राणी लक्ष्मीबाई यांची संपूर्ण माहिती Rani Lakshmibai Information In Marathi

Rani Lakshmibai Information In Marathi आपल्या भारत देशामध्ये भारत मातेसाठी लढणारे भरपूर योद्धे होऊन गेले ,परंतु आपल्या मातीसाठी लढणाऱ्या महिला योध्या खूप कमी होऊन गेल्या.अशाच एक महिला योध्या म्हणजे राणी लक्ष्मीबाई.ब्रिटिशांना भारत मातेच्या सुपुत्रिंची ताकद दाखवणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामधून पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे अशा महान योध्या राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Rani Lakshmibai Information In Marathi

राणी लक्ष्मीबाई यांची संपूर्ण माहिती Rani Lakshmibai Information In Marathi

नाव –राणी लक्ष्मीबाई
जन्म –१९ नोव्हेंबर १८३५
आईचे नाव – वडिलांचे नाव –भागीरथी बाई मोरोपंत तांबे
पतीचे नाव –गंगाधर राव
कार्य –ब्रिटिश सत्तेविरुद्ध लढा
मृत्यू –१७ जुन १८५८

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब / Birth of Rani Lakshmibai and his family in Marathi

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ मध्ये काशी येथे झाला.राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे असे होते ,तर त्यांच्या आईचे नाव भागीरथी बाई होते.राणी लक्ष्मीबाई यांना लहानपणी त्यांचे आई वडिल लाडाने मनुबाई म्हणून हाक मारत.

राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह / Marriage of Rani Lakshmibai in Marathi

राणी लक्ष्मीबाई यांचे पती असणाऱ्या गंगाधर राव यांना वर्ष १८३८ मध्ये झाशीचा राजा म्हणून घोषित केले होते.झाशीचे राजा गंगाधर राव आणि मनुबाई यांचा विवाह वर्ष १८५० मध्ये झाला.

राणी लक्ष्मीबाई यांच्या पतीचे निधन / Death of Rani Lakshmibai’s husband’s in Marathi

वर्ष १८५१ मध्ये गंगाधर राव आणि राणी लक्ष्मीबाई यांनी मुलगा झाला.आपल्या राज्याला राजकुमार मिळाला म्हणून संपूर्ण झाशी प्रदेश खुश होता ; परंतु चार महिन्यांतच राणी लक्ष्मीबाई यांच्या मुलाचे निधन झाले.संपूर्ण झाशी राज्यामध्ये शोकांतिका पसरली.आपला मुलगा हे जग सोडून गेला आहे ,हे सत्यच गंगाधर रावांना पटले नाही आणि त्यांची तब्येत हळू हळू बिघडू लागली आणि २१ नोव्हेंबर १८५३ मध्ये त्यांचे निधन झाले.आपल्या मुलाचे आणि पतीचे निधन झाल्यानंतर देखील राणी लक्ष्मीबाई डगमगल्या नाहीत.

राणी लक्ष्मीबाई यांचा ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड / Rani Lakshmibai’s rebellion against British rule in Marathi

गंगाधर राव जेव्हा जिवंत होते तेव्हा त्यांनी त्यांच्या कुटुंबातील दामोदर रावांना दत्तक घेण्यासाठी सरकारकडे विनंती केली ,परंतु इस्ट इंडिया कंपनी च्या सरकारने ही गंगाधर रावांची विनंती नाकारली.१८५४ मध्ये दामोदर रावांना लॉर्ड डलहौसी यांनी दामोदर रावांना दत्तक पुत्र म्हणून अस्वीकृती दाखवली आणि झाशी प्रदेश ब्रिटिश साम्राज्यात सामील होण्याचा आदेश दिला.

राणी लक्ष्मीबाई यांना हे कदापी मान्य नव्हते ,त्यांना झाशी प्रदेश ब्रिटिश साम्राज्यात सामील होणे कदापी मान्य न्हवते.परंतु ,१८ मार्च १८५४ मध्ये झाशी प्रदेशावर ब्रिटिशांचा अधिकार झाला.राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिश यांच्याकडून मिळणारी पेन्शन अस्वीकृत केली आणि त्या प्रदेशाच्या राजमहालात राहू लागल्या.

ब्रिटिश सत्तेविरुद्ध राणी लक्ष्मीबाई यांची क्रांती / Rani Lakshmibai revolution against British rule in Marathi

त्याकाळी ब्रिटिश साम्राज्याचे नियम त्याकाळच्या राजा- महाराजा यांना मान्य न्हवते ,त्यामुळे ते राजा – महाराजा ब्रिटिश साम्राज्या विरुद्ध बंड करू लागले.राणी लक्ष्मीबाई यांना देशामध्ये क्रांती घडवून आणण्याची ही चांगली संधी वाटली आणि राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिश सत्ते विरुद्ध लढण्यासाठी योजना करणे चालू केले.उत्तर भारतातील राजे राणी लक्ष्मीबाई यांच्या या क्रांती मध्ये सहभागी होऊ लागले.

त्याकाळी ब्रिटिश सत्तेची लोकांना चीड येई आणि त्याकाळचे राजे महाराजे ब्रिटिश सत्तेपासून आपला प्रदेश मुक्त व्हावा यासाठी प्रयत्न करत होते.त्याकाळी राजे महाराजे यांनी ब्रिटिश सत्ते विरुद्ध बंड करण्याची तारीख ठरवली.ही तारीख होती ३१ मे १८५७ .परंतु या ठरलेल्या तारखेच्या आधीच ब्रिटिश सत्ते विरुद्ध ७ मे १८५७ मध्ये मेरठ येथे आणि ४ जुन १८५७ मध्ये कानपूर येथे बंड करण्यात आला.

२८ जुन १८५७ मध्ये कानपूर चे राज्य ब्रिटिश साम्राज्यातून मुक्त झाले.ही गोष्ट जेव्हा ब्रिटिश लोकांना समजली ,तेव्हा त्यांनी या बंड करणाऱ्या लोकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू केला.

ब्रिटिशांनी आपली फौज घेऊन सागर , गडकोटा,शाहगड ,मदनपुर ,वानपुर ,तालबेहट,इत्यादी प्रदेशांवर हमले केले आणि ते प्रदेश आपल्या साम्राज्यात जोडले.ब्रिटिशांनी या जिंकून घेतलेल्या प्रदेशांच्या जनतेवर अत्याचार करू लागले.

ब्रिटिश आणि झाशी प्रदेशाचे युद्ध / War between Zashi and British rule in Marathi

यापुढे झाशी राज्यावरती आक्रमण करायचे असे ब्रिटिशांनी ठरवले.तसे त्यांनी आपले सैन्य झाशितील एका पहाडा जवळील मैदानावर तैनात केले.ब्रिटिश आपल्या राज्यावर आक्रमण करायला येणार हे राणी लक्ष्मीबाई यांना अगोदरच माहीत होते.त्यामुळे त्यांनी युद्धाची योजना मांडायला सुरवात केली होती.राणी लक्ष्मीबाई यांनी वाणपुर चे राजे मर्दनसिंह यांची मदत घ्यायची ठरवले.

२३ मार्च १८५८ रोजी झाशीच्या ऐतिहासिक युद्धाला सुरवात झाली.राणी लक्ष्मीबाई यांच्या छोट्या सैनेने ब्रिटिशांच्या मोठ्या सैनेला टक्कर देण्याचे काम केले.राणी लक्ष्मीबाई आपल्या झाशी साम्राज्यासाठी जिवाच्या आकांताने लढत होत्या.त्यांनी आपल्या पाठीवर दामोदर रावांना बांधले होते आणि त्या घोड्यावर बसून शत्रूशी लढत होत्या.त्या तब्बल सात दिवस शत्रूशी लढल्या ,परंतु राणी लक्ष्मीबाई यांनी कालपी येथे जावे ,असे त्यांच्या मंत्री मंडळाने सुचवले.तशा राणी लक्ष्मीबाई कालपी येथे गेल्या.

इथे येऊन देखील राणी लक्ष्मीबाई शांत बसल्या नाहीत आणि त्यांनी तात्या टोपे आणि नाना साहेब यांच्याशी संपर्क करून युद्ध विषयी चर्चा केली.ब्रिटिशांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाला मानले ,परंतु त्यांनी राणी लक्ष्मीबाई यांचा पाठलाग करणे सोडले नाही.यातच राणी लक्ष्मीबाई यांचा घोडा घायाळ झाला आणि त्या घोड्याचे निधन झाले.

राणी लक्ष्मीबाई,तात्या टोपे आणि नाना साहेब यांनी एकत्र येऊन एक योजना तयार केली आणि त्यांनी शाहगड चे राजा , वानपूर चे राजा यांना एकत्र घेऊन ग्वालियर गडावर आक्रमण केले आणि तो ग्वालियर गड त्यांनी जिंकून घेतला.ग्वालियर गड जिंकल्यानंतर सर्वजण खुश झाले.

राणी लक्ष्मीबाई यांचे निधन / Death of Rani Lakshmibai in Marathi

ब्रिटिश सेनापती सर ह्युरोज यांनी आपली ब्रिटिश फौज एकत्र करून ग्वालियर गडावर आक्रमण केले.१८५८ मध्ये ग्वालियर चे शेवटचे युद्ध झाले.या युद्धात देखील राणी लक्ष्मीबाई बाई यांनी शेवट पर्यंत लढा दिला ,त्यांनी शेवट पर्यंत हार मानली नाही ,परंतु शेवटी या युद्धात लढताना राणी लक्ष्मीबाई यांचे निधन १७ जुन १८५८ मध्ये झाले.

FAQ

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला ?

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८३५ मध्ये उत्तर प्रदेश राज्यातील काशी येथे झाला.

राणी लक्ष्मीबाई यांच्या आईचे नाव काय होते ?

राणी लक्ष्मीबाई यांच्या आईचे नाव “भागीरथी बाई” असे होते.

राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

राणी लक्ष्मीबाई यांच्या वडिलांचे नाव “मोरोपंत तांबे ” असे होते.

राणी लक्ष्मीबाई यांचे लहानपणीचे नाव काय होते ?

राणी लक्ष्मीबाई यांना लहानपणी त्यांचे आई वडील लाडाने ” मनूबाई” म्हणून हाक मारत.

राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह कोणासोबत झाला ?

राणी लक्ष्मीबाई यांचा विवाह साल १८५० मध्ये झाशी प्रदेशाचे राजा गंगाधर राव यांच्याशी झाला.

राणी लक्ष्मीबाई यांनी कोणते कार्य केले ?

राणी लक्ष्मीबाई यांनी आपल्या आयुष्यभर ब्रिटिश सत्ते विरुद्ध लढा दिला.

राणी लक्ष्मीबाई यांचे निधन केव्हा झाले ?

उत्तर – राणी लक्ष्मीबाई यांनी ब्रिटिश सत्तेविरूद्ध लढा दिला आणि या ग्वालियर च्या युद्धात राणी लक्ष्मीबाई यांचे निधन १७ जुन १८५८ मध्ये झाले.राणी लक्ष्मीबाई यांनी संपूर्ण जगाला सांगितले की ,”एक स्त्री काहीही करू शकतो ,ती कोणाशीही लढाई करू शकते.”

आजच्या लेखामध्ये आपण राणी लक्ष्मीबाई यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.राणी लक्ष्मीबाई यांनी महिला समाजासाठी एक आदर्श ठेवला.

Leave a Comment