मदर टेरेसा यांची संपूर्ण माहिती Mother Teresa Information In Marathi

Mother Teresa Information In Marathi आपल्या भारतामध्ये भरपूर समाजसेवक होऊन गेले आणि त्यांनी समाजाची सेवा केली.त्या सर्व समाजसेवकांनी आपले आयुष्य समाजासाठी खर्च केले,आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका समाजसेविके बद्दल म्हणजे मदर टेरेसा यांच्या बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे मदर टेरेसा यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Mother Teresa Information In Marathi

मदर टेरेसा यांची संपूर्ण माहिती Mother Teresa Information In Marathi

मदर टेरेसा यांचा जन्म आणि त्यांचे कुटुंब / Birth of Mother Teresa and his family in Marathi

मदर टेरेसा यांचा जन्म मैसेडोनिया देशातील स्कोप्जे येथे २६ ऑगस्ट १९१० मध्ये झाला.मदर टेरेसा यांचे नाव “अगनेस गोंझा बोयाजू” असे होते.गोझा या शब्दाचा अर्थ फुलाची कळी.मदर टेरेसा यांच्या वडिलांचे नाव ” निकोला बोयाजू” होते आणि ते एक व्यावसायिक होते. मदर टेरेसा यांच्या आईचे नाव “द्राना बोयाजू” असे होता.

मदर टेरेसा जेव्हा ८ वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि त्यांना सांभळण्याची जबाबदारी त्यांच्या आईवर आली.मदर टेरेसा यांना एक भाऊ आणि एक बहिण होती.मदर टेरेसा या घरातील सर्वात छोट्या सदस्य होत्या.मदर टेरेसा यांना लहापणापासूनच संगीताची आवड होती.मदर टेरेसा आणि त्यांच्या बहिण गाणी गात असत.

नाव –अगनेस गोंझा बोयाजू उर्फ मदर टेरेसा
जन्म दिनांक –२६ ऑगस्ट १९१०
आईचे नाव – वडिलांचे नाव –निकोला बोयाजू द्राना बोयाजू
पुरस्कार –भारतरत्न ,नोबेल शांती पुरस्कार ,पद्मश्री ,इत्यादी
मृत्यू –५ सप्टेंबर १९९७

मदर टेरेसा यांचा “सिस्टर ऑफ लॉरेटो” संस्थेमध्ये प्रवेश / mother Teresa join sister of Loreto in Marathi

मदर तेरेसा जेव्हा १२ वर्षाच्या झाल्या ,तेव्हापासूनच त्यांना लोकांची सेवा करायची होती आणि जेव्हा मदर टेरेसा १८ वर्षाच्या झाल्या तेव्हा त्यांनी ,”सिस्टर ऑफ लॉरेटो” या संस्थेमध्ये प्रवेश केला.ही संस्था भारतातील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेतून शिकवत होती ,त्यामुळे मदर टेरेसा इंग्रजी शिकण्यासाठी आयर्लंड मध्ये गेल्या.

मदर टेरेसा यांचे भारतातील जीवन / Life of Mother Teresa in India in Marathi

१९२९ मध्ये मदर टेरेसा या त्यांच्या बाकी नन सहकाऱ्यांसह भारत देशातील दार्जिलिंग येथे आल्या.इथे त्यांना मिशनरी स्कूल मध्ये मुलांना शिकवण्यासाठी पाठवण्यात आले होते.यानंतर मदर टेरेसा या कोलकत्ता येथे गेल्या आणि कोलकत्ता येथे त्यांना बंगाल राज्यातील गरीब मुलींना शिकवण्याचे काम केले.

मदर टेरेसा यांना हिंदी आणि बंगाली दोन्ही भाषा येत होत्या.इथे कोलकत्ता मध्ये त्या शिक्षिकेची नोकरी करत होत्या.इथेच त्यांना टेरेसा असे नाव पडले .मदर तेरेसा यांनी आजीवन देवाची आणि लोकांची सेवा करण्याचा ध्यास घेतला आणि त्यांनी तो घेतलेला ध्यास आयुष्यभर पाळला.

१९४४ मध्ये त्या सेंट मेरी स्कूल च्या मुख्याध्यापिका झाल्या..”१९४८ मध्ये मदर टेरेसा बिहार मधील पटना येथे गेल्या आणि इथे त्यांना नर्सिंग ची ट्रेनिंग पूर्ण केले आणि परत त्या कोलकत्ता मध्ये आल्या.त्यानंतर त्या वृध्द लोकांची सेवा करणाऱ्या संस्थेमध्ये रुजू झाल्या.

टेरेसा यांना मिळाली मदर पदवी / Teresa recived title of Mother in Marathi

वर्ष १९३७ मध्ये टेरेसा यांना मदर ची पदवी मिळाली टेरेसा या सगळ्यांची आई सारखी काळजी घेत असत,त्यामुळे त्यांना लोक मदर टेरेसा म्हणून हाक मारत आणि पुढे जाऊन मदर हीच टेरेसा यांची ओळख झाली आणि आज संपूर्ण जग त्यांना मदर टेरेसा नावाने ओळखतात.

मदर टेरेसा यांचे विचार / Thoughts of Mother Teresa in Marathi

मदर टेरेसा यांनी कधीच पीडित लोकांमध्ये भेदभाव केला नाही ,त्या सर्वांना समान मानत असत.त्यांच्यामते ,”मानवाला भूक ही अन्नाची नाहीये ,तर भूक ही प्रेमाची आहे” .मदर टेरेसा यांच्या कामाला प्रभावित होऊन इतर समाजसेवक देखील भारतामध्ये आले आणि त्यांनी लोकांची सेवा केली. मदर टेरेसा यांच्या मते लोकांची सेवा करणे हे काम खूप अवघड आहे आणि यासाठी आपण आपले तन आणि मन लोकांची सेवा करण्यासाठी समर्पित केले पाहिजे.

“मिशनरी ऑफ चारिटी” संस्थेची स्थापना / Establish Missionary of charity in Marathi

मदर टेरेसा यांच्या सामाजिक कामाकडे लोकांचें लक्ष्य गेले आणि वर्ष १९५० मध्ये पंतप्रधान यांनी मदर टेरेसा यांना  “मिशनरी ऑफ चारिटी” ची स्थापना करण्यासाठी परवागणी दिली.या संस्थेचा मुख्य उद्देश्य हा होता की ,” या संस्थेच्या मदतीने गरीब आणि असहाय लोकांची मदत व्हावी ,ज्या लोकांना समाजामध्ये हवे ते स्थान मिळत नाही ,ज्या लोकांना समाजाकडून वाळीत टाकले जाते ,अशा लोकांना त्या संस्थेकडून आधार मिळवा.”

मदर टेरेसा यांना मिळालेले पुरस्कार / Awards received by Mother Teresa in Marathi

मदर टेरेसा यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी सरकारकडून त्यांना भरपूर पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.१९६२ मध्ये भारत सरकारने मदर टेरेसा यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला .त्यानंतर १९८० मध्ये भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारत पुरस्कार मदर टेरेसा यांना देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

त्यानंतर १९८५ मध्ये त्यांना मेडल ऑफ फ्रीडम नावाचा पुरस्कार मिळाला.१९७९ मध्ये मदर टेरेसा यांना नोबेल शांती पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.नोबेल पुस्कारामधे मिळालेली १९२,००० डॉलर इतकी रक्कम मदर टेरेसा यांनी गरीब लोकांसाठी खर्च करण्याचे ठरवले.

मदर टेरेसा यांचे निधन / Death of Mother Teresa in Marathi

१९८३ मध्ये ७३ व्या वर्षी मदर टेरेसा यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका आला.१९८९ मध्ये त्यांना हृदयविकाराचा दुसरा झटका आला.त्यानंतर त्यांचे हृदय हळू हळू खराब होऊ लागले आणि ५ सप्टेंबर १९९७ मध्ये मदर टेरेसा यांचे निधन झाले.

मदर टेरेसा यांचे जेव्हा निधन झाले तेव्हा त्यांचा ” मिशनरीज ऑफ चारीटी मध्ये ४००० सिस्टर आणि ३०० इतर सहकारी काम करत होत्या आणि ही संस्था त्यांच्या मृत्यू वेळी जगातील १२३ देशामध्ये लोकांची सेवा करत होती.

FAQ

मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला ?

मदर टेरेसा यांचा जन्म मैसेडोनिया देशात झाला.

मदर टेरेसा यांचा जन्म केव्हा झाला ?

मदर टेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० मध्ये मैसेडोनिया देशात झाला.

मदर टेरेसा यांचे नाव काय होते ?

मदर टेरेसा यांचे खरे नाव “अगनेस गोंझा बोयाजू” असे होते आणि यातील गोंझा नावाचा अर्थ ” फुलाची कळी” असा होतो.

मदर टेरेसा यांच्या आईचे नाव आणि त्यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

मदर टेरेसा यांच्या आईचे नाव ” द्राना बोयाजू” आणि त्यांच्या वडिलांचे नाव ” निकोला बोयाजू” होते.

मदर टेरेसा यांना मदर ही पदवी कोणत्या वर्षी देण्यात आली ?

मदर टेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरीब आणि असाह्य लोकांची सेवा करण्यामध्ये खर्च केले.गरीब घरातील मुलांना शिकवण्या पासून ते वृध्द लोकांची सेवा करण्या पर्यंत कामे मदर टेरेसा यांनी केली.त्या सर्वांची आईसारखी सेवा करत होत्या ,त्यामुळे वर्ष १९३७ मध्ये त्यांना मदर ही पदवी देण्यात आली.

मदर टेरेसा यांच्या कामासाठी त्यांना कोणकोणते पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता ?

मदर टेरेसा यांना त्यांच्या कामासाठी भारत सरकारकडून त्यांना पद्मश्री आणि  भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.मदर टेरेसा यांना नोबेल शांती पुरस्कार देखील मिळाला होता आणि या नोबेल शांती पुरस्कारा मध्ये मिळालेल्या रक्कमेतून त्यांनी गरीब लोकांना मदत करण्याचे ठरवले.

मदर टेरेसा यांची संस्था किती देशामध्ये लोकांची सेवा करत होती ?

मदर टेरेसा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेली ” मिशनरीज ऑफ चारीटी” नावाची संस्था जगभरातील १२३ देशामध्ये लोकांची सेवा करत होती.

मदर टेरेसा यांचे निधन केव्हा झाले ?

मदर टेरेसा यांचे निधन ५ सप्टेंबर १९९७ मध्ये वयाच्या ८७ व्या वर्षी झाले.

आजच्या लेखामध्ये आपण भारताचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीविषयी म्हणजे मदर टेरेसा यांच्या विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment