नीरज चोप्रा यांची संपूर्ण माहिती Neeraj Chopra Information In Marathi

Neeraj Chopra Information In Marathi आपला भारत देश प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. आपल्या भारत भूमीत जन्म घेतलेले खेळाडू जगभरामध्ये विविध खेळांमध्ये आपल्या भारत देशाचे नाव रोशन करत आहेत. आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका महान खेळाडूच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भालाफेक खेळात गोल्ड मेडल जिंकून देशाचे नाव रोशन करणाऱ्या “नीरज चोप्रा” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Neeraj Chopra Information In Marathi

नीरज चोप्रा यांची संपूर्ण माहिती Neeraj Chopra Information In Marathi

नीरज चोप्रा (Neeraj Chopra in Marathi)

नीरज चोप्रा हे भारत देशाकडून भालाफेक स्पर्धेत खेळणारे खेळाडू आहेत. त्यांनी टोकियो येथे झालेल्या ऑलिम्पिक २०२० स्पर्ध्ये मध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले होते. याचसोबत नीरज चोप्रा हे भारताच्या आर्मी मधील राजपुताना रायफल्स मध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहेत. नीरज चोप्रा यांनी वर्ल्ड एथलिट स्पर्धेमध्ये ८८.१५ मीटर भाला फेकून विजय मिळवला होता.

नाव नीरज चोप्रा
जन्म २४ डिसेंबर १९९७
जन्म स्थान पानिपत , हरियाणा
आईचे नाव सरोज देवी
वडिलांचे नाव सतीश कुमार
खेळ भालाफेक

नीरज चोप्रा यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब (Birth of Neeraj Chopra and his family in Marathi)

नीरज चोप्रा यांचा जन्म २४ डिसेंबर १९९७ मध्ये हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यात झाला होता. नीरज चोप्रा यांच्या वडिलांचे नाव “सतीश कुमार” असे आहे ,तर त्यांच्या आईचे नाव “सरोज देवी” असे आहे. नीरज चोप्रा यांचे वडील सतीश कुमार हे एक शेतकरी आहेत ,तर त्यांच्या आई सरोज देवी ह्या गृहिणी आहेत.

हरियाणा मध्ये जन्म झाल्यामुळे नीरज चोप्रा यांना लहानपणापासूनच विविध खेळ खेळण्याची आवड निर्माण झाली होती. नीरज चोप्रा ह्यांना दोन भाऊ आणि दोन बहिणी आहेत आणि यात नीरज चोप्रा हे सर्वात मोठे आहेत.

नीरज चोप्रा जेव्हा ११ वर्षाचे झाले तेव्हा त्यांनी पानिपत मधील स्टेडियम मध्ये जय चौधरी यांना भाला फेकताना पाहिले होते ,तेव्हापासून त्यांना भालाफेक खेळा विषयी रुची निर्माण झाली. तिथून पुढे त्यांनी भालाफेक खेळण्यामध्ये महारत प्राप्त करण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आणि त्यांच्या कष्टाच्या जोरावर आज ते भालाफेक स्पर्धेतील जगातील एक नामंकित खेळाडू आहेत.

नीरज चोप्रा यांचे करियर (Career of Neeraj Chopra in Marathi)

नीरज चोप्रा हे ११ वर्षाचे असल्यापासून भालाफेक खेळ खेळत आहेत. त्यांनी २०१२ मध्ये वयाच्या १६ व्या वर्षी लखनौ येथे झालेल्या “अंडर १६ भालाफेक स्पर्धेत” गोल्ड मेडल जिंकले होते.

ही त्यांची पहिली राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा होती. यानंतर त्यांनी माघार घेतली नाही आणि त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ते देशासाठी मेडल जिंकत गेले. त्यानंतर २०१३ मध्ये झालेल्या “नॅशनल युथ स्पर्धेमध्ये” नीरज चोप्रा यांनी दुसरे पारितोषिक मिळवले होते.

२०१६ मध्ये पोलंड येथे झालेल्या आईएएस स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा यांनी सहभाग घेतला होता. ही स्पर्धा अंडर २० होती आणि नीरज चोप्रा यांनी या स्पर्धेमध्ये ज्युनियर विश्व विक्रम स्थापित केला होता. ही नीरज चोप्रा यांची पहिली आंतरराष्ट्रीय स्पर्धा होती.

त्यानंतर नीरज चोप्रा यांनी जगभरातील विविध देशामध्ये होणाऱ्या भालाफेक स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी दरवेळी भारत देशाचे नाव रोशन केले. त्यांनी २०१८ मध्ये झालेल्या कॉमन वेल्थ गेम्स आणि एशियन गेम्स मध्ये भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले होते.

एका वर्षामध्ये एशियन गेम्स आणि कॉमन वेल्थ गेम्स मध्ये देशासाठी गोल्ड मेडल जिंकणारे नीरज चोप्रा हे पाहिले भारतीय एथलीट होते. तसेच टोकियो येथे झालेल्या २०२० ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये त्यांनी भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले होते.

नीरज चोप्रा यांचे कोच (Coach of Neeraj Chopra in Marathi)

नीरज चोप्रा यांनी भालाफेक खेळासाठी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. त्यांनी जेव्हा भालाफेक स्पर्धेमध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजय मिळवला होता तेव्हा ,भारतीय आर्मी कडून नीरज चोप्रा यांचे कोच म्हणून “उवे होन” यांची निवड करण्यात आली होती.

उवे होन हे जर्मनी देशातील एक निवृत्त भालाफेक खेळाडू आहेत. त्यांनी १९८४ मध्ये झालेल्या एका स्पर्धेमध्ये १०४.८ मीटर भाला फेकून विश्व विक्रम केला होता. आणि अजूनही उवे होन यांचा हा १०४.८ मीटर भाला फेकण्याचा विश्व विक्रम कोणीही तोडू शकले नाही. उवे होन म्हणतात की ,”माझा हा विश्व विक्रम नीरज चोप्रा यांनी तोडला तर मला आनंदच होईल”.

नीरज चोप्रा ह्यांनी आज भालाफेक स्पर्धेत जेवढे यश मिळवले आहे ,त्यांच्या यशामध्ये त्यांच्या कोच चा म्हणजे उवे होन यांचा मोलाचा वाटा आहे. वर्ष २०१७ पासून उवे होन यांनी नीरज चोप्रा यांना भालाफेक खेळाविषयी विशेष ट्रेनिंग देणे चालू केले. नीरज चोप्रा आपल्या मुलाखतीत म्हणतात की , “उवे होन यांनी मला भालाफेक खेळातील काही महत्वाच्या टिप्स दिल्या ,तसेच त्यांना माझा भालाफेक चा खेळ सुधरण्यामध्ये माझा मदत केली”.

नीरज चोप्रा यांची भालाफेक खेळातील वर्ल्ड रँकिंग (World ranking of Neeraj Chopra in Marathi)

नीरज चोप्रा यांनी भारत देशाला वर्ल्ड एथलिट स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकले आहे. या स्पर्धेमध्ये मिळालेल्या विजयानंतर नीरज चोप्रा हे भालाफेक खेळामध्ये वर्ल्ड रँकिंग मध्ये पहिल्या स्थानावर गेले आहेत. नीरज चोप्रा हे भालाफेक खेळामध्ये दिवसेंदिवस देशासाठी नवनवीन मेडल जिंकत आहेत आणि याचा आपल्या देशवासीयांना गर्व आहे.

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरज चोप्रा यांना मिळालेली राशी (Amount received by Neeraj Chopra after winning gold medal in Olympic)

नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी गोल्ड मेडल जिंकले होते, तेव्हापासून नीरज चोप्रा हे देशातील लोकांचें नायक झाले. जेव्हा नीरज चोप्रा ऑलिम्पिक मध्ये विजय मिळवून भारतात आले ,तेव्हा सर्वांनी त्यांचे स्वागत आनंदाने केले. तसेच त्यांना काही राज्यांनी बक्षीस म्हणून नगद राशी देखील दिली.

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकल्यानंतर हरियाणा सरकारने नीरज चोप्रा यांना ६ करोड ची नगद राशी दिली होती,तसेच भारतीय रेल्वे ने त्यांना ३ करोड रुपये ची नगद राशी दिली होती. तसेच त्यांना पंजाब सरकारकडून २ करोड रुपये , बायज्यू कडून २ करोड रुपये ,बीसीसीआई कडून १ करोड रुपये,आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग संघाकडून १ करोड रुपये,इत्यादी नगद राशी देण्यात आली होती.

FAQ

नीरज चोप्रा यांचा जन्म केव्हा आणि कुठे झाला ?

नीरज चोप्रा यांचा जन्म २४ डिसेंबर १९९७ मध्ये हरियाणा राज्यातील पानिपत जिल्ह्यात झाला.

नीरज चोप्रा यांच्या आईचे नाव काय होते ?

नीरज चोप्रा यांच्या आईचे नाव “सरोज देवी” असे होते.

नीरज चोप्रा यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

नीरज चोप्रा यांच्या वडिलांचे नाव “सतीश कुमार” असे होते.

नीरज चोप्रा यांनी कोणत्या वर्षापासून भालाफेक खेळण्यास सुरुवात केली होती ?

नीरज चोप्रा यांनी वयाच्या ११ वर्षापासून भालाफेक खेळ खेळायला सुरवात केली होती.

नीरज चोप्रा यांच्या कोच चे नाव काय आहे ?

नीरज चोप्रा यांच्या कोचचे नाव “उवे होन” असे आहे.

नीरज चोप्रा यांची भालाफेक खेळातील वर्ल्ड रँकिंग काय आहे ?

वर्ल्ड एथलिट स्पर्धेनंतर भालाफेक खेळाच्या वर्ल्ड रँकिंग मध्ये नीरज चोप्रा हे पहिल्या स्थानावर गेले होते.

नीरज चोप्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कोणते मेडल जिंकले होते ?

२०२० टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये नीरज चोप्रा यांनी गोल्ड मेडल जिंकले होते.

भालाफेक खेळा व्यतिरिक्त नीरज चोप्रा हे आर्मी मध्ये कोणत्या पदावर कार्यरत आहेत ?

नीरज चोप्रा हे भारतीय आर्मी मधील राजपुताना रायफल्स मध्ये सुभेदार पदावर कार्यरत आहेत.

आजच्या लेखामध्ये आपण टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या “नीरज चोप्रा” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण नीरज चोप्रा यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब ,नीरज चोप्रा यांचे करियर ,नीरज चोप्रा यांचे कोच ,नीरज चोप्रा यांची भालाफेक खेळातील वर्ल्ड रँकिंग ,नीरज चोप्रा यांच्या विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment