पोपट पक्ष्याची संपूर्ण माहिती Parrot Bird Information In Marathi

Parrot Bird Information In Marathi पशु – पक्षी आपल्या निसर्गाला सुंदर बनवतात .निसर्गामध्ये विविध प्रकारची पशु – पक्षी आहे आणि त्यातील काहींचे सौंदर्य आपल्याला मोहून टाकते.आजच्या लेखामध्ये आपण अशेच मनमोहक सौंदर्य असणाऱ्या एका पक्षा बद्दल म्हणजे “पोपट” या पक्षा बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे पोपट या पक्षा विषयी संपूर्ण माहिती पाहुयात.

Parrot Bird Information In Marathi

पोपट पक्ष्याची संपूर्ण माहिती Parrot Bird Information In Marathi

पक्ष्याचे नाव पोपट
वर्ग पक्षी
संघ रज्जुकी
प्रजाती ३०० पेक्षा जास्त

पोपट पक्षी Parrot in Marathi

पोपट पक्षी हे विविध रंगाचे असतात ,जास्तकरून हिरव्या रंगाचे पोपट आपल्याला दिसतात.पोपटांच्या विविध प्रजाती देखील आहेत;ह्यातील काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत .आपल्याला पोपटांच्या संवर्धनसाठी प्रयत्न केले पाहिजेत.जगभरामध्ये खूप ठिकाणी पोपटांना पाळले जाते.यासाठी ते झाडावर बसलेल्या पोपटांची शिकार करतात आणि त्या पोपटाना जबरदस्ती छोट्या पिंजऱ्यामध्ये कैद केले जाते.

पोपट हा चपळ पक्षी आहे. यासोबत पोपट हे बुद्धिमान देखील असतात.शास्त्रज्ञांच्या मते पोपट हे चार ते पाच वर्षाच्या मानवी बाळा समान बुद्धिमान असतात.

पोपटांच्या प्रजाती Species of Parrots in Marathi

पोपट पक्षाच्या जगभरामध्ये ३०० पेक्षा जास्त प्रजाती आढळतात .मध्य अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेमध्ये आढळणाऱ्या पोपटांच्या प्रजातींना नव्या प्रजातीचे पोपट म्हणले जाते आणि आशिया आणि ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आढळणाऱ्या पोपटांना जुन्या प्रजातीचे पोपट म्हणले जाते.

पोपटांकडे असणारी नकल करण्याची क्षमता Ability of mimic in Parrot in Marathi

तुम्ही खूप ठिकाणी पोपटांना माणसांची नकल करताना पाहिले असेल ,पोपट फक्त माणसांची नकल न करता ,ते कोणत्याही प्राण्यांची नकल करू शकतात. पोपटांना ही नकल करण्याची क्षमता निसर्गाकडून देणगी रुपात मिळालेली आहे.

जंगलामध्ये असणारे पोपट विविध प्राण्यांची नकल करतात.ते काहीवेळा विविध प्राण्यांची नकल ही आपल्या रक्षणासाठी करतात.समजा जर जंगलामध्ये पोपट जिथे आहे ,तिथे साप आला ; तर सापापासून आपले रक्षण करण्यासाठी पोपट बहिरी ससाणा ची नकल करतात ,जेणेकरून साप तिथून निघून जाईल.

पोपट माणसांची देखील नकल करतात.काही ज्योतिष लोक आपल्या जवळ पोपट ठेवतात आणि ते पोपट माणसांची नकल करतात. काही जादुगार देखील आपल्या जादूच्या कार्यक्रमामध्ये पोपटांचा वापर करतात.आफ्रिकेतील एक अलेक्सा नावाच्या पोपटाला शंभर पेक्षा जास्त मानवी शब्द बोलता येत होते आणि त्या अलेक्सा नावाच्या पोपटाला त्या शब्दांचा अर्थ देखील समजत होता.

पोपटाचे पाय Legs of parrot in Marathi

जास्तकरून पशु पक्षी भोजन ग्रहण करताना आपल्या हाताचा वापर करतात ,परंतु पोपट हा पक्षी अन्न ग्रहण करताना आपल्या पायाचा वापर करतात ,त्यांच्या पायामध्ये खूप ताकद असते ,त्यांच्या पायांमध्ये असणारी ही ताकद त्यांना एका फांदीवर जास्तवेळ टिकून राहण्यासाठी मदत करते.

ते आपल्या पायाच्या मदतीने भोजन उचलतात आणि ते भोजन पायाच्या मदतीने तोंडात घालतात.आपल्या माणसांमध्ये आपल्याला दोन्ही हातांपैकी एका हाताने खायची सवय असते ,जसे की काही लोक आपल्या डाव्या हाताने खाणे पसंद करतात ,तर काही लोक आपल्या उजव्या हाताने खाणे पसंद करतात.अशेच पोपट देखील डाव्या पायाने अन्न उचलणे किंवा उजव्या पायाने अन्न उचलणे पसंद करतात.

पोपट पक्ष्याचा जीवनकाल life span of Parrots in Marathi

पोपटांचे जीवन काल हे विविध प्रजाती मध्ये वेगवेगळा असतो.छोट्या आकाराच्या पोपटांचे जीवन काल हा १५ ते २० वर्षा पर्यंत असतो ,मध्यम आकाराच्या पोपटांचा जीवन काल हा २५ ते ३० वर्षा पर्यंत असतो आणि मोठ्या आकाराच्या पोपटांचा जीवन काल हा ६० ते ८० वर्षे इतका असतो.

या मोठ्या आकाराच्या प्रजातीमधील एक प्रजाती म्हणजे “मकाऊ प्रजाती”.मकाऊ जातीतील चार्ली नाव असणाऱ्या पोपटाचा जीवन काल हा १०० पेक्षा अधिक होता.त्याच्या या जास्त जीवन कालामुळे तो चार्ली नावाचा पक्षी जगभर प्रसिद्ध झाला.८९ वय असणाऱ्या पोंचो नावाच्या मकाऊ प्रजातीतील पोपटाने भरपूर हॉलिवुड चित्रपटात काम केले आहे.

पोपटांची चोच Parrots beak in Marathi

पोपटांची चोच ही इतर प्राण्यांच्या तुलनेत मजबूत असते.पोपटाच्या खालच्या चोचेच्या तुलनेत त्याची वरची चोट मोठी आणि मजबूत असते.पोपट या चोचेच्या मदतीने काहीही तोडू शकतात.मकाऊ प्रजातीतील पोपटांची चोच इतकी मजबूत असते की ,ते आपल्या चोचेने अक्रोड तोडू शकतात.याच सोबत ते आपल्या चोचेने नारळ मध्ये देखील दरार पाडू शकतात.

नर पोपट आणि मादी पोपट Male parrots and female parrots in Marathi

मादी पोपट आणि नर पोपट हे आयुष्यभर एकत्र राहतात. नर पोपट मादी पोपट ला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी विविध आवाज काढतात किंवा विविध नकल करतात.यामध्ये लव बर्ड्स देखील येतात. जास्त काळ पर्यंत एका जागेवर राहणे ही ,लव्ह बर्डस ची विशेषतः आहे.नर पोपट आणि मादी पोपट हे एकमेकांना भोजन शोधण्यासाठी एकमेकांची मदत करतात.

पाळीव पोपट pet parrots in Marathi

पोपटांना आतापासूनच पाळले जात नाही तर ,पोपटांना प्राचीन काळापासून पाळले जाते.प्राचीन काळातील राजे महाराजे किंवा श्रीमंत लोक आवड म्हणून पोपटांना पाळत होते.

तुम्हाला देखील पोपटांना पाळायची इच्छा आहे तर तुम्ही योग्य ती दक्षता घेऊन पोपटांना पाळायची तुमची इच्छा पूर्ण करू शकता ,कारण पोपट हे खूप नाजूक असतात ,त्यांना पाळताना आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे.

सर्वात मोठी पोपटाची प्रजाती biggest species of parrot in Marathi

पोपटाची काकापो प्रजाती ही सर्वात मोठी प्रजाती आहे .ह्या काकापो प्रजातीतील पोपट हे २ फूट इतके लांब असतात आणि त्यांचे वजन साधारण नऊ पौंड इतके असते.

बऱ्यापैकी सर्व प्रजातीतील पोपटांना उडण्याची क्षमता असते ; परंतु काकापो प्रजातीतील पोपट उडू शकत नाही.इतर प्रजातीतील मादी पोपट आणि नर पोपट यामध्ये जास्त फरक नसतो.परंतु काकापो प्रजातीतील नर पोपट हा मादी पोपटा पेक्षा आकाराने खूप मोठा असतो.मादी काकापो पोपटाची चोच आणि शेपटी मोठी असते. काकापो प्रजातीतील पोपटांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.आणि पोपटांच्या नष्ट होण्याच्या कगारिवर असणाऱ्या प्रजाती पैकी काकापो ही एक प्रजाती आहे.

पोपटाची केआ प्रजाती Kea species of parrot in Marathi

केआ ही पोपटांची विशिष्ट प्रजाती आहे.बऱ्यापैकी पोपटांच्या प्रजाती या गरम वातावरणात राहतात ; परंतु पोपटाची केआ प्रजाती ही थंड वातावरणात राहते. केआ चे लांब पंख उष्ण असतात ,हे उष्ण पंख थंड वातावरणात केआ चे रक्षण करतात.

FAQ

जगभरामध्ये किती प्रकारच्या पोपटांच्या प्रजाती आढळतात ?

जगभरामध्ये ३०० पेक्षा अधिक पोपटांच्या प्रजाती आढळतात.

पोपट पक्ष्याचे जीवन काल किती वर्षा पर्यंतचा असतो ?

पोपटांचा जीवन काल हा विविध पोपटांच्या प्रजाती मधे वेगवेगळा असतो.छोट्या आकाराच्या पोपटांचा जीवन काल हा १५-२० वर्षे इतका असतो तर ,मध्यम आकाराच्या पोपटांचा जीवन काल हा २५ ते ३० वर्षे इतका असतो आणि मोठ्या आकाराच्या पोपटांचा जीवन काल हा ६० ते ८० वर्षा पर्यंत असतो.

पोपट कशाच्या सहायाने अन्न ग्रहण करतात ?

बऱ्यापैकी पशु पक्षी आपल्या हाताच्या मदतीने अन्न ग्रहण करतात ; परंतु पोपट हा पक्षी आपल्या पायांच्या मदतीने भोजन उचलतो आणि ते भोजन ग्रहण करतो.

पोपटांच्या प्रजाती मध्ये आकाराने सर्वात मोठी प्रजाती कोणती आहे ?

पोपटांच्या ३०० हून अधिक प्रजाती जगभरामध्ये आढळतात .त्यातील आकाराने सर्वात मोठी प्रजाती म्हणजे ” काकापो” प्रजाती.

पोपटाच्या काकापो प्रजातीचे वैशिष्टे काय आहे ?

पोपटाची काकापो प्रजाती ही आकाराने सर्वात मोठी प्रजाती आहे ; परंतु काकापो प्रजातीतील पोपट उडू शकत नाहीत.

पोपटांच्या केआ प्रजातीचे वैशिष्टे काय आहे ?

पोपटांच्या इतर सर्व प्रजाती उष्ण वातावरणामध्ये राहतात ; परंतु केआ प्रजातीचे पोपट हे थंड वातारणात राहतात.

आजच्या लेखामध्ये आपण मनमोहक दिसणाऱ्या आणि माणसांची नकल करणाऱ्या पोपट पक्ष्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment