नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संपूर्ण माहिती Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi

Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi आपला भारत देश स्वातंत्र होण्यासाठी बऱ्याच लोकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली.आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका स्वांतंत्र सेनानी बद्दल म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची संपूर्ण माहिती Netaji Subhash Chandra Bose Information In Marathi

नाव नेताजी सुभाषचंद्र बोस
जन्म २३ जानेवारी १८९७
आईचे नाव प्रभावती बोस
वडिलांचे नाव जानकीनाथ बोस
मृत्यू १८ ऑगस्ट १९४५

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of Netaji Subhash Chandra Bose and his family in Marathi)

आपला भारत देशाला स्वंतत्र मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका असणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ मध्ये आसाम राज्यातील कटक या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव जानकीनाथ बोस होते ,तर त्यांच्या आईचे नाव प्रभावती बोस होते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे वडील वकिली करत होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शिक्षण (Education of Netaji Subhash Chandra Bose in Marathi)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या गावी म्हणजे कटक मधील प्रॉटेस्टंट युरोपियन स्कूल येथे झाले.नेताजी सुभाषचंद्र बोस जेव्हा १६ वर्षाचे होते तेव्हा ते स्वामी विवेकानंद यांच्या विषयाशी प्रभावित झाले होते ,त्याकाळी त्यांनी स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण यांची पुस्तके वाचण्यास सुरवात केली.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांना सुभाषचंद्र बोस यांना सिव्हिल अधिकारी बनवायचे होते ,यासाठी त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्लंड मधील केंब्रिज विद्यापीठात पाठवले.वर्ष १९२१ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी सिव्हिल परीक्षा पास देखील केली ,परंतु त्यांना आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी काहीतरी करायचे होते ,त्यामुळे त्यांनी १९२१ मध्ये ही नोकरी सोडली आणि ते भारतात परत आले.

आझाद हिंद सेनेची स्थापना ( Establishing of Azad Hind Sena in Marathi )

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपले आयुष्य देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी खर्च केले.त्यांनी आपल्या आयुष्यात देशाला स्वतंत्र मिळण्यासाठी प्रयत्न केले.यातच जेव्हा जगभरामध्ये दुसरे महायुध्द चालू होते ,तेव्हा ब्रिटिशांना हरवण्याची हीच चांगली संधी आहे ,असे नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाटले आणि त्यांनी जपान देशाच्या मदतीने ” आझाद हिंद सेनेची” स्थापना केली.आपण “जय हिंद” हा नारा लावत असतो ,तर हा “जय हिंद” चा नारा नेताजी सुभाषचंद्र यांनीच बोलायला चालू केलं होत.

सुभाष चन्द्र बोस यांना लहापणापासूनच देशभक्ती ची आवड होती ,त्यांना आपल्या देशासाठी लहानणापासूनच काहीतरी करायचे होते.त्यांना आपल्या देशाबद्दल लहानणापासूनच प्रेम होते.नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जेव्हा “आझाद हिंद सेनेची” स्थापना केली ,तेव्हा ते आपल्या सहकाऱ्यांचे मनोबल वाढवत असत.त्यांना असे वाटत होते की ,”जोपर्यंत आपल्या भारत देशातील सर्व लोक एकत्र येऊन ब्रिटिशांना विरोध करत नाहीत किंवा त्यांच्या विरुद्ध लढाई करत नाहीत ,तोपर्यंत आपला भारत देश स्वतंत्र होणार नाही.”

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश (Netaji Subhash Chandra Bose joins National Congress in Marathi)

महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेल्या असहयोग आंदोलनामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भाग घेतला होता .इथे त्यांची भेट महात्मा गांधी यांच्याशी झाली.महात्मा गांधी यांनी चितरंजन दास यांची ओळख नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी केली.पुढे जाऊन हे चितरंजन दास नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे राजकीय गुरू बनले.

१९२७ मध्ये जेव्हा नेताजी सुभाषचंद्र बोस हे  जेल मधून सुटले ,तेव्हा त्यांना राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महासचिव बनवण्यात आले.पुढे जाऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या सोबत मिळून देश स्वतंत्र होण्यासाठी प्रयत्न केले.१९३८ मध्ये नेताजी सुभाषचंद्र यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे विचार (Thoughts of Netaji Subhash Chandra Bose in Marathi)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी त्याकाळी देशातील तरुणांमध्ये देशभक्ती जागण्यासाठी प्रयत्न केले.त्यांचे असे मत होते की ,”कोणत्याही देशासाठी त्या देशाची स्वांतंत्रता खूप महत्वाची असते “.नेताजी सुभाषचंद्र बोस यांना वाटत होते की ,”आपण हा जन्म घेतल्यामागे काहीतरी उद्देश्य आहे .

आपण आपले आयुष्य एखाद्या उदेश्याला पूर्ण करण्यासाठी खर्च केले पाहिजे “.नेताजी सुभाषचंद्र बोस यांना स्वातंत्र्य म्हणजे जीवन मरण्याचा प्रश्न वाटत होता.त्यांना वाटत होते की ,”आपला देश स्वतंत्र होण्यासाठी माझा जीव जरी गेला तरी काही हरकत नाही”.त्यांना वाटत होते ,”स्वांतत्र्य हे एक मिशन आहे आणि या मिशन मध्ये ज्यांची आस्था आहे किंवा जे या मिशन साठी लढा देत आहेत ,तेच खरे भारतवासी आहेत.”

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यामते ,” चांगला विचार हीच खरी ताकद आहे .” ” आपले विचार साहसी आणि राष्ट्र हितासाठी असले पाहिजेत ,असे त्यांना वाटत होते.नेताजी सुभाषचंद्र बोस एका भाषणात म्हणले होते की ,” आजच्या युवकांमध्ये विचारांची कमी नाही ; परंतु त्या युवकांचे विचार देशामध्ये क्रांती आणण्यासाठी असले पाहिजेत ,स्वातंत्र्य म्हणजे फक्त देश स्वतंत्र होणे नाही तर ,स्वातंत्र्य म्हणजे आपल्या देशातील लोक आर्थिक दृष्ट्या ,सामाजिक दृष्ट्या ,धार्मिक दृष्ट्या स्वतंत्र झाला पाहिजे ,असे त्यांना वाटत होते.”जी जात किंवा जो धर्म आपल्या उन्नती साठी प्रयत्न करत नाही ,त्या धर्मातील लोकांना जगण्याचा अधिकार नाहीये”,असे त्यांना वाटत होते.

नेताजी सुभाषचंद्र यांचे निधन (Death of Netaji Subhash Chandra Bose in Marathi)

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या संपूर्ण आयष्यभर देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन १८ ऑगस्ट १९४५ मध्ये एका विमान अपघातात झाले.हे विमान बँकॉक ते टोकियो प्रवास करत होते.

FAQ

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म केव्हा झाला ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म २३ जानेवारी १८९७ मध्ये आसाम राज्यातील कटक गावी झाला.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आईचे नाव काय होते ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आईचे नाव ” प्रभावती बोस” असे होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नीचे नाव काय होते ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पत्नीचे नाव ” एमिली शेंकल” असे होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे नाव ” जानकीनाथ बोस” असे होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस हे कोणत्या पक्षाचे होते ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता.नंतर त्यांना या पक्षाचे महासचिव बनवण्यात आले होते आणि वर्ष १९३८ मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांना भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बनवण्यात आले होते.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन केव्हा झाले ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन १८ ऑगस्ट १९४५ मध्ये झाले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन कसे झाले ?

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे  निधन एका विमान अपघातात झाले होते ,हे विमान बँकॉक पासून टोकियो पर्यंत प्रवास करत होते.

आजच्या लेखामध्ये आपण ” तुम मुझे खून दो,मे तुम्हे आझादी दुंगा” हे ब्रीद वाक्य म्हणणाऱ्या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली ,तसेच आपण आजच्या लेखामधून त्यांचे कार्य ,त्यांचे विचार याविषयी देखील माहिती पाहिली.

Leave a Comment