पोलिस भरती ची संपूर्ण माहिती Police Bharati Information In Marathi

Police Bharati Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण पोलीस भरती विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत ,तुम्ही जर पोलीस बनण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्हाला आजच्या लेखा मधून पोलीस भरती विषयीची संपूर्ण माहिती मिळणार आहे जसे की ,पोलीस भरती साठी शारीरिक चाचणी मध्ये कोणकोणत्या चाचण्या घेतल्या जातात ? ,पोलीस भरती साठी निकष पात्रता काय आहे ? आणि पोलीस भरती संबंधी असणाऱ्या FAQ (Frequently Asked Question ) प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या लेखामधून पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाला सुरवात करूयात .

Police Bharati Information In Marathi

पोलिस भरती ची संपूर्ण माहिती Police Bharati Information In Marathi

पोलिस भरती साठी असणारी शारीरिक चाचणी / Important Physical Tests For Police Bharati in Marathi

पोलिस भरती तून योग्य उमेदवाराला निवडण्यासाठी पोलिस खाते एक विशिष्ट शारीरिक चाचणी घेते ,ज्यातून पुढे मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या योग्य असणारा उमेदवार निवडला जातो.

पोलिस भरती साठी असणाऱ्या शारीरिक चाचणी मध्ये खालील चाचण्या असतात / The Physical Tests For Police Bharati in Marathi

१) धावणे – पोलीस भरती च्या शारीरिक चाचणी मध्ये धावणे ही खूप महत्वाचा चाचणी आहे. धावण्यातून पोलीस खाते उमेदवाराची चपळता तपासते.या चाचणी मध्ये उमेदवाराला विशिष्ट वेळेत विशिष्ट अंतर पार करावे लागते.जे हे अंतर विशिष्ट वेळेत पार करतात ,त्यांना पुढच्या राऊंड साठी निवडले जाते.

२)  पुष – उप्स – पोलीस खाते पोलीस भरती साठी निवेदन केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी मध्ये पुष – उप्स ची देखील चाचणी घेतली जाते.पुष – उप्स द्वारे पोलीस खाते उमेदवाराची पोटाच्या वरील शरीराची क्षमता तपासते.

३) लांब उडी – पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी मध्ये लांब उडी चा देखील समावेश असतो.

४) सीट उप – पोलीस भरतीची शारीरिक चाचणी पास करण्यासाठी उमेदवाराला सीट उप चाचनी पास करावी लागते. सीट उप चाचणी तून पोलीस खाते उमेदवाराच्या पोटाची क्षमता तपासते.

५) रोप क्लाइंबिंग – रोप क्लाइंबिंग ही देखील पोलीस भरतीच्या शारीरिक चाचणी तील महत्वाची चाचणी आहे.या रोप क्लाइंबिंग चाचणी तून पोलीस खाते उमेदवाराची शरीराच्या वरच्या बाजूच्या अवयवांची क्षमता तपासते.

६) स्ट्रेचिंग चाचणी – स्ट्रेचिंग चाचणी मध्ये विविध स्ट्रेचिंग संबंधी व्यायाम उमेदवाराकडून करवून घेतले जातात.यामधून पोलीस खाते उमेदवाराच्या शरीराची लवचिकता तपासते.

७) शटल रन – शटल रन चाचणी मध्ये उमेदवाराला विशिष्ट अंतरा पर्यंत पुढे – मागे धावावे लागते.

पोलिस भरतीसाठी पात्रता निकष / eligiblity crieteria for Police bharati In Marathi

तुम्हाला ऑफिशीयल रित्या पोलीस बनण्यासाठी खालील पात्रता निकष मध्ये बसावे लागते .

पोलीस भरती साठी असणारी ही पात्रता निकष  देशातील प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी असू शकते .परंतु त्यातील काही पात्रता निकष प्रत्येक राज्यासाठी सारखेच असतात .जसे की,

१) पोलीस भरती साठी इच्छुक उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे.जर एक पोलीस भरती साठी इच्छुक उमेदवार आहे ,परंतु त्याच्याकडे भारताचे नागरिकत्व नाहीये ,तर तो पोलीस भरती साठी निवेदन नाही करू शकत.

२) पोलीस भरती साठी निवेदन करण्यासाठी इच्छुक उमेदवाराचे वय १८ ते ३० च्या दरम्यान असले पाहिजे.जाती नुसार हा वय मर्यादा चा आकडा वाढवला जाऊ शकतो.१८ वया पेक्षा कमी आणि ३० वया पेक्षा जास्त वय असणारा उमेदवार पोलीस भरती साठी निवेदन करू शकत नाही.

३) पोलीस भरती साठी इच्छुक उमेदवारांची शारीरिक चाचणी घेतली जाते .यासोबतच पोलीस भरती साठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा देखील घेतली जाते आणि या शारिरीक चाचणी आणि परीक्षे मध्ये पास होणाऱ्या उमेदवारांची लिस्ट जाहीर केली जाते आणि त्या लिस्ट मध्ये नाव असणाऱ्यांची निवड पोलीस म्हणून होते आणि त्यांची पोस्टिंग राज्याच्या विविध ठिकाणी केली जाते.

४) पोलीस भरती साठी इच्छुक उमेदवाराला काही ठिकाणी १० वी पास असावे लागते ,तर काही पोलीस भरती मध्ये १२ वी पास असावे लागते,तर काही भरती मध्ये त्या उमेदवारांची डिग्री पूर्ण असावी लागते.

महाराष्ट्र पोलीस भरती प्रोग्राम २०२३

पोस्ट चे नाव –सब इन्स्पेक्टर
ऑर्गायझेशन चे नाव –MPSC
पोस्ट साठी निवेदन करण्याची सुरवातीची तारीख११-०९-२०२३
पोस्ट साठी निवेदन करण्याची शेवटची तारीख०३-१०-२०२३
ऍडमिट कार्डपरीक्षेच्या १५ दिवस आधी
परीक्षा तारीखडिसेंबर २०२३ मध्ये
वयोमर्यादा२१ ते ३५
शैक्षणिक पात्रताउमेदवाराची १०,१२ किंवा ग्रॅज्युएशन पास असणे गरजेचे
ॲप्लिकेशन फिजओपन साठी – ५४४ एससी ,एस टी – ३४४
ॲप्लिकेशन मोडऑनलाइन
ऑनलाइन निवेदनhttps://mpsconline.gov.in/candidate
ऑफिशिअल वेबसाईटhttps://mpsc.gov.in/

पोलिस भरती निवेदन प्रक्रिया / Police Bharati application process in Marathi

तुम्ही जर पोलीस भरती साठी इच्छुक असाल ,आणि तुम्हाला पण पोलीस भरतीचा फॉर्म भरायचा असेल तर ,तुम्ही खालील स्टेप्स फॉलो करून पोलीस भरती साठीचा फॉर्म भरू शकता.

१) तुम्ही जर पोलीस भरतीसाठी इच्छुक  असाल आणि ते वरती दिलेल्या पात्रता निकष मध्ये तुम्ही बसत असाल तर तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भण्यासाठी पोलीस भरती साठी असणाऱ्या सरकारच्या ऑफिशीयल साईट वरती जा आणि तिथे तुमची वयक्तिक आणि शैक्षणिक माहिती व्यवस्थित रित्या भरा.

हा पोलीस भरती चा फॉर्म काही काळासाठी च राज्याच्या वेबसाईट वरती उपलब्ध असतो ,त्यामुळे त्यांच्या अंतिम तारखेच्या आधी तुम्ही तो पोलीस भरतीचा फॉर्म भरा ,तुम्ही जर अंतिम तारखेच्या नंतर पोलीस भरतीचा फॉर्म भरण्याचा प्रयत्न केला तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही ,त्यामुळे तुम्ही अंतिम तारखेच्या आत पोलीस भरती चा फॉर्म भरा ,जेणेकरून तुमचा फॉर्म यशस्वी रित्या सबमिट होईल.

२) सर्वात आधी पोलीस भरती साठी सरकारने लाँच केलेली जाहिरात योग्य रित्या पाहा.नंतर पोलीस भरती साठी च्या ऑफिशीयल वेबसाईट वरती जा आणि तिथे फॉर्म मध्ये विचारलेली माहिती व्यवस्थित रित्या भरून तो फॉर्म सबमिट करा.तुमचा पोलीस भरती साठीचा फॉर्म यशस्वी रित्या सबमिट होईल.

पोलिस भरती साठी आवश्यक कागदपत्रे / Required Documents for Police Bharati in Marathi

पोलिस भरतीचा फॉर्म यशस्वी रित्या भरण्यासाठी तुमच्याकडे खालील आवश्यक डॉक्युमेंट असणे गरजेचे आहे .

१) आधार कार्ड

२) जन्माचा दाखला

३) जातीचा दाखला

४) उत्पन्नाचा दाखला

५) पासपोर्ट साईझ फोटो

६) सही असलेली स्कॅन कॉपी

पोलिस भरती तून शारीरिक ,मानसिक आणि शैक्षणिक दृष्ट्या चांगल्या असणाऱ्या उमेदवाराला निवडले जाते. पोलिस खाते हे देशाच्या सुरक्षेच्या क्षेत्रामध्ये मुख्य भूमिका बजावत असते .देशातील पोलिसांना खूप प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागतो.त्यामुळे पोलीस भरती तून पोलिसांची निवड करताना पोलीस खाते योग्य त्या उमेदवाराची निवड करतात.

या निवडीमध्ये पोलीस खाते असा उमेदवार निवडतात , जो शारीरिक दृष्ट्या ,मानसिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या चांगला असेल.पोलीस भरती तून शारीरिक दृष्ट्या आणि मानसिक दृष्ट्या चांगला उमेदवार निवडण्यासाठी पोलिस खाते उमेदवाराची शारीरिक चाचणी घेते आणि शैक्षणिक दृष्ट्या चांगला उमेदवार निवडण्यासाठी पोलिस खाते उमेदवाराची लेखी चाचणी घेते ,या चाचणीमध्ये जो कोणी उत्तीर्ण होईल ,त्याची निवड पोलीस खाते पोलीस म्हणून करते.

FAQ

पोलीस भरती मधून कोण कोणत्या पदांसाठी भरती केली जाते ?

पोलीस भरती मधून राज्यामध्ये कांस्टेबल GD, कांस्टेबल ट्रेडमैन, सब इंस्पेक्टर, सहायक उप निरीक्षक,इत्यादी पदांची भरती केली जाते.

पोलीस भरती चा फॉर्म भरण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

पोलीस भरती साठी तुम्ही कमीतकमी १० वी किंवा १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले असले पाहिजे.

पोलीस भरती साठी ऑनलाइन फॉर्म कसा भरायचा ?

पोलीस भरती साठी ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या पोलीस भरतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन तिथे विचारलेली माहिती योग्य रित्या भरून फॉर्म सबमिट करायला हवा.

पोलीस भरती साठी वयो मर्यादा काय असते ?

पोलीस भरती चा फॉर्म भरण्यासाठी तुमचे वय १८ ते ३० च्या दरम्यान असले पाहिजे.

आजच्या लेखामध्ये आपण पोलीस भरती विषयीची संपूर्ण माहिती पाहिली,पोलीस भरती साठी असणारी शारीरिक चाचणी पाहिली ,तसेच पोलीस भरती साठी असणारी पात्रता निकष पाहिली ,पोलीस भरती साठीचे निवेदन कशा पद्धतीने  करायचे याची माहिती पाहिली ,पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याकडे कोणकोणती डॉक्युमेंट असणे आवश्यक आहे, या सर्वांची माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहिली.

Leave a Comment