मैरी कॉम यांची संपूर्ण माहिती Mary Kom Information In Marathi

Mary Kom Information In Marathi आजच्या लेखामध्ये आपण बॉक्सिंग खेळातील एका थोर महिला खेळाडू विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या ,तसेच ५ वेळा बॉक्सिंग खेळात विश्व विजेता झालेल्या “मैरी कॉम” यांच्या जीवना विषयी आणि त्यांच्या बॉक्सिंग करियर विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Mary Kom Information In Marathi

मैरी कॉम यांची संपूर्ण माहिती Mary Kom Information In Marathi

नाव मैरी कॉम
पूर्ण नाव मैंगते चंग्नेइजैंग मैरी कॉम
जन्म १ मार्च १९८३
जन्म स्थळ मणिपूर ,भारत.
क्षेत्र बॉक्सिंग खेळाडू
पुरस्कार अर्जुन पुरस्कार (२००३) पद्मश्री (२००६) राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार (२००९) पद्म भूषण पुरस्कार (२०१३)

मैरी कॉम यांचा जन्म (Birth of Mary kom in Marathi)

मैरी कॉम यांचा जन्म मणिपूर येथे १ मार्च १९८३ मध्ये झाला होता. त्याने संपूर्ण नाव “मैंगते चंग्नेइजैंग मैरी कॉम” असे आहे ; परंतु आजही सर्वजण त्यांना “मैरी कॉम” या नावाने ओळखतात.

मैरी कॉम यांचे वडील हे एक शेतकरी होते आणि त्यांना चार मुले होते. मैरी कॉम या चार भावंडांपैकी सर्वात मोठ्या होत्या. त्या लहानपणी आपल्या लहान भावंडांची काळजी घेत असत.

मैरी कॉम यांचे शिक्षण (Education of Mary kom in Marathi)

मैरी कॉम यांचे ६ वी पर्यंतचे शिक्षण हे “लोकटक ख्रिचन मॉडल हायस्कूल” येथून झाले होते. पुढच्या शिक्षणासाठी मैरी कॉम यांच्या कुटुंबियांनी मैरी कॉम यांना “संत जेवियर कैथोलीक स्कूल” या शाळेत घातले.

इथे मैरी कॉम इयत्ता ८ वी पर्यंत शिकल्या आणि मैरी कॉम यांनी आपले ९ वी व १० वीचे शिक्षण हे “आदिवासी शाळेतून” पूर्ण केले. पुढे मैरी कॉम यांनी आपले ग्रॅज्युएशन पर्यंतचे शिक्षण “चुराचांदपुर कॉलेज” येथून पूर्ण केले.

मैरी कॉम यांचे सुरवातीचे जीवन (Early life of Mary kom in Marathi)

मैरी कॉम यांना लहानपणापासूनच विविध खेळ खेळण्याची आवड होती. मैरी कॉम जेव्हा शाळेत होत्या ,तेव्हा त्यांना फुटबॉल खेळ खेळायला खूप आवडत होते. सुरवातीला मैरी कॉम यांना बॉक्सिंग खेळामध्ये एवढी रुची न्हवती. १९८८ मध्ये एशियन गेम्स स्पर्धेमध्ये डींको सिंह यांनी भारतासाठी बॉक्सिंग खेळामध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. १९८८ मध्ये झालेल्या एशियन गेम्समध्ये बॉक्सिंग खेळामध्ये गोल्ड मेडल जिंकणारे डिंको सिंह हे देखील मणिपूर राज्याचे होते.

जेव्हा मैरी कॉम यांनी डिंको सिंह यांचा बॉक्सिंग खेळ पाहिला, तेव्हापासून त्यांची बॉक्सिंग खेळामध्ये रुची निर्माण झाली आणि मैरी कॉम यांनी आपले करियर बॉक्सिंग खेळामध्ये करायचे असे ठरवले. त्याकाळी बॉक्सिंग खेळ फक्त पुरुषच खेळत होते ,त्याकाळच्या स्त्रिया जास्तकरून बॉक्सिंग खेळ खेळत न्हवत्या ;परंतु मैरी कॉम यांचा निश्चय ठाम होता ,त्यांना आपले करियर बॉक्सिंग खेळातच करायचे होते.

बॉक्सिंग खेळामध्ये योग्य ते कौशल्य शिकण्यासाठी मैरी कॉम या बॉक्सिंग खेळाचे ट्रेनिंग घेऊ लागल्या. सुरवातीला आपण बॉक्सिंग खेळाचे ट्रेनिंग घेत आहोत ,ही गोष्ट मैरी कॉम यांना आपल्या घरच्यांना सांगितली नाही. पुढे मैरी कॉम यांनी “एम नरजीत सिंह” यांना बॉक्सिंग खेळाची ट्रेनिंग देण्यासाठी विनंती केली आणि नंतर मैरी कॉम ह्या “एम नरजीत सिंह” यांच्याकडे बॉक्सिंग खेळाची ट्रेनिंग घेऊ लागल्या. “एम नरजीत सिंह” हे मैरी कॉम यांचे बॉक्सिंग खेळाचे पाहिले गुरू होते.

मैरी कॉम यांचे बॉक्सिंग करियर (Boxing career of Mary kom in Marathi)

मैरी कॉम या बॉक्सिंग खेळामध्ये कौशल्यवान होण्यासाठी दिवसरात्र मेहनत घेत होत्या. त्यांना वाटत होते की ,”आपले घरचे आपल्या बॉक्सिंग करियरला कधीच स्वीकारणार नाहीत”. म्हणून मैरी कॉम या घरात न सांगता बॉक्सिंग खेळाच्या ट्रेनिंग घेत होत्या.

पुढे २००० मध्ये जेव्हा मणिपूर राज्यामध्ये “वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती तेव्हा ,या स्पर्धेमध्ये मैरी कॉम विजेत्या झाल्या होत्या आणि त्यांचे नाव व त्यांचा फोटो वृत्तपत्रामध्ये छापण्यात आला होता.

वृत्तपत्रात आलेला मैरी कॉम यांचा फोटो पाहून मैरी कॉम यांच्या घरच्यांना समजले की ,“आपली मुलगी बॉक्सिंग खेळ खेळत आहे”. तेव्हापासून मैरी कॉम यांच्या घरचे मैरी कॉम यांचा प्रत्येक विजय साजरा करू लागले. पुढे त्याच वर्षी २००० मध्ये बंगाल येथे आयोजित करण्यात आलेली  “वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा” देखील मैरी कॉम यांनी जिंकली होती.

२००१ मध्ये पहिल्यांदा मैरी कॉम यांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला होता. यावेळी त्यांचे वय १८ वर्ष इतके होते. २००१ साली झालेल्या “एआईबीए वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये” ४८ किलो वजनी गटामध्ये मैरी कॉम यांनी सिल्वर मेडल जिंकले होते. त्याच्या पुढच्या वर्षीच २००२ मध्ये मैरी कॉम यांनी तूर्क्ती येथे झालेल्या “एआईबीए वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये” ४५ किलो वजनी गटात भारतासाठी गोल्ड मेडल जिंकले होते.

२००३ मध्ये भारतात आयोजित झालेल्या “एशियन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये” मैरी कॉम यांनी ४६ किलो वजनी गटामध्ये गोल्ड मेडल जिंकले होते. तसेच २००५ मध्ये रशिया येथे झालेल्या “एआईबीए वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये” मैरी कॉम यांनी भारत देशासाठी गोल्ड मेडल जिंकले होते.

२००८ मध्ये आणि २०१० मध्ये आयोजित केलेल्या “एआईबीए वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये” गोल्ड मेडल जिंकुन मैरी कॉम या सलग ५ वेळा वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप जिंकणाऱ्या महिला खेळाडू बनल्या होत्या.

ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी मेडल जिंकायचे ,हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. मैरी कॉम यांना देखील देशासाठी ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मेडल जिंकायचे होते ,त्यासाठी त्यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सिंग खेळामध्ये मैरी कॉम यांनी ब्रौंझ मेडल जिंकले होते आणि या विजयानंतर त्या भारतातील ऑलिम्पिक स्पर्धेत मेडल जिंकणाऱ्या तिसऱ्या महिला खेळाडू बनल्या होत्या.

मैरी कॉम यांना त्यांच्या कार्यासाठी मिळालेले पुरस्कार (Awards received by Mary kom for his work in Marathi)

२००३ मध्ये भारत सरकारकडून मैरी कॉम यांच्या कार्यासाठी मैरी कॉम यांना अर्जुन पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच २००६ मध्ये मैरी कॉम यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

२००९ मध्ये मैरी कॉम यांना भारत सरकारकडून “राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार” देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. तसेच २०१३ मध्ये मैरी कॉम यांना भारत सरकारकडून पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले होते.

FAQ

मैरी कॉम यांचा जन्म केव्हा झाला होता ?

मैरी कॉम यांचा जन्म १ मार्च १९८३ मध्ये मणिपूर येथे झाला होता.

मैरी कॉम यांचे संपूर्ण नाव काय आहे ?

मैरी कॉम यांचे संपूर्ण नाव “मैंगते चंग्नेइजैंग मैरी कॉम” असे आहे.

मैरी कॉम यांचे बॉक्सिंग खेळाचे पाहिले गुरू कोण होते ?

एम नरजीत सिंह हे मैरी कॉम यांचे बॉक्सिंग खेळाचे पाहिले गुरू होते.

मैरी कॉम यांनी किती वेळा वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आहे ?

मैरी कॉम यांनी ५ वेळा वूमन बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली आहे.

२०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मैरी कॉम यांनी कोणते मेडल जिंकले होते ?

२०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये मैरी कॉम यांनी बॉक्सिंग खेळामध्ये भारत देशासाठी ब्राँझ मेडल जिंकले होते.

मैरी कॉम यांना त्यांच्या कार्यासाठी कोणकोणते पुरस्कार मिळाले आहेत ?

मैरी कॉम यांना त्यांच्या कार्यासाठी २००३ मध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता. तसेच २००६ मध्ये मैरी कॉम यांना पद्मश्री पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता. २००९ मध्ये मैरी कॉम यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार मिळाला होता. तसेच २०१३ मध्ये मैरी कॉम यांना भारत सरकारकडून पद्म भूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला होता.

मैरी कॉम यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाचे नाव काय आहे ?

“मैरी कॉम” नावाचा चित्रपट हा मैरी कॉम यांचा जीवनावर आधारीत आहे आणि हा चित्रपट २०१४ साली प्रदर्शित झाला होता.

आजच्या लेखामध्ये आपण २०१२ मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये देशासाठी बॉक्सिंग खेळामध्ये ब्राँझ मेडल जिंकणाऱ्या “मैरी कॉम” यांच्या जीवना विषयी संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment