पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi असे खूप कमी पंतप्रधान असतात ,ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावलेली असते .आजच्या लेखामध्ये आपण स्वांतत्र्य लढ्यामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या आणि पुढे जाऊन देशाचे पंतप्रधान झालेल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

पंडित जवाहरलाल नेहरू यांची संपूर्ण माहिती Pandit Jawaharlal Nehru Information In Marathi

नाव पंडित जवाहरलाल नेहरू
जन्म १४ नोव्हेंबर १८८९
आईचे नाव स्वरूप राणी
वडिलांचे नाव मोतीलाल नेहरू
पत्नीचे नाव कमला नेहरू
मुलीचे नाव इंदिरा गांधी
पंतप्रधान कार्यकाळ १९४७-१९६४
मृत्यू २७ मे १९६४

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of Pandit Jawaharlal Nehru and his family in Marathi)

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये प्रयागराज येथील आनंद भवन येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ” मोतीलाल नेहरू” होते ,तर त्यांच्या आईचे नाव “स्वरूप राणी” होते. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे वडील मोतीलाल नेहरू हे वकिलीची नोकरी करत होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे शिक्षण ( Education of Pandit Jawaharlal Nehru in Marathi)

१९०५ मध्ये मोतीलाल नेहरू आपल्या कुटुंबासोबत इंग्लंड येथे राहायला गेले आणि जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पंधरा वर्षाचे होते ,तेव्हा मोतीलाल नेहरू यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांचे एडमिशन इंग्लंड मधील हैरो शाळेत केले. शाळेत असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लॅटीन भाषा शिकली.

हैरो शाळेतील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ट्रीनिटी कॉलेज ,केंब्रिज मध्ये एडमिशन घेतले. कॉलेज मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांचा संपूर्ण वेळ अभ्यासामध्ये ,खेळांच्या स्पर्धेत भाग घेण्यामध्ये जात होता.

ते जेव्हा भारतात चाललेल्या बंगाल विभाजन ,स्वातंत्र्य लढ्या विषयीच्या गोष्टी ऐकत ,तेव्हा त्यांचे मन चिंतित होत असे. केंब्रिज कॉलेज मध्ये भारतीय विद्यार्थ्यांद्वारे आयोजित केलेल्या चर्चेत पंडित जवाहरलाल नेहरू सहभाग घेत असत.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे राजकीय जीवन ( Political Life of Pandit Jawaharlal Nehru in Marathi)

१९१२ मध्ये आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू भारतात परत आले. इथे त्यांनी सुरवातीला प्रयागराज येथे वकिलीची नोकरी केली.नपुढे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरू हे राष्ट्रीय काँग्रेस पक्षात शामिल झाले.

त्याकाळी दक्षिण आफ्रिके मध्ये चाललेल्या वर्ण भेदाच्या विरोधात महात्मा गांधी हे आंदोलन करत होते. त्यांचावर या आंदोलनाचा आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव पडला होता.

पुढे जाऊन पंडित जवाहरलाल नेहरू यांनी वकिलीची नोकरी सोडली आणि त्यांनी पुढच्या जीवनातील संपूर्ण वेळ काँग्रेस पक्षासाठी आणि देशासाठी खर्च करण्याचे ठरवले. १९२० मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू हे प्रयागराज जिल्हा काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष झाले.

१९२८ मधे लखनौ येथे झालेल्या सायमन कमिशन च्या विरोधात झालेल्या लढ्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू जखमी झाले होते ,तसे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ” मिठाच्या सत्याग्रहा” वेळी पंडित जवाहरलाल नेहरू यांना ६ महिन्यांची जेल ची शिक्षा झाली होती. स्वातंत्र्य लढ्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांना त्यांच्या संपूर्ण जीवनात ९ वेळा जेल ची शिक्षा भोगावी लागली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपले आत्मचरित्र हे १९३५ मध्ये अलमोडा जेल मध्येच लिहिले होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे साहित्य (Literature of Pandit Jawaharlal Nehru in Marathi)

राजकीय क्षेत्रा व्यतिरिक्त साहित्य क्षेत्रात देखील पंडित जवाहरलाल नेहरू यांची आवड होती. राजकीय नेत्यांमधील लोकमान्य टिळक आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना साहित्याच्या आवड होती. त्यांना लहापणापासूनच ऐतहासिक पुस्तके वाचण्याची आवड होती ,त्यांनी बरीच पुस्तके वाचली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या साहित्यातून आपल्याला इतिहासाचे ज्ञान असलेला आणि भावनिक लेखक दिसतो. पंडित जवाहरलाल नेहरू आपल्या मुलीला इंदिरा गांधी यांना पत्रे देखील लिहीत असत.

देशाचे पहिले पंतप्रधान ( First prime minister of country in Marathi)

भारत स्वांतत्र्य होण्यापूर्वी पंतप्रधान पदासाठी काँग्रेस मध्ये एक मत आकणी झाली होती आणि या मत आकणी मध्ये ज्याला जास्त मते पडतील ,त्याला देशाचे पहिले पंतप्रधान करायचे असे ठरवण्यात आले होते. या मत आकणी मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांना सर्वाधिक मते पडली न्हवती ,तर या मत आकणी मध्ये सरदार वल्लभभाई पटेल आणि आचार्य कृपलानी यांना सर्वाधिक मते पडली होती ,परंतु महात्मा गांधी यांनी सरदार वल्लभभाई पटेल आणि आचार्य कृपलानी यांना आपली नावे मागे घ्यायला लावली आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले.

त्याकाळी ब्रिटिश सत्तेतून नुकत्याच मुक्त झालेल्या भारत देशाचे नेतृत्व करणे खूप अवघड गोष्ट होती ; परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ही अवघड गोष्ट देखील सोपी करून दाखवली. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नेतृत्वात देशातील कृषी क्षेत्र हळू हळू विकसित होई लागले होते ,पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपल्या काळात देशातील विदेश निती विकसित करण्यासाठी प्रयत्न केले.

देशाचे पंतप्रधान झाल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भरपूर विकासाची कामे केली ; परंतु पंडित जवाहरलाल नेहरू यांना भारत – पाकिस्तान आणि भारत – चीन मध्ये मैत्रीचे संबंध राखता आले नाहीत. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना चीनकडे मैत्रीचा हात पुढे केला होता ,परंतु १९६२ मध्ये चायना ने भारतावर आक्रमण केले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी १७ वर्षे पंतप्रधान पदावर राहून देशाची सेवा केली.

१४ नोव्हेंबर – बाल दिवस ( 14 November – National children’s day)

पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांची आवड होती.जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले ,तेव्हा त्यांच्या स्मरणात त्यांच्या जन्मदिनी म्हणजे १४ नोव्हेंबर ला ” बाल दिवस ” साजरा करण्याचे ठरविले ,तेव्हापासून दरवर्षी भारतामधे १४ नोव्हेंबर ला बाल दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो.या दिवशी शाळेतील लहान मुलांच्या विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन ( Death of Pandit Jawaharlal Nehru in Marathi)

पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन २७ मे १९६४ मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने झाले.

FAQ

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म केव्हा झाला होता ?

पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म १४ नोव्हेंबर १८८९ मध्ये झाला होता.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव काय होते ?

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या आईचे नाव ” स्वरूप राणी” असे होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या वडिलांचे नाव ” मोतीलाल नेहरू” असे होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नीचे नाव ” कमला नेहरू ” होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मुलीचे नाव काय होते ?

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मुलीचे नाव ” इंदिरा गांधी ” होते.

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?

स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान ” पंडित जवाहरलाल नेहरू” हे होते.

पंडित जवाहरलाल नेहरू हे किती वर्षे देशाचे पंतप्रधान होते ?

पंडित जवाहरलाल नेहरू हे १७ वर्षे देशाचे पंतप्रधान होते.

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन केव्हा झाले ?

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निधन २७ मे १९६४ मध्ये हृदयविकाराच्या झ्टक्याने झाले.

आजच्या लेखामध्ये आपण देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जीवना विषयी आणि त्यांनी केलेल्या कार्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment