संत चोखामेळा यांची संपूर्ण माहिती Sant Chokhamela Information In Marathi

Sant Chokhamela Information In Marathi आपल्या महाराष्ट्र भूमीत बऱ्याच संतांनी जन्म घेतला आणि त्या प्रत्येक संतांनी लोकांना मोलाचे उपदेश दिले. संतांनी दिलेले उपदेश जर आपण आपल्या जीवनात पाळले ,तर आपण आयुष्यात नक्की प्रगती करू. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका महाराष्ट्र भूमीत जन्म घेतलेल्या थोर संताविषयी आणि त्यांनी केलेल्या कार्याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Sant Chokhamela Information In Marathi

संत चोखामेळा यांची संपूर्ण माहिती Sant Chokhamela Information In Marathi

तसेच आजच्या लेखामधून आपण संतांचे महत्व ,संत चोखामेळा यांचा जन्म ,संत चोखामेळा यांचे वैवाहिक जीवन ,संत चोखामेळा यांना लाभलेले विठ्ठलाचे दर्शन ,संत चोखामेळा यांचा मृत्यू ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या लेखाद्वारे “संत चोखामेळा” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव संत चोखामेळा
मूळ नाव चोखामेळा महार
जन्म १३२८
जन्मस्थळ मेहुणा ,बुलढाणा जिल्हा
पत्नीचे नाव सोयराबाई
मुलाचे नाव कर्ममेळा
गुरू संत नामदेव
समाधी पंढरपूर

संतांचे महत्व (importance of saints in Marathi)

आपल्या महाराष्ट्र भूमीला संतांची भूमी मानले जाते. इथे बऱ्याच थोर संतांनी जन्म घेतला आहे. संत तुकाराम महाराज यांनी आपल्या कीर्तनातून जगाला मोलाचे उपदेश दिले. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी भावार्थदीपिका द्वारे गीतेचे महत्व आपल्या सर्वांना सांगितले.

याचसोबत आपल्या महाराष्ट्र भूमीत इतर बऱ्याच संतांनी जन्म घेतला आणि त्यांनी आपल्या अनुभवातून लोकांना आनंदी जीवन जगण्यासाठी मोलाचे उपदेश दिले. त्या प्रत्येक संतांनी सांगितलेले उपदेश जितके त्या काळात उपयोगी होते ,तितकेच ते आताच्या काळात देखील उपयोगी आहेत.

संत चोखामेळा यांचा जन्म (Birth of Saint Chokhamela in Marathi)

संत चोखामेळा यांचा जन्म इसवी सन १३२८ च्या आसपास झाला होता. संत चोखामेळा यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहूना गावात झाला होता. संत चोखामेळा यांचा जन्म महार कुटुंबात झाला असल्यामुळे , लहानपणापासूनच त्यांच्या कुटुंबीयांना समाजातील काही लोकांचा विरोध सहन करावा लागला होता.

संत चोखामेळा यांचे वैवाहिक जीवन (Married Life of Saint Chokhamela in Marathi)

संत चोखामेळा हे सुरवातीला मोल मजुरीचे काम करत होते. पुढे संत चोखामेळा यांचा विवाह “सोयराबाई” यांच्या सोबत झाला. संत चोखामेळा आणि सोयराबाई यांना एक मुलगा झाला होता आणि त्या मुलाचे नाव त्यांनी “कर्ममेळा” असे ठेवले होते.

संत चोखामेळा (Saint Chokhamela in Marathi)

संत चोखामेळा यांच्या घरचे सर्वजण विठ्ठलांची भक्ती करत असत. काही काळानंतर संत चोखामेळा आणि त्यांचे कुटुंब पंढरपूर येथे आले आणि ते इथेच स्थायी झाले. इथे त्यांचे कुटुंब दररोज विठ्ठलाची भक्ती करत असत. संत चोखामेळा हे महार समाजाचे असल्यामुळे त्याकाळी समाजातील काही लोक संत चोखामेळा यांना विठ्ठलाच्या मंदिरात जाण्याची परवानगी देत नसत.

संत चोखामेळा यांना किती जरी मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा असली तरी ,काही लोकांमुळे त्यांना मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेता येत न्हवते. ते बाहेरूनच विठ्ठलाचे दर्शन घेत असत, तसेच ते आपले नियमितचे काम करताना देखील विठ्ठलाचे नामस्मरण करत असत. संत चोखामेळा यांनी आपला संपूर्ण जीवनात विठ्ठलाची भक्ती केली. संत नामदेव महाराज हे संत चोखामेळा यांचे अध्यात्मिक गुरू होते.

संत चोखामेळा यांना लाभले विठ्ठलाचे दर्शन (Saint Chokhamela got the darshan of Vitthal in Marathi)

संत चोखामेळा दररोज चंद्रभागा नदीमध्ये अंघोळ करून विठ्ठलाचे मुख दर्शन घेत असत. हा त्यांच्या नित्य क्रमच होता. एका रात्री साक्षात विठ्ठल संत चोखामेळा यांच्या समोर आले आणि ते संत चोखामेळा यांना हाताला धरून मंदिरात गेले.

पुढे साक्षात विठ्ठल म्हणाले की ,“तू दररोज मंदिराच्या बाहेरून माझे दर्शन घेतो ,मला तुझी आठवण येत नाही असा एकही क्षण नसतो”. यावर संत चोखामेळा यांनी उत्तर दिले की ,“विठ्ठला तू मायबापा आहेस”. एवढे बोलून संत चोखामेळा विठ्ठलाच्या पायाशी आपला माथा टेकून रडू लागले.

संत चोखामेळा यांचा रडलेला आवाज एका पुजाऱ्याने ऐकला आणि तो पुजारी धावत मंदिरात आला. त्या पुजाऱ्याने संत चोखामेळा यांना मंदिरात पाहिल्यानंतर इतर पुजाऱ्यांना देखील बोलवले. जेव्हा सर्व पुजारी एकत्र मंदिरात आले तेव्हा त्या सर्वांना संत चोखामेळा हे विठ्ठलाच्या मूर्तीच्या चरणात माथा टेकून बसलेले दिसले.

पुढे संत चोखामेळा त्या पुजाऱ्यांना म्हणू लागले की ,“यात माझी काहीच चुकी नाहीये ,मी स्वतःच्या मर्जीने मंदिरात आलेलो नाही ,मला साक्षात विठ्ठलांनी माझ्या हाताला धरून मंदिरात आणले आहे.” यावर पुजारी संत चोखामेळा यांना म्हणाले की ,“तू आता या क्षणापासून पंढरपुरात दिसायचे नाही”.

त्यावर संत चोखामेळा म्हणाले की ,“वारा क्षुद्र लोकांच्या अंगाला स्पर्श करून गेला म्हणून वारा काही वाईट होत नाही ,चंद्रभागा नदीमध्ये क्षुद्र लोकांनी अंघोळ केली म्हणून चंद्रभागा नदीचे पाणी काय वाईट होत नाही ,तसेच विठ्ठल देखील जातीमध्ये भेदभाव करत नाहीत, ते प्रत्येक जातीतील लोकांकडे समदृष्टिने पाहतात”.

संत चोखामेळा यांचा मृत्यू (Death of Sant Chokhamela in Marathi)

संत चोखामेळा यांनी शेवटपर्यंत विठ्ठलाची भक्ती केली. अशा या संत चोखामेळा यांचा मृत्यू दरड कोसळल्यामुळे झाला. असे म्हणतात की ,“संत चोखामेळा यांचा जेव्हा मृत्यू झाला होता तेव्हा त्यांच्या हाडांमधून “विठ्ठल विठ्ठल” असा आवाज येत होता. पुढे संत नामदेव यांनी संत चोखामेळा यांची हाडे एकत्र केली आणि त्यांनी संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूर येथे बांधली.

FAQ

संत चोखामेळा यांचा जन्म केव्हा झाला ?

संत चोखामेळा यांचा जन्म इसवी सन १३२८ च्या आसपास झाला होता.

संत चोखामेळा यांचा जन्म कुठे झाला होता ?

संत चोखामेळा यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहूना गावात झाला होता.

संत चोखामेळा यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

संत चोखामेळा यांच्या पत्नीचे नाव “सोयराबाई” असे होते.

संत चोखामेळा यांच्या मुलाचे नाव काय होते ?

संत चोखामेळा आणि सोयराबाई यांच्या मुलाचे नाव “कर्ममेळा” असे होते.

संत चोखामेळा हे कोणत्या देवाची भक्ती करत होते ?

संत चोखामेळा हे विठ्ठलाची भक्ती करत होते. संत चोखामेळा यांना समाजातील काही लोकांमुळे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या मंदिरात जाण्यास मनाई होती. मंदिरात जाण्यास बंधी असून देखील संत चोखामेळा दररोज बाहेरून विठ्ठलाचे दर्शन घेत असत. तसेच ते आपले नियमितचे काम करताना देखील विठ्ठलाचे नामस्मरण करत असत.

संत चोखामेळा हे कोणत्या संतांना आपला गुरु मानत होते ?

संत चोखामेळा हे संत नामदेव यांना आपला गुरू मानत होते.

संत चोखामेळा यांचा मृत्यू कसा झाला होता ?

संत चोखामेळा यांचा मृत्यू दरड कोसळीमुळे झाला होता. असे म्हणतात की, संत चोखामेळा यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा त्यांच्या मृत हाडांमधून “विठ्ठल विठ्ठल” असा आवाज येत होता. पुढे संत नामदेव यांनी संत चोखामेळा यांची हाडे गोळा केली आणि त्यांची समाधी पंढरपूर येथे बांधली.

संत चोखामेळा यांची समाधी कोठे आहे ?

संत चोखामेळा यांची समाधी पंढरपूर येथे आहे.

आजच्या लेखामध्ये आपण विठ्ठलाचे निःसीम भक्त असणाऱ्या संत चोखामेळा यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण संतांचे महत्व ,संत चोखामेळा यांचा जन्म ,संत चोखामेळा यांचे वैवाहिक जीवन ,संत चोखामेळा यांना लाभलेले विठ्ठलाचे दर्शन ,संत चोखामेळा यांचा मृत्यू, संत चोखामेळा यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment