पीसीओडी आजारची संपूर्ण माहिती PCOD Disease Information In Marathi

PCOD Disease Information In Marathi आजकालच्या धावपळीच्या युगात आपल्याला बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे. बदलत्या जीवन पद्धतीमुळे आपल्याला बऱ्याच आजारांचा देखील सामना करावा लागत आहे. आजच्या लेखामध्ये आपण महिलांना होणाऱ्या एका आजाराविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे “पीसीओडी आजाराविषयी” संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

PCOD Disease Information In Marathi

पीसीओडी आजारची संपूर्ण माहिती PCOD Disease Information In Marathi

आजराचे नाव पीसीओडी आजार
फुल्ल फॉर्म पॉली सिस्टीक ओवेरियन डीसिज
वयोगट १५-४५ वयोगटातील महिला
लक्षणे १) वजन वाढणे २) रक्तस्राव होणे ३) अनियमित पिरियडस ४) डोके दुखणे ५) चेहऱ्यावर केस येणे
घरगुती उपचार १) पालेभाज्या खाणे २) ३० ग्रॅम फायबर खाणे ३) नियमित फळ खाणे ४)  नियमित व्यायाम करणे ५)  नियमित मेडीटेशन करणे

पीसीओडी चा फुल्ल फॉर्म (Full form of PCOD in Marathi)

पीसीओडी चा फुल्ल फॉर्म हा “पॉली सिस्टीक ओवेरियन डीसिज” असा होतो आणि ह्या पीसीओडी आजाराचे प्रमाण महीलांमध्ये जास्त आढळते. महिलांच्या शरीरातील हार्मोनचे संतुलन बिघडल्यामुळे हा आजार उद्भवू शकतो.

हा आजार १५ ते ४५ वयो गटातील महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळला जातो. पीसीओडी आजाराने ग्रस्त असलेल्या महिलांच्या चेहऱ्यावर केस येऊ लागतात.

आज वर्तमानात भारतामध्ये बऱ्याच महिला पीसीओडी आजाराने ग्रस्त आहेत. “नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड रिसर्च” यांच्या मते,“वर्तमानात भारतामधील एकूण महीलांपैकी १०% महिला या पीसीओडी आजाराने ग्रस्त आहेत.”

पीसीओडी आजार होण्याची काही कारणे (Some causes of PCOD disease in Marathi)

१) महिलांचे वजन अचानक वाढणे ,हे देखील पीसीओडी आजाराचे एक प्रमुख कारण आहे.

२) अनियमित पिरिययड्स मुळे देखील महिलांना पीसीओडी आजार होऊ शकतो.

३) काही महिलांना आनुवंशिकता मुळे देखील पीसीओडी आजार होऊ शकतो.

पीसीओडी आजाराची लक्षणे (Symptoms of PCOD disease in Marathi)

पीसीओडी आजाराची लक्षणे ही विविध शरीरामध्ये वेगवेगळी असू शकतात ; परंतु पीसीओडी आजाराची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे आहेत :

१) वजन वाढणे

२) रक्तस्राव होणे

३) अनियमित पिरियडस

४) डोके दुखणे

५) चेहऱ्यावर केस येणे

वरील काही पीसीओडी आजाराची लक्षणे आहेत. तुम्हाला जर वर दिलेल्या लक्षणापैकी काही लक्षणे तुमच्या शरीरामध्ये जाणवू लागली ,तर तुम्ही त्वरित ती लक्षणे डॉक्टरांना दाखवा आणि तुम्हाला जर पीसीओडी आजार झाला असेल तर ,त्वरित मेडिकल उपचार घ्या.

तुम्ही खालील गोष्टी करून आपल्याला पीसीओडी आजार झाला आहे की नाही याची माहिती लावू शकता.

१) तुम्हाला जर पीसीओडी आजाराची लक्षणे तुमच्या शरीरामध्ये जाणवू लागली तर ,तुम्ही त्वरित ती लक्षणे डॉक्टरांना दाखवा. डॉक्टर तुम्हाला पीसीओडी आजाराच्या लक्षणा संबंधी काही प्रश्न विचारतील ,त्या प्रश्नांची तुम्ही खरी ती उत्तरे द्या.

२) त्यानंतर डॉक्टर तुमच्या संपूर्ण शरीराच्या काही टेस्ट घेतील ,जसे की बीएमआई टेस्ट , बीपी टेस्ट ,इत्यादी. आणि या टेस्ट वरून डॉक्टर तुमच्या शरीरात असणाऱ्या फॅटची माहिती मिळवतील.

३) त्यानंतर तुमची ब्लड टेस्ट घेतली जाईल आणि तुमच्या ब्लड टेस्टच्या रिपोर्ट वरून डॉक्टर तुमच्या शरीरातील एनड्रोजन आणि रक्तातील ग्लुकोज विषयी माहिती मिळवतील.

४) तसेच त्यानंतर तुमची पेल्विक टेस्ट घेतली जाईल आणि या पेल्विक टेस्टच्या रिपोर्ट वरून डॉक्टर तुमच्या शरीरामध्ये गाठी आहेत की नाही ,याची माहिती मिळवतील.

५) त्यानंतर तुमच्या शरीरातील अंडाशयची टेस्ट केली जाईल आणि टेस्ट द्वारे डॉक्टर तुमच्या अंडाशयामध्ये गाठ आहे की नाही याची माहिती मिळवतील.

पीसीओडी आजारावर असणारे काही घरगुती उपचार (Some Home Remedies for PCOD disease in Marathi)

आपण पीसीओडी आजार बरा करण्यासाठी संपूर्ण रित्या घरगुती आजारावर आधारित राहू शकत नाही ; आपल्याला जर पीसीओडी आजार संपूर्ण रित्या बरा करायचा असेल तर, आपण पीसीओडी आजार हा सर्जरी करून किंवा डॉक्टरांच्या नियंत्रणाखाली उपचार घेऊनच हा आजार बरा करू शकतो ; परंतु खालील घरगुती उपचार करून आपण आपल्या शरीरातील पीसीओडी आजाराच्या लक्षणांचे प्रमाण कमी करू शकतो.

१) तुम्ही जर पीसीओडी आजाराने ग्रस्त असाल तर ,तुम्ही दररोज आपल्या आहारामध्ये विविध फळांचा समावेश केला पाहिजे. नियमित फळ खाल्यामुळे आपल्या शरीरातील शुगरचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच नियमित फळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण देखील नियंत्रित राहण्यास मदत होते.

२) तुम्ही जर पीसीओडी आजाराने ग्रस्त असाल तर ,तुम्ही दिवसाला किमान ३० ग्रॅम फायबरचे सेवन केले पाहिजे. कारण किमान ३० ग्रॅम फायबर हे आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास आपल्या शरीराची मदत करते.

३) तुम्हाला जर पीसीओडी आजार झाला असेल तर ,तुम्ही नियमित योगा किंवा व्यायाम करायला हवा. नियमित योगा किंवा व्यायाम केल्यामुळे आपल्या शरीराचे वजन नियंत्रित राहते.

४) पीसीओडी आजारापासून वाचण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. हिरव्या पालेभाज्यामधील पोषक तत्वे आपल्याला पीसीओडी आजारापासून वाचण्यासाठी आपले रक्षण करतात.

५) तुम्ही जर पीसीओडी आजाराने ग्रस्त असला तर ,तुम्ही नियमित व्यायाम करण्यासोबत नियमित मेडीटेशन देखील केले पाहिजे. जसे नियमित व्यायाम किंवा योगा करण्याचे फायदे आपल्या शरीराला होतात , तसेच नियमित मेडीटेशन केल्याचे फायदे आपल्या मानसिक आरोग्याला होतात. नियमित मेडीटेशन केल्यामुळे आपले मानसिक आरोग्य तंदुरुस्त राहण्यामध्ये आपली मदत होते.

६) तुम्हाला जर पीसीओडी आजार झाला असेल तर ,तुम्ही गोड्या पदार्थाचे सेवन जितके शक्य तितके कमी केले पाहिजे.

७) पीसीओडी आजारापासून मुक्त होण्यासाठी तुम्ही आरोग्यदायी जीवन जगले पाहिजे.

FAQ

पीसीओडी आजार कोणाला होतो ?

पीसीओडी आजार हा महिलांना होणारा आजार आहे.

पीसीओडीचा फुल्ल फॉर्म काय आहे ?

पीसीओडी चा फुल्ल फॉर्म “पॉली सिस्टीक ओवेरियन डीसिज” असा होतो.

भारतामध्ये किती % महिला पीसीओडी आजाराने ग्रस्त आहेत ?

“नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड रिसर्च” यांच्या मते आपल्या भारतामध्ये १०% पेक्षा जास्त महिला ह्या पीसीओडी आजाराने ग्रस्त आहेत.

पीसीओडी आजार होण्याची कारणे कोणकोणती आहेत ?

काही महिलांना आनुवंशिकता मुळे पीसीओडी आजार होतो ,तर काही महिलांना अनियमित पिरियडस मुळे देखील पीसीओडी हा आजार होतो.

पीसीओडी आजाराची लक्षणे कोणकोणती आहेत ?

वजन वाढणे ,रक्तस्राव होणे ,अनियमित पिरियडस ,डोके दुखणे ,चेहऱ्यावर केस येणे, इत्यादी ही काही पीसीओडी आजाराची लक्षणे आहेत. आपल्याला जर आपल्या शरीरामध्ये पीसीओडी आजाराची लक्षणे जाणवू लागली तर ,आपण त्वरित ही लक्षणे जवळच्या दवाखान्यात जाऊन डॉक्टरांना दाखवली पाहिजेत.

पीसीओडी आजारावर घरगुती उपचार कोणकोणते आहेत ?

आपल्याला जर पीसीओडी आजार झाला असेल तर आपण नियमित व्यायाम किंवा योगा केला पाहिजे. तसेच आपण आपल्या आहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश केला पाहिजे. पीसीओडी आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी नियमित मेडीटेशन केले पाहिजे ,तसेच त्यांनी नियमित फळांचे सेवन केले पाहिजे. ज्या लोकांना पीसीओडी आजार झाला आहे ,तर अशा लोकांनी आपल्या आहारामध्ये किमान ३० ग्रॅम फायबरचे सेवन केले पाहिजे आणि आपण पीसीओडी आजारापासून वाचण्यासाठी गोड्या पदार्थाचे सेवन करणे टाळले पाहिजे. आपण जर वरील पथ्ये पाळली तर ,आपल्याला झालेली पीसीओडी आजाराची लक्षणे कमी होण्यामध्ये आपली मदत होते.

आजच्या लेखामध्ये आपण पीसीओडी आजाराविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण पीसीओडीचा फुल्ल फॉर्म ,पीसीओडी आजार होण्याची कारणे ,पीसीओडी आजाराची काही लक्षणे ,पीसीओडी आजारावर असणारे काही घरगुती उपचार, पीसीओडी आजाराविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment