राजर्षी शाहू महाराज यांची संपूर्ण माहिती Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली.त्यांच्या निधनानंतर काही वर्षांनंतर सातारा आणि कोल्हापूर अशा दोन गादी पडल्या.आजच्या लेखामध्ये आपण मराठ्यांच्या कोल्हापूर गादीमध्ये जन्म घेतललेल्या एका महान राज्यांबद्दल म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या कार्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

राजर्षी शाहू महाराज यांची संपूर्ण माहिती Rajarshi Shahu Maharaj Information In Marathi

नाव राजर्षी छत्रपती शाहू महाराज
जन्म२६ जुन १८७४
आईचे नाव राधाबाई
वडिलांचे नाव जयसिंगराव घाटके
राज्याभिषेक १८९४
शासन काळ १८९४-१९२२
मृत्यू ६ मे १९२२

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब Birth of Rajarshi Shahu Maharaj and his family in Marathi

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच जन्म २६ जुन १८७४ मध्ये झाला.त्यांचे लहानपणीचे नाव “यशवंतराव” असे होते.राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव “जयसिंगराव घाटके” असे होते तर ,त्यांच्या आईचे नाव राधाबाई होते.छत्रपती शाहू महाराज यांच्या आई ह्या मुधोल राज्याच्या राज्यकन्या होत्या.छोटे यशवंतराव हे जेव्हा ३ वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले आणि यशवंतराव जेव्हा २० वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या वडिलांचे म्हणजे जयसिंगराव घाटके यांचे निधन झाले.

चौथे शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर त्यांच्या विधवा पत्नीने आपले जमीनदार असणाऱ्या जयसिंगराव घाटके यांच्या मुलाला म्हणजे यशवंतराव यांना दत्तक घेतले आणि पुढे त्यांनी यशवंतराव यांना ” शाहू ” असे नाव दिले.

राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण आणि त्यांचे कुस्ती प्रेम Education of Rajarshi shahu Maharaj and his love about Kusti in Marathi

राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण राजकुमार कॉलेज ,राजकोट येथे झाले.आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाहू महाराज हे कोल्हापूर गादीवर बसले आणि ते राजर्षी झाले.राजर्षी शाहू महाराज यांचा आवडता खेळ म्हणजे कुस्ती .त्यांनी आपल्या राज्यकारभारात कुस्ती खेळ वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले .

राजर्षी शाहू महाराज हे स्वतः पैलवान असल्याने ते दिसायला धिप्पाड असे दिसायचे.त्यांची उंची ५ फूट ९ इंच इतकी होती.राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या आयुष्यात भरपूर कुस्तीची मैदाने भरवली ,या कुस्त्यांसाठी महाराष्ट्र राज्याबाहेरचे देखील पैलवान येत होते.

राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कार्य Work of Rajarshi shahu Maharaj in Marathi

राजर्षी शाहू महाराज हे १८९४ ते १९२२ पर्यंत कोल्हापूर गादीचे राजे होते.त्यांनी आपल्या कार्यकाळामध्ये शिक्षणाला महत्व दिले .त्यांना वाटत होते की ,”आपला समाज शिकला तर तो देशाचे भविष्य चांगले घडवू शकतो”.राजर्षी शाहू महाराज यांनी लहान मुलांच्या शिक्षणासाठी भरपूर शाळांची स्थापना केली ,तसेच त्यांनी राजाराम महाराज नावाचे कॉलेज स्थापन केले आणि पुढे जाऊन या राजाराम महाराज कॉलेज ला राजर्षी शाहू महाराज यांचे नाव देण्यात आले.

राजर्षी शाहू महाराज यांनी दलीत समाजासाठी केलेली कार्ये Work by Rajarshi shahu Maharaj for dalit community in Marathi

त्याकाळी समाजातील मागासवर्गीय वर्गाला आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या प्रबळ बनवण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी प्रयत्न केले.त्यांनी मागासवर्गीय लोकांना पहिल्यांदा ५०% आरक्षण दिले होते.समाजातील तरुण मुलांना चांगली नोकरी मिळावी यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी प्रयत्न केले ,त्यांनी नोकरी चे साधन बनवण्यासाठी देखील प्रयत्न केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी अच्युत लोकांच्या विकासासाठी प्रयत्न केले.अच्युत आणि दलीत लोकांना दवाखाना शाळेमध्ये समान न्याय असावा ,यासाठी त्यांनी प्रयत्न केले.दलीत आणि मागासवर्गीय लोकांना शिक्षणामध्ये आणि नोकरी मध्ये आरक्षण मिळावे यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी प्रयत्न केले. अंतरजातीय जातीमध्ये लग्न होण्यास राजर्षी शाहू महाराज यांनी प्रयत्न केले.

त्याकाळी ब्राम्हण समाजातील काही लोक इतर समाजातील लोकांना कमी दर्जा देत होते.राजर्षी शाहू महाराज यांना हे मान्य नव्हते ,ते सर्व धर्मातील ,जातीतील ,पंथातील लोकांकडे समदृष्टीने बघत होते.

राजर्षी शाहू महाराज यांनी महिलांसाठी केलेली कार्ये Work by Rajarshi shahu Maharaj for the women

राजर्षी शाहू महाराज यांना वाटत होते ,महिला या समाजाच्या महत्वाच्या अंग आहेत आणि प्रत्येक मुलींनी चांगले शिक्षण घेऊन त्यांनी चांगल्या स्तरावर गेले पाहिजे.गरीब मुलींना शिक्षण भेटण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी प्रयत्न केले.याचसोबत विधवा महिलांनी दुसरे लग्न करावे यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी परवानगी दिली.

राजर्षी शाहू महाराज यांनी शेतकरी आणि साहित्यकार यांच्यासाठी केलेली कार्ये Work by Rajarshi shahu Maharaj for the Artist and farmers in Marathi

राजर्षी शाहू महाराज यांनी कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी देखील प्रयत्न केले.त्यांनी नवीन कलाकार आणि साहित्यकार यांना पुढे जाण्यासाठी मंच भेटावा म्हणून विविध कार्यक्रमांचे आयोजन केले.

राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरणाची निर्मिती केली ,या धरणा वरून कोल्हापूर मधील लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटणार होता.राजर्षी शाहू महाराज यांनी त्याकाळच्या शेतकऱ्यांना शेतीच्या मालामध्ये चांगला भाव मिळण्यासाठी देखील प्रयत्न केले आणि त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यावर महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता ,महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे संरक्षण राजर्षी शाहू महाराज यांनी केले.आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये राजर्षी शाहू महाराज आर्य समाजांच्या विचारांकडे प्रभावित झाले.

राजर्षी शाहू महाराज यांचे निधन Death of Rajarshi Shahu Maharaj in Marathi

राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या आयुष्यभर भरपूर सामाजिक कामे केली ,समाजातील स्त्रियांना शिक्षण भेटावे यासाठी ,शेतकऱ्यांसाठी , अच्युत आणि मागासवर्गीय लोकांना समान न्याय देण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी आयुष्यभर प्रयत्न केले.अशा या थोर राजाचे निधन ६ मे १९२२ मध्ये झाले.

FAQ

राजर्षी शाहू महाराज हे कोणत्या गादीचे राजे होते ?

राजर्षी शाहू महाराज हे कोल्हापूर गादीचे राजे होते .

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म केव्हा झाला ?

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म २६ जुन १८७४ मध्ये झाला.

राजर्षी शाहू महाराज यांच्या आईचे नाव काय होते ?

राजर्षी शाहू महाराज यांच्या आईचे नाव ” राधाबाई” असे होते.

राजर्षी शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

राजर्षी शाहू महाराज यांच्या वडिलांचे नाव ” जयसिंगराव घाटके” असे होते.

राजर्षी शाहू महाराज यांचे लहानपणीचे नाव काय होते ?

राजर्षी शाहू महाराज यांचे लहानपणीचे नाव ” यशवंतराव” हे होते.

राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला ?

राजर्षी शाहू महाराज यांचा राज्याभिषेक १८९४ मध्ये झाला.

राजर्षी शाहू महाराज यांनी कोणत्या धरणाची निर्मिती केली होती ?

राजर्षी शाहू महाराज यांनी राधानगरी धरणाची निर्मिती केली होती.

राजर्षी शाहू महाराज यांचा कार्यकाळ किती वर्षांचा होता?

राजर्षी शाहू महाराज हे १८९४ ते १९२२ पर्यंत कोल्हापूर च्या गादीचे राजे होते.

राजर्षी शाहू महाराज यांनी कोणती कार्ये केली ?

राजर्षी शाहू महाराज यांनी आपल्या कार्यकाळात महिलांच्या शिक्षणासाठी ,शेतकऱ्यांसाठी ,दलीत समाजाला न्याय देण्यासाठी ,नवीन कलाकारांना चांगला मंच भेटावा यासाठी ,कुस्ती खेळाच्या विकासासाठी प्रयत्न केले.

राजर्षी शाहू महाराज यांचे निधन केव्हा झाले ?

राजर्षी शाहू महाराज यांचे निधन ६ मे १९२२ मध्ये झाले.

आजच्या लेखामध्ये आपण कोल्हापूर गादीचे राजे असणारे राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.आजच्या लेखामधून आपण राजर्षी शाहू महाराज यांनी केलेले कार्य याविषयीची संपूर्ण माहिती आपण पाहिली.

Leave a Comment