मोर पक्ष्याची संपूर्ण माहिती Peacock Bird Information In Marathi

Peacock Bird Information In Marathi आपण पाऊस यायच्या अगोदर डोंगराच्या पायथ्याला किंवा रानामध्ये मोर नाचताना नक्की पाहिले असेल.आजच्या लेखामध्ये आपण याच मोरा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे मोरा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Peacock Bird Information In Marathi

मोर पक्ष्याची संपूर्ण माहिती Peacock Bird Information In Marathi

नाव मोर
गण गैलीफोर्मिस
संघ रज्जुकी
वर्ग पक्षी
प्रजाती भारतीय मोर ,हिरवा मोरा आणि कांगो मोर

मोर हे खूप आकर्षित असतात आणि त्यांचे मोर पिस आपले मन मोहून टाकते.जर तुम्ही मोर नाचताना पाहिलं असेल तर ,तुम्ही नशीबवान आहात !! कारण मोरांच नाच हा खूप आकर्षक असतो.

मोर हा असा पक्षी आहे जो ,हवेत उंच गतीत उडू देखील शकतो आणि जमिनीवर गतीने धावू देखील शकतो.नर मोर चा आकार हा मादी मोर पेक्षा दुप्पट असतो.प्राचीन ग्रंथांमध्ये मोराचा उल्लेख केलेला आपल्याला दिसतो.मोर हे शाकाहरी पण असतात आणि ते मांसाहारी पण असतात ,मोर झाडांची फळं ,फुल पण खातात आणि ते कीटक देखील खातात.मोराची शेपटी हे खूप उंच असते आणि मोराच्या शरीराचा ७० ते ७५ % भाग हा शेपटीने व्यापलेला असतो.

विविध भाषांमध्ये असणारे मोराचे नाव [ Different Names of peacock in Different language in Marathi ]

मोराला विविध भाषेमध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते.इंग्रजी भाषेत मोराला ” पिकॉक” म्हणले जाते ,तर संस्कृत भाषेमध्ये मोराला “मयूर” म्हणले जाते.अरबी भाषेत मोराला ” ताऊस” म्हणले जाते.

मोरांच्या प्रजाती Species of Peacock in Marathi

मोरांच्या तीन वेगवेगळ्या प्रजाती आहेत आणि त्या तीन प्रजाती खालीलप्रमाणे :

१) भारतीय मोर – भारतामध्ये आढळणाऱ्या मोरांच्या प्रजातीला ” भारतीय मोर” म्हणले जाते.भारतीय मोराचे वैज्ञानिक नाव “Pavo cristatus” हे आहे.भारत देशासोबत श्रीलंका आणि भारताच्या इतर शेजारी राष्ट्रांमध्ये हा भारतीय मोर प्रजातीतील मोर आढळला जातो.

२) हिरवा मोर – या प्रजातीतील मोराचे वैज्ञानिक नाव ” Pavo muticus” हे आहे आणि या प्रजातीतील मोर जास्तकरून इंडोनेशिया आणि थायलंड या देशामध्ये आढळतात.या प्रजातीतील मोर विलुप्त होणाऱ्या मार्गावर आहेत ,आपण या प्रजातीतील मोरांचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

३) कांगो मोर – बऱ्यापैकी मोरांच्या प्रजाती या आशिया खडांमध्ये आढळल्या जातात.परंतु मोराची ही कांगो प्रजाती जास्त करून आफ्रिका खंडामध्ये आढळते.या प्रजातीतील मोराचे वैज्ञानिक नाव “Afropavo congensis” हे आहे.हिरवा मोराच्या प्रजाती सारखे ही कांगो मोराची प्रजाती देखील विलुप्त होण्याच्या मार्गावर आहे.

मोराचे ऐतहासिक महत्व Historical importance of peacock in Marathi

आपल्या प्राचीन ग्रंथांमध्ये मोराचा उल्लेख केला आहे.भगवान श्री कृष्ण यांना मोर खूप प्रिय होता आणि भगवान श्री कृष्णाच्या मुकुटावर मोर पिस होते.याचसोबत इतर हिंदुं धार्मिक ग्रंथामध्ये मोराचा उल्लेख केलेला आपल्या दिसतो.

मुघल बादशहा शाहजहा याला देखील मोर खूप प्रिय होता आणि त्याने आपल्या सिंहासनाला मोराच्या आकारासारखे बनवले होते.त्याच्या या सिंहासनाला ” मयूर सिंहासन” म्हणले जात होते.

मोरा विषयी असणाऱ्या १५ रोचक गोष्टी 15 interesting facts about Peacock in Marathi

१) मोराला सौंदर्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे भारत सरकारने १९६३ मध्ये मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले होते.तेव्हापासून मोर हा भारत देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

२) मोर पक्षी हा जास्तकरून आशिया खंडामध्ये आढळतो.आशिया खंडातील भारत ,श्रीलंका देशामध्ये मोर जास्त प्रमाणात आढळतात.आशिया खंडासोबत आफ्रिका खंडामध्ये देखील मोराची कांगो प्रजाती आढळते.

३) मोराचे वैज्ञानिक नाव “पावो क्रिस्टेट्स” हे आहे.

४) मोर हे शाकाहारी आणि मांसाहारी असतात ,ते दोन्ही प्रकारचे अन्न खातात.

५) आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये मोराच्या तीन प्रजाती आढळतात.

६) नर मोर हा मादी मोरापेक्षा आकाराने मोठा असतो.नर मोराचे वजन ५ ते ७ किलो च्या दरम्यान असते ,तर मादा मोराचे वजन हे २ ते ३ किलोच्या आसपास असते.

७) मोर हा असा पक्षी आहे ,जो आकाशामध्ये जोरात गतीने उडू देखील शकतो आणि जमिनीवर जोरात गतीने धावू देखील शकतो.

८) मोराचा जमिनीवर धावण्याचा वेग हा १६ किमी पर तास इतका असतो.

९) मोरांचे तोंड हे आकाराने खूप छोटे असते.मोरांच्या शेपटीने शरीरातील ७० ते ७५ % भाग व्यापलेला असतो.या शेवटी मध्ये १९५ हून अधिक विविध रंगाची पिसे असतात.मोराची चोचेचा आकार हा एक इंच इतका असतो.

१०) भारतामध्ये मोरांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे ; त्यामुळे भारत सरकारने १९८२ मध्ये मोराला मारण्यावर कायदा आणला होता.या कायद्यानुसार आपल्या देशामध्ये मोराची हत्या करणे हा कायद्याने गुन्हा आहे.

११) मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी असून तो म्यानमार देशाचा देखील राष्ट्रीय पक्षी आहे.

१२) मोरांचा जीवन काल हा २१ वर्षा पर्यंतचा असतो.काही मोर या जीवन कालापेक्षा जास्त वर्ष जगतात.

१३) मादी मोर एकावेळी २ ते ५ अंडी देते आणि एका महिन्याच्या आत त्या दिलेल्या अंड्यातून लहान मोरांचा जन्म होतो.

१४) जन्मलेल्या नवीन मोरांचे वजन १०० ग्रॅम इतके असते आणि हे जन्मलेले मोर जन्मापासून चालण्यास सक्षम असतात.

१५) मोरांचे पंख दरवर्षी झडतात आणि त्याजागी नविन पंख येतात.

FAQ

मोराला इंग्रजी भाषेत काय म्हणले जाते ?

मोराला इंग्रजी भाषेत “Peacock” म्हणले जाते.

भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण आहे ?

मोर पक्षी हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे.

मोराच्या किती प्रजाती जगभरामध्ये आढळतात आणि त्या प्रजाती कोणत्या ?

जगभरामध्ये मोराच्या तीन प्रजाती आढळतात आणि त्या तीन प्रजाती अनुक्रमे भारतीय मोर ,हिरवा मोर आणि कांगो मोर.

मोराच्या शरीरावर किती पंख असतात ?

मोराच्या शरीरावर १९५ पेक्षा जास्त पंख असतात.

मोराचा जमिनीवर धावण्याचा वेग किती आहे ?

मोराचा जमिनीवर धावण्याचा वेग हा ” १६ किमी पर तास” इतका असतो.

मोर हा पक्षी कोणत्या देशांचा राष्ट्रीय पक्षी आहे ?

मोर हा भारत आणि म्यानमार या दोन देशांचा राष्ट्रीय पक्षी आहे.

मोरांचे वजन किती असते ?

नर मोर हा मादी मोरपेक्षा आकाराने मोठा असतो.नर मोराचे वजन साधारण ५ ते ७ किलो ग्रॅम च्या आसपास असते ,तर मादा मोराचे वजन २ ते ३ किलो ग्रॅम इतके असते.

मोरांचा जीवन काल किती वर्षांपर्यंतचा असतो ?

मोरांचा जीवन काल हा २१ वर्षा पर्यंतचा असतो.काही मोर यापेक्षा जास्त वर्ष देखील जगतात.

मोराचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

“पावो क्रिस्टेट्स” हे मोराचे वैज्ञानिक नाव आहे

मोर शाकाहारी असतात की ते मांसाहारी असतात ?

मोर हे शाकाहारी पण असतात आणि ते मांसाहारी पण असतात.मोर झाडावरील फळे ,फुले पण खातात आणि ते कीटक खाऊन आपला उदरिर्वाह देखील करतात.

मादी मोर एकावेळी किती अंडे देते ?

मादी मोर एकावेळी २ ते ५ अंडी देते आणि एका महिन्याच्या आत दिलेल्या त्या अंड्यातून नवीन बाळ मोरांचा जन्म होतो.

आजच्या लेखामध्ये आपण भारताचा राष्ट्रीय पक्षी असणाऱ्या मोर पक्ष्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.आजच्या लेखामधून आपण मोराच्या प्रजाती ,मोराचे ऐतहासिक महत्व ,विविध भाषेंमध्ये असणारी मोरांची नावे अणि मोरांविषयी असणाऱ्या रोचक गोष्टी यांविषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment