प्रतापगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Pratapgad Fort Information In Marathi

Pratapgad Fort Information In Marathi आपल्या महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यात किल्ल्यांचे महत्व खूप होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच किल्ल्यांची निर्मिती केली होती ,तसेच त्यांनी भरपूर किल्ले जिंकून त्या जिंकलेल्या किल्ल्यांची डागडुजी केली होती. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका शिवकालीन महत्वाच्या किल्ल्या विषयी म्हणजे ” प्रतापगड” किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.

Pratapgad Fort Information In Marathi

प्रतापगड किल्ल्याची संपूर्ण माहिती Pratapgad Fort Information In Marathi

तसेच आजच्या लेखामधून आपण प्रतापगड किल्ल्याचा इतिहास ,प्रतापगड किल्ल्यावर असणारे एतहासिक आणि पर्यटकीय स्थळे ,प्रतापगड किल्ला पाहायला जाण्यासाठी उत्तम महिने ,प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ आणि सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन ,प्रतापगड किल्ल्या विषयी विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे याविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे ” प्रतापगड “किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

प्रतापगड किल्ला (Pratapgad fort in Marathi)

प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे. प्रतापगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासून उंची ३५०० फूट इतकी आहे. या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापित केलेले भवानी देवीची मंदिर देखील आहे. ज्या पर्यटकांना एतहासिक किल्ले किंवा एतहासिक स्थळे बघायला आवडतात ,त्यांच्यासाठी प्रतापगड किल्ला हा चांगला पर्याय आहे.

किल्ल्याचे नाव –प्रतापगड
जिल्हा –सातारा
राज्य –महाराष्ट्र
समुद्र सपाटी पासून उंची –३५०० फूट
जवळचे रेल्वे स्टेशन –पुणे
जवळचे विमानतळ –पुणे

प्रतापगड किल्ल्याचा इतिहास (History of Pratapgad fort in Marathi)

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर ते एक एक करत सर्व किल्ले जिंकत होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची चर्चा वाढत असल्यामुळे विजापूर चा आदिलशहा चिंतेत पडला होता. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची हत्या करण्याची जबाबदारी अफजलखानाला दिली होती.

अफजल खान देखील आदिलशहाच्या आदेशावरून अफाट फौज घेऊन स्वराज्या मध्ये दाखल झाला. तो वाटेत येईल ती मंदिरे तोडत होता , स्वराज्यातील माणसांवर अत्याचार करत होता. ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांना समजली तेव्हा त्यांनी अफजल खानाचा खात्मा करण्यासाठी योजना बनवण्यास सुरवात केली.

अफजल खानाचे मुख्य उद्देश्य छत्रपती शिवाजी महाराज यांना जीवे मारणे होते. अफखलखानाने छल कपटाने छत्रपती शिवाजी महाराज यांना मारण्यासाठी त्यांना प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजल खानाची चाल अगोदरच ओळखली होती ,त्यामुळे त्यांनी अफजल खानाला आपण घाबरलो आहोत म्हणून आजारी पडायचे नाटक केले आणि भेटीचा दिवस पुढे ढकलला.

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान भेटीचा दिवस उजाडला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेटीला जाताना आपली रक्षा व्हावी म्हणून अंगात चिलखत घातले होते ,तसेच सोबत अंगरक्षक न्हेले होते आणि हातात वाघनखे घातली होती.

छत्रपती शिवाजी महाराज प्रतापगडाच्या पायथ्याशी उभारलेल्या शामीयाण्यात अफजलखाना समोर दाखल झाले .समोर भला मोठा धिप्पाड शरीराचा अफजलखान उभा होता.

छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखान यांची गळा भेट झाली ,लगेचच धिप्पाड शरीर दृष्टी असणाऱ्या अफजलखानाने छत्रपती शिवाजी महाराजांना यांच्या पाठीत वार करण्याचा प्रयत्न केला ,परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी चिलखत घातले होते ,त्यामुळे त्यांना काहीच झाले नाही. अफजलखानचा हा वार वाया गेला ,तसेच छत्रपती शिवाजी महाराजांनी हातातील वाघनख्यांनी अफजलखानचा कोथळा फोडला.

अफजलखान जागीच ठार झाला होता. अफजलखानाच्या अंगरक्षक असणाऱ्या सय्यद बंडाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला , परंतु जिवा महाला यांनी त्याला पण जागी ठार मारले. तेव्हापासून म्हणतात ” होता जिवा ,म्हणून वाचला शिवा!!!”

ही छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची एतहासिक भेट ही प्रतापगड किल्ल्यावर झाली होती .अफजलखानाची कबर ही आजही प्रतापगडावर स्थित आहे. या एतहासिक भेटीनंतर छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांनी प्रतापगड किल्ला ते पन्हाळा किल्ल्या दरम्यान येणारे सर्व किल्ले जिंकून घेतले.

प्रतापगड किल्ल्यावर असणारी एतहासिक स्थळे ( Historical place at Pratapgad fort in Marathi)

१) अफजल खानाची कबर – छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाचा वध केला होता. आजही प्रतापगडावर अफजल खानाची कबर स्थित आहे.

२) भवानी मंदिर – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या द्वारे प्रतापगड किल्ल्यावर भवानी मंदिर ची स्थापना करण्यात आली होती. असे म्हणतात की, एके वेळी छत्रपती शिवाजी महाराज हे तुळजापूर च्या अंबाबाई चे दर्शन घेण्यास असमर्थ झाले होते ,तेव्हा त्यांनी प्रतापगड किल्ल्यावर भवानी देवीच्या मंदिराची निर्मिती केली होती.

प्रतापगड किल्ला बघायला जाणाऱ्यांसाठी काही महत्वाच्या टिप्स (some Important tips for visiting Pratapgad fort in Marathi)

१) प्रतापगड किल्ला हा उंचीने मोठा असल्यामुळे ,तुम्ही किल्ला पाहायला जाताना भरपूर प्रमाणात पाणी तुमच्या जवळ ठेवा.

२) प्रतापगड किल्ल्यावर चार तळे आहेत ,त्या तळ्यातील पाण्यांचा वापर तुम्ही पिण्यासाठी करू शकता.

प्रतापगड किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने (Best months to visit Pratapgad fort in Marathi)

प्रतापगड किल्ला हा एक एतहासिक किल्ला आहे. तुम्ही वर्षाच्या कोणत्याही महिन्यात हा किल्ला पाहण्यासाठी जाऊ शकता; परंतु ऑक्टोंबर ते मार्च च्या दरम्यान असणारे महिने हा किल्ला पाहण्यासाठी उत्तम मानले जातात.

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे असणारे विमानतळ ( Nearest Airport from Pratapgad fort in Marathi)

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळ असणारे विमानतळ हे पुणे येथे स्थित आहे आणि या विमानतळापासून प्रतापगड किल्ल्या पर्यंतचे अंतर १५० किलोमीटर इतके आहे.

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळ असणारे रेल्वे स्टेशन ( Nearest Railway station from Pratap fort in Marathi)

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळ असणारे रेल्वे स्टेशन हे ” पुण्याचे रेल्वे स्टेशन ” आहे. देशातील मोठ्या शहरांपासून रेल्वे या पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत येत असतात .तुम्ही देशातील कोणत्याही शहरात राहत असाल तर तुमच्या शहरापासून पुणे शहरापर्यंत रेल्वे नक्की येत असतील,तुम्ही रेल्वे च्या मदतीने पुणे रेल्वे स्टेशन पर्यंत पोहोचल्यानंतर तुम्ही पुढे रोड मार्गाने प्रतापगड किल्ल्यावर जाऊ शकता.

FAQ

प्रतापगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

प्रतापगड किल्ला हा महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यात स्थित आहे.

समुद्र सपाटी पासून प्रतापगड किल्ल्याची उंची किती फूट आहे ?

प्रतापगड किल्ल्याची समुद्र सपाटी पासून उंची ३५०० फूट इतकी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला कोणाचा वध केला होता ?

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याला अफजलखानाचा वध केला होता.

सातारा शहरापासून प्रतापगड किल्ल्या पर्यंतचे अंतर किती किलोमीटर इतके आहे ?

सातारा शहरापासून प्रतापगड किल्ला हा २० किलोमीटर अंतरावर आहे.

प्रतापगड किल्ल्याच्या प्रकार कोणता आहे ?

प्रतापगड किल्ला हा ” पर्वतीय दुर्ग ” प्रकारातील किल्ला आहे.

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ कोठे आहे ?

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ हे पुणे येथे आहे.

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कोठे आहे ?

प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे पुणे येथे आहे.

आजच्या लेखामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्यातील एका महत्वाच्या किल्ल्या विषयी म्हणजे ” प्रतापगड ” किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामध्ये आपण प्रतापगड किल्ल्याचा इतिहास ,प्रतापगड किल्ल्यावर असणारे एतहासिक आणि पर्यटकीय स्थळे ,प्रतापगड किल्ला पाहायला जाण्यासाठी उत्तम महिने ,प्रतापगड किल्ल्याच्या सर्वात जवळचे विमानतळ आणि रेल्वे स्टेशन ,प्रतापगड किल्ल्या विषयी विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे ,याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment