रोहित शर्मा यांची संपूर्ण माहिती Rohit Sharma Information In Marathi

Rohit Sharma Information In Marathi क्रिकेट हा खेळ भारतामधे सर्वात लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेट खेळाला भारतामध्ये एक धर्म मानले जाते. आजच्या लेखामध्ये आपण अशाच भारत देशाकडून आणि आयपीएल मध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळणाऱ्या एका महान खेळाडू विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे महान खेळाडू रोहित शर्मा यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Rohit Sharma Information In Marathi

रोहित शर्मा यांची संपूर्ण माहिती Rohit Sharma Information In Marathi

नाव रोहित गुरुनाथ शर्मा
जन्म ३० एप्रिल १९८७
आईचे नाव पूर्णिमा शर्मा
वडिलांचे नाव गुरुनाथ शर्मा
पत्नीचे नाव रितिका सजदेह
आयपीएल मधील संघ डेक्कन चार्जेस मुंबई इंडियन्स
पुरस्कार अर्जुन पुरस्कार ,राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार

रोहित शर्मा यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of Rohit Sharma and his family in Marathi)

रोहित शर्मा यांचा जन्म ३० एप्रिल १९८७ मध्ये महाराष्ट्र राज्यातील नागपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव “गुरुनाथ शर्मा” होते ,तर त्यांच्या आईचे नाव “पूर्णिमा शर्मा” असे होते. रोहित शर्मा यांना एक भाऊ होता आणि त्यांच्या भावाचे नाव “विशाल शर्मा” असे होते.

रोहित शर्मा यांचे वडील गुरुनाथ शर्मा हे केअरटेकर ची नोकरी करत होते. रोहित शर्मा यांचे लहानपण हे त्यांच्या आजी आजोबांकडे मुंबई येथे गेले. रोहित हे त्यांच्या आजी आजोबांकडे मुंबई येथील बोरिवली येथे राहत होते ,ते आठवड्यातील दोन दिवस आपल्या आई बाबांकडे नागपूर ला जात असत.

रोहित शर्मा यांना लहानपणापासूनच क्रिकेट खेळाची आवड होती आणि रोहित शर्मा यांना क्रिकेट कॅम्प जॉईन करण्यासाठी त्यांना त्यांचे काका पैसे देत असत.

रोहित शर्मा यांचा विवाह (Marriage of Rohit Sharma in Marathi)

२०१५ मध्ये रोहित शर्मा यांचा विवाह रितिका सजदेह यांच्याशी झाला होता . रितिका सजदेह या स्पोर्ट्स मॅनेजर ची नोकरी करत होत्या. २०१८ मध्ये रोहित शर्मा आणि रितिका सजदेह यांना एक मुलगी झाली आणि त्या मुलीचे नाव “समायरा” असे ठेवण्यात आले. 

रोहित शर्मा यांचे आयपीएल करियर (IPL career of Rohit Sharma in Marathi)

आयपीएल मध्ये रोहित शर्मा हे मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करतात आणि मुंबई इंडियन्स संघ रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे २०१३,२०१५,२०१७,२०१९ आणि २०२० मध्ये आयपीएल चा किताब जिंकण्यामध्ये यशस्वी झाला आहे.

मुंबई इंडियन्स संघामध्ये खेळण्याच्या अगोदर रोहित शर्मा हे आयपीएल मधील डेक्कन चार्जेस संघाकडून खेळत होते. विशेष गोष्ट ही की ,रोहित शर्मा हे बॅटर आहेत ,तरी देखील त्यांच्या नावावर आयपीएल मध्ये एक हैट्रिक आहे. रोहित शर्मा नी डेक्कन चार्जस संघा कडून खेळताना मुंबई इंडियन्स संघा विरुद्ध हैट्रिक घेतली होती.

रोहित शर्मा यांनी मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व करून २०१३ च्या फायनल मध्ये चेन्नई सुपर किंग संघाचा पराभव केला होता आणि पहिल्यांदा आयपीएल चा किताब मुंबई इंडियन्स ला जिंकून दिला होता. यानंतर वर्ष २०१५ मधे परत फायनल मध्ये चेन्नई सुपर किंग संघाचा पराभव करून आयपीएल चा किताब दुसऱ्यांदा जिंकला होता. यांनतर २०१७ मध्ये मुंबई इंडियन्स ने रायजिंग पुणे सुपरजाईंट संघाचा पराभव करून ३ वेळा आयपीएल चा किताब जिंकला होता.

पुढे वर्ष २०१९ मध्ये चेन्नई सुपर किंग संघाचा पुन्हा पराभव करून ४ वेळा आयपीएल चा किताब जिंकला होता आणि त्याच्याच पुढच्या वर्षी म्हणजे २०२० मध्ये मध्ये फायनल देल्ही कॅपिटल संघाचा पराभव करून ५ वेळा आयपीएल चा किताब जिंकला होता.

मुंबई इंडियन्स हा संघ आयपीएल च्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघापैकी एक संघ आहे आणि मुंबई इंडियन्स ला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनवण्याचे मोठे श्रेय हे त्यांच्या कप्तानला म्हणजे रोहित शर्मा यांना जाते.

रोहित शर्मा यांचे एकदिवसीय मॅचेस करियर (One day match career of Rohit Sharma in Marathi)

रोहित शर्मा यांना एकदिवसीय सामण्या मधील सर्वोत्तम खेळाडू पैकी एक खेळाडू मानले जाते. एकदिवसीय सामन्यामध्ये रोहित शर्मा यांच्या नावावर तीन २०० हून अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आहे. रोहित शर्मा यांच्या नावावर एका एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड देखील आहे. श्रीलंका विरुद्ध झालेल्या सामन्यामध्ये रोहित शर्मा यांनी २६४ धावा केलेल्या होत्या आणि एकदिवसीय सामन्यामध्ये २६४ धावा या एका खेळाडू कडून केल्या जाणाऱ्या सर्वोत्तम धावा आहेत.

रोहित शर्मा यांनी भारताच्या एकदिवसीय संघाकडून खेळून २०१३ मधे इंग्लंड येथे झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे ,तसेच २०१५ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ सेमी फायनल मध्ये ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभूत झाला होता. या २०१५ मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्व चषक सामन्यामध्ये रोहित शर्मा हे भारतीय संघाचे ओपनिंग बॅटर होते.

तसेच २०१९ मधे झालेल्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेमध्ये रोहित शर्मा यांनी सर्वाधिक धावा केल्या होत्या. या २०१९ मध्ये इंग्लंड येथे झालेल्या एकदिवसीय विश्व चषक सामन्यामध्ये रोहित शर्मा यांनी ५ शतके मारली होती. एका खेळाडू कडून एका एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेमध्ये मारली जाणारी ही सर्वाधिक शतके होती.

२०२३ म्हणजे ह्या वर्षी होत असलेल्या एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेमध्ये रोहित शर्मा हे भारतीय संघाचे नेतृत्व करत आहेत. हा २०२३ मध्ये होणारा एकदिवसीय विश्व चषक स्पर्धा ही भारतामध्ये आहे आणि आशा आहे की ,आपला भारतीय संघ ह्या वर्षी होणारी एकदिवसीय विश्व चषक स्पर्धा जिंकेल.

रोहित शर्मा यांचे टेस्ट मॅचेस करियर (Test match career of Rohit Sharma in Marathi)

रोहित शर्मा यांनी टेस्ट क्रिकेट मध्ये २०१३ वर्षामध्ये पाहिली मॅच खेळली होती. रोहित शर्मा यांनी खेळलेली पाहिली टेस्ट सिरीज ही वेस्ट इंडीज संघा विरुद्ध होती आणि हीच टेस्ट सिरीज ही महान सचिन तेंडुलकर यांची शेवटची टेस्ट सिरीज होती.

रोहित शर्मा यांनी आपल्या पहिल्या टेस्ट मॅच मध्ये एका इनिंग मध्ये १७७ धावा केल्या होत्या. टेस्ट क्रिकेट मध्ये आपल्या डेब्युट मॅच मध्ये सर्वाधिक धावा या शिखर धवन यांनी केल्या होत्या. शिखर धवन यांनी आपल्या डेब्युट मॅच मध्ये १८७ धावा केल्या होत्या. शिखर धवन यांच्या नंतर टेस्ट क्रिकेट मध्ये आपल्या डेब्युट मॅच मध्ये सर्वाधिक धावा ह्या रोहित शर्मा यांनी केल्या होत्या.

आपल्या पहिल्या मॅच मध्ये चांगल्या धावा करून देखील रोहित शर्मा यांना भारतीय टेस्ट संघामध्ये आपले स्थान मिळवता आले नाही ; परंतु २०१८ मधे रोहित शर्मा यांनी परत भारतीय टेस्ट संघामध्ये प्रवेश केला आणि वर्तमानात रोहित शर्मा हे भारतीय टेस्ट संघाचे कप्तान आहेत. यावर्षी झालेल्या टेस्ट चॅम्पियन शिप स्पर्धेच्या फायनल मध्ये भारतीय संघाचा पराभव ऑस्ट्रेलिया संघाने केला होता. या टेस्ट चॅम्पियन शिप स्पर्धेमध्ये देखील भारतीय संघाचे नेतृत्व हे रोहित शर्मा यांनी केले होते.

रोहित शर्मा यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार (Awards received by Rohit Sharma in Marathi)

रोहित शर्मा यांना त्यांच्या कार्यासाठी भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. रोहित शर्मा यांच्या क्रिकेटिंग करियर मध्ये त्यांना आयसीसी चा प्लेअर ऑफ द इअर चा पुरस्कार मिळाला आहे. भारत सरकारकडून रोहित शर्मा यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे ,तसेच भारत सरकारकडून रोहित शर्मा यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन रोहित शर्मा यांना सन्मानित करण्यात आले आहे.

FAQ

रोहित शर्मा यांचा जन्म केव्हा झाला होता ?

रोहित शर्मा यांचा जन्म ३० एप्रिल १९८७ मध्ये नागपूर येथे झाला होता.

रोहित शर्मा यांच्या आईचे नाव आणि वडिलांचे नाव काय आहे ?

रोहित शर्मा यांच्या आईचे नाव “पूर्णिमा शर्मा” असे आहे तर ,त्यांच्या वडिलांचे नाव “गुरुनाथ शर्मा” असे आहे.

रोहित शर्मा यांच्या पत्नीचे नाव काय आहे ?

रोहित शर्मा यांच्या पत्नीचे नाव “रितिका सजदेह” असे आहे.

रोहित शर्मा यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

भारत सरकारकडून अर्जुन पुरस्कार आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन रोहित शर्मा यांना सन्मानित करण्यात आले आहे.

आजच्या लेखामध्ये आपण मुंबई इंडियन्स आणि भारतीय संघाचे कप्तान रोहित शर्मा यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment