पी.वी. सिंधू यांची संपूर्ण माहिती P.V. Sindhu Information In Marathi

P.V. Sindhu Information In Marathi आपल्या भारत देशातील पुरुष खेळाडू जगभरामध्ये होत असलेल्या विविध स्पर्धेमध्ये देशाचे नाव रोशन करत आहेत. पुरुष खेळाडूंसोबत महिला खेळाडू देखील विविध खेळांमध्ये देशाचे नाव रोशन करत आहेत.

P.V. Sindhu Information In Marathi

पी.वी. सिंधू यांची संपूर्ण माहिती P.V. Sindhu Information In Marathi

आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका थोर महिला खेळाडूच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे टोकियो येथे झालेल्या २०२१ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून कांस्य पदक जिंकणाऱ्या “पी.वी.सिंधू” यांच्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

नाव पी.वी.सिंधू
पूर्ण नाव पुसारला वेंकट सिंधू
जन्म ५ जुलै १९९५
आईचे नाव पी.विजया
वडिलांचे नाव पी.वी.रमणा
शिक्षण एमबीए
क्षेत्र बॅडमिंटन खेळाडू
पुरस्कार अर्जुन पुरस्कार,राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार,पद्मश्री पुरस्कार,पद्म विभूषण पुरस्कार

पी.वी.सिंधू यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of P.V. Sindhu and his family in Marathi)

पी.वी.सिंधू यांचा जन्म ५ जुलै १९९५ मध्ये हैद्राबाद येथे झाला होता. पी.वी.सिंधू यांचे खरे नाव “पुसारला वेंकट सिंधू” असे होते. पी.वी.सिंधू यांच्या आईचे नाव “पी. विजया” असे होते ,तर त्यांच्या वडिलांचे नाव “पी.वी. रमणा” असे होते. पी.वी.सिंधू यांचे वडील हे देखील व्हॉलीबॉल खेळातील महान खेळाडू होते.

१९८६ मध्ये झालेल्या एशियन खेळामध्ये पी.वी.सिंधू यांच्या वडिलांनी म्हणजे पी.वी.रमणा यांनी व्हॉलीबॉल खेळात भारताला कांस्य पदक जिंकून दिले होते.

पी.वी.सिंधू यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद मधील ऑक्सीलियम शाळेत झाले आणि पुढे जाऊन पी.वी.सिंधू यांनी हैद्राबाद मधील सेंट एन कॉलेज मध्ये एमबीए डिग्री साठी एडमिशन घेतले आणि त्यांनी या कॉलेज मधून एमबीए चे शिक्षण पूर्ण केले.

पी.वी.सिंधू यांचे सुरवातीचे जीवन (Early life of P.V.Sindhu in Marathi)

आपले वडील व्हॉलीबॉल खेळ खेळत असून देखील पी.वी.सिंधू यांना व्हॉलीबॉल खेळण्यामध्ये आवड न्हवती. पी.वी.सिंधू यांना लहानपणापासूनच बॅडमिंटन खेळायला आवडत होते ,त्या जेव्हा ८ वर्षाच्या होत्या ,तेव्हापासून त्या बॅडमिंटन खेळ खेळत आहेत. २००१ मध्ये इंग्लंड देशात झालेल्या ओपन बॅडमिंटन स्पर्धेमध्ये भारताकडून खेळणारे पुलेला गोपीचंद हे विजेते झाले होते. या सामन्यापासून पी.वी.सिंधू यांनी बॅडमिंटन खेळामध्ये आपले करियर करायचे असे ठरवले.

पी.वी.सिंधू यांनी बॅडमिंटन खेळामध्ये महारत प्राप्त करण्यासाठी ट्रेनिंग सेंटर मध्ये एडमिशन घ्यायचे ठरवले. सूरवातीला त्यांनी हैद्राबाद मध्ये स्थित असलेल्या “इंडीयन रेल्वे इन्स्टिट्युट ऑफ सिग्नल इंजिनियरिंग अँड टेली कम्युनिकेशन” सेंटर मध्ये एडमिशन घेतले. या ट्रेनिंग सेंटर मध्ये पी.वी.सिंधू यांनी बॅडमिंटन चा सराव केला ,तसेच बॅडमिंटन खेळा विषयी काही डावपेच त्यांनी इथे शिकले.

पी.वी.सिंधू यांनी बॅडमिंटन खेळण्याची सुरवात ही गोपीचंद यांच्या ओपन बॅडमिंटन स्पर्धा जिंकल्यानंतर केली होती. सुरवातीला त्यांचे बॅडमिंटन खेळातील आदर्श हे “पुलेला गोपीचंद” होते. पुढे जाऊन पी.वी.सिंधू यांनी आपल्या आदर्षांच्या म्हणजे गोपीचंद यांच्या “गोपीचंद अकॅडमी” मध्ये एडमिशन घेतले.

पी.वी.सिंधू यांचे बॅडमिंटन करियर (Badminton career of P.V.Sindhu in Marathi)

पी.वी.सिंधू यांनी वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळ खेळायला सुरवात केली होती आणि त्यांनी १५ वर्षांपासून देशासाठी बॅडमिंटन खेळामध्ये मेडल्स जिंकण्यास सुरवात केली.

वर्ष २००९ मध्ये पी.वी.सिंधू यांनी सब ज्युनियर एशियन स्पर्धेमध्ये बॅडमिंटन खेळात भारताकडून खेळताना कांस्य पदक जिंकले होते. हे त्यांच्या बॅडमिंटन करियर मधील पाहिले मेडल होते.

वर्ष २०१० मध्ये पी.वी.सिंधू यांनी “इंटरनेशनल बैडमिंटन चैलेंज” स्पर्धेमध्ये कांस्य पदक जिंकले होते. २०११ वर्ष हे पी.वी.सिंधू यांच्या बॅडमिंटन करियर मधले सुवर्ण वर्ष होते. यावर्षी पी.वी.सिंधू यांनी “इंडोनेशिया बॅडमिंटन चॅलेंज” स्पर्धा जिंकली होती. तसेच यावर्षी पी.वी.सिंधू यांनी “मालदीव बॅडमिंटन चॅलेंज” स्पर्धा देखील जिंकली होती.

२०१२ मध्ये झालेल्या ज्युनिअर एशियन बॅडमिंटन स्पर्धा पी.वी.सिंधू यांनी जिंकली होती. नंतर दुखापती मुळे भारतामधील श्रीनगर येथे आयोजित केलेली सिनियर राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धा पी.वी.सिंधू यांना खेळता आली नाही.

आपल्या जबरदस्त खेळामुळे वर्ष २०१३ मध्ये पी.वी.सिंधू या बॅडमिंटन खेळामध्ये खेळाडू रँकिंग मध्ये १५ व्या रँक वर आल्या होत्या. पी.वी.सिंधू यांनी बॅडमिंटन खेळामध्ये देशाचे नाव रोशन केल्यामुळे त्यांना २०१३ मध्ये अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

२०१४ मध्ये झालेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये सलग दोन मेडल जिंकून पी.वी.सिंधू यांनी विक्रम केला होता. याआधी भारताकडून या स्पर्धेमध्ये कोणीही सलग दोन मेडल जिंकले न्हवते ,या स्पर्धेमध्ये भारताकडून सलग दोन मेडल जिंकणाऱ्या पी.वी.सिंधू या पहिल्या बॅडमिंटन खेळाडू होत्या.

२०१७ मध्ये दिल्ली येथे पी.वी.सिंधू यांनी त्याकाळच्या एक नंबरच्या बॅडमिंटन खेळाडू कैरोलीना यांचा पराभव केला होता. २०२० मध्ये पी.वी.सिंधू यांना “बिबिसी इंडीयन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इअर” चा किताब मिळाला होता. २०२१ मध्ये टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पी.वी.सिंधू यांनी कांस्य पदक जिंकले होते.

पी.वी.सिंधू यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार (Awards received by P.V.Sindhu in Marathi)

पी.वी.सिंधू या भारत देशातील थोर बॅडमिंटन खेळाडू आहेत आणि त्यांनी बॅडमिंटन खेळामध्ये भारत देशासाठी भरपूर मेडल्स जिंकले आहेत. २०१५ मध्ये पी.वी.सिंधू यांना भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

तसेच २०१६ मध्ये पी.वी.सिंधू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले होते. तसेच जानेवारी २०२० मध्ये पी.वी. सिंधू यांना भारत सरकारकडून पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

FAQ

पी.वी.सिंधू यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला होता ?

पी.वी.सिंधू यांचा जन्म ५ जुलै १९९५ मध्ये हैद्राबाद येथे झाला.

पी.वी.सिंधू यांचे पूर्ण नाव काय होते ?

पी.वी.सिंधू यांचे पूर्ण नाव “पुसारला वेंकट सिंधू” असे होते.

पी.वी.सिंधू यांच्या आईचे नाव काय आहे ?

पी.वी.सिंधू यांच्या आईचे नाव “पी.विजया” असे होते.

पी.वी.सिंधू यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

पी.वी.सिंधू यांच्या वडिलांचे नाव “पी.वी.रमणा” असे होते.

पी.वी.सिंधू यांचे शिक्षण कोठे झाले होते ?

पी.वी.सिंधू यांचे प्राथमिक शिक्षण हैद्राबाद मधील ऑक्सीलियम शाळेमध्ये झाले होते. त्यांनी पुढे एमबीए कोर्स साठी सेंट एन कॉलेज मधे एडमिशन घेतले होते.

पी.वी.सिंधू यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकले होते ?

पी.वी.सिंधू यांना २०२१ मधे टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताकडून खेळताना कांस्य पदक जिंकले होते.

पी.वी.सिंधू यांना बीबीसी कडून कोणता किताब देण्यात आला होता ?

२०२० मद्ये पी.वी.सिंधू यांना बीबीसी कडून “बीबीसी इंडीयन स्पोर्ट्स वूमन ऑफ द इअर” चा किताब देण्यात आला होता.

पी.वी.सिंधू यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

२०१५ मध्ये पी.वी.सिंधू यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला होता. त्याच्याच पुढच्या वर्षी पी.वी.सिंधू यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. २०२० मध्ये पी.वी.सिंधू यांना पद्म विभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

आजच्या लेखामध्ये आपण एका थोर बॅडमिंटन खेळाडू विषयी म्हणजे पी.वी.सिंधू यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment