पंडिता रमाबाई यांची संपूर्ण माहिती Pandita Ramabai Information In Marathi

Pandita Ramabai Information In Marathi आपल्या भारत देशामध्ये खूप समाजसुधारक होऊन गेले ,आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका महिला समाजसुधारकाच्या जीवना विषयी म्हणजे पंडिता रमाबाई यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे पंडिता रमाबाई यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Pandita Ramabai Information In Marathi

पंडिता रमाबाई यांची संपूर्ण माहिती Pandita Ramabai Information In Marathi

नाव पंडिता रमाबाई
जन्म २३ एप्रिल १८५८
जन्म स्थान मैसूर
वडिलांचे नाव अनंत शास्त्री
संस्था आर्य महिला समाज
मृत्यू ५ एप्रिल १९२२

पंडिता रमाबाई यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब ( Birth of Pandita Ramabai and his family in Marathi)

पंडिता रमाबाई यांचा जन्म मैसूर मध्ये २३ एप्रिल १८५८ मध्ये झाला होता. पंडिता रमाबाई यांचे पूर्ण नाव ” रमाबाई मेधावी” असे होते. पंडिता रमाबाई यांच्या वडिलांचे नाव ” अनंत शास्त्री” होते आणि ते एक संस्कृत भाषेचे विद्वान होते. पंडिता रमाबाई यांना एक भाऊ आणि एक बहिण होती.

पंडिता रमाबाई यांचे वडील आपल्या बायकोला आणि आपल्या तीन मुलांना घेऊन गावोगावी पौराणिक कथा सांगण्यासाठी जात असत आणि यातूनच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होत असे.१८७६ मध्ये पंडिता रमाबाई यांच्या आईचे आणि त्यांच्या वडिलांचे निधन झाले.आई वडिलांच्या निधनानंतर तीन भावंडे अनाथ झाली.

पंडिता रमाबाई ( Pandita Ramabai in Marathi)

पंडिता रमाबाई या लहानपणापासूनच खूप हुशार होत्या.त्यांचे वडील संस्कृत भाषेतील विद्वान असल्यामुळे त्यांनी आपल्या मुलीला लहान वयातच संस्कृत भाषा शिकवली होती.पंडिता रमाबाई यांनी कमी वयातच संस्कृत भाषेत महारत प्राप्त केली होती. संस्कृत भाषे व्यतिरिक्त पंडिता रमाबाई यांना मराठी ,कन्नड आणि हिंदी यांसारख्या भाषांचे ज्ञान होते.

पंडिता रमाबाई यांना वयाच्या १२ व्या वर्षी २० हजार पेक्षा जास्त संस्कृत शब्द माहीत होते. पंडिता रमाबाई यांनी कमी वयातच संस्कृत भाषेत इतकी महारत प्राप्त केली होती की ,त्यांना लोकांकडून पंडिता आणि सरस्वती ही पदवी मिळाली होती. तेव्हापासूनच पंडिता रमाबाई या “पंडिता” नावाने ओळखू लागल्या.

पंडिता रमाबाई यांचे धर्म परिवर्तन (Religion Conversion of Pandita Ramabai in Marathi)

पंडिता रमाबाई या समाजसेविके व्यतिरिक्त एक प्रसिद्ध लेखिका देखील होत्या. त्यांना लहापणापासूनच लिखाणाची आवड होती. रमाबाई यांनी पुढे जाऊन आपले धर्म परिवर्तन केले आणि त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यांनी ख्रिश्चन धर्मातील पवित्र ग्रंथ असणाऱ्या बायबल ग्रंथांचा अनुवाद मराठी भाषेत केला.

पंडिता रमाबाई यांचे कार्य ( Work of Pandita Ramabai in Marathi)

आपल्या पतीच्या निधनानंतर वयाच्या २२ व्या वर्षी पंडिता रमाबाई कोलकता येथे गेल्या . इथे त्यांनी बाल विवाह आणि विधवा महिलांवर होणाऱ्या अन्याया विरुद्ध लढण्यासाठी आवाज उठला. इथे कोलकता मध्ये त्यांनी समाज प्रबोधनासाठी भाषणे दिली. पंडिता रमाबाई यांच्या भाषणा द्वारे पंडिता रमाबाई आपले विचार कोलकता मधील लोकांपर्यत पोहोचवत होत्या.

इथे त्यांनी अच्युत समाजातील एका वकीलसोबत विवाह केला.पंडिता रमाबाई यांनी अच्युत समाजातील पुरुषासोबत विवाह केल्यामुळे त्याकाळी पंडिता रमाबाई यांना समाजातील काही लोकांचा विरोध सहन करावा लागला. दीड वर्षानंतर पंडिता रमाबाई यांच्या  पतीचे निधन झाले.

पतीच्या निधनानंतर पंडिता रमाबाई या पुणे येथे आल्या आणि येथे त्यांनी ” आर्य महिला समाज” संस्थेची स्थापना केली. “समाजात विधवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणे आणि समाजात वाढत चाललेल्या बाल विवाहाचे प्रमाण कमी करणे “,हे या संस्थेचे प्रमुख उद्देश होते.

पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांसाठी केलेली कार्ये ( Pandita Ramabai works for widows in Marathi)

पंडिता रमाबाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य विधवा महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी खर्च केले. पंडिता रमाबाई यांनी दोन वर्ष अमेरिकेत संस्कृत विषयाच्या प्रोफेसर होत्या .इथेच त्यांनी विधवा महिलांसाठी आश्रम बनवण्यासाठी प्रयत्न केले.त्यांच्या अथक प्रयत्नानंतर ” रमाबाई असोसिएशन” ची स्थापना करण्यात आली. भारतातील विधवा महिलांचा पुढचे १० वर्ष संपूर्ण खर्च उचलणे हे या संस्थेचे प्रमुख ध्येय होते .

पंडिता रमाबाई या जेव्हा भारतात आल्या ,तेव्हा त्यांनी विधवा महिलांसाठी एका आश्रमाची निर्मिती केली आणि या आश्रमाला त्यांनी ” शारदा सदन” असे नाव दिले . यानंतर त्यांनी महिलांसाठी दुसऱ्या आश्रमाची निर्मिती केली आणि या आश्रमाला त्यांनी ” कृपा सदन” असे नाव दिले.

पंडिता रमाबाई यांचा सन्मान ( Honoring of Pandita Ramabai in Marathi)

पंडिता रमाबाई यांना संस्कृत भाषेतील भरपूर ज्ञान होते ,त्यांच्या या ज्ञानवर प्रभावित होऊन १८८७ मधे कोलकता येथील विश्व विद्यालयात त्यांना ” सरस्वती” ही पदवी देण्यात आली. १९१९ मध्ये ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाई यांच्या कार्याचा सन्मान म्हणून त्यांना ” कैसर – ए – हिंद ” ही पदवी दिली.

पंडित रमाबाई यांच्या कार्याचा सन्मान म्हणून मुंबईत शहरातील एका रोड ला पंडित रमाबाई यांचे नाव देण्यात आले आहे. तसेच शुक्र ग्रहावर असणाऱ्या एका क्रेटर ला पंडिता रमाबाई यांचे नाव देण्यात आले आहे.

पंडिता रमाबाई यांचे निधन (Death of Pandita Ramabai in Marathi)

पंडिता रमाबाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी आणि महिलांच्या विकासासाठी घालवले.त्यांचे निधन ५ एप्रिल १९२२ मध्ये झाले.

FAQ

पंडिता रमाबाई यांचा जन्म केव्हा झाला ?

पंडिता रमाबाई यांचा जन्म २३ एप्रिल १८५८ मध्ये मैसूर येथे झाला.

पंडिता रमाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

पंडिता रमाबाई यांच्या वडिलांचे नाव ” अनंत शास्त्री” असे होते.

पंडिता रमाबाई यांचे शिक्षण कुठे झाले ?

पंडिता रमाबाई यांचे शिक्षण ब्रिटन येथे झाले आणि पुढे जाऊन अमेरिकेत संस्कृत भाषेच्या प्रोफेसर म्हणून पंडिता रमाबाई यांनी काम केले.

पंडिता रमाबाई यांनी किती भावंडे होती ?

पंडिता रमाबाई यांना एक भाऊ आणि एक बहिण होती.

पंडिता रमाबाई यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली ?

पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांसाठी “आर्य महिला समाज” संस्थेची स्थापना केली.

पंडिता रमाबाई यांनी कोणते कार्य केले ?

पंडिता रमाबाई यांनी आपले संपूर्ण आयुष्य विधवा महिलां विरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी खर्च केले.

पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांसाठी कोणत्या आश्रमाची निर्मिती केली होती ?

पंडिता रमाबाई यांनी विधवा महिलांसाठी ” शारदा सदन ” आणि ” कृपा सदन ” या आश्रमाची निर्मिती केली होती.

पंडिता रमाबाई यांनी कोणता धर्म स्वीकारला होता ?

पंडिता रमाबाई यांनी ख्रिचन धर्म स्वीकारला होता.

ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाई यांना कोणती पदवी दिली होती ?

ब्रिटिश सरकारने पंडिता रमाबाई यांनी “कैसर – ए – हिंद ” ही पदवी देण्यात आली होती.

कोलकता मधील विश्व विद्यालयात पंडिता रमाबाई यांना कोणती पदवी देण्यात आली होती ?

कोलकता मधील विश्व विद्यालयात पंडिता रमाबाई यांना त्यांच्या संस्कृत भाषेतील कार्यासाठी ” सरस्वती ” ही पदवी देण्यात आली होती.

पंडिता रमाबाई यांचे निधन केव्हा झाले ?

पंडिता रमाबाई या आयुष्यभर विधवा महिलांसाठी लढल्या आणि त्यांनी विधवा महिलांसाठी आश्रमाची निर्मिती केली होती. पंडिता रमाबाई यांचे निधन ५ एप्रिल १९२२ मध्ये झाले.

आजच्या लेखामध्ये आपण थोर समाजसुधारक आणि महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या पंडिता रमाबाई यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.आजच्या लेखामधून आपण पंडिता रमाबाई यांचा जन्म , त्यांनी बाल विवाह रोखण्यासाठी आणि विधवा महिलांसाठी केलेली कार्ये ,त्यांच्या कार्यासाठी त्यांचा झालेला सन्मान ,पंडिता रमाबाई यांच्या विषयी विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे, याची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment