राजमाता जिजाबाई यांची संपूर्ण माहिती Rajmata Jijabai Information In Marathi

Rajmata Jijabai Information In Marathi आपल्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली ; परंतु हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्याची संकल्पना ही त्यांच्या आईची म्हणजे राजमाता जिजाबाई यांची होती. आजच्या लेखामध्ये आपण हिंदवी स्वराज्याच्या राजमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई यांच्या विषयी म्हणजे राजमाता जिजाबाई यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे हिंदवी स्वराज्याचा राजमाता असणाऱ्या राजमाता जिजाबाई यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Rajmata Jijabai Information In Marathi

राजमाता जिजाबाई यांची संपूर्ण माहिती Rajmata Jijabai Information In Marathi

नाव राजमाता जिजाबाई
जन्म १२ जानेवारी १५९८
जन्मस्थान बुलढाणा ,महाराष्ट्र
आईचे नाव म्हाळसाबाई
वडिलांचे नाव लखुजीराव जाधव
पतीचे नाव शहाजीराजे भोसले
मुलाचे नाव संभाजी ,छत्रपती शिवाजी महाराज
निधन १७ जुन १६७४

राजमाता जिजाबाई यांचा जन्म आणि त्यांचा विवाह (Birth of Rajmata Jijabai and married life of Rajmata Jijabai in Marathi)

राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ” लखुजी जाधव” असे होते ,तसेच त्यांच्या आईचे नाव “म्हाळसाबाई” होते. लखुजीराव जाधव हे सिंदखेड प्रांताचे राजे होते.

त्याकाळी लहानपणी विवाह करण्याची प्रथा होती. जिजाबाई यांचा विवाह मालोजीराव भोसले यांच्या मुलाशी म्हणजे शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला. जिजाबाई यांचा विवाह झाला तेव्हा त्यांचे वय फक्त ६ वर्ष इतके होते.

राजमाता जिजाबाई आणि शहाजीराजे भोसले यांच्या लग्नाची गोष्ट अशी आहे की ,एकदा शहाजीराजे यांचे वडिल मालोजीराजे लखुजीराव जाधव यांच्या घरी दसऱ्याला गेले होते ,तिथे त्यांनी लखुजीराव जाधवांची कन्या जिजाबाई यांना पाहिले.

त्यांना जिजाबाई या आपल्या मुलासाठी पत्नी म्हणून योग्य वाटल्या आणि लखुजीराव जाधव यांना देखील शहाजीराजे भोसले आपल्या मुलीसाठी पती म्हणून योग्य वाटले. त्यानंतर शहाजीराजे भोसले आणि जिजाबाई यांचा विवाह करण्यात आला .

राजमाता जिजाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म (Rajmata  Jijabai give birth to Chatrapati Shivaji Maharaj in Marathi)

राजमाता जिजाबाई या गरोदर असताना त्यांची आणि त्यांच्या पोटातील बाळाची रक्षा व्हावी म्हणून शहाजीराजे भोसले यांनी त्यांना पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर ठेवले होते. इथेच राजमाता जिजाबाई यांच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जन्म घेतला. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला होता ,तेव्हा त्यांच्या आईच्या सोबतीला त्यांचे वडील शहाजीराजे न्हवते.

राजमाता जिजाबाई यांनी शिवनेरी किल्ल्यावर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव “शिवाजी” असे ठेवण्यात आले. लहानपणी छत्रपती शिवाजी महाराज यांना राजमाता जिजाबाई या महाभारत आणि रामायणातील कहाणी सांगत.

त्याकाळी जुलमी राजवटींचे राज्य सर्वत्र पसरले होते. जुलमी राजवट गरीब जनतेवर अन्याय करत होते ,जुलमी राजवटीतील माणसे स्त्रियांची अब्रू लुटत . राजमाता जिजाबाई यांचे स्वप्न होते की, “या जुलमी राजवटीपासून वेगळे मुक्त असे आपले स्वतःचे राज्य असावे ,ज्या राज्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही.”

राजमाता जिजाबाई यांचे हे स्वप्न त्यांच्या मुलाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण करावे ,असे राजमाता जिजाबाई यांना वाटे आणि त्यांचे हे स्वप्न त्यांच्या मुलाने पूर्ण देखील केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून जुलमी राजवटीपासून आपल्या राज्याचे रक्षण केले.

राजमाता जिजाबाई यांच्या पतीचे शहाजीराजे भोसले यांचे निधन ( Death of Shahaji Raje Bhosale in Marathi )

राजमाता जिजाबाई यांचे पती शहाजीराजे भोसले ह्यांनी राजमाता जिजाबाई यांना कायम सुख दुःखात साथ दिली होती. त्याकाळी पतीच्या निधनानंतर विधवा पत्नीने सती जाण्याची प्रथा होती. जेव्हा शहाजीराजे भोसले यांचे निधन झाले तेव्हा ,राजमाता जिजाबाई यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला ;  परंतु त्यांच्या मुलाने म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना सती जाण्यापासून रोखले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सांगण्यावरून राजमाता जिजाबाई यांनी सती जाण्याचा निर्णय मागे घेतला.

राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चांगले संस्कार लावले ,त्यांना आपल्या धर्मासाठी लढायला शिकवले. लहानपणी त्यांना वीर योध्यांच्या कहाण्या सांगितल्या. हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यामध्ये जेवढे श्रेय छत्रपती शिवाजी महाराज यांचे आहे ,तेवढेच श्रेय त्यांच्या आई राजमाता जिजाबाई यांचे देखील आहे ; कारण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापनेचे बीज हे त्यांच्या आईनेच रुजले होते. असे म्हणतात की ,” हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा!!”. याचा अर्थ असा होतो की ,”हिंदवी स्वराज्याची निर्मिती व्हावी ही राजमाता जिजाबाई यांची इच्छा होती.

राजमाता जिजाबाई या एक महान पत्नी ,महान आई होत्याच ,याचसोबत त्या महान आजी देखील होत्या. राजमाता जिजाबाई यांनी जे संस्कार छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केले ,तेच संस्कार त्यांनी आपल्या नातवावर म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर केले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण पुढे जाऊन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. 

राजमाता जिजाबाई यांच्या जीवना संबंधी असणाऱ्या काही रोचक आणि प्रेरणादायक गोष्टी ( Interesting and Inspirational Facts about Rajmata Jijabai life in Marathi)

१) राजमाता जिजाबाई या भविष्याचा विचार करून वर्तमानात कर्म करणाऱ्या महिला होता. त्यांच्या या गुणांचा प्रभाव त्यांच्या मुलावर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पडलेला आपल्याला दिसतो.

२) राजमाता जिजाबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना महिलांचा आदर करण्याचे संस्कार शिकवले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या जीवनभर महिलांचा आदर केला ,तसेच त्यांच्या राज्यात ज्या ज्या लोकांनी महिलांचा अपमान केला किंवा महिलांवर अत्याचार केले ,त्या त्या लोकांवर छत्रपती शिवाजी महाराज यांनी कठोर कारवाई केली.

३) राजमाता जिजाबाई यांच्या पहिल्या मुलाचे नाव होते “संभाजी” असे होते ; परंतु त्यांची हत्या अफजलखानाद्वारे करण्यात आली होती.

राजमाता जिजाबाई यांचे निधन (Death of Rajmata Jijabai in Marathi)

हिंदवी स्वराज स्थापन करण्याचे स्वप्न सत्यात साकारण्यामध्ये राजमाता जिजाबाई यांचा मोलाचा वाटा आहे. अशा या स्वराज्यातील जनतेच्या माता राजमाता जिजाबाई यांचे निधन १७ जुन १६७४ मध्ये झाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक ६ जुन १६७४ मध्ये रायगड किल्ल्यावर झाला होता. या राज्याभिषेक सोहळ्यानंतर काहीच दिवसात राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले होते.

FAQ

राजमाता जिजाबाई यांचा जन्म केव्हा झाला ?

राजमाता जिजाबाई यांचा जन्म १२ जानेवारी १५९८ मध्ये महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा येथे झाला.

राजमाता जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

राजमाता जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव “लखुजीराव जाधव” असे होते.

राजमाता जिजाबाई यांच्या पतीचे नाव काय होते ?

राजमाता जिजाबाई यांच्या पतीचे नाव “शहाजीराजे भोसले” हे होते.

राजमाता जिजाबाई यांच्या मुलाचे नाव काय होते ?

राजमाता जिजाबाई यांच्या मुलाचे नाव “छत्रपती शिवाजी महाराज” आणि “संभाजी” असे होते.

राजमाता जिजाबाई यांचे निधन केव्हा झाले ?

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक ६ जुन १६७४ मध्ये झाला होता. छत्रपती शिवाजी महाराज मराठी भूमीचे राजे झाले होते ; परंतु राज्याभिषेक झाल्यानंतर काही दिवसातच म्हणजे १७ जुन १६७४ मध्ये राजमाता जिजाबाई यांचे निधन झाले.

आजच्या लेखामध्ये आपण हिंदवी स्वराज्याचा संकल्प ज्यांनी केला होता अशा राजमाता जिजाबाई यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण राजमाता जिजाबाई यांचा जन्म आणि त्यांचा विवाह ,राजमाता जिजाबाई यांनी त्यांच्या मुलांवर केलेले संस्कार ,स्वराज्य स्थापन करण्यामध्ये असणारे राजमाता जिजाबाई यांचे योगदान आणि राजमाता जिजाबाई यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment