ऑलिम्पिक खेळाची संपूर्ण माहिती Olympic Games Information In Marathi

Olympic Games Information In Marathi जो कोणीही शाळेमध्ये किंवा कॉलेज मध्ये कोणत्याही खेळाचा सराव करत असेल ,तर त्याला विचारले की ,“तुमचे या सर्वोत्तम खेळातील ध्येय कोणते आहे ?” ,तर बऱ्यापैकी सर्वांचे उत्तर हे “मला देशासाठी ऑलिम्पिक स्पर्धेचे गोल्ड मेडल आणायचे आहे” असते.

Olympic Games Information In Marathi

ऑलिम्पिक खेळाची संपूर्ण माहिती Olympic Games Information In Marathi

प्रत्येक खेळाडूचे स्वप्न हे ऑलिम्पिक स्पर्धा खेळणे आणि ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी मेडल जिंकून आणणे असते. आजच्या लेखामध्ये आपण याच ऑलिम्पिक स्पर्धे विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे ऑलिम्पिक स्पर्धे विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

स्पर्धेचे नाव ऑलिम्पिक स्पर्धा
ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रकार ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा, शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धा, पैरा ऑलिम्पिक स्पर्धा,युथ ऑलिम्पिक स्पर्धा
पाहिली ऑलिम्पिक स्पर्धा १८९६ ,ऑलिम्पिया स्टेडियम ,ग्रीस.
समिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती
समितीची स्थापना २३ जुन १८९४

ऑलिम्पिक (Olympic in Marathi)

ऑलिम्पिक स्पर्धा ही खेळाच्या दुनियेतील सर्वोत्तम स्पर्धा आहे आणि या स्पर्धेमध्ये प्रत्येक देश सहभागी होत असतो. या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये हजारो खेळाडू सामील होत असतात आणि ते खेळाडू ऑलिम्पिक स्पर्धा जिंकून आपल्या देशाचे नाव रोशन करत असतात.

ऑलिम्पिक स्पर्धा ही दोन ऋतूत आयोजित केली जाते. हे दोन ऋतू म्हणजे उन्हाळा आणि हिवाळा. उन्हाळ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला “ ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा” म्हणतात ,तर हिवाळ्यात आयोजित केल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेला “शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धा” म्हणले जाते.

ही ऑलिम्पिक स्पर्धा दर चार वर्षांनी आयोजित केली जाते. ह्या मुख्य ऑलिम्पिक स्पर्धे व्यतिरिक्त युथ ऑलिम्पिक स्पर्धा आणि पैरा ऑलिम्पिक  स्पर्धा ह्या दोन स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. यातील युथ ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये १४ ते १८ वर्षीय खेळाडू सहभागी घेतात आणि पैरा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दिव्यांग आणि अपंग खेळाडू सहभाग घेतात.

ऑलिम्पिक स्पर्धा चालू करण्यामागचा मुख्य उद्देश्य हा होता की ,“जगातील सर्व खेळाडू एकत्र येतील आणि या स्पर्धेद्वारे जगामध्ये शांतता पसरेल”.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (International Olympic Committee in Marathi)

ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हे “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती” द्वारे केले जाते. तसेच कोणत्या खेळाला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सामील करायचे ? ,कोणत्या खेळाला ऑलिम्पिक स्पर्धेमधून काढून टाकायचे ?,ऑलिम्पिक स्पर्धेसाठी कोणते नियम लागू करायचे ? ,तसेच ऑलिम्पिक स्पर्धेचे नियोजन कोणत्या देशामध्ये करायचे ? ,या सर्व गोष्टींचे निर्णय “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती” घेते.

या “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती” ची स्थापना २३ जुन १८९४ मध्ये फ्रान्स देशातील पेरीस शहरात करण्यात आली होती. परंतु या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे मुख्यालय हे “लौसेन स्वित्झर्लंड” येथे आहे. वर्तमानात या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती मधील सदस्यांची संख्या ही १०३ आहे आणि या समितीचे वर्तमानातील अध्यक्ष हे “थॉमस बास” हे आहेत.

ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास (History of Olympic games in Marathi)

आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे श्रेय हे “बैरोन पियरे डिकोबरटिन” यांना दिले जाते. “बैरोन पियरे डिकोबरटिन” यांनी १८९४ ग्रीस देशातील ऑलिम्पिया स्टेडियम मध्ये जगभरातील खेळाडूंना बोलवून स्पर्धेचे आयोजन करण्याचा प्रस्ताव पहिल्यांदा मांडला होता आणि त्यांचा हा प्रस्ताव यशस्वी रित्या सफल देखील झाला होता.

प्रस्ताव मांडल्यानंतर दोन वर्षांनेच म्हणजे १८९६ मध्ये पाहिली ऑलिम्पिक स्पर्धा ही ग्रीस देशातील ऑलिम्पिया स्टेडियम मध्ये भरवण्यात आली होती. ऑलिम्पिया स्टेडियम मध्ये भरवण्यात आलेल्या या स्पर्धेला “ऑलिम्पिक स्पर्धा” असे नाव देण्यात आले होते.

त्यानंतर चार वर्षांनी म्हणजे १९०० मध्ये फ्रान्स देशातील पेरिस येथे दुसरी ऑलिम्पिक स्पर्धा भरवण्यात आली होती आणि या ऑलिम्पिक च्या दुसऱ्या पर्वामध्ये महिलांनी देखील सहभाग घेतला होता. त्यानंतर ही स्पर्धा दर चार वर्षांनी भरवली जाते आणि या स्पर्धेमध्ये जगभरातील सर्व देशातील खेळाडू सहभाग घेतात आणि मेडल जिंकून आपल्या देशाचे नाव जगभरामध्ये रोशन करतात.

ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा (Summer Olympic games in Marathi)

ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेचे नियोजन हे उन्हाळा ऋतूत केले जाते. १८९६ मध्ये ग्रीस देशातील ऑलिम्पिया स्टेडियम मध्ये भरवण्यात आलेली स्पर्धा ही “ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा” होती.

शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धा (Winter Olympic games in Marathi)

शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धेचे नियोजन हे हिवाळा ऋतूत केले जाते. पहिल्या शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धेचे नियोजन हे १९२४ मध्ये फ्रान्स देशातील पेरिस येथे “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती” द्वारे करण्यात आले होते.

त्याकाळी शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धा आणि ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन एकसोबत केले जात होते ; परंतु ह्या दोन्ही स्पर्धेचे आयोजन दोन वेगवेगळ्या ठिकाणी केले जात होते. ह्या दोन्ही स्पर्धेवर एकावेळी नियंत्रित करणे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला अवघड जात होते ,म्हणून त्यांनी १९९२ मध्ये ह्या दोन्ही स्पर्धांचे आयोजन एकसोबत न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर १९९४ पासून ह्या दोन्ही ऑलिम्पिक स्पर्धांचे आयोजन वेगवेगळ्या वेळी केले जाते.

भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेमधील इतिहास (History of Indian in Olympic games in Marathi)

भारताने ऑलिम्पिक स्पर्धेच्या दुसऱ्याच पर्वामध्ये म्हणजे १९०० वर्षामध्ये फ्रान्स देशातील पेरिस शहरामध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. त्याकाळी आपल्या भारत देशावर ब्रिटिशांची सत्ता होती. या १९०० मध्ये पेरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताकडून भारतीय – ब्रिटिश खेळाडू “नौमरन गिल्बर्ट प्रिटचार्ड” यांनी दोन सिल्वर मेडल जिंकले होते.

त्यानंतर पुढच्या २० वर्षा पर्यंत कोणत्याही भारतीय खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला न्हवता. त्यानंतर २० वर्षानंतर १९२० मध्ये भारतीय खेळाडूंनी बेल्जियम येथे झालेल्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला ;परंतु बेल्जियम येथे झालेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताकडून  कोणत्याही खेळाडूने मेडल जिंकले नाही.

भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये एक विश्व विक्रम केला होता. आपल्या देशातील हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ८ गोल्ड मेडल,१ सिल्वर मेडल आणि २ ब्राँझ मेडल जिंकले आहेत.

ऑलिम्पिक स्पर्धे विषयी असणाऱ्या काही रोचक गोष्टी (Interesting Facts about Olympic games in Marathi)

१) पाहिल्या विश्व युद्ध वेळी म्हणजे १९१६ मध्ये ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले नव्हते.

२) दुसऱ्या विश्व युद्ध वेळी देखील १९४० आणि १९४४ मध्ये ग्रीष्मकालीन आणि शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले न्हवते.

३) ऑलिम्पिक स्पर्धा ही जगातील खेळाडूंना एकत्र आणण्याचे काम करते.

FAQ

पाहिली ऑलिम्पिक स्पर्धा ही कोणत्या देशामध्ये भरवण्यात आली होती ?

पाहिली ऑलिम्पिक स्पर्धा ही ग्रीस देशातील ऑलिम्पिया स्टेडियम मध्ये १८९६ मध्ये भरवण्यात आली होती.

ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन दर किती वर्षांनी केले जाते ?

ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन दर चार वर्षांनी केले जाते.

ऑलिम्पिक स्पर्धेचे किती प्रकार आहेत ?

ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा, शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धा ,युथ ऑलिम्पिक स्पर्धा आणि पैरा ऑलिम्पिक स्पर्धा इत्यादी हे ऑलिम्पिक स्पर्धेचे प्रकार आहेत.

ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन कोणत्या समिती द्वारे केले जाते ?

ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन हे “आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती” द्वारे केले जाते.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती ?

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती ची स्थापना ही २३ जुन १८९४ मध्ये फ्रान्स देशातील पेरिस येथे करण्यात आली होती.

शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा ही कोणत्या वर्षी भरवण्यात आली होती ? तसेच ती स्पर्धा कोणत्या देशामध्ये भरवण्यात आली होती ?

शेवटची ऑलिम्पिक स्पर्धा ही जपान देशातील टोकियो येथे २०२० मध्ये भरवण्यात आली होती.

आजच्या लेखामध्ये आपण जगातील खेळाच्या दुनियेतील सर्वोत्तम स्पर्धेविषयी म्हणजे ऑलिम्पिक स्पर्धेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती,ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास ,ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक स्पर्धा, शीतकालीन ऑलिम्पिक स्पर्धा, भारताचा ऑलिम्पिक स्पर्धेचा इतिहास ,ऑलिम्पिक स्पर्धेविषयी असणाऱ्या काही रोचक गोष्टी ,ऑलिम्पिक स्पर्धेविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment