संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Eknath Maharaj Information In Marathi

Sant Eknath Maharaj Information In Marathi महाराष्ट्राला थोर वारकरी संप्रदाय लाभलेला आहे. याच वारकरी संप्रदायातील नाथ म्हणून सर्वविख्यात असणारे संत म्हणजेच संत एकनाथ होय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नंतर सुमारे 250 वर्षांनी एकनाथ महाराजांचा जन्म झाला. आजच्या लेखात आपण संत एकनाथ महाराज यांच्याविषयी जाणून घेणार आहोत.

Sant Eknath Maharaj Information In Marathi

संत एकनाथ महाराज यांची संपूर्ण माहिती Sant Eknath Maharaj Information In Marathi

नावसंत एकनाथ महाराज
जन्मइ.स 1533
जन्म ठिकाणपैठण
आईचे नावरुक्मिणी
वडीलांचे नावसूर्यनारायण
गुरूजनार्दन स्वामी
संप्रदायवारकरी
मृत्यू26 फेब्रुवारी इ.स. 1599 फाल्गुन वद्य षष्ठी, शके 1521

संत एकनाथांचा बालपण आणि विवाह : (Childhood and marriage information of sant eknath)

संत एकनाथ महाराजांचा जन्म महाराष्ट्रातील पैठण या ठिकाणी देशस्थ ब्राह्मणाच्या घरी इ.स. 1533 मध्ये झाला. संत एकनाथ महाराजांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर नाथांच्या आईचे नाव रुक्मिणी असे होते. पण एकनाथ महाराज यांना आई-वडिलांचे छत्र फार  काळ मिळाले नाही. संत एकनाथ महाराजांचे पणजोबा संत भानुदास यांनी एकनाथांचे पालनपोषण केले. संत एकनाथ यांच्या आजी-आजोबांचे नाव सरस्वती आणि चक्रपाणी असे  होते.

एकदा एकनाथ छोटे असताना आईबरोबर एका किर्तनांत गेले असता तिथे त्यांना गुरु महती ऐकायला मिळाली आणि गुरुभेटीच्या ओढीने हा छोटा मुलगा पैठणपासून देवगिरी किल्ल्यापर्यंत पायी चालत गेला. तेथे त्यांनी पू. जनार्दन स्वामी यांना आपले गुरू मानले

एकनाथ महाराजांनी गुरुसेवा केली,अनेक तीर्थयात्राही केल्या. नाथांनी गुरुगृही राहून सेवा करून ज्ञान मिळवले. तसेच अनेक ग्रंथ, शास्त्रे, पुराण ह्यांचा अभ्यास केला. गुरू जनार्दन स्वामीनी एकनाथाला “रामकृष्ण” हा गुरुमंत्र दिला. गुरूकृपेनं नाथांना साक्षात दत्तात्रेयांनी दर्शन दिले असे देखील म्हणले जाते.

पैठनजवळील वैजापूर येथील एका मुलीशी एकनाथांनी विवाह केला.तिचे नाव होते गिरिजा. एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी एकूण तीन अपत्ये झाली. त्या मुलींचे नाव  गोदावरी व गंगा असे होते तर मुलाचे नाव हरी असे होते. यातील नाथांचा मुलगा हरी याने एकनाथ महाराजांचेच शिष्यत्व पत्करले.

संत एकनाथ महाराजांचे सामाजिक कार्य (Social Work of sant eknath maharaj)

संत ज्ञानदेव आणि संत नामदेव यांनी जनसामान्यांत  भागवत धर्म ,माणुस धर्म रुजविण्याचे जे कार्य केले, त्याच सामाजिक जनजागृतीच्या कार्याचा पुढे एकनाथांनी मोठा विस्तार केला.

संत एकनाथ महाराजांनी अभंगरचना, भारूड, जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या साहाय्याने समाजात जनजागृती केली. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, गैरसमजूती यासारखे समाजातील दोष दूर करायला या भरुडांचा फार उपयोग झाला.

एकनाथ महाराज हे एक संतकवी होते. एकनाथांनी आपल्या साहित्याद्वारे जनतेचे रंजन आणि जनतेमध्ये प्रबोधन घडवून आणले. समाजातून जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.

संत एकनाथ महाराजांच्या गौळणी म्हणजे त्यांच्या अत्यूंच्च कृष्णभक्तीच जणू दर्शनच होय.

संत एकनाथ महाराज हे दत्तभक्त होते तसेच ते देवीभक्त पण होते. नाथांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या समाधीचा जिर्णीद्धार केला. तसेच संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात नित्य पूजेची व्यवस्था लावून दिली. संत एकनाथ महाराजांनी आळंदी समाधी सोहळ्याची कार्तिकी यात्रा देखील पुन्हा सुरू केली.

संत एकनाथांनी प्रत्यक्ष कृतीतूनच समाजाला भूतदयेचे धडे घालवून दिले. संत एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजले, वारंवार डंख मारणाऱ्या विंचवाला जीवदान दिले. वाळवंटात राहणाऱ्या महारांच्या पोराला प्रेमानं कडेवर घेऊन त्यांनी उच्च-नीचतेच्या ,जातीभेदाच्या कल्पना मोडून काढल्या. अशाप्रकारे आपल्या प्रत्यक्ष आचरणातून संत एकनाथांनी समाजाला समतेचीआणि ममतेची शिकवण दिली.

संत एकनाथ महाराजांचे लेखन कार्य (Writing Work of sant eknath maharaj)

एकनाथ महाराजांचा “एकनाथी भागवत”  हा एक लोकप्रिय ग्रंथ आहे. हा एक भागवत पुराणातील अकराव्या स्कंधावर मराठीतून ओवीबद्ध टीका करणारा ग्रंथ आहे. संत एकनाथ महाराजांनी या ग्रंथात एकूण 18,810 ओव्या लिहिल्या आहेत. तर व्यास ऋषींनी  रचलेले मूळ भागवत हे 12 स्कंदांचे आहे.

एकनाथ महाराजांनी “भावार्थ रामायण” हा ग्रंथ लिहला. या ग्रंथात सुमारे 40 हजार ओव्या आहेत. या ग्रंथाचे हिंदी भाषेसह इतर अनेक भाषांतही भाषांतर झालेले आहे. संत एकनाथांनी “रुक्मिणीस्वयंवर” हे काव्य देखील लिहिले.

संत एकनाथ महाराजांचे एक महत्त्वाचे कार्य म्हणजे त्यांनी ज्ञानेश्वरी या ग्रंथाची प्रत शुद्ध केली. हे कार्य नाथांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर 250 वर्षांनी शके 1506 मध्ये पूर्ण केले.

संत एकनाथ महाराज यांच्या “एका जनार्दनी” च्या प्रत्येक रचनेतील उल्लेखातून एकनाथांची त्यांच्या गुरूवरील निष्ठा दिसून येते. संत एकनाथांच्या अनेक आरत्या आजही लोकप्रिय आहेत.

संत एकनाथ महाराजांचा मृत्यू (Death of sant eknath maharaj)

संत एकनाथ महाराजांनी फाल्गुन वद्य षष्ठी, शके 1521 (26 फेब्रुवारी इ.स. 1599) या दिवशी आपला देह ठेवला. हा फाल्गुन वद्यचा म्हणजेच एकनाथांना समाधी  दिवस “एकनाथ षष्ठी” म्हणून ओळखला जातो आणि महाराष्ट्रभर साजरा देखील केला जातो.

संत एकनाथ महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांचा मुलगा व शिष्य हरि यांनी एकनाथ महाराजांच्या पादुका दरवर्षी आषाढी वारीसाठी पंढरपूरास नेण्यास सुरुवात केली.

संत एकनाथ महाराजांमुळेच पैठण या छोट्याशा गावालाही क्षेत्रत्व प्राप्त झाले.

संत एकनाथ महाराजांची परंपरा (Legacy of sant eknath maharaj )

संत एकनाथ महाराजांची वंशपरंपरा :

एकनाथ महाराज आणि गिरिजाबाई यांना दोन मुली आणि एक मुलगा अशी एकूण तीन अपत्ये झाली. त्या मुलींचे नाव  गोदावरी व गंगा असे होते तर मुलाचे नाव हरी असे होते. पुढे नाथांचा मुलगा हरी याला प्रल्हाद, मेघश्याम व राघोबा अशी ही तीन अपत्ये झाली. यापैकी केवळ मधला मुलगा मेघश्याम याचा मूळ वंश पैठण येथे अस्तित्वात आहे. कवी मुक्तेश्वर हे एकनाथ महाराजांचे मूलीकडून नातू होत.

संत एकनाथ महाराज यांचे काही वंशज पैठण येथे आहेत तर काही पैठणच्या बाहेरही आहेत. संत एकनाथ महाराजांच्या पश्चात त्यांच्या वंशजांनी त्यांची वारकरी संप्रदायाची आणि दत्त संप्रदायाची कार्य पुढे चालूच ठेवले.

संत एकनाथ महाराजांच्या वांशाजातील पहिले रामचंद्र  हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 11 गुरूंपैकी एक होते याचे पुरावे आढळतात. तसेच चौथ्या पाचव्या पिढीत छय्याबुवा म्हणून एक सत्पुरुष होऊन गेले त्यांच्या संबंधीत अनेक कथा सांगितल्या गेल्या आहेत.

वांशाजतील सहाव्या सातव्या पिढीतील काशिनाथबुवा यांचा उल्लेख गायक व रामचंद्रबाबा दुसरे  यांचा उल्लेख कीर्तनकार व गायक केलेला आढळतो. या दोघांचा मोठा प्रभाव भोसले,पेशवे, शिंदे, होळकर आदींवर असल्याचे दिसते. सद्यस्थितीत संत एकनाथ महाराजांचे 14 वे वंशज म्हणून “योगिराज गोसावी” यांचे नाव घेतले जाते.

संत एकनाथ महाराजांची गुरुपरंपरा :

  • नारायण (विष्णू)
  • ब्रह्मदेव
  • अत्री ऋषी
  • दत्तात्रेय
  • जनार्दनस्वामी
  • एकनाथ

संत एकनाथ महाराजांची शिष्यपरंपरा :

संत एकनाथ महाराजांचे शिष्य तसेच शिष्य शाखा या महाराष्ट्र राज्य आणि राज्याबाहेरील पसरलेल्या आहेत. त्यापैकी काही श्री भगवानगड (नगर), श्रीकृष्णदयार्णव महाराज (पैठण, भारतातील सर्व मठ), श्री तुकाविप्र महाराज (पंढरपूर,अंजनवती) हे आहेत.

FAQ

संत एकनाथ महाराज यांचा जन्म कधी व कोठे झाला?

संत एकनाथ महाराज यांचा जन्म इ.स.1533 मध्ये महाराष्ट्रातील पैठण येथे झाला.

संत एकनाथ महाराज यांच्या आई – वडिलांचे नाव काय आहे?

संत एकनाथ महाराजांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण तर आईचे नाव रुक्मिणी असे होते.

संत एकनाथ महाराज यांचे पालनपोषण कोणी केले?

संत एकनाथ महाराज यांचे पालनपोषण त्यांचे पणजोबा संत भानुदास यांनी केले.

संत एकनाथ महाराजांनी भागवत पुराणावर टीका करणारा कोणता ग्रंथ लिहला?

संत एकनाथ महाराज यांनी भागवत पुराणावर टीका करणारा “एकनाथी भागवत” हा ग्रंथ लिहला.

संत एकनाथ महाराजांचा समाधी दिवस म्हणजेच  फाल्गुन वद्य काय म्हणून ओळखला जातो?

संत एकनाथ महाराजांचा समाधी दिवस म्हणजेच  फाल्गुन वद्य “एकनाथ षष्ठी” म्हणून ओळखला जातो.

संत एकनाथ महाराज यांच्या “भावार्थ रामायण” या  ग्रंथात किती ओव्या आहेत?

संत एकनाथ महाराजांच्या “भावार्थ रामायण” या  ग्रंथात एकूण 40 हजार ओव्या आहेत.

निष्कर्ष (Conclusion)

महाराष्ट्र राज्याच्या वारकरी संप्रदायातील एक थोर संत म्हणजेच संत एकनाथ महाराज. यांना सर्वजण “नाथ” म्हणून पण ओळखत. संत एकनाथ महाराजांनी अभंगे, भारुडे तसेच एकनाथी भागवत, भावार्थ रामायण , रुक्मिणीस्वयंवर यासारखी सहित्यारचना करून समाजप्रबोधन घडवून आणलं.

त्यांनी केवळ समाजप्रबोधनासाठी लिखाणाचं केले असे नाही तर त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून भूतदया, जातीभेद – अंधश्रध्दा निर्मूलन घडवून आणून समाजात जनजागृती केली.अशाप्रकारे संत एकनाथ महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजासाठी व्यतीत केले.

Leave a Comment