पी.टी.उषा यांची संपूर्ण माहिती PT Usha Information In Marathi

PT Usha Information In Marathi आपल्या भारतामध्ये बऱ्याच महिला खेळाडूंनी जन्म घेतला आणि त्यांनी विविध स्पर्धेमध्ये आपल्या भारत देशाचे नाव रोशन केले. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका धावण्याच्या स्पर्धेमध्ये देशाचे नाव रोशन करणाऱ्या महिला एथलीट विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे “पी.टी.उषा” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

PT Usha Information In Marathi

पी.टी.उषा यांची संपूर्ण माहिती PT Usha Information In Marathi

नाव पी.टी.उषा
पूर्ण नाव पिलावुलकंडी थेक्केपारंबिल उषा
जन्म २७ जुन १९६४
जन्मस्थळ पय्योली ,केरळ
आईचे नाव टी.वी.लक्ष्मी
वडिलांचे नाव इ.पी.एम.पैतल
पतीचे नाव वी.श्रीनिवासन
क्षेत्र ट्रेक अँड फिल्ड एथलीट
पुरस्कार अर्जुन पुरस्कार (१९८४) पद्मश्री पुरस्कार (१९८५)

पी.टी.उषा यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of P.T. Usha and his family in Marathi)

पी.टी.उषा यांचा जन्म २७ जुन १९६४ मध्ये केरळ राज्यातील पय्योली गावात झाला होता. पी.टी.उषा यांचे संपूर्ण नाव “पिलावुलकंडी थेक्केपारंबिल उषा” असे आहे ,परंतु आज संपूर्ण जग त्यांना पी.टी.उषा या नावाने ओळखते. पी.टी.उषा यांच्या आईचे नाव टी.वी.लक्ष्मी होते ,तर त्यांच्या वडिलांचे नाव “इ.पी.एम.पैतल असे होते.

पी.टी.उषा यांचा सुरवातीचा संघर्ष (Early Struggle of P.T. Usha in Marathi)

पी.टी.उषा यांना लहानपणापासूनच धावण्याचा शौक होता. त्याकाळी केरळ सरकारने कन्नूर येथे महिला ट्रेनिंग सेंटरची स्थापना केली होती. कन्नूर येथे स्थापित झालेल्या या महिला ट्रेनिंग सेंटर मध्ये सुरवातीला ४४ महिला ट्रेनिंग घेत होत्या आणि या ४४ महिलांमध्ये पी.टी उषा ह्या देखील होत्या. पी.टी.उषा यांनी जेव्हा कन्नूर मधील या महिला ट्रेनिंग सेंटर मध्ये ट्रेनिंग घेणे चालू केले होते ,तेव्हा त्यांचे वय फक्त १२ वर्ष इतके होते.

पी.टी.उषा यांनी कमी वयापासूनच आपले करियर एथलीट बनण्यामध्ये करायचे असे ठरवले होते. पहिल्यांदा पी.टी.उषा यांनी १९७९ मध्ये झालेली नेशनल स्पोर्ट्स ही स्पर्धा जिंकली होती. या स्पर्धेपासून पी.टी.उषा यांचे धावण्याच्या स्पर्धेतील टॅलेंट संपूर्ण देशाने पाहिले होते आणि पी.टी.उषा यांच्या संपर्कातील लोकांना समजले होते की ,“पी.टी.उषा या नक्कीच मोठ्या एथलीट बनणार आहेत आणि आपल्या देशाचे नाव संपूर्ण जगामध्ये रोशन करणार आहेत.”

पी.टी.उषा यांचे करियर (Track and field career of P.T. Usha in Marathi)

१९८० मध्ये पाकिस्तानच्या कराची येथे झालेल्या “पाकिस्तान ओपन नॅशनल मीट” या स्पर्धेतून पी.टी.उषा यांनी आपल्या आंतरराष्ट्रीय ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेमध्ये पदार्पण केले होते. ही स्पर्धा जेव्हा झाली होती ,तेव्हा पी.टी.उषा यांचे वय फक्त १६ वर्ष इतके होते आणि या स्पर्धेमध्ये पी.टी.उषा यांनी भारत देशासाठी ४ गोल्ड मेडल जिंकले होते. वयाच्या १६ व्या वर्षी दुश्मन देशात जाऊन आपल्या भारत देशासाठी ४ गोल्ड मेडल जिंकणे हे कठीण काम पी.टी.उषा यांनी सोपे करून दाखवले होते.

नंतर त्याच्या दोन वर्षानंतर १९८२ मध्ये पी.टी.उषा यांनी “वर्ल्ड जूनियर इनविटेशन मीट” या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये पी.टी.उषा यांनी २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते ,तर १०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये ब्राँझ मेडल जिंकले होते.

त्यानंतर एका वर्षानंतर १९८३ मधे कुवैत येथे झालेल्या “एशियन ट्रैक अँड फील्ड चैम्पियनशीप” स्पर्धेमध्ये पी.टी उषा यांनी ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकले होते आणि त्यांनी या स्पर्धेमध्ये नवा विश्व विक्रम बनवला होता.

प्रत्येक खेळाडूचे देशासाठी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकून आणण्याचे स्वप्न असते. पी.टी उषा यांना देखील १९८४ मध्ये लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी मेडल जिंकायचे होते. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मेडल जिंकण्यासाठी पी.टी उषा यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती.

पी.टी उषा या १९८४ मध्ये लॉस एंजेलिस येथे झालेल्या ऑलिम्पिक मध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेच्या सेमी फायनल मध्ये देखील पोहोचल्या होत्या ; परंतु सेमी फायनल मध्ये त्यांना अपयशाचा सामना करावा लागला होता. त्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मेडल जिंकण्याच्या खूप जवळ पोहोचल्या होत्या ; परंतु या ऑलिम्पिक मध्ये त्या ऑलिम्पिक मेडल जिंकू शकल्या नाहीत.

त्यानंतर १९८८ मध्ये सोल देशात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पी.टी.उषा यांनी दिवसरात्र मेहनत चालू केली. १९८४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे काम अधूरे राहिले होते ,ते त्यांना १९८८ च्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पूर्ण करायचे होते ; परंतु नियतीला वेगळेच मान्य होते. जेव्हा १९८८ ची ऑलिम्पिक स्पर्धा होणार होती ,त्याच्या आधीच पी. टी.उषा यांना इंजरीचा सामना करावा लागला.

सर्वांना वाटले की , “पी.टी.उषा या इंजरी मुळे १९८८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होऊ शकणार नाहीत ; परंतु पी.टी.उषा यांनी इंजरी असून पण १९८८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. दुर्दैवाची गोष्ट ही की ,“१९८८ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देखील पी.टी उषा यांना मेडल जिंकता आले नाही ; परंतु इंजरी असून देखील पी. टी.उषा यांनी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला हीच मोठी आणि प्रेरणादायी गोष्ट आहे.”

पी.टी.उषा यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार (Awards received by P.T.Usha in Marathi)

भारत सरकारकडून पी.टी.उषा यांना भरपूर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. पी.टी.उषा यांचे ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेतील कामगिरी मुळे १९८४ मध्ये भारत सरकारकडून त्यांना अर्जुन पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते.

त्याच्याच पुढच्या वर्षी १९८५ मध्ये पी.टी.उषा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. तसेच “भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन” द्वारे पी.टी.उषा यांना “स्पोर्ट पर्सन ऑफ द सेंच्युरी” हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

FAQ

पी.टी.उषा यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला होता ?

पी.टी.उषा यांचा जन्म २७ जुन १९६४ मध्ये केरळ राज्यातील पय्योली गावात झाला होता.

पी.टी.उषा यांचे पूर्ण नाव काय आहे ?

पी.टी.उषा यांचे पूर्ण नाव “पिलावुलकंडी थेक्केपारंबिल उषा” असे आहे.

पी.टी.उषा यांच्या आईचे नाव काय होते ?

पी.टी.उषा यांच्या आईचे नाव “टी.वी.लक्ष्मी” असे होते.

पी.टी.उषा यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

पी.टी.उषा यांच्या वडिलांचे नाव “इ.पी.एम.पैतल” असे होते.

पी.टी.उषा यांनी कोणत्या खेळामध्ये आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे ?

पी.टी.उषा यांनी ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत आपल्या भारत देशाचे नाव रोशन केले आहे.

पी.टी.उषा यांनी किती ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे ?

पी.टी.उषा यांनी तीन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आहे आणि त्या एका ऑलिम्पिक स्पर्धेच्या सेमी फायनल राऊंड पर्यंत पोहचल्या होत्या ; परंतु त्या ऑलिम्पिक मेडल जिंकू शकल्या नाहीत.

पी.टी.उषा यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

पी.टी.उषा यांना त्यांच्या कार्यासाठी भरपूर पुरस्कार मिळाले आहेत. १९८४ मध्ये भारत सरकारकडून पी.टी.उषा यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच १९८५ मध्ये भारत सरकारकडून पी.टी.उषा यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

आजच्या लेखामध्ये आपण धावण्याच्या स्पर्धेतिक एका महान महिला एथलीट म्हणजे पी.टी.उषा यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण पी.टी.उषा यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब, पी.टी.उषा यांचा सुरवातीचा संघर्ष ,पी.टी.उषा यांचे करियर ,पी.टी.उषा यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार ,पी.टी.उषा यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment