पुरंदर किल्याची संपूर्ण माहिती Purandar Fort Information In Marathi

Purandar Fort Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेल्या आणि विशेष एतहासिक महत्व असणाऱ्या एका किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे पुणे जिल्ह्यातील “पुरंदर किल्ल्या” विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Purandar Fort Information In Marathi

पुरंदर किल्याची संपूर्ण माहिती Purandar Fort Information In Marathi

किल्ल्याचे नाव पुरंदर
जिल्हा पुणे
राज्य महाराष्ट्र
समुद्र सपाटी पासून उंची ४४७२
जवळचे रेल्वे स्टेशन पुणे
जवळचे विमानतळ पुणे
जवळील पर्यटन स्थळे मल्हार गड ,इस्कॉन मंदिर,राजीव गांधी प्राणी संग्रहालय, बनेश्वर मंदिर,इत्यादी.

पुरंदर किल्ला (Purandar Fort in Marathi)

पुरंदर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात स्थित आहे. पुरंदर किल्ल्याची निर्मिती यादवांद्वारे काही शतकांपूर्वी करण्यात आली होती. परशुराम यांच्या नावावरून पुरंदर किल्ल्याचे नाव “पुरंदर” असे पडले. पुरंदर किल्ल्याला “पुरंधर” असे देखील म्हणले जाते. महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये या किल्ल्याला विशेष महत्व होते.

महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटामध्ये पुरंदर किल्ला स्थित आहे. या किल्ल्याची समुद्र सपाटी पासून उंची ४४७२ फूट इतकी आहे. पुरंदर ज्या ठिकाणी स्थित आहे ,त्या गावाला किल्ल्याच्या नावावरून “पुरंदर” या नावाने ओळखले जाते.

पुरंदर किल्ल्याची संरचना (Structure of Purandar fort in Marathi)

पुरंदर किल्ला दोन भागात विभागला आहे. त्यातील खालच्या भागाला माची म्हणले जाते. या माचीच्या उत्तर दिशेला छावणी आहे. किल्ल्यावर पुरंदरेश्वर देवाचे मंदिर आहे. तसेच ज्या मुरारबाजी देशपांडे यांनी हा किल्ला वाचवण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा केली न्हवती ,त्या मुरारबाजी देशपांडे यांची समाधी पुरंदर किल्ल्यावर आहे.

पुरंदर किल्ल्याच्या माचीवर जायला पायऱ्या आहेत. आपण जर पायरी चढून माचीवर गेलो ,तर पुढे “बालेकिल्ला” लागतो. इथेच बालेकिल्ल्यावर जुने केदारेश्वराचे मंदिर देखील आहे.

पुरंदर किल्ल्याचा इतिहास (History of Purandar fort in Marathi)

पुरंदर किल्ल्याची निर्मिती यादवांनी केली होती. पारशी लोकांनी यादवांविरुद्ध १३५० मध्ये युद्ध करून या किल्ल्यावर आपला कब्जा मिळवला. त्यावेळी किल्ला जिंकल्यानंतर पारशी लोकांनी या किल्ल्याची डागडुजी केली.

पारशी साम्राज्यानंतर हा किल्ला मुस्लिम राजवटी च्या देखरेख खाली आला. १६४६ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी पुरंदर किल्ला जिंकून तो आपल्या स्वराज्यामध्ये सामील केला.

१६६५ मध्ये औरंगजेबाच्या सेनाचे नेतृत्व मिर्झाराजे जयसिंह यांनी केले होते आणि त्यांनी पुरंदर किल्ल्यावर हमला केला होता. हा हमला जेव्हा झाला तेव्हा मुरारबाजी देशपांडे हे पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार होते. या हमल्या मध्ये मुरारबाजी देशपांडे यांचे निधन झाले.

पुढे छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झाराजे जयसिंह यांच्यात समझोता झाला होता. या समझोत्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या स्वराज्यातील २३ किल्ले औरगजेबाला दिले होते. या दिलेल्या २३ किल्ल्यामध्ये पुरंदर किल्ला देखील सामील होता.

समझोता झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांनी समझोता मध्ये स्वराज्यातील गेलेले किल्ले हळू हळू जिंकणे चालू केले. यातच त्यांनी १६७० मध्ये पुरंदर किल्ला परत जिंकून घेतला. ब्रिटिशांच्या काळामध्ये हा किल्ला ब्रिटिश सत्तेने जिंकून घेतला होता आणि त्यांनी त्याकाळात या किल्ल्यावर चर्च ची देखील निर्मिती केली होती.

पुरंदर किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे (Tourists places near Purandar fort in Marathi)

१) बनेश्वर मंदिर – पुरंदर किल्ल्याच्या आसपास असणाऱ्या महत्वाच्या पर्यटन स्थळांपैकी “बनेश्वर मंदिर” हे एक आहे. बनेश्वर मंदिर हे मध्यकाळात बांधलेले महादेवांचे मंदिर आहे. हे मंदिर पुरंदर किल्ल्यापासून २६ किलो मीटर च्या अंतरावर आहे. नसरपुर च्या या मंदिराच्या आसपासच्या परिसराला “पक्षी अभयारण्य” म्हणून घोषित करण्यात आले होते.

