सायना नेहवाल यांची संपूर्ण माहिती Saina Nehwal Information In Marathi

Saina Nehwal Information In Marathi आजच्या लेखामधून आपण एका महिला बैडमिंटन खेळाडूच्या जीवना विषयी आणि  संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या “सायना नेहवाल” यांच्या जीवना विषयी आणि त्यांच्या बैडमिंटन करियर विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Saina Nehwal Information In Marathi

सायना नेहवाल यांची संपूर्ण माहिती Saina Nehwal Information In Marathi

नाव सायना नेहवाल
जन्म १७ मार्च १९९०
जन्मस्थळ हिसार ,हरियाणा.
आईचे नाव – वडिलांचे नावउषा राणी हरविर सिंह
क्षेत्र बैडमिंटन खेळाडू
पुरस्कार अर्जुन पुरस्कार (२००८) पद्मश्री (२००९) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२००९-१०) पद्म भूषण (२०१६)

सायना नेहवाल यांचा जन्म आणि त्यांचे  सुरवातीचे जीवन (Birth of Saina Nehwal and early life of Saina Nehwal in Marathi)

सायना नेहवाल यांचा जन्म १७ मार्च १९९० मध्ये हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यात झाला होता. त्यांचा जन्म एका हिंदू कुटुंबात झाला होता. सायना नेहवाल यांच्या आईचे नाव “उषा राणी” असे होते तर ,त्यांच्या वडिलांचे नाव “हरविर सिंह” असे होते. सायना नेहवाल यांचे वडील हरविर सिंह हे युनिव्हर्सिटी मध्ये काम करत होते ,तर त्यांच्या आई उषा राणी या त्यांच्या काळातील राज्यस्तरीय बैडमिंटन खेळाडू होत्या.

सायना नेहवाल यांचे प्राथमिक शिक्षण हिसार येथेच झाले ; परंतु सायना नेहवाल यांच्या वडिलांची सतत बदली होत होती ,त्यामुळे आपल्या वडिलांच्या प्रत्येक बदलीसोबत सायना नेहवाल यांना देखील दरवेळी आपली शाळा बदलावी लागत होती. सायना नेहवाल यांचे १२ वी चे शिक्षण हैद्राबाद मधील “संत एनस कॉलेज” मधून पूर्ण झाले होते.

सायना नेहवाल यांना लहानपणापासूनच बैडमिंटन खेळायला आवडत होते. सायना नेहवाल यांचे आई – वडील दोघेही बैडमिंटन खेळ खेळत असल्यामुळे त्या दोघांचा बैडमिंटन खेळण्याचा गुण सायना नेहवाल यांच्यात जन्मतः आला होता. सायना नेहवाल जेव्हा ८ वर्षाच्या होत्या ,तेव्हा त्यांच्या वडिलांनी बैडमिंटन खेळातील डावपेच शिकवण्यासाठी सायना नेहवाल यांचे एडमिशन “लाल बहादूर शास्त्री स्टेडियम,हैद्राबाद” येथे केले होते.

सायना नेहवाल यांचा सुरवातीचा संघर्ष (Early life struggle of Saina Nehwal in Marathi)

सुरवातीला सायना नेहवाल या ज्या ट्रेनिंग सेंटर मधून ट्रेनिंग घेत होत्या ,ते ट्रेनिंग सेंटर सायना नेहवाल यांच्या घरापासून साधारण २५ किलो मीटरच्या अंतरावर होते. सायना नेहवाल यांच्या वडिलांना सायना नेहवाल यांना बैडमिंटन खेळातील एक प्रसिद्ध आणि कौशल्यवाण खेळाडू बनवायचे होते.

सायना नेहवाल यांचे ट्रेनिंग सेंटर त्यांच्या घरापासून साधारण २५ किलो मीटरच्या अंतरावर असल्यामुळे सायना नेहवाल यांचे वडील सायना नेहवाल यांना सकाळी ४ वाजता उठवून त्यांना आपल्या स्कूटर वरून ट्रेनिंग सेंटर जवळ पोहचवत असत. सायना नेहवाल यांच्या यशामध्ये जेव्हढे श्रेय त्यांचे स्वतःचे आहे ,तेवढेच श्रेय हे त्यांच्या आई – वडिलांचे देखील आहे.

सायना नेहवाल या दररोज पहाटे ४ वाजता उठून आपल्या वडिलांसोबत ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग घेण्यासाठी जात असत. ट्रेनिंग सेंटर वरून ट्रेनिंग घेऊन आल्यानंतर त्या शाळेत जात असत. “लाल बहादूर शास्त्री स्टेडियम” मधून काही दिवस ट्रेनिंग घेतल्यानंतर सायना नेहवाल या “एस.एम.आरिफ” यांच्याकडे बैडमिंटन खेळाचे ट्रेनिंग घेऊ लागल्या.

“एस.एम आरिफ” हे त्याकाळचे बैडमिंटन खेळातले नावाजलेले खेळाडू होते आणि त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार देखील मिळाला होता. पुढे नंतर सायना नेहवाल या गोपीचंद यांच्याकडे बैडमिंटन खेळाच्या ट्रेनिंग घेऊ लागल्या. सायना नेहवाल या “गोपीचंद” यांना आपला मेंटोर मानतात.

सायना नेहवाल यांचे बैडमिंटन करियर (Badminton career of Saina Nehwal in Marathi)

सायना नेहवाल यांच्या बैडमिंटन खेळाची सुरवात “जूनियर सीजेक ओपन” या स्पर्धेतून झाली होती. ही “जूनियर सीजेक ओपन” स्पर्धा २००३ मध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या स्पर्धेमध्ये सायना नेहवाल या विजयी झाल्या होत्या. त्यानंतर त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे २००४ मध्ये झालेल्या “कॉमनवेल्थ यूथ गेम्स” स्पर्धेमध्ये सायना नेहवाल यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यानंतर २००५ मध्ये झालेली “एशियन सेटेलाइट बैडमिंटन” स्पर्धा सायना नेहवाल यांनी जिंकली.

२००६ मध्ये सायना नेहवाल यांनी फिलिपिन्स येथे झालेल्या  “४ स्टार टूर्नामेंट ओपेंस” स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता आणि त्यांनी ही स्पर्धा जिंकली होती. ही स्पर्धा जेव्हा झाली तेव्हा ,सायना नेहवाल या फक्त १६ वर्षांचा होत्या आणि ही स्पर्धा जिंकल्यानंतर सायना नेहवाल या ही स्पर्धा जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय आणि आशियायी खेळाडू बनल्या होत्या.

२००८ मध्ये सायना नेहवाल यांनी “वर्ल्ड जूनियर बैडमिंटन चैम्पियनशीप” स्पर्धा जिंकली आणि ही स्पर्धा जिंकल्यानंतर “वर्ल्ड जूनियर बैडमिंटन चैम्पियनशीप” स्पर्धा जिंकणाऱ्या सायना नेहवाल या पहिल्या भारतीय खेळाडू बनल्या होत्या. २००८ मध्ये झालेली “इंडियन नेशनल बैडमिंटन चैम्पियनशीप” स्पर्धा आणि  “कॉमनवेल्थ यूथ गेम्स” स्पर्धा देखील सायना नेहवाल यांनी जिंकली होती.

२००९ मध्ये सायना नेहवाल यांनी बॅडमिंटन जगतातील सर्वोत्तम स्पर्धा असणारी  “इण्डोनेशिया ओपन बॅडमिंटन” जिंकली होती आणि या विजयासोबत ही स्पर्धा जिंकणाऱ्या सायना नेहवाल या पहिल्या भारतीय खेळाडू बनल्या होत्या. तसेच २०१० मध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली “कॉमनवेल्थ” स्पर्धा देखील सायना नेहवाल यांनी जिंकली होती.

२०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बॅडमिंटन खेळामध्ये सायना नेहवाल यांनी ब्राँझ मेडल जिंकले होते आणि या विजयानंतर सायना नेहवाल या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बॅडमिंटन खेळात मेडल जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू बनल्या होत्या. तसेच २०१६ मध्ये रिओ येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सायना नेहवाल यांनी सहभाग घेतला होता ; परंतु ह्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सायना नेहवाल मेडल जिंकू शकल्या नाहीत. २०१८ मध्ये सायना नेहवाल यांनी पी.वी.सिंधू यांना फायनल मध्ये हरवून “कॉमनवेल्थ स्पर्धा” जिंकली होती.

सायना नेहवाल यांना मिळालेले पुरस्कार (Awards received by Saina Nehwal in Marathi)

२००८ मध्ये सायना नेहवाल यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. त्याच्याच पुढच्या वर्षी २००९ मध्ये भारत सरकारकडून सायना नेहवाल यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. याच वर्षी सायना नेहवाल यांचा भारत सरकारकडून “राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार” देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच २०१६ मध्ये सायना नेहवाल यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

FAQ

सायना नेहवाल यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला होता ?

सायना नेहवाल यांचा जन्म १७ मार्च १९९० मध्ये हरियाणा राज्यातील हिसार जिल्ह्यात झाला होता.

सायना नेहवाल यांच्या आईचे नाव काय आहे ?

सायना नेहवाल यांच्या आईचे नाव “उषा राणी” असे आहे.

सायना नेहवाल यांच्या वडिलांचे नाव काय आहे ?

सायना नेहवाल यांच्या वडिलांचे नाव “हरविर सिंह ” असे आहे.

सायना नेहवाल यांनी किती ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता ?

सायना नेहवाल यांनी तीन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यांनी २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल जिंकले होते.

सायना नेहवाल यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

सायना नेहवाल यांना त्यांच्या कार्यासाठी बरेच पुरस्कार मिळाले आहेत. २००८ मध्ये सायना नेहवाल यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तसेच २००९ मध्ये भारत सरकारकडून सायना नेहवाल यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.२००९-१० मध्ये सायना नेहवाल यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता ,तसेच २०१६ मध्ये भारत सरकारकडून सायना नेहवाल यांना पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

आजच्या लेखामध्ये आपण २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये बॅडमिंटन खेळामध्ये ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या सायना नेहवाल यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण सायना नेहवाल यांचा जन्म आणि त्यांचे सुरवातीचे जीवन ,सायना नेहवाल यांचा सुरवातीचा संघर्ष ,सायना नेहवाल यांचे करियर ,सायना नेहवाल यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार, सायना नेहवाल यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment