चंद्राची संपूर्ण माहिती Moon Information In Marathi

Moon Information In Marathi आपण नेहमी लहान मुलांना चंद्राच्या गोष्टी सांगत असतो. लहानपणी आपली आई चंद्र हा आपला मामा आहे ,असे आपल्या सांगत असते. चंद्राचा रात्रीच्या अंधारातील प्रकाश आपले मन मोहून टाकतो. जसा पौर्णिमेच्या चंद्राचा लख्ख प्रकाश सर्वाला मोहित करून टाकतो ,तसेच अमावस्येला चंद्राचा प्रकाश नसल्यामुळे काही लोकांना भीती देखील वाटते. आजच्या लेखामध्ये आपण याच चंद्रा विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे चंद्रा विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Moon Information In Marathi

चंद्राची संपूर्ण माहिती Moon Information In Marathi

चंद्राचा आकार १,७३७.१ किमी
चंद्राचे पृथ्वी पासूनचे अंतर ३,८४,४०० किमी
चंद्राचे तापमान १२७° C
चंद्राचे गुरुत्वाकर्षण १.६२ m/s २
पृथ्वीची एक फेरी मारण्यासाठी लागणारा कालावधी २७ दिवस
चंद्राचा जीवन कालावधी Moon

चंद्र (Moon in Marathi)

चंद्र हा आपल्या पृथ्वीचा एकमात्र उपग्रह आहे आणि तो पृथ्वी पासून ३,८४,४०० किलो मीटर इतक्या अंतरावर पृथ्वीच्या कक्षेमध्ये फिरत आहे. मानवाने पृथ्वी ग्रहा व्यतिरिक्त चंद्रावर आपले पाऊल टाकले आहे. चंद्र हा पृथ्वी भोवती फिरत असतो ,चंद्राला एकावेळी संपूर्ण पृथ्वीची फेरी पूर्ण करायला २७ दिवस एवढा कालावधी लागतो.

आपल्या पृथ्वीवर असणाऱ्या समुद्रात बनणाऱ्या मोठ्या लाटा या चंद्रामुळेच उत्पन्न होतात. आपल्या सूर्यमालेत १९० पेक्षा जास्त उपग्रह आहेत ,त्यातील आपल्या पृथ्वीचा उपग्रह चंद्र हा आपल्या सूर्यमालेतील पाचव्या क्रमांकाचा सर्वात मोठा उपग्रह आहे.

चंद्रावर कोणत्याही प्रकारचा वायू उपलब्ध नाही. शास्त्रज्ञांच्या मते ,“जर आपल्या पृथ्वी भोवती चंद्र फिरत नसता ,तर आपल्या पृथ्वीवर एकही जीव टिकू शकला नसता”. अमेरिकेच्या नासा संस्थेने चंद्रावर यशस्वी रित्या अपोलो नावाचे मिशन लाँच केले होते.

यामध्ये त्यांनी तीन शास्त्रज्ञ चंद्रावर पाठवले होते आणि याच मिशन मध्ये अमेरिकेतील नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पाहिले व्यक्ती झाले होते. त्यानंतर आतापर्यंत १०० पेक्षा जास्त देशांनी आपले चंद्रा संबंधी अंतरीक्ष यान चंद्रावर पाठवले आहे.

चंद्राचे पृथ्वी पासूनचे अंतर (Distance between moon and earth in Marathi )

चंद्र हा पृथ्वीपासून ३,८४,४०० किमी च्या अंतरावर आहे आणि तो पृथ्वीच्या कक्षेत फिरत असतो. शास्त्रज्ञांच्या मते ,“चंद्र आणि पृथ्वीचे जेवढे अंतर आहे ,तेवढ्या अंतरामध्ये ३० पृथ्वी बसतील”. तसेच शास्त्रज्ञांनी हा देखील शोध लावला आहे की ,“दरवर्षी चंद्र हा आपल्या पृथ्वी पासून दूर दूर सरकत चालला आहे ,दरवर्षी चंद्र हा आपल्या पृथ्वीपासून एक एक इंच दूर जात आहे.”

चंद्राला पृथ्वीची फेरी पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ (The time taken by the moon to complete one orbit around the earth in Marathi)

चंद्राला पृथ्वीची संपूर्ण एक फेरी पूर्ण करायला २७ दिवस इतका कालावधी लागतो. आपला पृथ्वी ग्रह देखील सूर्याभोवती कक्षेमध्ये फिरत असल्यामुळे आपल्याला चंद्राचे पृथ्वी भोवती एक संपूर्ण फेरी मारण्याचे अंतर हे २९ दिवस इतके वाटते ; परंतु पृथ्वीची एक संपूर्ण फेरी पूर्ण करण्यासाठी चंद्राला २७ दिवस एवढा कालावधी लागतो.

चंद्रावर पोहोचलेले पाहिले अंतरीक्ष यान ( First Spacecraft who reached on moon in Marathi)

ज्यावेळी अमेरिका आणि सोव्हिएत युनियन (रशिया) यांच्यामध्ये शीत युद्ध चालू होते ; तेव्हा अमेरिका आणि सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया यांच्यामधे प्रत्येक क्षेत्रामध्ये अव्वल राहण्यासाठी झुंज चालू होती. यातच दोन्ही देशांनी चंद्रावर अंतरीक्ष यान पोहोचवण्यासाठी प्रयत्न चालू केले.

१९५९ मध्ये सोव्हिएत युनियन ने चंद्रा संबंधी पाहिले लूना २ नावाचे अंतरीक्ष यान लाँच केले होते ; परंतु चंद्रा वर यशस्वी रित्या लाँच झालेले अंतरीक्ष यान हे सोव्हिएत युनियन चे लुना ९ हे होते आणि हे लुना ९ अंतरीक्ष यान सोव्हिएत युनियन देशाने १९६६ मध्ये लाँच केले होते.

चंद्रावर पाऊल ठेवणारे पाहिले व्यक्ती (First person who reached on moon in Marathi)

सोव्हिएत युनियन देशाने चंद्रावर पाहिले अंतरीक्ष यान यशस्वी रित्या लाँच केल्यानंतर अमेरिका देशाने चंद्रावर यशस्वी रित्या मानव पाठवण्यासाठी प्रयत्न चालू केले. यासाठी अमेरिकेच्या नासा संस्थेने खूप मेहनत घेतली आणि अमेरिकेतील नासा संस्थेच्या अपोलो ९ मिशन द्वारे चंद्रावर अंतरीक्ष यानातून तीन माणसे पाठवण्यात आली होती.

अमेरिकेतील नासा संस्थेद्वारे १९६८ मध्ये यशस्वी रित्या मानव पाठवण्यात आला होता आणि नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पाहिले व्यक्ती बनले होते. चंद्रावर मानव पाठवण्याचा उद्देश्य हा होता की ,“चंद्राच्या पृ्ठभागावरील माती आणणे आणि त्या माती द्वारे चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध लावणे”.

भारताचे चंद्रयान मिशन (India’s Moon mission in Marathi)

मिशन चंद्रयान १ (Mission Chandrayaan 1 in Marathi)

भारतामधील इस्रो संस्थेने आपले पाहिले चंद्रयान मिशन हे २२ ऑक्टोंबर २००८ मध्ये लाँच केले होते. आपल्या देशाने लाँच केलेले हे पहिले मिशन यशस्वी झाले होते. ह्या मिशन द्वारे लाँच करण्यात आलेले चंद्रयान हे चंद्राच्या पृष्ठभागापासून १०० किलो मीटर वरती चंद्राची प्रदक्षिणा घालत होते. जेव्हा आपल्या भारत देशाने पाहिले चंद्रयान यशस्वी रित्या लाँच केले होते ; तेव्हा आपल्या संपूर्ण देशामध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

मिशन चंद्रयान २ (Mission Chandrayaan 2 in Marathi)

चंद्रयान २ मिशन लाँच करण्यासाठी त्याकाळचे पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी परवानगी दिली होती. सुरवातीला चंद्रयान २ मिशन हे २०१३ मध्येच लाँच करण्याची योजना आखण्यात आली होती ; परंतु त्याकाळी आपल्या भारत देशाकडे आपले स्वतःचे अंतरीक्ष यान न्हवते आणि त्याकाळी रशिया देशाने आपले अंतरीक्ष यान देण्यासाठी भारताला अनुमती दर्शवली होती. त्यानंतर भारताने आपले स्वतःचे अंतरीक्ष यान बनवण्याचा निर्णय घेतला. याच कारणामुळे नंतर मिशन चंद्रयान २ हे २०१९ मध्ये लाँच करण्याचा निर्णय इस्रो ने घेतला.

चंद्रयान २ मिशन चा उद्देश्य हा होता की , “चंद्रयाना सोबत एक लैंडर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करायचे आणि चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग केलेला लैंडर चंद्राच्या पृष्ठभागावरती फिरेल व त्याच्याद्वारे चंद्राच्या पृष्ठभागावर असणाऱ्या गोष्टींचा शोध आपल्याला लावता येईल”.

भारताने लाँच केलेले चंद्रयान २ मिशन चे यान यशस्वी रित्या लाँच झाले ; परंतु काही कारणास्तव चंद्रयाना मध्ये असलेल्या लैंडरला यशस्वी रित्या सॉफ्ट लँडिंग करण्यामध्ये इस्रोला यश मिळाले नाही आणि भारताने लाँच केलेले हे दुसरे मिशन असफल ठरले.

मिशन चंद्रयान ३ (Mission Chandrayaan 3 in Marathi)

१४ जुलै २०२३ मध्ये भारताने मिशन चंद्रयान ३ चे यान सतीश धवन अंतरीक्ष केंद्रातून यशस्वी रित्या लाँच केले. हे लाँच केलेले चंद्रयान ५ ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्राच्या कक्षेमध्ये दाखल झाले आणि या यानातील लैंडरचे २३ ऑगस्ट २०२३ रोजी ६ वाजून ३ मिनिटांनी चंद्रावर यशस्वी रित्या सॉफ्ट लँडिंग झाले.

जे काम चंद्रयान २ मिशन वेळी अधुरे राहिले होते ,ते काम चंद्रयान ३ मिशन ने पूर्ण केले. या सॉफ्ट लँडिंग सोबत भारत हा चंद्राच्या पृष्ठभागावर अंतरीक्ष यान सोडणारा जगातील चौथा देश बनला. चंद्रयान ३ चे सॉफ्ट लँडिंग हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर झाले होते आणि चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लैंडरचे सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला बनला.

FAQ

पृथ्वी पासून चंद्र हा किती अंतरावर आहे ?

पृथ्वी पासून चंद्र हा ३,८४,४०० किमी अंतरावर आहे.

चंद्राला पृथ्वीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो ?

चंद्राला पृथ्वीची एक फेरी पूर्ण करण्यासाठी २७ दिवस इतका कालावधी लागतो.

आपल्या सूर्यमालेतील चंद्र हा कोणत्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे ?

आपल्या सूर्यमालेतील चंद्र हा पाचव्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे.

चंद्रावर पाऊल ठेवणारे पाहिले व्यक्ती कोण होते ?

नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पाहिले व्यक्ती होते.

कोणत्या देशाने चंद्राच्या पृष्ठभागावर पाहिले अंतरीक्ष यान यशस्वी रित्या पाठवले होते ?

सोव्हिएत युनियन म्हणजेच रशिया या देशाने १९६६ मध्ये चंद्रावर पाहिले अंतरीक्ष यान यशस्वी रित्या पाठवले होते.

निष्कर्ष (Conclusion)

आजच्या लेखामध्ये आपण पृथ्वीचा ग्रह असणाऱ्या चंद्रा विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण चंद्राचे पृथ्वी पासूनचे अंतर आणि चंद्राला पृथ्वीची एक फेरी मारण्यासाठी लागणारा कालावधी, चंद्रावर यशस्वी रित्या पाठवण्यात आलेले पाहिले यान आणि चंद्रावर पाहिले पाऊल ठेवणारा व्यक्ती ,इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली. तसेच चंद्रा संबंधी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे देखील आपण आजच्या लेखामधून पाहिली.

Leave a Comment