२) मल्हार गड – मल्हार गड हा पुरंदर किल्ल्यापासून ३७ किलो मीटर च्या अंतरावर स्थित आहे. ह्या किल्ल्याची निर्मिती १७७५ मध्ये मराठा साम्राज्याद्वारे करण्यात आली होती आणि असे म्हणतात की, “मराठा साम्राज्याद्वारे निर्माण करण्यात आलेला हा शेवटचा किल्ला होता”.

३) इस्कॉन मंदिर – पुरंदर किल्ल्यापासून ३१ किलो मीटर च्या अंतरावर इस्कॉनचे मंदिर आहे. हे भगवान श्रीकृष्ण आणि राधाराणी यांचे मंदिर आहे. ज्या लोकांना धार्मिक मंदिरे पाहायला आवडतात किंवा ज्या लोकांना श्रीकृष्णाच्या आणि राधा राणी यांच्या या मंदिराचे दर्शन घ्यायचे असेल तर ,ते लोक पुरंदर किल्ल्याची सफर केल्यानंतर या मंदिराकडे जाऊन दर्शन घेऊ शकतात.

४) राजीव गांधी प्राणी संग्राहलय, पुणे – राजीव गांधी प्राणी संग्रहालय हे पुणे येथील कात्रज येथे आहे. हे प्राणी संग्रहालय १३० एकर मध्ये विस्तारले आहे. या प्राणी संग्रहालयात वाघ ,सिंह यांसारखे जंगली प्राणी आपल्याला पाहायला मिळतात.

पुरंदर किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने (Best months to visit Purandar fort in Marathi)

वर्षभरातील प्रत्येक महिन्यात पर्यटक पुरंदर किल्ला पाहण्यासाठी येत असतात. उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे हा किल्ला पाहण्यासाठी जास्त पर्यटक जात नाहीत. पावसाळ्यात ह्या किल्ल्यावर सर्वत्र हिरवळ पसरलेली असते आणि पावसाळ्यात ह्या किल्ल्यावरून नजारा पाहण्यासारखा असतो ; त्यामुळे पावसाळ्यातील महिने हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम मानले जातात.

पुरंदर किल्ल्याच्या जवळचे रेल्वे स्टेशन (Nearest railway station from Purandar fort in Marathi)

पुरंदर किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे “पुणे रेल्वे स्टेशन” आहे. देशातील इतर राज्यामधून रेल्वे मार्ग हे पुणे रेल्वे मार्गाला जोडले आहेत ,त्यामुळे तुम्ही देशातील कोणत्याही राज्यात राहत असाल तर ,रेल्वे च्या सहायाने पुणे रेल्वे स्टेशन येथे येऊ शकता आणि तिथून पुढे लोकल गाड्यांच्या मदतीने पुरंदर किल्ल्यावर जाऊ शकता.

पुरंदर किल्ल्याच्या जवळचे विमानतळ (Nearest airport from Purandar fort in Marathi)

पुरंदर किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे “पुणे विमानतळ” आहे. देश – परदेशातून पर्यटक विमानाच्या मदतीने पुणे विमानतळ येथे येत असतात आणि ते पर्यटक पुढे जाऊन लोकल च्या मदतीने पुरंदर किल्ल्यावर जात असतात.

FAQ

पुरंदर किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

पुरंदर किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात स्थित आहे.

समुद्र सपाटी पासून पुरंदर किल्ल्याची उंची किती फूट आहे ?

समुद्र सपाटी पासून पुरंदर किल्ल्याची उंची ४४७२ फूट इतकी आहे.

पुरंदर किल्ल्याची निर्मिती कोणी केली होती ?

पुरंदर किल्ल्याची निर्मिती यादवांनी केली होती.

पुरंदर किल्ल्याच्या इतिहास काय आहे ?

या किल्ल्याची निर्मिती यादवांद्वारे करण्यात आली होती. पुढे जाऊन पारशी लोकांनी या किल्ल्यावर कब्जा मिळवला. पुढे हा किल्ला मुस्लिम सत्तेने आपल्या ताब्यात घेतला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी १६४६ मध्ये हा किल्ला जिंकला होता. मिर्झाराजे जयसिंह आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मध्ये झालेल्या समझोत्या मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी २३ किल्ले मुघलांना दिले ,या २३ किल्ल्यामध्ये त्यांनी पुरंदर किल्ला देखील दिला होता आणि पुढे जाऊन १६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी हा किल्ला परत जिंकून घेतला.

पुरंदर किल्ल्याच्या आसपास कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत ?

पुरंदर किल्ल्याच्या आसपास मल्हार गड , बनेश्वर मंदिर ,इस्कॉन मंदिर,राजीव गांधी प्राणी संग्रहालय,इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.

पुरंदर किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे कोठे आहे ?

पुरंदर किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे येथे आहे आणि हे एक आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्यामुळे देश – विदेशातून पर्यटक इथे येत असतात.

पुरंदर किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कोठे आहे ?

पुरंदर किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे पुणे येथे आहे.

पुरंदर किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने कोणते मानले जातात ?

पावसाळ्यातील महिने हे पुरंदर किल्ला पाहण्यासाठी उत्तम मानले जातात.

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यात वसलेल्या पुरंदर किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण पुरंदर किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती,पुरंदर किल्ल्याची संरचना ,पुरंदर किल्ल्याचा इतिहास,पुरंदर किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे ,पुरंदर किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने,पुरंदर किल्ला चालू आणि बंद होण्याची वेळ ,पुरंदर किल्ल्याच्या जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन,पुरंदर किल्ल्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment