गुलाब फुलाची संपूर्ण माहिती Rose Flower Information In Marathi

Rose Flower Information In Marathi गुलाब फुलाला फुलाचा राजा म्हणले जाते ,बऱ्यापैकी सर्व लोकांना गुलाबाचे फुल आवडते.खूप वेळा प्रियकर आपल्या प्रेयसी ला किंवा प्रेयसी आपल्या प्रियकराला गुलाबाचे फुल देऊन आपल्या प्रेमाची कबुली देत असते.तुम्हाला ही गुलाब फुल आवडत असेल ,परंतु तुम्हाला गुलाब फुलाविषयी संपूर्ण माहिती माहीत नसेल तर ,आजच्या लेखामधून आपण गुलाबाच्या फुलाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे फुलाचा राजा असणाऱ्या गुलाब फुलाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Rose Flower Information In Marathi

गुलाब फुलाची संपूर्ण माहिती Rose Flower Information In Marathi

फुलाचे नाव गुलाब
फुलाचे इंग्रजी भाषेतील नाव रोज
फुलाचे संस्कृत भाषेतील नाव पाटलम
फुलाचे वैज्ञानिक नाव रोझा
फुलांचे प्रकार १०० हून अधिक
ऋतू नुसार पडणारे झाडांचे प्रकार सदा गुलाब , चैत्र गुलाब
फुलाच्या झाडाचे वर्गीकरण हायब्रीड टी, फ्लोरीबण्डा, पॉलिएन्था, मिनीएचर, लता गुलाब,इत्यादी.

गुलाबांच्या फुलाचे प्रकार (Types of rose in Marathi)

गुलाबाच्या फुलांचे शंभर हून अधिक प्रकार आहेत.यातील गुलाबाचे निम्म्या पेक्षा जास्त प्रकार आशिया खंडात आढळतात.तर त्यातील काही प्रकार युरोप आणि अमेरिका खंडात आढळतात .

गुलाबाचे फुल म्हणले तर आपल्या डोळ्यासमोर फक्त गुलाबी गुलाब दिसते ; परंतु गुलाबाच्या फुलाचे खूप प्रकार आहेत.आपल्या देशामध्ये पिवळे गुलाब,लाल गुलाब ,गुलाबी गुलाब , हिरवे गुलाब , काळे गुलाब  ,पांढरे गुलाब ,इत्यादी गुलाबांच्या रंगाचे प्रकार आढळतात.गुलाबी रंगाचे गुलाब प्रेमाचे प्रतीक मानले जाते . तर पिवळे रंगाचे गुलाब मैत्रीचे प्रतीक मानले जाते आणि पांढऱ्या रंगाचे गुलाब शांततीचे प्रतीक मानले जाते.

ऋतूच्या मानाने पडणारे गुलाबाच्या झाडांचे प्रकार (Types of rose according to season in Marathi)

देशामध्ये ऋतूच्या मानाने गुलाबाच्या झाडांचे दोन प्रकार पडतात.ते ऋतूच्या मानाने पडणारे गुलाबाच्या झाडाचे दोन प्रकार खालीलप्रमाणे :

१) सदा गुलाब – यामध्ये या प्रकारच्या गुलाबाचे झाड प्रत्येक ऋतूत लावला जातो.

२) चैत्र गुलाब – यामध्ये या प्रकारच्या गुलाबाचे झाड उन्हाळ्यात लावले जाते.खासकरून हे गुलाब चैत्र महिन्यात लावले जातात ,त्यामुळे या प्रकाराला चैत्र गुलाब म्हणले जाते.चैत्र गुलाबाचे फुल हे सदा गुलाबाच्या फुलापेक्षा अधिक सुगंधी असतात.

भारतामध्ये चैत्र गुलाबाची शेती केली जाते.या चैत्र गुलाबाचा वापर अत्तर बनवण्यासाठी देखील केला जातो.या अत्तर बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सुरवातीला गुलाबातून गुलाबजल काढले जाते आणि परत त्या गुलाबजलाचे रूपांतर अत्तर मध्ये केले जाते.

गुलाबाच्या झाडांचे वर्गीकरण (Classification of Rose in Marathi )

गुलाबांच्या झाडाची उंची ,फुलांचा आकार यावरून गुलाबाच्या झाडाचे पाच वर्गात वर्गीकरण केले जाते.ते पाच वर्ग खालीलप्रमाणे :

१) हायब्रीड टी – या वर्गातील गुलाबाचे झाड आकाराने मोठे आणि पसरणारे असतात.या वर्गातील गुलाबांच्या फुलांचा आकार इतर वर्गाच्या फुलांच्या आकारापेक्षा जास्त असतो आणि या वर्गातील गुलाबांच्या झाडाच्या प्रत्येक फांदीवर एक गुलाब उगते.

२) फ्लोरीबण्डा – या वर्गातील गुलाबांच्या फुलांचा आकार हायब्रीड टी वर्गातील फुलांच्या आकारा पेक्षा कमी असतो आणि या वर्गातील गुलाबांच्या झाडांमध्ये असणाऱ्या फुलांची संख्या जास्त असते.

३) पॉलिएन्था – या वर्गातील गुलाबांच्या फुलांचा आकार हायब्रीड टी आणि फ्लोरीबण्डा वर्गातील गुलाबांच्या फुलांच्या आकारापेक्षा कमी असतो आणि पॉलिएन्था वर्गातील फुले जास्तकरून आपल्या अंगणात आणि बागेत लावले जातात.

४) मिनीएचर – या वर्गातील गुलाबांना मिनी गुलाब असे देखील म्हणले जाते.या वर्गातील गुलाबांच्या फुलांचा आकार इतर वर्गातील गुलाबांच्या फुलांच्या आकारापेक्षा खूप कमी असतो ,त्यामुळे या वर्गातील गुलाबांना मिनी गुलाब म्हणले जाते.परंतु या वर्गातील गुलाबांच्या झाडावर भरपूर प्रमाणात गुलाब येतात.या वर्गातील गुलाब जास्त करून शहरांमध्ये फ्लॅट मधील कुंडींमध्ये लावले जातात.

५) लता गुलाब – या वर्गातील गुलाबांना कशाच्या तरी मदतीने मोठे केले जाते आणि या वर्गातील गुलाबांचे फुल खूप आकर्षक असते.

गुलाबांच्या झाडांची शेती (Farming of Rose in Marathi)

आपल्या भारतामध्ये भरपूर ठिकाणी गुलाबांच्या झाडांची शेती केली जाते.आपल्या देशातील शेतकरी लोक आपली आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून गुलाबाची शेती करतात.जागतिक बाजारात वाढती गुलाबाची मागणी ,त्यामुळे गुलाबाच्या झांडाची शेती करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

आपल्या देशामध्ये गुलाबाची शेती जास्तकरून उत्तर प्रदेश ,हिमाचल प्रेदश ,राजस्थान ,जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये केली जाते.गुलाबाची शेती करण्यासाठी जास्तकरून चिकन मातीचा वापर केला जातो.या मातीचा पी एच ७.० ते ८.५ च्या दरम्यान असला पाहिजे.या शेतीमधून तयार झालेल्या गुलाबांना अत्तर आणि गुलाबाचे तेल तयार करण्यासाठी पाठवले जाते.

गुलाबाच्या फुला संबंधी असणाऱ्या  १० विशेष गोष्टी (10 interesting facts about Rose in Marathi )

१) गुलाब फुल हे बाहेरून सुंदर तर दिसतेच ,परंतु गुलाबाचा सुगंध देखील सर्वांचे मन मोहून टाकतो.

२) गुलाब फुलाला इंग्रजी भाषेत “रोज” म्हणले जाते तर संस्कृत भाषेत गुलाबाच्या फुलाला “पाटलम” म्हणले जाते आणि गुलाबाचे वैज्ञानिक नाव “रोझा” आहे.

३) गुलाब फुलाच्या पाकळ्या कोमल असतात.

४) संपूर्ण जगामध्ये दरवर्षी ७ फेब्रुवारी ला “जागतिक रोज दिवस” साजरा केला जातो.यादिवशी प्रियकर आपल्या प्रेयसी ला आणि प्रेयसी आपल्या प्रियकराला गुलाबाचे फुल देऊन हा दिवस साजरा करतात.आपल्या भारतामध्ये दरवर्षी १२ ऑक्टोंबर हा दिवस “गुलाब दिवस” म्हणून साजरा केला जातो.

५) संपूर्ण जगामध्ये १०० पेक्षा अधिक प्रकारात गुलाबाची झाडे आढळतात.

६) गुलाबाच्या फुलाला काटे असतात.हे काटे गुलाबाच्या फुलाचे रक्षण कीटकांपासून करतात.

७) गुलाबाच्या झाडाची साधारण उंची १ फूट ते ६ फुटाच्या दरम्यान असते.

८) आपल्याला माहीत आहे की ,बऱ्यापैकी फुलांचा वापर हा देवापुढे वाहण्यासाठी केला जातो; परंतु देवापुढे वाहण्यासाठी गुलाबाच्या फुलाचा वापर केला जात नाही.गुलाबाच्या फुलाचा जास्तकरून वापर सजावट करण्यासाठी केला जातो.

९) गुलाबाच्या झाडाची वयोमर्यादा इतर फुलांच्या झाडा पेक्षा जास्त असते.

१०) आपल्या भारत देशामध्ये गुलाबांच्या फुलांना खूप मागणी आहे ; त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गुलाबांच्या झाडांची शेती केली जाते.

FAQ

आपल्या देशामध्ये कोणत्या फुलाला फुलाचा राजा म्हणले जाते ?

आपल्या देशामध्ये गुलाब फुलाला फुलाचा राजा म्हणले जाते.

गुलाबांच्या फुलांचे किती प्रकार आहेत ?

गुलाबांच्या फुलांचे १०० पेक्षा अधिक प्रकार पडतात आणि निम्म्या पेक्षा अधिक प्रकारचे गुलाब आपल्या आशिया खंडात आढळतात.

गुलाबाच्या फुलाला इंग्रजी भाषेत काय म्हणले जाते ?

गुलाबाच्या फुलाला इंग्रजी भाषेत “रोज” म्हणले जाते.

गुलाबाच्या फुलाला संस्कृत भाषेत काय म्हणले जाते ?

गुलाबाच्या फुलाला संस्कृत भाषेत “पाटलम” म्हणले जाते .

गुलाबाच्या फुलाचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

गुलाबाच्या फुलाचे वैज्ञानिक नाव ” रोझा” हे आहे.

ऋतू नुसार गुलाबाच्या झाडाचे किती प्रकार पडतात आणि ते प्रकार कोणते ?

ऋतू नुसार गुलाबाच्या झाडांचे २ प्रकार पडतात.त्यातील पहिला प्रकार म्हणजे सदा गुलाब आणि दुसरा प्रकार म्हणजे चैत्र गुलाब.

गुलाबाच्या झाडाचे वर्गीकरण किती वर्गात केले जाते ?

गुलाबाच्या झाडाचे वर्गीकरण ५ वर्गात केले जाते.आणि ते पाच वर्ग “हायब्रीड टी” ,”फ्लोरीबण्डा” , “मिनीएचर “,” लता गुलाब”,” पॉलिएन्था” हे आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण फुलाचा राजा असणाऱ्या गुलाब फुला विषयी संपूर्ण माहिती पाहिली.आजच्या लेखामध्ये आपण गुलाबाच्या झाडांची शेती ,गुलाबांच्या झाडांचे वर्गीकरण ,गुलाबाच्या झाडांचे प्रकार ,ऋतूनुसार पडणारे गुलाबाच्या झाडांचे प्रकार आणि गुलाबाच्या झाडाच्या विशेषतः याविषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment