संत गाडगे महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Gadge Maharaj Information In Marathi

Sant Gadge Maharaj Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्रातील थोर संत श्री संत गाडगे महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत ,जसे की त्यांचा जन्म ,त्यांचे सुरवातीची आयुष्य,त्यांनी समाजासाठी कोणत्या गोष्टींचे योगदान दिले,यासारख्या सर्व गोष्टी आपण आजच्या या लेखामध्ये पाहणार आहोत,चला तर मग आजच्या लेखाला सुरवात करूयात.

Sant Gadge Maharaj Information In Marathi

संत गाडगे महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Gadge Maharaj Information In Marathi

महाराष्ट्र भूमी असणारे  संतांचे योगदान / importance of Sant in Maharashtra

महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर संतांनी जन्म घेतला आणि समाज प्रबोधनाचे काम केले.संतांनी समाजाला योग्य वाट दाखवायचे काम केले ,आपल्या महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर ,संत तुकाराम,संत चोखामेळा ,संत जनाबाई ,संत नामदेव ,आणि असे बरेच संत होऊन गेले .

सुरवातीला त्या संतांना समाजाच्या तिरस्काराचा सामना करावा लागला ,परंतु काही काळानंतर समाजाला त्या संतांची कार्याची ओळख झाली ,असेच महाराष्ट्रात एक संत श्री गाडगे महाराज हे देखील होऊन गेले.

संत गाडगे महाराज यांचा जन्म आणि त्यांची कार्ये / birth of Sant Gadge Maharaj and his work

संत गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ साली झाली.संत गाडगे महाराज यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील दरिया पुर तालुक्यातील शेडगाव गावी झाला.संत गाडगे महाराज यांना लोक लाडाने “गाडगे बाबा” म्हणत.संत गाडगे बाबांनी गावोगावी जाऊन स्वच्छतेचा प्रसार केला.

त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वच्छता करण्यामध्ये आणि स्वच्छता संबंधी लोकांना जागरूक करण्यामध्ये घालवले.संत गाडगे बाबांनी सामजिक न्याय करण्यामध्ये देखील रुची होती.मागच्या शतकात झालेल्या सामाजिक न्याय आंदोलनामध्ये देखील गाडगे बाबांनी सहभाग घेतला होता.

संत गाडगे महाराज यांची ओळख – Introduction of Sant Gadge Maharaj –

संत गाडगे महाराज यांचे पूर्ण नाव “डेबूजी जिंगराजी जनोरकर” असे होते आणि त्यांच्या वडिलांचे नाव “जिंगराजी राणोजी जनोरकर” असे होते.संत गाडगे बाबांच्या आईचे नाव “सखुबाई जिंगराजी जनोरकर” असे होते.संत गाडगे महाराज हे वैज्ञानिक दृष्टिकोन असणारे संत होते ,त्यांनी आपल्या आयुष्यातील जास्तीत जास्त वेळ दलितांची सेवा करण्यामध्ये घालवला.

संत गाडगे महाराज हे अंधश्रधदेच्या विरुद्ध होते ,त्यांना समाजात वाढत चालेल्या अंधश्रद्धेला आळा घालायचा आहे ,यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले.त्यांनी समाज अंधश्रद्धा मुक्त करण्यासाठी प्रयत्न केले.संत गाडगे महाराज यांनी समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून दिले.संत गाडगे महाराज यांनी त्यांच्या संपूर्ण आयुष्यात स्वच्छतेचा प्रसार केला.

संत गाडगे महाराज यांनी समाज प्रबोधनासाठी दिलेले संदेश / Message given by Sant Gadge Maharaj for the society

संत गाडगे महाराज हे एक थोर समाजसुधारक होते आणि जीवनभर सत्याचा मार्ग स्वीकारला होता.त्याकाळी  गरीब आणि दलीत समाजामध्ये अंधश्रद्धा खूप वाढली होती.ही वाढलेली अंधश्रद्धा कमी करण्याचे आणि लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देण्याचे काम संत गाडगे महाराज यांनी केले.त्यांच्या मते ,”खरे संत तेच ,जे की गरिबांची ,अनाथ लोकांची ,आणि विकलांग लोकांची सेवा करतात”.

संत गाडगे महाराज यांचे म्हणणे होते की,देव हा मूर्ती मध्ये नसून तो माणसांमध्ये आहे”त्यामुळे ते लोकांना संदेश देत होते की ,तुम्ही देवळांमध्ये देव न शोधता तो देव माणसांमध्ये शोधा”.संत गाडगे महाराज हे चमत्कारांवर ,मंत्र – तंत्र , यांच्यावर ते विश्वास ठेवत न्हवते.

संत गाडगे महाराज यांनी कधीच मूर्तीला देव मानले नाही ,त्यांच्यासाठी दिन दुबळे ,अनाथ ,विकलांग ,दलीत हेच देव होते आणि त्यांची सेवा करणे हीच देवाची सेवा करणे होते.संत गाडगे महाराज यांनी महाराष्ट्र राज्यातील विविध ठिकाणी अनाथ आश्रम ,धर्मशाळा ,शाळा यांची स्थापना केली.

संत गाडगे महाराज यांनी कीर्तनातून दिलेले उपदेश / The advice of Sant Gadge Maharaj through his kirtan

संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर दीन दुबळ्याची सेवा केली .त्यांनी त्यांचे आयुष्य समाजा मध्ये पसरलेल्या अंधश्रध्देला आणि अज्ञानतेला दूर करण्याच्या घालवले.संत गाडगे महाराज यांनी समाजातील अंधश्रध्दा दूर करण्यासाठी कीर्तनाचा मार्ग निवडला.त्यांनी कीर्तना द्वारे समाजाचे प्रबोधन केले ,समाजाला अज्ञानते मधून दूर करण्यासाठी त्यांनी कीर्तनाचा मार्ग निवडला.

ते त्यांच्या किर्तणामधून लोकांच्या अज्ञान तेला समजण्यासाठी ते लोकांना चित्र – विचित्र प्रश्न विचारत असत.संत गाडगे बाबांनी दिलेले उपदेश हे सरळ होते आणि ते उपदेश समाजाच्या हिताचे होते.त्यांनी लोकांना असे संदेश दिले की ,”चोरी करू नका, सावकारांकडून कर्ज काढू नका ,धर्माच्या नावावर जनावरांना मारू नका ,जातीमध्ये भेदभाव करू नका “.त्यांनी लोकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न केला की ,” देव हा दगडाच्या मूर्तीमध्ये नाही ,तर माणसांमध्ये आहे ,तुम्ही मूर्तीच्या देवाची पूजा न करता ,माणसांची पूजा करा.”

संत गाडगे महाराज हे संत तुकाराम महाराजांना आपला आदर्श मानत होते.ते म्हणत होते की ,मी कुणाचाही गुरू नाही आणि मी कुणाचाही शिष्य नाही”.संत गाडगे महाराज यांचे म्हणणे गावाकडील  गरीब लोकांपर्यंत पोहचावे म्हणून संत गाडगे महाराज हे आपल्या कीर्तना मध्ये वर्हाडी भाषेचा वापर करत होते.संत गाडगे महाराज हे आपल्या कीर्तना मध्ये संत तुकारामांच्या अभगांचा देखील वापर करत होते.

संत गाडगे महाराज यांनी आयुष्यभर गरीब लोकांची सेवा केली ,त्यांनी ज्याला मदत हवी आहे ,त्या सर्वांची मदत केली ,आणि त्या मदत केल्याच्या बदल्यात त्यांनी कशाचीही अपेक्षा केली नाही.ते आयुष्यभर गरीब आणि दलीत लोकांची मदत करत राहिले.

संत गाडगे महाराज हे जुने कपडे घालायचे आणि ज्या ज्या गावामध्ये ते कीर्तनासाठी किंवा अन्य कामासाठी जायचे ,त्या त्या गावामध्ये ते स्वच्छता करायचे .त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य स्वच्छता संबंधी लोकांना जागृत करण्यासाठी आणि अंधश्रद्धा ला आळा घालण्यासाठी घालवले.

संत गाडगे महाराज यांचा मृत्यू / The death of Sant Gadge Maharaj

संत गाडगे महराज यांचा मृत्यू २० डिसेंबर १९५६ मध्ये झाला.

नाव –डेबूजी जिंगराजी जनोरकर
टोपण नाव –संत गाडगे बाबा
जन्म तारीख –२३ फेब्रुवारी १८७६
मृत्यू –२० डिसेंबर १९५६

FAQ

संत गाडगे महाराज यांचा धर्म कोणता होता ?

संत गाडगे बाबांनी आपले आयुष्य दीन दुबळ्या ची सेवा करण्यामध्ये घालवला .त्यांना वाटत होते की ,मूर्ती मध्ये देव नाही ,तर देव माणसांमध्ये आहे .आपण मूर्ती मधल्या देवाची पूजा न करता , मानस रुपी देवाची पूजा केली पाहिजे.

संत गाडगे महाराज यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला आणि त्यांचा जन्म कुठे झाला ?

संत गाडगे महाराज यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ साली झाला आणि त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यातील अमरावती जिल्ह्यातील दरिया पुर तालुक्यातील शेड गाव येथे झाला.

संत गाडगे महाराज यांचे खरे नाव काय होते ?

संत गाडगे महाराज यांचे खरे नाव “डेबूजी जिंगराजी जनोरकर” हे होते.

संत गाडगे महाराज यांचे टोपण नाव काय होते ?

संत गाडगे महाराज यांचे खरे नाव “डेबूजी जिंगराजी जनोरकर” असून लाडाने त्यांना लोक “संत गाडगे बाबा” म्हणत असत.

संत गाडगे बाबांनी आपल्या आयुष्यात कोणते कार्य केले ?

संत गाडगे बाबांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात समाजाला अंधश्रद्धे पासून मुक्त करण्याचे काम केले ,तसेच त्यांनी कीर्तन घेऊन समाजामध्ये प्रबोधन करण्याचे काम केले.

संत गाडगे महाराज यांचा मृत्यू कोणत्या वर्षी झाला ?

संत गाडगे महाराज यांचा मृत्यू “२० डिसेंबर १९५६” साली झाला.

आजच्या लेखामध्ये आपण  संत श्री संत गाडगे महाराज यांच्याविषयी संपूर्ण माहिती पाहिली ,जसे की त्यांचा जन्म कुठे झाला ,त्यांचे पूर्ण नाव काय ,त्यांनी समाजासाठी कोणत्या गोष्टींचे योगदान दिले ,त्यांना किर्तणामधून समाजाला कोणकोणते संदेश दिले ? यासारख्या सर्व गोष्टी आपण आजच्या या लेखामध्ये पहिल्या .

Leave a Comment