मकर संक्रांती सणाची संपूर्ण माहिती Makar Sankranti Festival Information In Marathi

Makar Sankranti Festival Information In Marathi आपल्या भारत देशात सर्व धर्माचे उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरे केले जातात ,उत्सव साजरा करण्यामागे हाच मुख्य उद्देश असतो की , “समाजातील सर्व लोकांनी एकत्रित येऊन ,मोठ्या उत्साहात सण साजरे करावेत .”आजच्या लेखामध्ये आपण अशाच एका सणा बद्दल म्हणजे ” मकर संक्रांती” सणाबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत.चला तर मग आजच्या लेखाद्वारे मकर संक्रांती सणाविषयी माहिती जाणून घेऊयात.

Makar Sankranti Festival Information In Marathi

मकर संक्रांती सणाची संपूर्ण माहिती Makar Sankranti Festival Information In Marathi

सणाचे नाव –मकर संक्रांती
तिथी –सूर्य उत्तरायण झाल्यानंतर
तारीख –१४ जानेवारी किंवा १५ जानेवारी
महत्व –सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश झाल्यानंतर हा सण साजरा केला जातो.

मकर संक्रांती / Makar Sankranti In Marathi

मकर संक्रांती हा दरवर्षी इंग्रजी कॅलेंडर नुसार येणार पहिला सन आहे.मकर संक्रांती हा हिंदू धर्मीय लोकांचा सण आहे ,तरीही इतर धर्मातील लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरे करतात.मकर संक्रांती हा सण दरवर्षी जानेवारी महिन्यातील १४ किंवा १५ तारखेला असतो.ह्या सणा दिवशी तीळ आणि गूळ चे एक मिश्रीत साधन करून , ते मिश्रीत साधन एकमेकात वाटले जाते ,याला आपण तीळगूळ म्हणतो.

मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मातील प्रमुख सणापैकी एक सण आहे.देशातील लोक मकर संक्रांती हा सण पतंग उडवून साजरा करतात. मकर संक्रांती हा सण देशातील विविध राज्यांमध्ये विविध नावाने ओळखला जातो.

मकर संक्रांती सणाचे वैशिष्ट्य / Uniqueness of Makar Sankranti festival in Marathi

आपल्या हिंदू धर्मात तिथींना जास्त महत्व असते ,त्यामुळे आपले सर्व सण तिथी नुसार येत असतात आणि इंग्रजी कॅलेंडर नुसार हे सण दरवर्षी वेगवेगळ्या तारखेला येत असतात .परंतु मकर संक्रांती हा एकमेव हिंदू सण आहे जो ,इंग्रजी कॅलेंडर नुसार दरवर्षी १४ जानेवारी किंवा १५ जानेवारी ला येतो.हा सण जास्त करून दरवर्षी १४ जानेवारी या दिवशी येतो.

मकर संक्रांती सण साजरा करण्याचा कालावधी / Celebration period of Makar Sankranti festival in Marathi

मकर संक्रांती हा सण सूर्य उत्तररायन मध्ये गेल्यानंतर साजरा केला जातो.हिंदू धर्मातील मकर संक्रांती या सणाचा सबंध थेट सूर्य आणि पृथ्वी यांच्याशी आहे.सूर्य जेव्हा मकर रेखे मध्ये येतो ,तेव्हा तो दिवस १४ जानेवारी हा असतो आणि याच दिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो.कधी कधी सूर्य मकर रेखेत येण्याचा दिवस हा १५ जानेवारी असतो.

मकर संक्रांती साजरी करण्याची पद्धत / How to celebrate Makar Sankranti in Marathi

मकर संक्रांती सणा दिवशी हिंदू धर्मातील लोक सकाळी लवकर उठतात.मकर संक्रांती ह्या सणाला तीळगुळाचा मान आहे ,त्यामुळे ह्या सना दिवशी लवकर उठून घरातील लोक मिळून तिळगुळ खातात.मकर संक्रांती सणा दिवशी लोक पतंग उडवतात ,त्यामुळे या दिवशी हिंदू धर्मातील लोक आपल्या कुटुंबातील लोकांना घेऊन किंवा आपल्या मित्रांना घेऊन गच्चिवर किंवा मैदानात जाऊन पतंग उडवतात.घरातील मंडळी या मकर संक्रांती दिवशी रात्री तिळगुळ घेऊन ते तिळगुळ आपल्या शेजाऱ्यांना द्यायला जातात.

भारत देशातील विविध राज्यात मकर संक्रांती हा सण विविध नावाने ओळखला जातो आणि विविध राज्यातील लोक या मकर संक्रांती सणा दिवशी वेगवेगळे भोजन करून हा सण साजरा करतात.तसे तर मकर संक्रांती दिवशी खिचडी खाण्याचा मान आहे .यादिवशी खिचडी मध्ये गूळ घालून ती खिचडी खाल्ली जाते.

या दिवशी तिळगूळ खायची देखील परंपरा आहे.मकर संक्रांती हा सण हिवाळ्यात येत असल्यामुळे आणि तीळ गुळा मध्ये उष्णता जास्त असल्यामुळे या सणादिवशी तीळ गुळाचे सेवन केले जाते.हिवाळ्यात आपण तिळगुळ खाल्ले तर आपल्या शरीराला तीळ गुळामुळे उष्णता मिळते.

देशभरातील लोक मकर संक्रांती दिवशी पतंग उडवून हा सण साजरा करतात.काही ठिकाणी या मकर संक्रांती दिवशी पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते .परंतु काही वेळा आकाशात उडत असलेल्या पतांगामुळे काही पक्षांचा मृत्यू देखील होतो ,त्यामुळे आपण जर मकर संक्रांती दिवशी पतंग उडवत असलो ,तर आपण आपल्यामुळे पक्ष्यांना काही त्रास होणार नाही ,याची दक्षता घेतली पाहिजे.

विविध राज्यात असणारी या सणाची वेगवेगळी नावे / Different names of this festival in different states in Marathi

देशातील विविध राज्यांमध्ये मकर संक्रांती हा सण विविध नावाने साजरा केला जातो.महाराष्ट्र ,कर्नाटक ,केरळ ,आंध्रप्रदेश या राज्यामध्ये या सणाला मकर संक्रांती म्हणले जाते ,आपल्या देशातील तामिळनाडू राज्यात या सणाला पोंगल म्हणले जाते.पंजाब अनीनहरियाणा मध्ये ह्या सणाला लोहरी म्हणले जाते.या दिवशी पंजाब आणि हरियाणा तील लोक पीक लावायला सुरवात करतात. आसाम राज्यातील लोक या सूर्य मकर रेखेत गेलेल्या दिवशी बिहू सण साजरा करतात.

ज्योतिष शास्त्रानुसार असणारे मकर संक्रांतीचे महत्व / importance of Makar Sankranti in astrology in Marathi

आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्योतिष शास्त्राला खूप महत्व आहे.ज्योतिष शास्त्राच्या मते ,सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ,त्या दिवशी मकर संक्रांती सण साजरा केला जातो.मकर संक्रांती हा सण हिंदू धर्मामधील महत्वाच्या सणापैकी एक सण आहे.

हिंदू धर्म शास्त्रा नुसार मकर संक्रांती दिवशी आपण जर  तीर्थ क्षेत्राला गेलो ,तर आपल्याला पुण्य लाभते.असे ही म्हणतात की ,मकर संक्रांती दिवशी आपण जर दान केले तर ,सूर्य देव आपल्यावर प्रसन्न होतात आणि मकर संक्रांती दिवशी केलेल्या दानाचे पुण्य आपल्यासोबत कायमस्वरूपी राहते.

FAQ

मकर संक्रांती हा कोणत्या धर्मातील सण आहे ?

मकर संक्रांती हा हिंदू धर्मातील सण आहे ;परंतु देशातील इतर धर्मातील लोक देखील हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

मकर संक्रांती हा सण दरवर्षी कोणत्या तारखेला येतो ?

जास्तकरून मकर संक्रांती हा सण दरवर्षी १४ जानेवारी या दिवशी येतो ,परंतु काही वेळा हा सण १५ जानेवारी ला येतो.

मकर संक्रांती या सणाचे महत्व काय आहे ?

सूर्य जेव्हा उत्तरायन होतो ,त्यादिवशी मकर संक्रांती सण साजरा केला जातो.ज्योतिष शास्त्रानुसार सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो ,त्यादिवशी मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो.

पितामह भीष्म यांनी कोणत्या दिवशी आपला देह सोडला होता ?

पितामह भीष्म यांनी सूर्य उत्तरायन ला गेल्यानंतर माघ शुक्ल अष्टमी म्हणजे मकर संक्रांती दिवशी आपला देह सोडला होता.

मकर संक्रांती सणाला देशातील वेगवेगळ्या राज्यामध्ये कोणकोणत्या नावाने ओळखले जाते ?

मकर संक्रांती हा सण देशातील लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात.देशातील महाराष्ट्र ,कर्नाटक ,आंध्रप्रदेश या राज्यांमध्ये या सणाला मकर संक्रांती म्हणले जाते.तमिळनाडू राज्यामध्ये या सणाला पोंगल नावाने ओळखले जाते.पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये या सणाला लोहरी नावाने ओळखले जाते. आसाम राज्यातील लोक या सणाला बिहु नावाने ओळखतात.

मकर संक्रांती हा सण कशा पद्धतीने साजरा केला जातो ?

मकर संक्रांती हा सण देशामध्ये विविध पद्धतीने साजरा केला जातो.यामध्ये देशातील काही ठिकाणी या दिवशी पतंग उडवली जातात.तर काही ठिकाणी तीळ गूळ खाऊन हा मकर संक्रांती हा सण साजरा केला जातो.

मकर संक्रांती दिवशी कोणते भोजन खाल्ले जाते ?

मकर संक्रांती दिवशी गूळ घालून बनवलेली खिचडी खाल्ली जाते.

आजच्या लेखामध्ये आपण मकर संक्रांती या सणा विषयी संपूर्ण माहिती पाहिली .या दिवशी चे महत्व ,मकर संक्रांती सण कशा पद्धतीने साजरा केला जातो ? , विविध राज्यात या सणाला असणारी नावे , इत्यादी विषयी आपण संपूर्ण माहिती पाहिली.

Leave a Comment