नागपंचमी सणाची संपूर्ण माहिती Nagpanchami Festival Information In Marathi

Nagpanchami Festival Information In Marathi आपल्या भारत देशामध्ये विविध धर्मीय लोक आपले सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरे करतात. आजच्या लेखामध्ये आपण हिंदू धर्मातील एका प्रमुख आणि महत्वाच्या सणा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे हिंदू धर्मातील एका प्रमुख सणा विषयी म्हणजे “नागपंचमी” या सणा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Nagpanchami Festival Information In Marathi

नागपंचमी सणाची संपूर्ण माहिती Nagpanchami Festival Information In Marathi

सणाचे नाव नागपंचमी
तिथी श्रावण शुक्ल पंचमी
धर्मातील सण हिंदू
२०२४ तारीख ९ ऑगस्ट (शुक्रवार)

नागपंचमी सण (Nag Panchami festival in Marathi)

“सणांच्या निमित्ताने संपूर्ण समाज एकत्र यावा व प्रत्येक सण समाजातील सर्व लोकांनी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा” ,हा सण साजरा करण्यामागचा उद्देश होता. आपल्या हिंदू धर्मामध्ये बरेच सण आहेत आणि त्या प्रत्येक सणांचे विशेष महत्व आहे.

तसेच आपल्या भारतीय संस्कृती मध्ये आपण डोंगर – दर्यांची ,नद्यांची ,झाडा – झुडपांची ,निसर्गातील प्रत्येक गोष्टीची पूजा केली जाते. नागपंचमी सणा दिवशी सापांची , नागांची पूजा केली जाते. आपल्या निसर्गामध्ये नागांचे ,विविध जातीतील सापांचे विशेष स्थान आहे ,त्यामुळे नागपंचमी दिवशी आपण नागांची आणि सापांची पूजा करतो.

नागपंचमी सणा संबंधी असणारी पौराणिक कथा (Mythological story related Nag Panchami festival in Marathi)

प्राचीन काळामध्ये एक “लीलाधर” नावाचा गरीब शेतकरी होता. तो दिवसभर शेतात काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. त्याला तीन मुलगे आणि मुलगी होती. एके दिवशी तो नेहमी प्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेला होता. त्यादिवशी तो जिथे काम करत होता ,तिथे आसपास नागीण आणि तिची छोटी बाळे होती.

लीलाधर कडून चुकीने त्या नागीणीच्या लहान बाळांची हत्या होते. आपल्या लहान बाळांची झालेली हत्या पाहून माता नागीणला राग येतो आणि ती आपल्या लहान बाळांचा बदला घ्यायचा ठरवते. यासाठी रात्री ती लीलाधर शेतकऱ्याच्या घरी जाते व लीलाधरला ,त्याच्या पत्नीला व त्याच्या तीन मुलांना डसते. त्यादिवशी काही कारणास्तव ती नागीण लीलाधर च्या मुलीला डसण्यामध्ये अयशस्वी ठरते.

नागीण च्या डसल्यामुळे लीलाधर च्या कुटुंबाचा नाश होतो ,फक्त लीलाधर ची मुलगी वाजते. ज्यादिवशी लीलाधर आणि त्याच्या कुटुंबीयांची हत्या नागीण द्वारे होते ,त्याच्या दुसऱ्याच दिवशी नागीण लीलाधर च्या मुलीची हत्या करण्यासाठी परत लीलाधरच्या घरी जाते ; परंतु ती जेव्हा लीलाधरच्या घरी जाते ,तेव्हा लीलाधरच्या मुलीने नागीणला आधीच प्रसन्न करण्यासाठी दुधाचे भांडे ठेवलेले असते.

लीलाधर ची मुलगी त्या नागीण देवतेची माफी मागते. त्यानंतर नागीण देवता त्या मुलीवर प्रसन्न होते आणि नागीण देवता तिच्या आई वडिलांना ,तसेच तीन भावांना जीवनदान देते आणि असे वरदान देते की ,“जी महिला श्रावण शुक्ल पंचमीला माझी पूजा करेल ,मी त्या महिलेच्या कुटुंबाचे रक्षण करेन”. तेव्हापासून श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला “नागपंचमी” सण साजरा केला जातो.

नागपंचमी सण साजरा करण्याची पद्धत (How we celebrate Nag Panchami festival in Marathi)

श्रावण महिन्यामध्ये बरेच सण असतात. त्यातील एक सण म्हणजे “नागपंचमी सण”. यादिवशी सकाळी लवकर उठले जाते. तसेच सकाळी लवकर उठल्यानंतर स्नान करून चांगली कपडे घातली जातात. यादिवशी घराच्या दारावर नाग देवतेचे चित्र काढले जाते ,तसेच नाग देवतेला सुगंधी वस्तू आवडतात त्यामुळे या दिवशी नाग देवते समोर सुगंधित पुष्प ,चंदन वाहले जाते.

नागपंचमी दिवशी ब्राम्हणांना गोड्या अन्नाचे भोजन दिले जाते. तसेच घरातील सर्व लोकांनी देखील हेच गोडे भोजन खाल्ले जाते. या नागपंचमी दिवशी आपल्याला जर नाग देवतेचे दर्शन झाले तर ,त्याला शुभ मानले जाते. तसेच जे गरीब घरातील लोक सापांना आणि नागांना पकडुन त्यांना जंगलात सोडतात ,अशा लोकांना देखील नागपंचमी दिवशी आर्थिक मदत केली जाते.

आता आपण नागपंचमी दिवशी कोणत्या गोष्टी केल्या जातात याविषयाची माहिती पाहिली ,चला तर मग आता नागपंचमी दिवशी कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजेत ,याविषयीची माहिती पाहुयात. नागपंचमी दिवशी खालील गोष्टी केल्या नाही पाहिजेत.

१) आपण नागपंचमी दिवशी जीवित नागांची पूजा केली नाही पाहिजे किंवा पूजा करण्याच्या हेतूने जीवित नागांना आपण त्रास दिला नाही पाहिजे. आपण यादिवशी नागांच्या फोटोची किंवा नागांच्या मूर्तीची पूजा केली पाहिजे. 

२) नागपंचमी दिवशी आपण खोटे नाही बोलले पाहिजे.

३) नागपंचमी दिवशी आपण शेतात खुदाई नाही केली पाहिजे; कारण खुदाई केल्यामुळे सापांना व नागांना तसेच त्यांच्या बिळांना धोका उद्भवू शकतो.

४) काहींच्या मते नागपंचमी दिवशी आपण धारधार वस्तूंचा वापर केला नाही पाहिजे.

५) काहींच्या मते आपण नागपंचमी दिवशी तव्यावर जेवण केले नाही पाहिजे. 

६) नागपंचमी दिवशी आपण नाग देवतेला किंवा भगवान महादेवांना दुधाचा अभिषेक हा तांब्याच्या भांड्यात न करता ,त्यांना दुधाचा अभिषेक हा पितळेच्या भांड्यात केला पाहिजे.

बत्तीस शिराळा येथे नागपंचमी साजरा करण्याची पद्धत (How battis Shirala village celebrate Nag Panchami festival in Marathi)

दरवर्षी नागपंचमी सण हा बत्तीस शिराळा गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बत्तीस शिराळा गाव हे सांगली शहरा पासून साधारण ६० किलो मीटरच्या अंतरावर वसलेले एक गाव आहे. पूर्वी बत्तीस शिराळा गावामध्ये नागपंचमी सणा दिवशी जीवित नागांची मिरवणूक काढली जात होती.

पूर्वी नागपंचमी सणाच्या एक महिना अगोदर बत्तीस शिराळा गावातील विविध मंडळातील कार्यकर्ते जीवित नाग पकडण्यासाठी जात असत. गावातील सर्व मंडळांनी पकडलेल्या एकूण जीवित नागांची मिरवणूक नागपंचमी दिवशी काढली जात होती. यादिवशी कोणत्या मंडळाने मोठ्या फणांचा नाग पकडुन आणला किंवा कोणत्या मंडळाने आकाराने मोठा नाग पकडुन आणला ,अशा मंडळाना गावाकडून बक्षीस दिले जात होते.

परंतु ह्या सर्व गोष्टीमुळे नागांना खूप त्रास होत असे. त्यामुळे सरकारने २०१२ मध्ये नागांची मिरवणूक काढणे ,त्यांना त्रास देणे यावर बंदी घातली होती ; परंतु आजही बत्तीस शिराळा गावामध्ये नागपंचमी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

वर्तमानात बत्तीस शिराळा गावतील लोक नागपंचमी यादिवशी नाग देवतेच्या मूर्तीची मिरवणूक संपूर्ण गावातून काढतात. बत्तीस शिराळा गावातील नागपंचमी सण पाहण्यासाठी इतर गावातील लोक देखील दरवर्षी बत्तीस शिराळा येथे येत असतात.

FAQ

नागपंचमी सणा दिवशी कोणाची पूजा केली जाते ?

नागपंचमी सणा दिवशी नागांची ,सापांची पूजा केली जाते.

२०२४ वर्षामध्ये नागपंचमी सण हा कोणत्या दिवशी येत आहे ?

२०२४ मधील नागपंचमी सण हा ९ ऑगस्ट दिवशी शुक्रवारी येत आहे.

नागपंचमी सण केव्हा साजरा केला जातो ?

नागपंचमी सण हा श्रावण महिन्यातील एक महत्वाचा सण आहे.  हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पंचमीला साजरा केला जातो.

नागपंचमी सणा दिवशी कोणत्या गोष्टी केल्या जातात ?

नागपंचमी सणा दिवशी सकाळी लवकर उठले जाते. यादिवशी चांगले वस्त्र धारण करून नाग देवतेची पूजा केली जाते. तसेच यादिवशी ब्राम्हणांना गोड अन्नाचे भोजन दिले जाते आणि तेच गोड अन्नाचे भोजन कुटंबातीला सदस्यांनी एकत्र येऊन खाल्ले जाते. जे गरीब घरातील लोक नागांना व सापांना पकडुन त्यांना जंगलामध्ये सोडतात ,अशा गरीब घरातील लोकांना यादिवशी आर्थिक मदत केली जाते.

नागपंचमी दिवशी कोणत्या गोष्टी केल्या जात नाहीत ?

नागपंचमी दिवशी भगवान महादेवांना व नाग देवतेला तांब्याच्या भांड्यातून दुधाचा अभिषेक केला जात नाही ,तर त्यांना पितळेच्या भांड्यातून दुधाचा अभिषेक केला जातो. नागपंचमी सणा दिवशी धारधार वस्तूंचा वापर केला जात नाही ,तसेच नागांना व त्यांच्या बिळांना त्रास होऊ नये म्हणून यादिवशी शेतात खुदाई केली जात नाही.

आजच्या लेखामध्ये आपण नागपंचमी सणा विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण नागपंचमी सणा संबंधी असणारी पौराणिक कथा ,नागपंचमी सण साजरा करण्याची पद्धत ,बत्तीस शिराळा गावामध्ये नागपंचमी सण साजरा करण्याची पद्धत ,नागपंचमी सणा विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

1 thought on “नागपंचमी सणाची संपूर्ण माहिती Nagpanchami Festival Information In Marathi”

Leave a Comment