एनडीए परीक्षेची संपूर्ण माहिती NDA Exam Information In Marathi

NDA Exam Information In Marathi आपण जेव्हा बारावी मध्ये असतो ,तेव्हा आपल्या सर्वांचे स्वप्न असते की ,“इंडीयन आर्मी मध्ये जाऊन किंवा नेवी मध्ये जाऊन किंवा एअर फोर्स मध्ये जाऊन देशाची सेवा करावी”. पण आपल्यापैकी खूप कमी लोकांचे हे देश सेवा करण्याचे स्वप्न पूर्ण होते. आजच्या लेखामध्ये आपण “एनडीए परीक्षे” विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे “एनडीए परीक्षे” विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

NDA Exam Information In Marathi

एनडीएची संपूर्ण माहिती NDA Exam Information In Marathi

एनडीए (NDA in Marathi)

भारतातील “संघ लोक सेवा आयोग (युपीएससी) वर्षातून दोन वेळा एनडीए ची परीक्षा घेते आणि ही एनडीए परीक्षा पास होणे खूप अवघड असते. ह्या एनडीए परीक्षेमध्ये खूप कमी लोक पास होतात आणि ही परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना रक्षा दला द्वारे देशाची सेवा करण्याची संधी मिळते. ह्या एनडीए परीक्षेमध्ये काही चाचण्या सामील असतात. ज्यामध्ये शारिरीक चाचणी ,सामान्य योग्यता ,मनोविज्ञान कौशल्य ,टीम कौशल्य आणि सामाजिक कौशल्य ,इत्यादी चाचण्या सामील असतात.

ह्या परीक्षेचा फॉर्म भरलेल्या उमेदवाराने जर वरील चाचण्या पास केल्या तर ,नंतर त्या उमेदवाराची एसएसबी ची साक्षात्कार प्रक्रिया घेतली जाते.

एनडीए परीक्षा च्या सर्व चाचण्या आणि साक्षात्कार प्रक्रिया पास झाल्यानंतर उमेदवाराला “राष्ट्रीय रक्षा अकॅडमी(नॅशनल डिफेन्स अकॅडमी), पुणे” येथे ट्रेनिंग साठी पाठवले जाते आणि ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर उमेदवाराचे देशातील विविध विभागात पोस्टिंग केले जाते. ही एनडीए ची परीक्षा बारावी उत्तीर्ण केलेला विद्यार्थी देऊ शकतो.

एनडीए चा फुल्ल फॉर्म (Full form of NDA in Marathi)

एनडीए चा फुल्ल फॉर्म “नॅशनल डिफेन्स अकॅडमी (National Defence Academy)” असा होतो. दरवर्षी देशभरातील लाखो विद्यार्थी या परीक्षेचा फॉर्म भरतात ; परंतु ह्या लाखो विद्यार्थ्यांपैकी हजारो विद्यार्थीच ही परीक्षा पास करतात आणि त्यांची निवड भारतीय रक्षा सेनेत केली जाते.

एनडीए परीक्षेसाठी असणारी निकष पात्रता ( Eligibility criteria for NDA exam in Marathi)

एनडीए परीक्षेसाठी असणारी निकष पात्रता खालीलप्रमाणे आहे :

१) ह्या परीक्षेसाठी निवेदन करण्यासाठी उमेदवार हा भारताचा नागरिक असला पाहिजे.

२) ह्या परीक्षेसाठी निवेदन करण्यासाठी उमदेवार हा बारावी परीक्षा उत्तीर्ण असलेला पाहिजे. जो उमेदवार सध्या बारावीचे शिक्षण घेत आहे आणि त्याचे अजून बारावी चे शिक्षण पूर्ण  झाले नाही ,तो उमदेवार देखील या परीक्षेसाठी निवेदन करू शकतो.

२) ह्या परीक्षेसाठी निवेदन करण्यासाठी उमेदवाराला बारावी मध्ये भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र आणि गणित हे विषय असले पाहिजे.

३) ह्या परीक्षेसाठी निवेदन करण्यासाठी उमेदवार हा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या तंदुरुस्त असला पाहिजे.

४) ह्या परीक्षेसाठी निवेदन करण्यासाठी उमेदवाराची उंची कमीतकमी साधारण १५७ सेंटी मीटर इतकी असली पाहिजे.

५) ह्या परीक्षेसाठी निवेदन करण्यासाठी उमेदवाराचे वय १६.५ ते १९ च्या दरम्यान असले पाहिजे.

६) एनडीए – १ ची परीक्षा अविवाहित पुरुष उमेदवारच देऊ शकतात. ज्यांचा विवाह झाला आहे तो पुरुष उमेदवार ही एनडीए – १ ची परीक्षा देऊ शकत नाहीत. तसेच एनडीए – २ ची परीक्षा ही विवाहित महिला उमेदवार देऊ शकते.

एनडीए परीक्षेचा निवेदन फॉर्म (Application form of NDA exam in Marathi)

१) तुम्हाला एनडीए परीक्षेसाठी निवेदन करण्यासाठी युपीएससी च्या ऑफिशिअल वेबसाईट वर जावे लागेल.

२) तिथे ह्या परीक्षेसाठी असणारी निकष पात्रते मध्ये आपण बसतो आहे की नाही हे पाहावे लागेल

३) नंतर एनडीए परीक्षेसाठी असणारा निवेदन फॉर्म योग्य रित्या भरावा लागेल.

४) नंतर त्या निवेदन फॉर्म वरती विचारलेली माहिती योग्य रित्या भरावी लागेल ,तसेच आणि डॉक्युमेंट्स योग्य रित्या सबमिट करावे लागतील.

५) शेवटी एनडीए परीक्षेसाठी असणारी जेवढी फी आहे ,तेव्हढी फी आपल्याला भरावी लागेल आणि सर्व माहिती योग्य रित्या भरल्यानंतर निवेदन फॉर्म सबमिट करावा लागेल.

६) आपला एनडीए परीक्षेचा फॉर्म योग्य रित्या सबमिट होईल.

एनडीए परीक्षेचा सिलॅबस (Syllabus of NDA exam in Marathi)

एनडीए ची ही परीक्षा दोन भागामध्ये विभागली आहे. या पहिल्या भागामध्ये गणिताची परीक्षा घेतली जाते ,तर दुसऱ्या भागामध्ये सामान्य ज्ञानाची चाचणी घातली जाते.

चला तर आपण आता एनडीए परीक्षेमध्ये असणाऱ्या दोन भाग गणित आणि सामान्य ज्ञान चा सिलॅबस पाहू.

१) गणित –

 • बीजगणित
 • मैट्रिक्स आणि डिस्ट्रमेंट्स
 • त्रिकोण मिति
 • अंतर आकलन
 • सम आकलन गणित
 • वेक्टर बीजगणित
 • सांख्यिकी आणि संभावना

सामान्य ज्ञान चाचणी

 • इंग्रजी
 • सामान्य ज्ञान
 • सामान्य विज्ञान
 • इतिहास
 • अर्थशास्त्र
 • भूगोल
 • रसायन शास्त्र
 • भौतिक विज्ञान
 • करेंट अफेयर्स

एनडीए परीक्षेसाठी असणारी साक्षात्कार प्रक्रिया (Interview Process of NDA exam in Marathi)

एनडीए परीक्षेची चाचणी परीक्षा पास झाल्यानंतर एसएसबी ची साक्षात्कार प्रक्रिया घेतली जाते. ही साक्षात्कार प्रक्रिया ९०० अंकांची असते आणि या साक्षात्कार प्रक्रिया देखील दोन चरणामध्ये विभागली आहे आणि ते दोन चरण खालीलप्रमाणे आहेत :

चरण १ –

स्क्रीनिंग चाचणी –

 • मौखिक आणि गैर मौखिक चाचणी
 • पीपीडीटी चाचणी

मनोविज्ञान चाचणी –

 • विषयगत धारणा चाचणी
 • वर्ड एसोसिएशन चाचणी
 • सिचुएशन रिएक्शन चाचणी
 • स्वविवरण चाचणी

चरण २ – समूह चाचणी

 • ग्रुप डिस्कशन
 • ग्रुप टास्क
 • ग्रुप प्लॅनिंग
 • एचजीटी
 • आईओटी
 • कमांड टास्क
 • स्नेक स्पर्धा
 • एफजीटी

ह्यानंतर शेवटची चाचणी म्हणजे “व्यक्तिगत मुलाखत” घेतली जाते आणि या सर्व चाचण्या मध्ये पास होणाऱ्या उमेदवाराची पोस्टिंग भारतीय रक्षा सेवेमध्ये विविध पदावर केली जाते.

FAQ

एनडीए चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

एनडीए चा फुल्ल फॉर्म हा “नॅशनल डिफेन्स अकॅडमी” असा आहे. यूपीएससी द्वारे ही एनडीए परीक्षा वर्षातून दोन वेळा घेतली जाते. या परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी निवेदन फॉर्म भरतात ; परंतु त्यातील फक्त हजारो विद्यार्थ्याची निवड या परीक्षे द्वारे केली जाते.

एनडीए ची साक्षात्कार प्रक्रिया ही किती मार्क्स ची असते ?

एनडीए परीक्षेची साक्षात्कार प्रक्रिया ही ९०० मार्क्स ची असते आणि यामध्ये दोन चरण असतात. आणि शेवटी व्यक्तिगत मुलाखत घेतली जाते. या सर्व चाचण्या मध्ये पास झालेल्या उमेदवाराची निवड पुढे केली जाते.

एनडीए परीक्षेचा सिलॅबस काय आहे ?

एनडीए ची परीक्षा दोन भागामध्ये घेतली जाते. पहिल्या भागामध्ये गणिताची परीक्षा घेतली जाते तर ,दुसऱ्या भागामध्ये सामान्य ज्ञानाची परीक्षा घेतली जाते.

एनडीए परीक्षेसाठी निकष पात्रता काय असते ?

एनडीए परीक्षेसाठी निवेदन फॉर्म भरण्यासाठी उमेदवार हा भारतीय नागरिक असणे गरजेचे आहे. तसेच उमेदवार हा बारावी उत्तीर्ण असला पाहिजे आणि त्याच्या बारावी मधे त्याला भौतिक विज्ञान ,रसायन शास्त्र आणि गणित हे विषय असले पाहिजेत आणि त्याचे वय १९ वर्षा पेक्षा जास्त नसले पाहिजे.

एनडीए परीक्षेसाठी उमेदवाराची उंची किती असली पाहिजे ?

एनडीए परीक्षेसाठी उमेदवाराची उंची ही साधारण १५७ सेंटी मीटर पेक्षा जास्त असली पाहिजे.

एनडीए परीक्षा ही वर्षातून किती वेळा घेतली जाते ?

एनडीए परीक्षा ही वर्षातून दोन वेळा घेतली जाते.

नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही कुठे स्थित आहे ?

नॅशनल डिफेन्स अकॅडमी ही महाराष्ट्र राज्यातील पुणे येथे स्थित आहे.

आजच्या लेखामध्ये आपण युपीएससी द्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या एनडीए परीक्षेविषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एनडीए चा फुल्ल फॉर्म ,एनडीए परीक्षेसाठी असणारी निकष पात्रता,एनडीए परीक्षेचा निवेदन फॉर्म ,एनडीए परीक्षेचा सिलॅबस , एनडीए परीक्षेची साक्षात्कार प्रक्रिया,एनडीए परीक्षे विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment