पन्हाळा किल्ल्याची संपूर्ण माहिती Panhala Fort Information In Marathi

Panhala Fort Information In Marathi आपल्या महाराष्ट्र भूमीत किल्ल्यांचे महत्त्व खूप आहे. किल्ले बांधण्याच्या मुख्य उदेश्य हा होता की ,” किल्ल्यावरून शत्रूपासून किल्ल्या जवळील प्रदेशाचे रक्षण करता येईल “.आपल्या महाराष्ट्र राज्यात तीनशे हून अधिक किल्ले आहेत आणि त्या सर्व किल्ल्यांचे विशेष महत्व आहे . आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका एतहासिक किल्ल्या विषयी म्हणजे ” पन्हाळा किल्ल्या” विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे पन्हाळा किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Panhala Fort Information In Marathi

पन्हाळा किल्ल्याची संपूर्ण माहिती Panhala Fort Information In Marathi

नाव पन्हाळा किल्ला
उंची४०४० फूट
जिल्हाकोल्हापूर
राज्यमहाराष्ट्र
जवळील पर्यटन स्थळे महालक्ष्मी मंदिर ,ज्योतिबा मंदिर ,राधानगरी अभयारण्य,इत्यादी.

पन्हाळा किल्ला ( Panhala fort in Marathi)

पन्हाळा किल्ला हा महाराष्ट्र राज्यात स्थित असून तो कोल्हापूर शहरापासून २० किमी च्या अंतरावर आहे.पन्हाळा किल्ला हा भारतातील प्राचीन किल्ल्यांपैकी एक किल्ला आहे.या किल्ल्याने परकीय आक्रमणापासून राजा भोग ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या साम्राज्याचे रक्षण केले आहे.

पन्हाळा किल्ल्याचा इतिहास (History of Panhala fort in Marathi)

पन्हाळा किल्ला हा दख्खन पठारावर स्थित एक किल्ला आहे. पन्हाळा किल्ल्याची निर्मिती शीलाहरा राजवंश यांच्या काळामध्ये करण्यात आली होती. पन्हाळा किल्ल्याची निर्मिती द्वितीय राजा भोग आणि त्यांच्या सहकाऱ्यांद्वारे करण्यात आली होती. इसवी सन पूर्व ११७८ ते इसवी सन पूर्व १२०९ या कालावधीत या किल्ल्याची बांधणी करण्यात आली होती.

पुढे विजापूर च्या आदिलशहाने हा किल्ला जिंकला. छत्रपती शिवाजी महाराज यांनी अफजलखानचा वध प्रतापगड येथे केल्यानंतर ,त्यांनी प्रतापगड ते पन्हाळा किल्ल्यापर्यंत स्थित असणारे सर्व किल्ले जिंकले ,यात शेवटी त्यांनी पन्हाळा किल्ला जिंकला आणि काही दिवस त्यांनी तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला.

अफजलखानाच्या मृत्यूनंतर आदिलशहाने पन्हाळा किल्ला परत जिंकण्यासाठी सिद्दी जोहर कडे पन्हाळा किल्ल्याला वेढा देण्याची मोहीम सोपवली. पन्हाळा किल्ल्याचा हा  वेढा खूप महिने चालू राहिला ,छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे सहकारी वर किल्ल्यावर होते .महिण्यांमागुन महिने जात होते ! किल्ल्यावर अन्नाची टंचाई जाणवत होती , सिद्दी जोहर पन्हाळा किल्ल्याचा वेढा मागे घ्यायला तयार नव्हता.

छत्रपती शिवाजी महाराज यांनी अक्कल लावून तिथून निसटून जाण्याची योजना केली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या वकिलांद्वारे सिद्दी जोहर कडे निरोप पाठवला की ,” आम्ही माघार घ्यायला तयार आहोत ” .छत्रपती शिवाजी महाराज हे माघार घ्यायला तयार आहेत ,हे ऐकून वेढ्यातील शत्रूचे सैनिक ढिले पडले. या संधीचा फायदा छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतला. त्यांनी आपल्या काही मावळ्यांसह पन्हाळा किल्ला सोडला आणि ते विशाळगाकडे जाऊ लागले.

छत्रपती शिवाजी महाराज हे वेढ्यातून निसटले आहेत याची खबर सिद्दी जोहर ला लागली आणि त्याने देखील आपले सैन्य छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मागावर पाठवले. छत्रपती शिवाजी महाराज आणि काही मावळ्यांना घेऊन विशाळगडाकडे जावे आणि  पांढरपाणी जवळील खिंडीत बाजीप्रभू देशपांडे यांनी काही मावळ्यांना घेऊन सिद्दी जोहर च्या सैनिकांविरुद्ध लढण्याचा निर्णय घेण्यात आला.

जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून त्यांनी तोफ वाजवली नाही ,तोपर्यंत बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांनी खिंडीत सिद्दी जोहर च्या सैनिकांशी युद्ध केले.बाजीप्रभू देशपांडे आणि मावळ्यांच्या पराक्रमाने पावन झालेल्या खिंडीला पुढे ” पावनखिंड” असे नाव देण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज हे त्या वेढ्यातून  बाहेर पडले आणि ते विशाळगडावर सुखरूप पोहोचले ; परंतु शिवा काशीद ,बाजीप्रभू देशपांडे व इतर काही मावळ्यांना या लढाईत आपला जीव गमवावा लागला.

पन्हाळा किल्ल्याच्या आसपास असणारी पर्यटन स्थळे ( tourist places near Panhala fort in Marathi)

पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जवळ स्थित आहे ,पन्हाळा किल्ल्याच्या आसपास असणारी काही पर्यटन स्थळे खालीलप्रमाणे :

१) ज्योतिबा मंदिर – दख्खनचा राजा म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या ज्योतिबा चे मंदिर पन्हाळा किल्ल्यापासून काही अंतरावर स्थित आहे.

२) महालक्ष्मी मंदिर – पन्हाळा किल्ल्या पासून काही अंतरावर कोल्हापूर शहरा मध्ये महालक्ष्मी चे मंदिर आहे .

३) राधानगरी अभयारण्य – राधानगरी अभयारण्य हे महाराष्ट्र राज्यातील पहिले अभयारण्य आहे आणि सुरवातीला या अभयारण्याचे नाव ” दाजीपूर ” अभयारण्य असे होते.या अभयारण्यामध्ये ३५ प्राण्यांच्या प्रजाती आणि २३५ पक्ष्यांच्या प्रजाती आहेत.

पन्हाळा किल्ल्या विषयी असणाऱ्या काही रोचक गोष्टी ( interesting facts about Panhala fort in Marathi)

१) पन्हाळा शब्दाचा अर्थ ” सापांचे घर ” असा होतो.

२) पन्हाळा किल्ला महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर शहरापासून २० किमी च्या अंतरावर आहे.

३) इसवी सन पूर्व ११७८ मध्ये या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

४) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये पन्हाळा किल्ल्यावर १५,००० घोडे तर २०,००० सैन्य तैनात होते.

५) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या दुसऱ्या मुलाच्या म्हणजे छत्रपती राजाराम महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीने आपल्या १२ वर्षाच्या लहान मुलाला पन्हाळा किल्ल्यावर गादीवर बसवले होते.

६) सातारा गादीचे छत्रपती शाहू महाराज आणि राणी ताराबाई यांच्यात युद्ध झाले होते ,त्यात छत्रपती शाहू महाराज यांचा विजय झाला होता ,तेव्हा त्यांनी पन्हाळा किल्ला आपल्या ताब्यात घेतला .पुढे जाऊन महाराणी ताराबाई यांनी पन्हाळा किल्ला परत जिंकला आणि या किल्ल्याला कोल्हापूर प्रांताची राजधानी बनवले.

पन्हाळा किल्ला चालू आणि बंद होण्याची वेळ ( opening and closing time of  Panhala fort in Marathi)

आपण आठवड्यातील कोणत्याही दिवशी आपल्या कुटुंबासोबत किंवा मित्रांसोबत पन्हाळा किल्ल्याला भेट देऊन शकतो. पन्हाळा किल्ला हा आठवड्याच्या सातही दिवस पर्यटकांसाठी उघडा असतो.

पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी उत्तम महिने ( Best months to visit Panhala fort in Marathi)

पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी ऑक्टोंबर महिन्यापासून मार्च महिन्या पर्यंतचे महिने उत्तम मानले जातात ,तसे तर तुम्ही वर्षाच्या कोणत्याही महिन्यात पन्हाळा किल्ल्याला भेट देऊ शकता .

FAQ

पन्हाळा किल्ला हो कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ?

पन्हाळा किल्ला हा कोल्हापूर जिल्ह्यात स्थित आहे.

कोल्हापूर शहरा पासून पन्हाळा किल्ला किती अंतरावर आहे ?

कोल्हापूर शहरापासून पन्हाळा किल्ला हा २० किमी च्या अंतरावर आहे.

पन्हाळा किल्ल्याची उंची किती आहे ?

पन्हाळा किल्ल्याची उंची ४०४० फूट इतकी आहे.

पन्हाळा किल्ल्याची निर्मिती कोणी केली ?

पन्हाळा किल्ल्याची निर्मिती शीला हरा राजवंश मध्ये राजा भोग आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी इसवी सन पूर्व ११७८ ते इसवी सन पूर्व १२०९ च्या दरम्यान केली होती.

सिद्धी जोहर ने कोणत्या किल्ल्याला वेढा दिला होता ?

सिद्धी जोहर ने ” पन्हाळा किल्ल्याला ” वेढा दिला होता ,हा वेढा चार महिने चालला होता .चार महिन्यांनंतर पावसाळ्यात जुलै महिन्यात शकल लढवून छत्रपती शिवाजी महाराज हे पन्हाळा वेढ्यातून सुखरूप विशाळगडाकडे गेले होते.

पन्हाळा किल्ल्या जवळ कोणकोणती पर्यटन स्थळे आहेत ?

पन्हाळा किल्ल्या जवळ ” कोल्हापूर चे महालक्ष्मी मंदिर ,ज्योतिबा मंदिर ,राधानगरी अभयारण्य ,इत्यादी पर्यटन स्थळे आहेत.

पन्हाळा किल्ल्याचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कोणते आहे ?

पन्हाळा किल्ल्याच्या सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे ” शाहू महाराज रेल्वे स्टेशन ” हे आहे.

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील एका एतहासिक किल्ल्या विषयी म्हणजे पन्हाळा किल्ल्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.तसेच आजच्या लेखामधून आपण पन्हाळा किल्ल्याचा इतिहास ,पन्हाळा किल्ल्या विषयी असणाऱ्या काही रोचक गोष्टी ,पन्हाळा किल्ल्याला जवळ असणारी पर्यटन स्थळे ,पन्हाळा किल्ला पाहण्यासाठी असणारे उत्तम महिने आणि पन्हाळा किल्ल्या विषयी विचारले जाणारे काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment