नीट परीक्षेची संपूर्ण माहिती NEET Exam Information In Marathi

NEET Exam Information In Marathi तुम्हाला मोठे झाल्यानंतर काय व्हायचे आहे ? ,हा प्रश्न जेव्हा आपल्याला शाळेतील शिक्षक विचारायचे. तेव्हा बऱ्यापैकी मुलांचे उत्तर हे असायचे की ,“आम्हाला मोठे झाल्यानंतर डॉक्टर किंवा इंजिनिअर बनायचे आहे”. आपल्यापैकी बऱ्याच लोकांचे स्वप्न डॉक्टर बनण्याचे असते. आजच्या लेखामध्ये आपण डॉक्टर बनवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षे विषयी म्हणजे नीट परीक्षे विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे नीट परीक्षे विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

NEET Exam Information In Marathi

नीट परीक्षेची संपूर्ण माहिती NEET Exam Information In Marathi

परीक्षेचे नाव नीट
फुल्ल फॉर्म नॅशनल एलीजीबीलीटी कम इंट्रास टेस्ट
वेबसाईट https://neet.nta.nic.in/
कोर्स अंडर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन

नीट परीक्षेचा फुल्ल फॉर्म (NEET full form in Marathi)

ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात डॉक्टर बनायचे आहे ,अशा विद्यार्थ्यांची एक परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेद्वारे विद्यार्थ्यांना देशातील मेडिकल कॉलेजमध्ये एमबीएस ,बीडीएस कोर्स साठी एडमिशन दिले जाते. नीट चा इंग्रजी भाषेतील फुल्ल फॉर्म हा “नॅशनल एलीजीबीलीटी कम इंट्रास टेस्ट” असा होतो. तर या परीक्षेचा मराठी फुल्ल फॉर्म हा “राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा” असा होतो.

नीट ची परीक्षा “राष्ट्रीय परीक्षा एजंसी” द्वारे दरवर्षी आयोजित केली जाते. नीटची परीक्षा ही राज्यातील ,तसेच देशातील मेडिकल कॉलेज मध्ये एडमिशन घेण्यासाठी आयोजित केली जाते. नीट परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना एमबीबीएस ,बीडीएस कोर्स साठी राज्यातील तसेच देशातील मेडिकल कॉलेज मध्ये एडमिशन मिळते.

नीट परीक्षेचा इतिहास (History of NEET exam in Marathi)

नीट परीक्षा घेण्याचा प्रस्ताव हा २०१२ मध्ये मांडण्यात आला होता ; परंतु त्यावेळी काही कारणामुळे “मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया” द्वारे नीट ची परीक्षा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली. नंतर पुढच्या वर्षी ५ मे २०१३ रोजी देशामध्ये पाहिली नीट ची परीक्षा आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेसाठी १० लाख पेक्षा जास्त मुलांनी निवेदन केले होते. तसेच ही परीक्षा अंडर ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन दोन्ही कोर्स साठी आयोजित करण्यात आली होती.

नीट परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for NEET exam in Marathi)

नीट परीक्षेसाठी असणारे काही पात्रता निकष खालीलप्रमाणे आहेत :

१) नीट परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. भारताच्या बाहेरचे उमेदवार नीटची परीक्षा देऊ शकत नाहीत.

२) नीटची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा १२ वी विज्ञान शाखेत शिकत असला पाहिजे ,तसेच त्याला १२ वी मध्ये भौतिक शास्त्र ,रसायनशास्त्र ,जीवशास्त्र ,इत्यादी विषय असले पाहिजेत.

३) नीट च्या परीक्षे मध्ये उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला १२ वी विज्ञान शाखेत प्रत्येक विषयात ५०% च्या वरती मार्क्स पडायला हवेत.

नीट परीक्षेची प्रक्रिया (Process of NEET exam in Marathi)

१) निवेदन फॉर्म – नीट ची परीक्षा देण्यासाठी सर्वात आधी आपल्याला नीटच्या परीक्षेचा निवेदन फॉर्म भरावा लागतो. तुम्हाला जर २०२४ मध्ये होणारी नीटची परीक्षा द्यायची असेल तर ,२०२४ मध्ये होणाऱ्या नीटच्या परीक्षेचा निवेदन फॉर्म हा साधारण मार्च महिण्यामध्ये नीट च्या ऑफिशीयल साईट वरती येईल. तेव्हा तो निवेदन फॉर्म तुम्ही व्यवस्थित रित्या भरा.

२) एडमीट कार्ड डाऊनलोड करणे – निवेदन फॉर्म भरल्यानंतर जेव्हा आपली नीटची परीक्षा असेल त्याच्या काही दिवस अगोदर नीटच्या ऑफिशीयल वेबसाईट वरती एडमीट कार्ड येईल. ते एडमीट कार्ड आपण डाऊनलोड केले पाहिजे आणि जेव्हा आपली नीट ची परीक्षा असेल तेव्हा, ते एडमीट कार्ड आपण परीक्षेला जाताना सोबत न्हेले पाहिजे.

३) परीक्षा तारीख – एडमीट कार्डवर आपल्याला आपल्या परीक्षेची तारीख दिलेली असेल ,तसेच एडमीट कार्ड वरती आपली परीक्षा ज्या केंद्रामध्ये होणार आहे ,त्या केंद्राचे नाव देखील दिले असेल. तर ज्यादिवशी आपली नीट ची परीक्षा आहे, त्यादिवशी आपण योग्य वेळेवर आणि एडमीट कार्डवर दिलेल्या केंद्रावर जाऊन नीटची परीक्षा दिली पाहिजे.

४) अन्सर की – नीटची परीक्षा झाल्यानंतर नीटच्या ऑफिशीयल वेबसाईट वर आपण दिलेल्या नीटच्या परीक्षेची अन्सर की येईल. त्या अन्सर की द्वारे आपण आपल्या परीक्षेतील प्रश्न कशा पद्धतीने सोडवली आहेत ,याचा अंदाज लावू शकतो.

५) नीटच्या परीक्षेचा निकाल – आपली नीटची परीक्षा झाल्यानंतर एका महिन्याचा आत आपला नीटच्या परीक्षेचा निकाल लागेल. निकाला वेळी यावर्षीच्या नीटच्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो आहोत की नाही याची माहिती आपल्याला समजेल.

जर आपण या वर्षीच्या नीटच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालो असेल ,तर आपण आपल्या मार्क्स ची काऊंसलिंग केली पाहिजे ; परंतु या वर्षी झालेल्या नीट च्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण झालो नाही तर ,आपण न खचता ,न धीर सोडता पुढच्या वर्षी होणारी नी ची परीक्षा परत दिली पाहिजे आणि पुढच्या वर्षी होणाऱ्या नीटच्या परीक्षेसाठी आपण जास्त मेहनत घेतली पाहिजे.

नीट परीक्षेची काऊंसलींग प्रक्रिया (Counseling Process for NEET exam in Marathi)

आपला जेव्हा नीट परीक्षेचा निकाल लागतो, तेव्हा त्यानंतर नीट परीक्षेची काऊंसलींग प्रक्रिया चालू होते. या काऊंसलींग प्रक्रियेमध्ये तीन राऊंड असतात आणि राज्यातील आणि देशातील सरकारी आणि खाजगी मेडिकल कॉलेज मधील एमबीबीएस , बीडीएस कोर्स साठी असणाऱ्या जागा या तीन राऊंड द्वारे भरल्या जातात. या नीट परीक्षेद्वारे देशातील मेडिकल कॉलेज मध्ये १५% कोटा भरला जातो ,तर राज्यातील मेडिकल कॉलेज मध्ये ८५% कोटा भरला जातो.

FAQ

नीट चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

नीट चा फुल्ल फॉर्म “नॅशनल एलीजीबीलीटी कम इंट्रास टेस्ट” असा होतो.

नीट ची परीक्षा कोणा द्वारे आयोजित केली जाते ?

नीट ची परीक्षा ही “राष्ट्रीय परीक्षा एजंसी” द्वारे आयोजित केली जाते.

नीट ची परीक्षा चालू करण्याचा प्रस्ताव कोणी मांडला होता ?

नीट ची परीक्षा चालू करण्याचा प्रस्ताव हा “स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालय” यांनी मांडला होता.

नीट परीक्षेद्वारे कोणत्या कोर्स साठी एडमिशन दिले जाते ?

नीटची परीक्षा ही “राष्ट्रीय परीक्षा एजंसी” द्वारे वर्षातून एकदा आयोजित केली जाते. या परीक्षे मध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना देशातील मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्स साठी एडमिशन दिले जाते.

मी माझे १२ वी शिक्षण विज्ञान शाखेतून केले आहे ; परंतु माझ्या १२ वी मध्ये मला जीवशास्त्र हा विषय न्हवता ,तर मी नीट ची परीक्षा देऊ शकतो का ?

नाही तुम्ही नीट ची परीक्षा देऊ शकत नाही. नीट ची परीक्षा देण्यासाठी १२ वी मध्ये जीवशास्त्र विषय असणे गरजेचे आहे.

नीट ची परीक्षा देण्यासाठी पात्रता निकष काय आहे ?

नीट ची परीक्षा देण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे. तसेच त्या उमेदवाराचे १२ वी चे शिक्षण विज्ञान शाखेतून पूर्ण असले पाहिजे आणि त्याला १२ वी मध्ये भौतिक शास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय असले पाहिजेत. नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवाराला १२ वी मध्ये प्रत्येक विषयात ५०% च्या वरती मार्क्स पडले असले पाहिजेत.

नीटची परीक्षा कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती ?

नीटची परीक्षा सुरू करण्याचा प्रस्ताव हा २०१२ मध्येच मांडण्यात आला होता ; परंतु पाहिली नीटची परीक्षा ही ५ मे २०१३ रोजी आयोजित करण्यात आली होती आणि या पहिल्या नीटच्या परीक्षेमध्ये १० लाख पेक्षा जास्त मुलांनी निवेदन फॉर्म भरला होता.

आजच्या लेखामध्ये आपण राज्यातील आणि देशातील मेडिकल कॉलेज मध्ये एमबीबीएस आणि बीडीएस कोर्स साठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेविषयी म्हणजे नीट परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण नीट परीक्षेचा फुल्ल फॉर्म ,नीट परीक्षेचा इतिहास ,नीट परीक्षेसाठी असणारी पात्रता निकष, नीट परीक्षेची प्रक्रिया ,नीट परीक्षेची काऊंसलींग प्रक्रिया ,नीट परीक्षेविषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment