एमबीए कोर्सची संपूर्ण माहिती MBA Course Information In Marathi

MBA Course Information In Marathi आपल्या देशातील सर्वात लोकप्रिय पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स पैकी एक कोर्स म्हणजे “एमबीए कोर्स”. एमबीए कोर्स हा विद्यार्थ्यांना व्यावसायिक कार्यप्रणाली शिकवतो. आजच्या लेखामध्ये आपण याच एमबीए कोर्स विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे एमबीए कोर्स विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

MBA Course Information In Marathi

एमबीए कोर्सची संपूर्ण माहिती MBA Course Information In Marathi

कोर्सचे नाव एमबीए कोर्स
फुल्ल फॉर्म मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन
कालावधी २ वर्ष
प्रकार १) नियमित एमबीए कोर्स २) डीस्टन्स एमबीए कोर्स ३) ऑनलाइन एमबीए कोर्स
फी ५०,००० ते १०,००,०००

एमबीए फुल्ल फॉर्म (MBA full form in Marathi)

एमबीए चा फुल्ल फॉर्म हा “मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन” असा होतो आणि हा कोर्स विशेषतः विद्यार्थ्यांना व्यावसायिक कार्यप्रणाली संबंधी ज्ञान देण्यासाठी बनवण्यात आला आहे.

एमबीए हा दोन वर्षाचा कोर्स आहे आणि या कोर्स मध्ये एकूण ४ सेमीस्टर असतात. चारही सेमीस्टर पास झाल्यानंतर आपल्याला एमबीए पास झालेले सर्टिफिकेट भेटते. एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण नोकरी करू शकतो किंवा आपल्याला जर आपला स्वतःचा व्यवसाय चालू करायचा असेल तर ,आपण एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर एमबीए कोर्स मध्ये शिकवलेल्या ज्ञानाच्या आधारावर स्वतःचा व्यवसाय देखील चालू करू शकतो.

एमबीए कोर्सची फी (Fees of MBA course in Marathi)

भारतामध्ये लाखो एमबीए कोर्स करवून घेणारे कॉलेजेस आहेत आणि या सर्व कॉलेज मध्ये एमबीए कोर्सची फी वेगवेगळी आहे. आपल्या देशातील सरकारी कॉलेज मध्ये असणारी एमबीए कोर्सची फी ही खाजगी कॉलेज मध्ये असणाऱ्या एमबीए कोर्सच्या फी पेक्षा कमी असते ; परंतु सरकारी कॉलेज मध्ये आणि भारतातील टॉपच्या कॉलेज मध्ये एमबीए कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी प्रवेश परीक्षा आयोजित केली जाते. या प्रवेश परीक्षेच्या मेरिट वर त्या कॉलेज मध्ये एडमिशन मिळते.

भारतातील सरकारी कॉलेज मध्ये एमबीए कोर्स ची एका वर्षाची फी ही ५०,००० ते १,००,००० इतकी असते ,तर भारतातील टॉप च्या खाजगी कॉलेज मधील एमबीए कोर्सची एका वर्षाची फी ही १०,००,००० रुपये इतकी असते. इतर कॉलेजेस मध्ये एमबीए कोर्स ची एका वर्षाची फी ही १,००,००० इतकी असते. 

एमबीए कोर्सचे प्रकार (Types of MBA course in Marathi)

एमबीए कोर्स चे तीन प्रकार पडतात. चला तर मग आता आपण एमबीए कोर्स च्या तिन्ही प्रकाराविषयी विस्तार मध्ये माहिती पाहुयात.

१) नियमित एमबीए कोर्स – एमबीए कोर्स च्या या प्रकारामध्ये आपल्याला नियमित कॉलेजला जावे लागते. काही कॉलेज मध्ये या नियमित एमबीए कोर्स साठीचे एडमिशन हे प्रवेश परीक्षे द्वारे केले जाते ,तर काही ठिकाणी एडमिशन हे ग्रॅज्युएशन च्या मेरिट वरती केले जाते.

नियमित एमबीए कोर्स मध्ये चार सेमीस्टर असतात ,तर ह्या चारही सेमिस्टर च्या परीक्षा आपल्याला कॉलेज मध्ये जाऊन द्याव्या लागतात. काही कॉलेजस मध्ये नियमित एमबीए कोर्स साठी आपण एडमिशन घेतले असेल आणि आपण नियमित लेक्चरला जात नसू तर ,कॉलेजच्या नियमानुसार आपल्याला सेमीस्टर परीक्षेला बसता येत नाही.

२) डीस्टन्स एमबीए कोर्स – डीस्टन्स एमबीए कोर्स मध्ये नियमित कॉलेजला जावे लागते नाही. डीस्टन्स एमबीए कोर्स मध्ये आपण फक्त परीक्षेसाठी कॉलेजला गेले तरी चालते. या डीस्टन्स एमबीए कोर्स चे लेक्चर्स हे ऑनलाइन असतात. जे लोक नोकरी करतात आणि त्यांना नोकरी सोबत एमबीए कोर्सची डिग्री देखील पूर्ण करायची असते ,ते लोक जास्तकरून डीस्टन्स एमबीए कोर्स साठी एडमिशन घेतात.

३) ऑनलाइन एमबीए कोर्स – ऑनलाइन एमबीए कोर्सचे एडमिशन हे ऑनलाइन पद्धतीने केले जाते ,तसेच या कोर्स मध्ये ऑनलाइन मोड द्वारेच लेक्चर घेतली जातात. या ऑनलाइन एमबीए कोर्स मध्ये परीक्षा देखील ऑनलाइनच आयोजित केल्या जातात. या ऑनलाइन एमबीए कोर्स साठी जास्त करून एडमिशन हे नोकरी करणारे लोक घेतात. तसेच जे लोक इतर काम करतात आणि त्यांना पुढे शिकण्याची आवड आहे ; परंतु त्यांच्याकडे नियमित कॉलेज मध्ये जाण्यासाठी वेळ पुरेसा नसतो ,असे लोक ऑनलाइन कोर्स मध्ये एडमिशन घेतात.

एमबीए कोर्स साठी असणारी पात्रता निकष (Eligibility criteria for MBA course in Marathi)

१) एमबीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी आपले ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे. एमबीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी आपले कला ,वाणिज्य किंवा विज्ञान शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे.

२) काही कॉलेजेस मध्ये एमबीए कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी आपल्याला आपल्या ग्रॅज्युएशन मध्ये ५०% च्या वर मार्क्स पाडवी लागतात.

३) काही कॉलेजेस मध्ये एमबीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा असते आणि ज्यांना प्रवेश परीक्षेमध्ये चांगले मार्क्स पडतात, त्यांनाच त्या कॉलेज मध्ये एमबीए कोर्स साठी एडमिशन मिळते.

एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर असणाऱ्या करीयरच्या संधी (Career opportunities after completion of MBA course in Marathi)

एमबीए कोर्स हा पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स आहे आणि वर्तमानात तसेच भविष्यात हा कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्केट मध्ये स्कोप आहे. तुम्हाला जर एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढे शिकायची आवड असेल तर ,तुम्ही एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी पीएचडी साठी एडमिशन घेऊ शकता.

तुम्हाला जर एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर नोकरी करायची असेल तर ,तुम्ही खाजगी किंवा सरकारी विभागात नोकरी करत शकता. तसेच तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय उभा करायचा असेल तर ,तुम्ही एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर स्वतःचा नवीन व्यवसाय देखील उभा करू शकता.

एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळणारी सैलरी (Salary after completing MBA course in Marathi)

एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर आपण जर खाजगी क्षेत्रात नोकरी करणार असेल तर ,आपली सैलरी ही आपल्या कौशल्यावर आधारित असते ; परंतु साधारण एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर उमेदवाराची प्रत्येक वर्षाची सैलरी ही ४,००,००० ते ३२,००,००० रुपये इतकी असते.

FAQ

एमबीए चा फुल्ल फॉर्म काय आहे ?

एमबीए चा फुल्ल फॉर्म “मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन” असा होतो.

एमबीए कोर्स हा किती वर्षांचा कोर्स आहे ?

एमबीए कोर्स हा २ वर्षांचा कोर्स आहे आणि या दोन वर्षांमध्ये एकूण चार सेमीस्टर असतात. चार सेमीस्टर पास झाल्यानंतर आपल्याला एमबीए कोर्स पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट मिळते.

एमबीए कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी पात्रता निकष काय असते ?

एमबीए कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी उमेदवाराचे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण असले पाहिजे ,तसेच त्या उमेदवाराला ग्रॅज्युएशन मध्ये ५०% पेक्षा जास्त मार्क्स पडली असली पाहिजेत. एमबीए कोर्स मध्ये एडमिशन घेण्यासाठी काही कॉलेजेस त्यांची स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित करतात. त्या कॉलेज मध्ये एमबीए कोर्स साठी एडमिशन घेण्यासाठी आपल्याला त्यांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे गरजेचे असते.

एमबीए कोर्स ची फी साधारण किती असते ?

एमबीए कोर्स ची फी ही कॉलेज वरती आधारित असते. सरकारी कॉलेज मध्ये एमबीए कोर्सची फी ही कमी असते तर ,खाजगी कॉलेज मध्ये एमबीए कोर्स ची फी जास्त असते. साधारण भारतातील एमबीए कोर्स घेणाऱ्या कॉलेज मध्ये एमबीए कोर्सची एका वर्षाची फी ही ५०,००० ते १०,००,००० इतकी असते.

मी माझे ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण हे कला शाखेतून केले आहे तर ,मी एमबीए कोर्स साठी एडमिशन घेऊ शकतो का ?

हो तुम्ही कला शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर एमबीए कोर्स साठी एडमिशन घेऊ शकता. एमबीए कोर्स साठी एडमिशन कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतून ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी घेऊ शकतात.

आजच्या लेखामध्ये आपण व्यावसायिक कार्यप्रणाली संबंधी ज्ञान देणाऱ्या एका कोर्स विषयी म्हणजे “एमबीए कोर्स” विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण एमबीए कोर्सचा फुल्ल फॉर्म ,एमबीए कोर्स साठी असणारी पात्रता निकष, एमबीए कोर्सचे प्रकार ,एमबीए कोर्सची फी ,एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर असणाऱ्या करीयरच्या संधी, एमबीए कोर्स पूर्ण केल्यानंतर मिळणारी सैलरी, एमबीए कोर्स विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे, इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment