संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi

Sant Janabai Information In Marathi महाराष्ट्र राज्यामध्ये खूप संत होऊन गेले ,त्या सर्व संतांनी समाजासाठी काही मोलाचे उपदेश दिले आणि त्या उपदेशाचा वापर जर आपण दैंनदिन जीवनात केला ,तर आपली प्रगती निश्चित होऊ शकते.अशाच एका संतां बद्दल म्हणजे संत जनाबाई यांच्याबद्दल आपण आजच्या लेखामध्ये माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखा द्वारे जाणून घेऊया संत जनाबाई यांच्या विषयी मराठी माहिती.

Sant Janabai Information In Marathi

संत जनाबाई यांची संपूर्ण माहिती Sant Janabai Information In Marathi

संत जनाबाई यांचा जीवन परिचय / The Biography of Saint Janabai in Marathi

संतं जनाबाई ह्या महाराष्ट्रातील एक संत होत्या आणि संत जनाबाई ह्या विठ्ठल देवाच्या परम भक्त होत्या.आपल्या आयुष्यामध्ये संत जनाबाई यांनी खूप काव्यांची ,अभंगांची निर्मिती केली ,त्यांच्या काव्यांमधून त्यांचे श्री विठ्ठल यांच्या बद्दल प्रेम दिसून येते.

संत जनाबाई या संत नामदेवांना आपले गुरू मानत होत्या आणि त्यांच्या भरपूर काव्यांमध्ये त्यांनी संत नामदेवांचा उल्लेख केला होता.संत जनाबाई यांनी खूप ओव्या लिहिल्या आहे आणि आजही महाराष्ट्रातील स्त्री जाते दळताना संत जनाबाई यांनी लिहिलेल्या ओव्या गातात.

संत जनाबाई यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब / Birth of Sant Janabai and Family of Saint Janabai in Marathi

संत जनाबाई ह्या संत नामदेव यांच्या काळातील एक संत होत्या.संत जनाबाई यांचा जन्म १२५८ साली परभणी जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या किनारी वसलेल्या गंगाखेड गावी झाला.संत जनाबाई यांच्या वडिलांचे नाव ‘ दमा ‘होते ,तर त्यांच्या आईंचे नाव ‘ करुंडबाई ‘होते.

संत जनाबाई यांचे वडील दमा आणि त्यांची आई करुड बाई हे दोघेही विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते आणि ते दोघेही दरवर्षी न चुकता विठ्ठलाच्या वारीला जात होते.

संत जनाबाई आणि संत नामदेव यांची भेट / Meeting of Saint Janabai and Saint Namdev in Marathi

संत जनाबाई यांचे वडील तेल काढण्याचे काम करत होते.लहानपणी एकदा त्यांचे वडील संत जनाबाई यांना घेऊन पंढरपूर ला गेले होते.संत जनाबाई यांनी एकदा संत नामदेवांचे कीर्तन ऐकले होते ,तेव्हा त्यांना ते इतके आवडले की ,त्या त्यांच्या वडिलांना म्हणाल्या की ,” मला इथेच राहायचे आहे ,इथे राहून मला विठ्ठल देवाची भक्ती करायची आहे ” .

संत जनाबाई यांच्या वडिलांनी संत नामदेवांना परवानगी मागितली की ,”माझ्या मुलीला इथे राहूदे ,इथे ती विठ्ठल देवाची भक्ती करेल आणि तुमच्या घराची देवपूजा देखील ती करेल आणि मंदिराची झाड लोट देखील ती करेल.”.संत नामदेव यांनी संत जनाबाई यांना त्यांच्या इथे ठेऊन घेतले.

पुढे जाऊन संत जनाबाई यांनी संत नामदेव यांना आपले गुरू मानले.संत जनाबाई या नामदेवांच्या वाड्यात राहत होत्या आणि विठ्ठल रुक्मिणी चे मंदिर त्या वाड्याच्या समोरच होते ,त्यामुळे संत जनाबाई यांना दररोज भगवान विठ्ठलाचे दर्शन होत होते.संत जनाबाई या शेवट पर्यंत दासी बनुन राहिल्या आणि त्या आपली रोजची कामे करताना भगवान विठ्ठलाचे नाव घेत होत्या.वर्ष १३५० मधील आषाढ महिन्यामध्ये संत नामदेवांना देह सोडला ,त्याच वेळी संत जनाबाई यांनी देखील देह सोडला होता ,असे म्हणतात.

संत जनाबाई यांचं माहेर ( परभणी जिल्ह्यातील गंगाखेड ) आणि त्यांचे पंढरपूर मधील जीवन / The Village of Saint Janabai (Gangakhed) and his life in pandharpur in Marathi

संत जनाबाई यांचा जन्म गंगाखेड या गावी झाला होता आणि या गावात आज ही विठ्ठलाने संत जनाबाई यांना दळताना मदत केलेले जाते दिसून येते.संत जनाबाई यांच्या निधनानंतर या गावामध्ये संत जनाबाई यांची समाधी बांधण्यात आली होती आणि आजही दर वर्षी या गंगाखेड गावातून संत जनाबाई नावाने वारी जाते.संत जनाबाई यांनी आपले बर्या पैकी आयुष्य पंढरपूर येथे घालवले.त्यांनी संपूर्ण आयुष्य काबाड कष्ट केले ,परंतु संत जनाबाई यांना त्यांच्या कामामध्ये साक्षात भगवान विठ्ठल मदत करत होते.

संत जनाबाई आणि संत कबीर यांची भेट / Meeting of Saint Janabai and Saint Kabir in Marathi

त्याकाळी संत जनाबाई यांचे अभंग प्रसिद्ध होऊ लागले होते.संत जनाबाई यांचे काही अभंग संत कबीर दास यांना देखील आवडले होते आणि यावरून संत कबीर दास यांना संत जनाबाई यांना भेटण्याची इच्छा वाटू लागली.ते लगेच संत जनाबाई यांना भेटायला पंढरपूर ला नामदेवांच्या वाड्यात आले , परंतु संत जनाबाई ह्या तिथे न्हवता ,त्या दुसऱ्या गावी गेल्या होत्या.

संत कबीर यांनी संत जनाबाई यांना भेटण्यासाठी त्या गावाला जायचे ठरवले.ते त्या गावात गेले ,तेव्हा त्यांना दोन स्त्रिया गोवऱ्या वरून भांडताना दिसल्या.संत कबीर त्या दोन स्त्रियांच्या जवळ गेले आणि त्यांना “जनाबाई कोण आहेत ? आणि त्या कुठे राहतात ?”हे विचारलेले.

तर संत जनाबाई यांच्या सोबत भांडत असणारी स्त्री म्हणाली ,” हीच ती चोरटी जनी !” ,त्या बाईचे शब्द संत कबीर यांना विचित्रच वाटले ,कारण त्यांच्या मनामध्ये  संत जनाबाईंची वेगळी प्रतिमा होती.संत जनाबाई संत कबीर यांना म्हणाल्या ,”तुम्ही कोण आहे इथे कशाला आला आहात ” .हे शब्द ऐकून देखील संत कबीर यांना विचित्रच वाटले.

संत जनाबाई आणि त्या दुसऱ्या स्त्री मध्ये गोवऱ्या वरून भांडण लागले होते ,संत जनाबाई म्हणत होत्या,” ह्या माझ्या गोवऱ्या आहेत” आणि ती दुसरी स्त्री म्हणत होती ,”ह्या जनी ने माझ्या गोवऱ्या चोरल्या आहेत”.नंतर संत जनाबाई यांनी संत कबीरांना न्याय करायला सांगितले.

त्या संत कबीरांना म्हणाल्या ,”तुम्ही ह्या सगळ्या गोवऱ्या एकत्र करा आणि तुम्ही प्रत्येक गोवरी कानाला लावा ,तुम्हाला ज्या गोवरी तून विठ्ठल नाव येईल ,ती गोवरी माझी आहे आणि ज्यातून तुम्हाला विठ्ठल नाव येणार नाही ,ती गोवरी माझी नाही ,ती ह्या बाईची आहे”.संत कबीर यांना आधी विचित्रच वाटले ,परंतु त्यांनी त्या गोवऱ्या तील प्रत्येक गोवरी कानाला लावली ,त्या गोवऱ्या पैकी बर्या पैकी गोवऱ्या तून विठ्ठल असा आवाज येत होता ,संत कबीर यांना तो आवाज ऐकून धक्काच बसला.

शेवटी त्यांना संत जनाबाई यांच्या गोवऱ्या आणि त्या दुसऱ्या स्त्री च्या गोवऱ्याची वाटणी केली.त्या दुसऱ्या स्त्रीने मुद्दामून संत जनाबाई यांच्यावर आरोप लावला होता.शेवटी संत कबीर यांनी संत जनाबाई यांना आपली ओळख सांगितली आणि ते जनाबाईंच्या घरी गेले.

संत जनाबाई ह्या आपल्या कामातून विठ्ठलाची भक्ती करत होत्या ,त्यांना वाटत होते की ,”विठ्ठल हा कणा कणामध्ये आहे ,विठ्ठल सर्वत्र आहे”.

नाव –संत जनाबाई
आईचे नाव –करूंड बाई
वडिलांचे नाव –दमा
जन्म –१२५८
मृत्यू –१३५०
गुरुंचे नाव –संत नामदेव

FAQ

संत जनाबाई यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला आणि त्यांचा जन्म कोणत्या गावी झाला?

उत्तर – संत जनाबाई यांचा जन्म १२५८ च्या आसपास झाला आणि संत जनाबाई यांचा जन्म महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गावी झाला.

संत जनाबाई यांचे गुरू कोण होते ?

संत जनाबाई ह्या संत नामदेवांना आपले गुरू मानत होत्या.

संत जनाबाई ह्या कोणत्या देवाची भक्ती करत होत्या ?

संत जनाबाई ह्या विठ्ठल देवाची मनोभावे भक्ती करत होत्या.

संत जनाबाई यांनी कोणती कार्ये केली ?

संत जनाबाई यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात विठ्ठलाची भक्ती केली ,त्या संत नामदेवांना आपला गुरु मानत होत्या आणि त्यांनी खूप अभंग लिहिली आहेत ,जे की आजही वारकरी संप्रदायातील लोक संत जनाबाई यांनी लिहिलेले अभंग गातात.

संत जनाबाई यांनी जगाला कोणता उपदेश दिला ?

संत जनाबाई यांच्या मते ,”देव हा सर्वत्र आहे “.

संत जनाबाई यांचा मृत्यू कधी झाला ?

संत जनाबाई यांचा मृत्यू १३५० च्या आसपास झाला.

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील थोर संत असणाऱ्या जनाबाई यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment