मानव निर्मित आपत्तीची संपूर्ण माहिती Man Made Disaster Information In Marathi

Man Made Disaster Information In Marathi आपत्तींचे दोन प्रकार पडतात ,त्यातील पहिला प्रकार म्हणजे “नैसर्गिक आपत्ती” आणि दुसरा प्रकार प्रकार म्हणजे “मानवनिर्मित आपत्ती”. आजच्या लेखामध्ये आपण मानवनिर्मित आपत्ती विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. चला तर मग आजच्या लेखाद्वारे मानवनिर्मित आपत्ती विषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Man Made Disaster Information In Marathi

मानव निर्मित आपत्तीची संपूर्ण माहिती Man Made Disaster Information In Marathi

आपत्तीचे प्रकार नैसर्गिक आपत्ती , मानवनिर्मित आपत्ती
नैसर्गिक आपत्तीचे प्रकार पूर ,भूकंप ,ज्वालामुखी उत्सर्जन ,त्सुनामी ,इत्यादी
मानवनिर्मित आपत्तीचे प्रकाररेल्वे दुर्घटना ,रस्त्यावर होणारे अपघात , आग लागणे,विमान दुर्घटना ,बॉम्ब स्फोट ,रासायनिक आपत्ती ,महामारी ,भूस्खलन,इत्यादी.

नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती (Natural Disaster and Man made disaster in Marathi)

नैसर्गिक आपत्ती मध्ये नैसर्गिक गोष्टींचा समावेश असतो ,आणि बऱ्यापैकी सर्व नैसर्गिक आपत्ती मध्ये आपण मानव नैसर्गिक आपत्ती नियंत्रित करू शकत नाही. नैसर्गिक आपत्ती मध्ये पूर ,भूकंप ,ज्वालामुखी उत्सर्जन ,त्सुनामी ,इत्यादींचा समावेश असतो.

तर दुसऱ्या प्रकारामध्ये म्हणजे मानवनिर्मित आपत्ती मध्ये होणाऱ्या आपत्ती ला संपूर्ण रित्या मानवच जबाबदार असतो. मानवाच्या हलगर्जी मुळे मानवनिर्मित आपत्ती उद्भवतात. मानवनिर्मित आपत्तीचे नुकसान मानवा सोबत इतर प्राण्यांना देखील होते ,तसेच मानवनिर्मित आपत्ती मुळे निसर्गाचे देखील नुकसान होते.

नैसर्गिक आपत्ती मुळे देखील मानवाचे आणि इतर प्राण्यांचे नुकसान होते ; परंतु नैसर्गिक आपत्ती चे प्रमाण कमी करण्यासाठी आपण काहीही करू शकत नाही. तसेच मानवनिर्मित आपत्तीचे प्रमाण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो.

मानवनिर्मित आपत्तीचे कारण (Reason of Man made disaster in Marathi)

बदलत्या काळा सोबत जग देखील बदलत आहे. मानव दिवसेंदिवस प्रगती करत आहे, तसेच दिवसेंदिवस मानव तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती करत आहे. मानव आपले पुढचे जीवन सोपे जावे यासाठी नवनवीन यंत्रांचा शोध लावत आहे ; परंतु जेवढा माणूस प्रगतीच्या मार्गावर पुढे जात आहे ,तेवढाच तो निसर्गाला हानी देखील पोहोचवत आहे.

आपण मानवाने चांगले रस्ते बनवण्यासाठी जंगलातील झाडांची तोड केली. अशीच जर आपण आपल्या फायद्यासाठी जंगलतोड पुढे देखील करत राहिलो तर ,आपण हा विचार केला पाहिजे की ,“आपल्या पुढच्या पिढीला श्वास घेण्यासाठी झाडे तरी शिल्लक राहतील का ?” आणि आपण आपल्याला जेवढे शक्य तेवढे निसर्गाला हानी पोहोचवण्याचे काम कमी केले पाहिजे.

मानवनिर्मित आपत्तीचे सर्वात मोठे कारण हे “मानवाचा हलगर्जीपणा” आहे. आपण तंत्रज्ञान क्षेत्रात दिवसेंदिवस प्रगती करत आहे ; परंतु जेवढी आपण तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये प्रगती केली आहे , तेवढाच त्याचा नुकसान आपल्याला होत आहे.

मानवनिर्मित आपत्तीचे प्रकार (Types of Man made Disaster in Marathi)

मानवनिर्मित आपत्तीचे प्रकार खूप आहेत ,त्यातील काही प्रकार खालीलप्रमाणे आहेत :

१) रेल्वे दुर्घटना – दरवर्षी जगभरामध्ये रेल्वे दुर्घटने मध्ये हजारो लोकांना आपला जीव गमावावा लागतो. आपण “रेल्वे दुर्घटना मध्ये एवढ्या माणसांचा मृत्यू झाला आणि एवढ्या माणसांना दुखापत झाली “ अशी बातमी सारखी एकत किंवा बघत असू. कारण आपल्या भारत देशामध्ये रेल्वे दुर्घटना चे प्रमाण खूप आहे. रेल्वे दुर्घटना चे मुख्य कारण हे “व्यवस्थित नसणारा रेल्वे मार्ग” आहे.

२) रस्त्यावर होणारे अपघात – जगभरामध्ये रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची संख्या देखील दिवसेंदिवस वाढत आहे. पूर्वी गाड्यांची संख्या कमी होती आणि पूर्वी गाड्यांवरून होणाऱ्या अपघातांची संख्या देखील कमी होती. परंतु आता गाड्यांची संख्या देखील खूप वाढली आहे आणि गाड्यांमुळे होणाऱ्या अपघातांची संख्या देखील खूप वाढली आहे. जास्तकरून अपघात हे चालकाच्या हलगर्जीपणा मुळे होतात ,तर काही अपघात हे चालकाने रस्त्याच्या नियमाचे पालन न केल्यामुळे होतात.

समजा एक चालक आहे आणि तो चालक रस्त्याच्या नियमाचे पालन करत नाही, तो कशीही गाडी चालवत आहे आणि त्याने समोरच्या दुसऱ्या गाडीला धक्का दिला ,तर त्या समोरच्या गाडीवर बसणाऱ्या माणसाची काहीही चुकी नसताना ,त्याला ह्या चालकाच्या चुकीमुळे अपघाताचा सामना करावा लागणार. तर आपण सर्वांनी गाडी चालवताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे आणि आपण गाडी चालवताना रस्त्याच्या नियमांचे पालन केले पाहिजे.

३) आग लागणे – मानवनिर्मित आपत्तीचा “आग लागणे” हा देखील प्रकार आहे. मानवाच्या लापरवाही मुळे काहीवेळा आग लागते आणि या आगी मुळे खूप लोकांचा मृत्यू देखील होतो. आपल्या भारतामध्ये भरपूर रासायनिक कंपन्या आहेत आणि यातील काही कंपन्यांमध्ये काही वेळा मानवाच्या हलगर्जीपणा मुळे आग लागते.

या आगीमध्ये कित्येक त्या रासायनिक कंपनी मध्ये काम करणाऱ्या मजदुरांचा मृत्यू होतो. जंगलांमध्ये आग लागण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिस वाढत आहे. पर्यटकांच्या चुकीमुळे जंगलामध्ये आग लागते ,तर या आगीमुळे जंगलातील काही झाडे जळून खाक होतात.

४) विमान दुर्घटना – विमान दुर्घटना होण्याचे प्रमाण देखील दिवसेंदिवस वाढत आहे. विमान दुर्घटना चे मुख्य कारण “तंत्रज्ञान मधील खराबी” हे असते. या तंत्रज्ञान मध्ये झालेल्या खराबी मुळे विमान दुर्घटना होते आणि यामध्ये निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागतो.

५) बॉम्ब स्फोट – दहशतवादी आपल्या दुश्मन देशाचे नुकसान व्हावे , यासाठी त्या दुश्मन देशामध्ये बॉम्ब स्फोट करतात. ज्या ठिकाणी बॉम्ब स्फोट केला जातो ,त्याठिकाणी असणाऱ्या लोकांचें निधन या बॉम्ब स्फोट मुळे होते.

६) रासायनिक आपत्ती – जग विज्ञान क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस प्रगती करत आहे. आपल्या भारतामध्ये भरपूर प्रमाणात रासायनिक कंपन्या आहेत आणि या रासायनिक कंपन्यांमध्ये मानवाला आणि निसर्गाला हानिकारक असे गॅस देखील आहेत.

काही वेळा मानवाच्या हलगर्जीपणा मुळे या रासायनिक कंपन्यांमधील हानिकारक गॅस वायुमध्ये पसरला जातो आणि याचे नुकसान मानवाला होते ,तसेच या रासायनिक कंपन्यामधील हानिकारक गॅस वायुमध्ये पसरल्यामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होते.

७) महामारी – महामारी ही जिवाणू आणि विषाणू यांच्यामुळे उत्पन्न होते. आपण मागील तीन वर्षापूर्वी कोरोना सारख्या महामारी चा सामना केला आहे. ह्या कोरोना महामारी चे नुकसान चायना देशामुळे संपूर्ण जगाला भोगावे लागले होते. कोरोना महामारी मुळे संपूर्ण जगभरातील भरपूर लोकांना आपला जीव गमवावा लागला. काही लोकांचे तर कुटुंब च्या कुटुंब या महामारी मध्ये नष्ट झाले होते. मागच्या काही वर्षांमध्ये जगाने प्लेग ,कोरोना, इत्यादीं सारख्या महामारीचा सामना केला आहे.

८) भूस्खलन – आपण मानवाने भरपूर प्रमाणात जंगलतोड केली आहे. झाडांची तोड केल्यामुळे त्या झाडाखाली असलेल्या मातीवर वायूचा आणि पाण्याचा दबाव पडतो आणि ती खालची माती कमकुवत होते. तसेच अतिवृष्टी झाल्यामुळे देखील ती माती कमकुवत होते आणि यामुळे भूस्खलन चा धोका उद्भवतो.

FAQ

आपत्तीचे प्रकार किती पडतात ? आणि ते आपत्तीचे प्रकार कोणकोणते आहेत ?

आपत्तीचे प्रकार दोन पडतात आणि त्यातील पहिला प्रकार म्हणजे “नैसर्गिक आपत्ती” आणि त्यातील दुसरा प्रकार म्हणजे “मानवनिर्मित आपत्ती”. नैसर्गिक आपत्ती ही निसर्गामुळे होते आणि याचे नुकसान मानवाला आणि इतर प्राण्यांना भोगावे लागतात. मानवनिर्मित आपत्ती ही मानवाच्या हलगर्जी मुळे होते आणि याचे नुकसान मानवा सोबत इतर प्राण्यांना देखील भोगावे लागतात. मानवनिर्मित आपत्तीमुळे निसर्गाचे देखील नुकसान होते.

नैसर्गिक आपत्ती मध्ये कोणकोणत्या गोष्टी सामील आहेत ?

नैसर्गिक आपत्ती मध्ये त्सुनामी ,महापूर ,भूकंप ,ज्वालामुखी उत्सर्जन ,इत्यादी सामील आहेत.

मानवनिर्मित आपत्ती मध्ये कोणकोणत्या गोष्टी सामील आहेत ?

मानवनिर्मित आपत्ती मध्ये रेल्वे दुर्घटना ,रस्त्यावर होणारे अपघात ,आग लागणे ,बॉम्ब स्फोट ,विमान दुर्घटना ,रासायनिक आपत्ती ,महामारी ,भूस्खलन ,इत्यादी गोष्टी सामील आहेत.

मानवनिर्मित आपत्तीचे कारण काय आहे ?

मानवनिर्मित आपत्ती ही मानवाच्या हलगर्जीपणा मुळे होते आणि याचे नुकसान मानवा सोबत इतर प्राण्यांना देखील भोगावे लागतात.

आजच्या लेखामध्ये आपण मानवनिर्मित आपत्ती विषयी संपूर्ण माहिती पाहिली. तसेच आजच्या लेखामधून आपण नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती ,मानवनिर्मित आपत्तीचे कारण ,मानवनिर्मित आपत्तीचे प्रकार जसे की ,रेल्वे दुर्घटना ,रस्त्यावर होणारे अपघात , आग लागणे,विमान दुर्घटना ,बॉम्ब स्फोट ,रासायनिक आपत्ती ,महामारी ,भूस्खलन आणि मानवनिर्मित आपत्ती विषयी विचारल्या जाणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे इत्यादी विषयांची संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment