाराज हे होऊन गेले. संत नामदेव महाराजांची अभंगगाथा प्रसिद्ध आहे. या अभंगगाथेत सुमारे  2500 अभंग आहेत. संत नामदेवांनी शौरसेनी भाषेतही काही अभंग रचलेत. यात एकूण 125 पदे आहेत. यातीलच बासष्ट अभंग हे शीख पंथाचा ग्रंथ गुरुग्रंथ साहेबमध्ये घेतले आहेत.

संत नामदेव महाराजांनी आदि, समाधी व तीर्थावळी यालाच तीर्थावली असेही म्हणले जाते या गाथांतील तीन अध्यायांतून संत ज्ञानेश्वर महाराजांचे चरित्र सांगितले आहे. नामदेव महाराज आपल्या कीर्तनांत अनेक चांगल्या ग्रंथांचा उल्लेख असे.

संत नामदेव महाराज हे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन असल्याने, नामदेवांनी संत ज्ञानेश्वर महाराजांसह संपूर्ण महाराष्ट्रभर प्रवास केला, भक्तिगीते देखील लिहिली. संत नामदेव महाराजांनी अनेक प्रकारच्या साहित्यरचना रचल्या. त्यांनी वज्र भाषेतही काव्ये रचली, हिंदी भाषेतून काही अभंग रचले.

संत नामदेव महाराजांसंबंधी अख्यायिका (Sant Namdev maharaj )

नामदेवांबद्दल अनेक आख्यायिका प्रसिध्द आहेत. त्यातीलच एक म्हणजे संत नामदेव महाराज लहान असताना, एकदा त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितले की आज देवाला प्रसाद तू दाखव. तेव्हा संत नामदेवांनी देवाला नुसता नेवैद्य दाखविला नाही, तर देवापुढे प्रसाद खाण्याची वाट बघत बसले. तेव्हा विठ्ठल प्रत्यक्ष प्रकट झाले व त्यांनी संत नामदेव महाराजांनी दिलेला सुद्धा प्रसाद ग्रहण केला.

एकदा संत नामदेव महाराज औंढा येथील नागनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी गेले असता, तेव्हा तेथील पुजाऱ्यांनी त्यांना भजन न करण्यास सांगितले. पुजाऱ्यांचे ऐकून नामदेव महाराज मंदिराच्या मागील बाजूस बसून देवाची आळवणी केली असता, देवाने पूर्व दिशेस असलेले मंदिराचे मुख पश्चिम दिशेस केले. आजसुद्धा ते मंदिर तसेच पश्चिमाभिमुख आहे.

एकदा कुत्र्याने चपाती पळवली असता त्या कुत्र्याला ती चपाती कोरडी खावा लागू नये म्हणून संत नामदेव महाराज, त्याच्यामागे तुपाची वाटी घेऊन गेले .

संत नामदेव महाराजांचा मृत्यू (Death of sant namdev maharaj)

महाराष्ट्राचे हे एक महान संत आषाढ वद्य त्रयोदशी, शके 1272 मध्ये पांडुरंगचरणी पंढरपूर येथे विलीन झाले. त्या दिवशीची तारीख 3 जुलै, 1350 आणि वार शनिवार होता. पण संत नामदेव महाराजांच्या समाधी तारखेबद्दल अजूनही निश्चितता नाही.

FAQ

संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव काय आहे?

संत नामदेव महाराजांचे पूर्ण नाव हे नामदेव दामा रेळेकर असे आहे.

संत नामदेव महाराजांचा जन्म कधी व कोठे झाला?

संत नामदेव महाराजांचा जन्म 26 ऑक्टोबर इ.स.1270 रोजी महाराष्ट्र राज्यातील हिंगोली जिल्ह्यातील नरसी-बामणी या गावी झाला.

संत नामदेव महाराजांच्या गुरूंचे नाव काय होते?

संत नामदेव महाराजांच्या गुरूंचे नाव विसोबा खेचर असे होते.

संत नामदेव महाराजांचा कौटुंबिक व्यवसाय काय होता ?

संत नामदेव महाराजांचा कौटुंबिक व्यवसाय शिंपी म्हणजेच कपडे शिवणे हा होता.

संत नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?

संत नामदेव महाराजांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी रेळेकर असे होते.

संत नामदेव आणि राजाई यांना एकूण किती अपत्ये झाली?

संत नामदेव आणि राजाई यांना चार मुले आणि एक मुलगी असे एकुण पाच अपत्ये झाली.

संत नामदेव महाराजांच्या अभंगगाथेत एकूण किती अभंग आहेत?

संत नामदेव महाराजांच्या अभंगगाथेत एकूण 2500 अभंग आहेत.

निष्कर्ष (Conclusion)

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. याच भूमीतील एक संत म्हणजे संत नामदेव महाराज होय. संत नामदेव महाराजांनी भारतभर भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला. संत नामदेव महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी खर्च केले. नामदेवांनी समाजातील अंधश्रद्धा, जतिभेद, उच्चनीचता घालवली.

Leave a Comment