माळशेज घाटाची संपूर्ण माहिती Malshej Ghat Information In Marathi

Malshej Ghat Information In Marathi आपल्या भारत देशाला निसर्गाची देणगी लाभली आहे.आपल्या भारत देशात खूप निसर्गरम्य ठिकाणे आहेत. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यात देखील भरपूर निसर्गरम्य ठिकाणे आहेत ,यात धबधबे ,घाट ,झरे , हवीची ठिकाणे,इत्यादींचा समावेश आहे.महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटामध्ये स्थित असलेल्या एका घाटाबद्दल म्हणजे माळशेज घाटाबद्दल संपूर्ण माहिती आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे माळशेज घाटाविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.

Malshej Ghat Information In Marathi

माळशेज घाटाची संपूर्ण माहिती Malshej Ghat Information In Marathi

घाटाचे नाव –माळशेज घाट
जिल्हा –ठाणे
राज्य –महाराष्ट्र
उंची –७०० मिटर
घाटा जवळील प्रेक्षणीय ठिकाणे –जोगा धरण,हरिश्चंद्र गड ,आजोबा किल्ला

माळशेज घाट / Malshej Ghat in Marathi

माळशेज घाट हा महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटामधील एक प्रमुख घाट आहे.माळशेज घाटा जवळ भरपूर झरे ,धबधबे ,जंगले उपलब्ध आहेत आणि माळशेज घाट हा निसर्गरम्य ठिकाणी वसला असल्यामुळे इथे सदैव प्रेक्षकांची गर्दी असते .माळशेज घाटा च्या या सौंदर्याकडे लोक आकर्षित होतात.माळशेज घाटा च्या आसपास जंगले ,पहाड उपलब्ध आहेत त्यामुळे ज्या लोकांना ट्रेकिंग करायला आवडते ,त्या लोकांसाठी माळशेज घाट एक चांगला पर्यटन पर्याय आहे.

माळशेज घाट हा महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात स्थित असून ,तो घाट बघण्यासाठी राज्याबाहेरची पर्यटक लोक देखील येत असतात.माळशेज घाट हा तेथील विचित्र प्रजातीचे पक्षी ,विचित्र प्रजातीची झाडे आणि मन मोहून टाकणारा निसर्ग यासाठी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे.

माळशेज घाटाचे तापमान / Temeprature of Malshej Ghat in Marathi

पावसाळ्यात माळशेज घाटा जवळील परिसरात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो.पावसाळ्यात माळशेज घाटा जवळचे तापमान काही वेळा ३० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचते.पावसाळ्यात माळशेज घाटाजवळील निसर्ग बघण्यासारखा असतो.त्यामुळे बऱ्यापैकी पर्यटक पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात हा माळशेज घाट पाहण्यासाठी जातात.

उन्हाळ्यात माळशेज घाटा जवळील परिसराचे तापमान ४० डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचते.हिवाळ्यात माळशेज घाटा जवळील परिसराचे तापमान १५ डिग्री सेल्सिअस इतके असते.त्यामुळे हिवाळ्यात देखील भरपूर मंडळी माळशेज घाट पाहण्यासाठी येतात.

पर्यटकांसाठी माळशेज घाट हा चांगला पर्याय / Malshej Ghat is one of the best option for tourists in Marathi

पर्यटकांसाठी माळशेज घाट हा एक चांगला पर्याय आहे ,कारण माळशेज घाटा ला निसर्गाची देन तर मिळालीच आहे ,परंतु आता माळशेज घाटा जवळ साहसी ॲक्टीविटीज देखील उपलब्ध झाल्या आहेत ,त्यामुळे ज्या लोकांना  साहसी ॲक्टीविटीज करायला आवडतात ,त्या लोकांना देखील साहसी ॲक्टीविटीज करण्यासाठी माळशेज घाट हा चांगला पर्याय आहे.

माळशेज घाटाजवळील परिसरात भरपूर धबधबे देखील आहेत.ज्या लोकांना धबधबे बघायला आवडत असतील ,त्यांच्यासाठी देखील माळशेज घाट हा चांगला पर्याय आहे.माळशेज घाटा जवळील परिसरात जंगले आणि पहाडे देखील आहेत ,त्यामुळे ज्या लोकांना ट्रेकिंग करायला आवडते ,ते माळशेज घाटा जवळ उपलब्ध असणाऱ्या डोंगरावर ट्रेकिंग करू शकतील.

माळशेज घाटा जवळील असणारी पर्यटन स्थळे / Tourist places near Malshej Ghat in Marathi

१) पिंपळगाव जोगा धरण –  माळशेज घाटा जवळील पिंपळगाव येथे जोगा नावाचे धरण आहे आणि जे धरण पुष्पवती नावाच्या नदीवर बांधलेले आहे.ह्या ठिकाणी बर्ड विविंग पॉइंट आहे आणि हा बर्ड वी पॉइंट पाहण्यासाठी देशभरातील लोक इथे येत असतात.या ठिकाणी गुलाबी राजहंस नावाचा विचित्र प्रजातीचा प्राणी आढळतो आणि हा प्राणी पर्यटकांना जोगा धरण जवळ उपलब्ध असणाऱ्या बर्ड विव पॉइंट पाहण्यासाठी आकर्षित करतो.

२) हरिश्चंद्र गड – हरिश्चंद्र गडाला एतिहासिक वारसा लाभला आहे आणि हा हरिश्चंद्र गड माळशेज घाटा जवळ उबलब्ध आहे.हा हरिश्चंद्र गड समुद्र सपाटी पासून १,४२४ मिटर च्या उंचीवर आहे आणि हा गड सहाव्या शतकामध्ये बांधण्यात आला होता.ज्या लोकांना ट्रेकिंग करायची आवड आहे ,त्या लोकांसाठी माळशेज घाटा जवळ असणारा हरिश्चंद्र गड एक चांगला पर्याय आहे.

३) आजोबा किल्ला – आजोबा किल्ला हा देखील माळशेज घाटा जवळील प्रमुख ठीकाणांपैकी एक ठिकाण आहे.हा आजोबा किल्ला हिरव्या झाडांमध्ये वसलेल्या असल्यामुळे हा किल्ला बघणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे.हा किल्ला सर करणे ,इतकेही सोपे नाहीये ,त्यामुळे इथे साहसी ट्रेकर ट्रेकिंग करायला येत असतात.

मुंबई आणि पुण्यापासून माळशेज घाटा पर्यंतचे अंतर / Distance from Mumbai And Pune to Malshej Ghat in Marathi

मुंबई पासून माळशेज घाटाचे अंतर १२९ किलोमिटर इतके आहे आणि पुण्या पासून माळशेज घाटाचे अंतर १२६ किलो मिटर इतके आहे.मुंबई मधून भरपूर एस टी माळशेज घाटाकडे जात असतात.कल्याण मधून देखील भरपूर एस टी माळशेज घाटाकडे जात असतात.पुणे ते माळशेज घाटाचा एस टी मार्ग देखील व्यवस्थित आहे ,त्यामुळे पुण्यातून देखील निश्चित वेळेनंतर सतत एस टी माळशेज घाटाकडे जात असतात.

माळशेज घाटा पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन / Nearest Railway station to Malshej Ghat in Marathi

माळशेज घाटा पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कल्याण आहे आणि कल्याण पासून माळशेज घाटापर्यंतचे अंतर ८५ किलो मिटर इतके आहे आणि रेल्वे ने कल्याण पासून माळशेज घाटा पर्यंत जायला २ तास एवढा वेळ लागतो.

माळशेज घाटा पासून सर्वात जवळचे विमानतळ / Nearest Airport to Malshej Ghat in Marathi

माळशेज घाटा पासून सर्वात जवळचे विमानतळ हे मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आणि या विमानतळापासून माळशेज घाटा पर्यंतचे अंतर १२९ किलो मिटर इतके आहे.

माळशेज घाटाजवळील दवाखाना / Nearest Hospital from Malshej Ghat in Marathi

माळशेज घाटा जवळ खूप रिसॉर्ट आणि हॉटेल्स देखील उपलब्ध आहेत आणि माळशेज घाटाजवळ सर्वात जवळचा दवाखाना हा माळशेज घाटा पासून २५ किलो मिटर च्या अंतरावर आहे आणि हा एक सरकारी दवाखाना आहे.माळशेज घाटा च्या सुरवातीलाच एक पोलीस स्टेशन आहे.

माळशेज घाट बघण्यासाठी उत्तम महिने / Best months to visit Malshej Ghat in Marathi

माळशेज घाट हा निसर्गरम्य ठिकाणी वसलेला असल्यामुळे १२ ही महिने इथे पर्यटकांची गर्दी असते.परंतु पावसाळ्यात इथे भरपूर प्रमाणत पाऊस पडतो आणि पावसाळ्यात या ठिकाणची धबधबे लोकांना आकर्षित करतात.माळशेज घाट ला भेट देण्यासाठी सर्वात चांगले महिने म्हणजे ऑगस्ट पासून सप्टेंबर पर्यंत.

FAQ

माळशेज घाट हा घाट कोणत्या जिल्ह्यात वसलेला आहे ?

माळशेज घाट हा महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यात वसलेला आहे.

माळशेज घाटाची उंची किती आहे ?

माळशेज घाटाची उंची ७०० मिटर इतकी आहे.

माळशेज घाटा पासून मुंबई पर्यंतंचे अंतर किती आहे ?

मुंबई पासून माळशेज घाटा पर्यंतचे अंतर १२९ किलो मीटर इतके आहे.

पुण्यापासून माळशेज घाटा पर्यंतचे अंतर किती आहे ?

पुण्यापासून माळशेज घाटा पर्यंतचे अंतर १२३ किलो मीटर इतके आहे.

माळशेज घाटा जवळ कोणकोणती पर्यटक स्थळे आहेत ?

माळशेज घाट हा निसर्गरम्य ठिकाणी वसलेला असल्यामुळे इथे भरपूर पर्यटक स्थळे आहेत.आजोबा किल्ला , हरिश्ंद्रगड ,जोगा धरण ,इत्यादी प्रसिद्ध ठिकाणे माळशेज घाटा जवळ उपलब्ध आहेत.

माळशेज घाटा पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन कुठे आहे ?

माळशेज घाटा पासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे कल्याण ला आहे आणि कल्याण पासून माळशेज घाटा पर्यंतचे अंतर ८५ किलो मिटर इतके आहे.

माळशेज घाटा पासून सर्वात जवळचे विमानतळ कोठे आहे ?

माळशेज घाटा पासून सर्वात जवळचे विमानतळ हे मुंबई ला आहे ,ज्याचे अंतर माळशेज घाटा पासून १२९ किलो मीटर इतके आहे.

आजच्या लेखामध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटामध्ये वसलेल्या एका घाटा बद्दल म्हणजे माळशेज घाटा बद्दल संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment