रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Raigad Fort Information In Marathi

Raigad Fort Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणून ओळखल्या जाणारा रायगड किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे दुर्गदुर्गेश्वर रायगड किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Raigad Fort Information In Marathi

रायगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Raigad Fort Information In Marathi

किल्ल्याचे नाव –रायगड किल्ला
जिल्हा –रायगड
राज्य –महाराष्ट्र
समुद्र सपाटी पासून उंची –२७०० फूट
जवळील पर्यटन स्थळे –तोरणा किल्ला ,गंगा सागर सरोवर,छत्रपती शिवाजी महाराज समाधी ,रायगड संग्रहालय ,इत्यादी.
जवळचे रेल्वे स्टेशन –वीर रेल्वे स्टेशन
जवळचे विमानतळ –छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या काळामध्ये तीनशे हून अधिक किल्ले जिंकले आणि त्यांनी किल्ले जिंकून त्या किल्ल्यांची डागडुजी देखील केली.किल्ले जिंकण्याचा उद्देश्य हा होता की ,”ज्या परिसरात तो किल्ला आहे ,त्या परिसराची देखरेख किल्ल्यावरून करता यावी आणि परकीय आक्रमणापासून किल्ल्याच्या आसपासच्या परिसराचे रक्षण व्हावे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात रायगड किल्ला हा मराठा साम्राज्याची राजधानी होता आणि या किल्ल्याने मराठ्यांचा पराक्रम पाहिला आहे .हा किल्ला आजही थाटात उभा राहून मराठ्यांचा पराक्रमी इतिहास संपूर्ण जगाला सांगत आहे.

रायगड किल्ला / Raigad fort in Marathi

रायगड किल्ला हा रायगड जिल्ह्यात स्थित असून तो समुद्र सपाटी पासून २७०० फुटाच्या उंचीवर आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात महाराजांनी वर्ष १६७४ मध्ये या किल्ल्याला राजधानी म्हणून घोषित केलेले होते आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक देखील या रायगड किल्ल्यावरच झाला होता.

रायगड किल्ल्याचा इतिहास / History of Raigad fort in Marathi

रायगड किल्ल्याची निर्मिती ही वर्ष १०३० च्या आसपास चंद्रराव मोर्स यांनी केली होती.त्यावेळी या किल्ल्याचे नाव “रायरी” असे होते.वर्ष १६५६ मध्ये हा किल्ला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्याकडे आला.छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची डागडुजी केली आणि या किल्ल्याला रायगड नाव दिले.

रायगड शब्दाचा अर्थ,” राजाचा गड “असा होतो.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनानंतर औरंगजेबाने १६८९ मध्ये छल कपटाने छत्रपती संभाजी महाराज यांना कैद केले .त्यानंतर वर्ष १६८९ मधे जुल्फीकार खान ने हा किल्ला जिंकला.९ मे १९१७ मध्ये हा रायगड किल्ला ब्रिटिशांनी जिंकला.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक / Cornation of Chatrapati Shivaji Maharaj in Marathi

मुघली राजवटी पासून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपले रक्षण केले आणि ६ जुन १६७४ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावर झाला.छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त मराठा साम्राज्याचे राजे न्हवते ,तर ते संपूर्ण हिंदुस्तानचे राजे होते.रायगड किल्ल्यावर झालेल्या राज्याभिषेक समारोहासाठी काशीहून गागभट्ट देखील आले होते.

रायगड किल्ल्या जवळ असणारी एतहासिक आणि पर्यटन स्थळे / Historical place and Tourists place near Raigad fort in Marathi

१) टकमक टोक – रायगड किल्ल्यावर टकमक टोक आहे.हे टकमक टोक उंचीवर आहे आणि त्याकाळी जे लोक गुन्हा करत असत,त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून टकमक टोकावरून खाली ढकलले जात असे.वर्तमानात टकमक टोकावरून रायगड किल्ल्याचा मनमोहक असा नजरा दिसतो.

२) राजमाता जिजाबाई महल – रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांचे महल आजही आहे.हिंदवी स्वराज्य व्हावे हे राजमाता जिजाबाई यांचेच स्वप्न होते आणि त्यांचे ते सप्न त्यांच्या मुलांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी पूर्ण केले.राजमाता जिजाबाई यांची समाधी देखील रायगड किल्ल्यावर आहे.

३) गंगा सागर सरोवर – रायगड किल्ल्याच्या समोर गंगा सागर सरोवर आहे आणि हे सरोवर मानवनिर्मित आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्यभिषेक वेळी या सरोवराची निर्मिती केली होती.असे म्हणतात की ,छत्रपती शिवाजी महाराज यांनी गंगा नदीतून जल आणून या सरोवराची निर्मिती केली होती.हे गंगा सागर सरोवर आजही पर्यटकांचे मन आकर्षित करतो.

४) जगदीश्वर मंदिर – रायगड किल्ल्यावर जगदीश्र्वराचे मंदिर आहे .रायगड किल्ल्यावर जगदीश्वराच्या मंदिराची निर्मिती छत्रपती शिवाजी महाराज यांनीच केली होती.छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा रायगड वर राहत होते ,तेव्हा ते दररोज या जगदीश्र्वराचे दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरवात करत होते.

५) रायगड संग्रहालय – रायगड किल्ल्या जवळ रायगड संग्रहालय आहे आणि या संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली पराक्रमाची गाथा चित्र रुपात उपलब्ध आहे.

६) मधे घाट – रायगड जिल्ह्यामध्ये स्थित असलेले मधे घाटाला निसर्गाची देणगी मिळालेली आहे.हा मधे घाट पुण्यापासून ६२ किलोमीटर च्या अंतरावर आहे.हा मधे घाट त्यांच्या प्राकृतिक रचनेसाठी प्रसिद्ध आहे.हा मधे घाट पाहण्यासाठी राज्यभरातून पर्यटक इथे येत असतात.

रायगड किल्ला बघण्यासाठी सर्वोत्तम महिने / Best months for visit Raigad fort in Marathi

आपण कोणत्याही महिन्यात रायगड किल्ला बघायला जाऊ शकतो; परंतु रायगड  किल्ला पाहण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हे दोन ऋतू सर्वात उत्तम मानले जातात.असे म्हणतात की ,आपल्याला जीवनात सतत निराश किंवा अपयश येत असेल तर आपण रायगड किल्ल्याला भेट दिली पाहिजे आणि तिथे असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीला पाहिल्यानंतर आपल्याला जगण्याची नवी ऊर्जा मिळते आणि आपण आपले आयुष्य पुन्हा नव्या उमेदीने जगायला सुरुवात करतो.

रायगड किल्ल्या जवळ असणारी खाण्याची सोय / Eating facility near Raigad fort in Marathi

रायगड जिल्हा आणि पुणे जिल्ह्यासाठी रायगड किल्ला हा एक महत्वाचे पर्यटन स्थळ आहे ,त्यामुळे रायगड किल्ला पाहायला आलेल्या पर्यटकांसाठी इथे खाण्याची सोय देखील चांगली आहे.खासकरून इथे महाराष्ट्रीय भोजन मिळते.वाटेमध्ये तुम्हाला भरपूर हॉटेल्स आणि ढाबे दिसतील ,जिथे तुम्ही भोजन करू शकता.

रायगड किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन / Nearest Railway station from Raigad fort in Marathi

मुंबई – पुणे रेल्वे मार्गावर वीर रेल्वे स्टेशन आहे आणि हे रायगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे.हे वीर रेल्वे स्टेशन रायगड किल्ल्यापासून ४० किलो मीटरच्या अंतरावर आहे.

रायगड किल्ला बघण्यासाठी घेतली जाणारी रक्कम / Amount charged for seeing Raigad fort in Marathi

रायगड किल्ला हा खूप उंच आहे.जे लोक तो किल्ला चढू शकत नाही त्यांच्यासाठी महाराष्ट्र सरकारने रोपवे ची सोय केली आहे.तुम्हाला जर रोपवे च्या मदतीने किल्ल्यावर जायचे असेल तर ,रोपवे ची जी जे रक्कम असेल ,ती रक्कम तुम्हाला भरावी लागेल.

रायगड किल्ला पर्यटकांसाठी चालू आणि बंद होण्याची वेळ / Raigad fort opening and closing time for tourists in Marathi

पर्यटकांसाठी रायगड किल्ला हा आठवड्यातील सात ही दिवस चालू असतो.हा किल्ला सकाळी ८ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुला असतो.

FAQ

रायगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

रायगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील रायगड जिल्ह्यात स्थित आहे.

रायगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासून उंची किती आहे ?

रायगड किल्ला हा समुद्र सपाटी पासून २७०० फूट उंचीवर आहे.

रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव काय होते ?

रायगड किल्ल्याचे पूर्वीचे नाव ” रायरी” होते.

रायगड किल्ल्या जवळ कोणकोणती पर्यटक स्थळे आहेत ?

रायगड किल्ल्याजवळ टकमक टोक ,छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ,गंगा सागर सरोवर,तोरणा किल्ला ,हिरकणी टोक ,इत्यादी पर्यटक स्थळे आहेत.

रायगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ कोठे आहे ?

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ मुंबई हे रायगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ आहे.

रायगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोठे आहे ?

वीर रेल्वे स्टेशन हे रायगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन आहे आणि हे रेल्वे स्टेशन रायगड किल्ल्यापासून ४० किलो मिटर च्या अंतरावर आहे.

आजच्या लेखामध्ये आपण हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ला विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment